|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

नितिन५८८'s picture
नितिन५८८ in जे न देखे रवी...
23 Sep 2015 - 11:57 am

कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं,
थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं.
बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच,
तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच.
आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं,
आम्हाला आपल उभच रहाव लागायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

बस स्टोपवर उतरल्यावर मैत्रिणींसोबत तीन कॉलेज कड निघायचं,
आम्हीपण उगाचच आपल तिच्या मग मग जायचं.
जाताना वळून तीन आमच्याकड बघायचं,
हळूच मैत्रिणींच्या कानात आमच्याविषयी काहीतरी सांगायचं,
त्या मैत्रिणीनीसुधा आमच्याकड बघून हसायचं,
हासत हासत त्यांनी वर्गात सुद्धा निघून जायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

हुशार आसल्या मुळ वर्गात तीन पहिल्या बेंचवर बसायचं,
आम्हाला काहीच येत नसल्यामुळ आम्ही आपल मागच बसायचं.
तस माग बसायला दुसर एक कारण सुद्धा असायचं,
वर्गात नुस्त तिच्याकडच बघत बसायचं.
आता वर्गात आमच लक्ष नाही हे पाहून मास्तरन आम्हाला वर्गाच्या बाहेर काढायचं,
मास्तरन वर्गाच्या बाहेर काढल म्हणून तीन आम्हाला हसायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी म्हणून तीन बस मधी बसायचं,
आतामात्र आम्हाला सुद्धा बसायला भेटायचं.
आम्ही पण मुद्दाम तिच्या बाजूच्याच सीट वर जाऊन बसायचं.
गाव आल्यावर उतरून तीन तिच्या घराकड जायचं आणि आम्ही आमच्या घराकड जायचं.
जाताना वळून तीन आम्हाला बाय म्हणायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

संध्याकाळी 'मैत्रिणीकड जाऊन येते' आस घरी तीन खोट सांगायचं,
सोबत त्या शेंबड्या बंड्याला सुद्धा घ्यायचं.
आम्ही पण रस्त्यातच बिड्या फुकत बसल्याल असायचं.
आम्हाला बिड्या फुकताना पाहून तीन रागारागात निघून जायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

दुसऱ्या दिशी संग तीन तिच्या बापाला आणायचं,
आता संग बाप आसल्यामुळ आम्हाला काहीच नाही करता यायचं.
तीन तिच्या बापासंग कॉलेजला जायचं,
आणि आम्ही आपल दुसऱ्या बसनी यायचं.
तीच लग्न जमल्याच तिच्या बापान मास्तर ला सांगायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

आता लग्न जमल्यामुळ तीन कॉलेजला येन बंद करायचं,
वर्षभर काहीच अभ्यास न केल्यामुळ आम्ही आपल परीक्षेत नापास व्हायचं.
आता परीक्षेत नापास झालो म्हणून बापान घराच्या बाहेर काढ्याच.
काहीच काम धंदा नसल्यामुळ गावात नुस्त कुत्री मारत फिरायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

काही वर्षानंतर तीन माहेरी म्हणून यायचं.
सोबत तिच्या ते तीच पाच वर्षाच कार्ट सुद्धा असायचं.
आणि त्या कार्ट्यान आमच्या हाताला धरून आम्हाला 'मामा' म्हणायचं.
सांगा आता आम्ही काय करायचं?

-- वरील कविता माझ्या ऑफिस मधल्या एका मित्राने लिहिलीये ,जी मी तुमच्या समोर सादर केली आहे

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

23 Sep 2015 - 12:02 pm | रातराणी

छानय !

नि३सोलपुरकर's picture

23 Sep 2015 - 12:54 pm | नि३सोलपुरकर

टिंब . द्यायचे राहिले वाटते शेठ.

जेपी's picture

23 Sep 2015 - 5:28 pm | जेपी

=))