"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा"
आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे.
कसे उमजले नाही मला
आज झालो मी 82 वर्षाचा
असेल मन माझे रेंगाळत
समजूनी मला 28 वर्षाचा
भूक,तहान अन इच्छा आकांक्षा
अजूनी आहेत जशाच्या तश्या
वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा
आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो
आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो
कठोर दंडक आहे हा निसर्गाचा
पराधीन आहे पुत्र मानवाचा
शोधीला मार्ग निरोगी जीवनाचा
दोन मैल नित्य चालण्याचा
आहार मोजकाच खाण्याचा
थोडी तरी विश्रांती घेण्याचा
उपाय हा निरोगी शरीरावरचा
इंटरनेट नित्य चाळण्याचा
फेसबुकावर लाईक टाकण्याचा
ट्वीटरवर प्रतिसाद देण्याचा
इमेलवरून संपर्क साधण्याचा
वाचण्याचा अन लिहिण्याचा
उपाय हा निरोगी मनावरचा
जन्म-दिवस आहे म्हणूनी
दुवा मिळेल शुभेच्छांचा
खचित होईल माझ्यावरती
उचित परिणाम मनःशांतीचा
शुभेच्छा देणार्यांचे आभार आणि न देणार्यांचेही आभार.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
14 Aug 2015 - 8:08 am | श्रीरंग_जोशी
मुक्तक आवडलं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
14 Aug 2015 - 8:22 am | खेडूत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
लिहीत-वाचत रहाण्यास शुभेच्छा...
14 Aug 2015 - 8:42 am | सनईचौघडा
!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
!असेच उत्साही आणि आनंदी रहा!
14 Aug 2015 - 9:13 am | मुक्त विहारि
हार्दिक शुभेच्छा
14 Aug 2015 - 9:29 am | उगा काहितरीच
८२ ? खरंच ?
14 Aug 2015 - 10:02 am | अत्रुप्त आत्मा
येती तू हा जोक आठवला.. आकड्यातच तारुण्य आहे.. ते असेच लाभो..
14 Aug 2015 - 10:05 am | नाव आडनाव
वाढदिवसाच्या शुभेच्छा :)
14 Aug 2015 - 10:14 am | यशोधरा
सामंतकाका, वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
14 Aug 2015 - 10:56 am | gogglya
तुम जियो हजारों साल साल के दिन हो पचास हजार...
14 Aug 2015 - 11:00 am | नीलमोहर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
14 Aug 2015 - 11:34 am | अमित मुंबईचा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
14 Aug 2015 - 11:42 am | जडभरत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
14 Aug 2015 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर मुक्तक !
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!
14 Aug 2015 - 12:03 pm | एस
अठ्ठाविसाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असेच चिरतरुण रहा!
14 Aug 2015 - 12:17 pm | तुडतुडी
आज जन्म घेतो तो उद्या वृद्ध होतो
आज सुपात हसतो तो उद्या जात्यात रडतो
कठोर दंडक आहे हा निसर्गाचा
पराधीन आहे पुत्र मानवाचा>>>
१ नंबर . खरच तुम्ही ८२ वर्षांचे आहात ? वाढदिवसाच्या शुभेच्छा
14 Aug 2015 - 12:31 pm | प्यारे१
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शतायुषी व्हा....!
14 Aug 2015 - 12:31 pm | प्यारे१
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शतायुषी व्हा....!
14 Aug 2015 - 12:52 pm | पद्मावति
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
मुक्तक खूप आवडले.
14 Aug 2015 - 1:51 pm | श्रीगुरुजी
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवेत शरदः शतम |
14 Aug 2015 - 2:01 pm | वेल्लाभट
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुम्हाला !
स्व्स्थ रहा, मस्त रहा !
14 Aug 2015 - 2:33 pm | राही
वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच. पण आपणासारखे वयोवृद्ध आज जालावर आहेत हे आमचे सद्भाग्य. कारण ८२ वर्षाचे आपले वय म्हणजे आपला जन्म १९३३ सालातला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपण चौदा वर्षांचे होतात. त्या काळातल्या आणि नंतरच्या गांधीहत्या, प्रजासत्ताकाची घोषणा, नेहरूंची लोकप्रियता, चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध, बांगलादेशनिर्मिती, राशनिंग, धान्यटंचाई, मुंबईची ट्राम, कोंकणप्रवास, प्रवासातल्या अडचणी, संपर्कसाधनांची वानवा, संयुक्तमहाराष्ट्राची निर्मिती, त्या वेळी लोकांनी केलेला दीपोत्सव, शिवसेनेचा उदय, कॉ. कृष्णा देसाईची हत्या वगैरे घटना आपल्या डोळ्यांसमोर घडल्या. जमल्यास या विषयी आपण छोटी छोटी टिपणे किंवा आठवणी लिहाव्यात. आजच्या युवापिढीस त्या रंजक वाटू शकतील. आपण मुंबईबाहेरील ठिकाणी राहात असाल तर तिथल्या आठवणी लिहाव्यात. अगदी 'मुघले आज़म'साठी किती गर्दी असे यासारख्या आठवणीदेखील वाचनीय ठरू शकतील.
14 Aug 2015 - 8:35 pm | बहुगुणी
वर लिहिलेल्या विनंतीतील प्रत्येक सूचनेला अनुमोदन, लिहाच तुम्ही सामंतसाहेब, आणि या विषयांबरोबरच, मागे तुम्हाला विनंती केली तसं, तुमच्या BARC मधील Physics मधील संशोधनाविषयीही लिहा, तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहेच, आम्हालाही ते घ्यायला आवडेल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
14 Aug 2015 - 8:55 pm | टिवटिव
अनुमोदन...
15 Aug 2015 - 1:31 am | नंदन
आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
19 Aug 2015 - 6:46 pm | सूड
+८२
{सूड उगवे (वडगांव बुद्रुक पुणे व्हाया बदलापूर)}
14 Aug 2015 - 5:20 pm | माम्लेदारचा पन्खा
तुमचा आदर्श अनुकरणीय आहे !!
जीवेत शरदः शतम |
14 Aug 2015 - 5:49 pm | अविनाश पांढरकर
वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
14 Aug 2015 - 6:22 pm | जुइ
मनोगत आवडले! असेच उत्साही रहा.
14 Aug 2015 - 6:49 pm | सुबोध खरे
८२
म्हणजे आपण २१ वर्षांचे आणी "६१ वर्षे" अनुभव.
केवढा प्रचंड अनुभव? हि शिदोरी आमच्या सारर्ख्यांच्यात वाटा. आमच्या फार कामाला येईल.
आपल्या वाढदिवसाबद्दल नम्र अभिवादन.
जीवेत शरदः शतम.
14 Aug 2015 - 7:57 pm | सौंदाळा
सामंत काका, खरं तर आजोबा म्हणायला पाहीजे. (माझ्या आजीचे वय ८३ आहे)
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा कराच.
वर कोणी तरी म्हटल्याप्रमाणे खुप जुन्या राजकीय, सामाजिक घटना, किस्से, तुमचे अनुभव आणि तुमचे तळकोकणातले वर्णन असलेले भरपुर लेख मिपावर यायची वाट बाघतोय.
14 Aug 2015 - 11:37 pm | राघवेंद्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
15 Aug 2015 - 1:29 am | रमेश आठवले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
15 Aug 2015 - 1:38 am | वॉल्टर व्हाईट
वाढदिवसाच्या शुभेच्छा. वर इतरांनी लिहिल्याप्रमाणे भारतात घडलेल्या महत्वाच्या घतनांबद्दल्चे आपले अनुभव लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडतील.
15 Aug 2015 - 1:59 am | ट्रेड मार्क
तुम्ही चक्क कॉम्पुटर एवढ्या सहज वापरू शकता आणि मराठीत लिहू शकता तेही एवढ्या उत्साहाने… आमचा सलाम स्वीकारावा.
तुमचे फाळणीच्या वेळचे अनुभव वाचायला आवडतील.
15 Aug 2015 - 9:27 am | तीरूपुत्र
"तुम्ही चक्क कॉम्पुटर एवढ्या सहज वापरू शकता आणि मराठीत लिहू शकता तेही एवढ्या उत्साहाने… आमचा सलाम स्वीकारावा."
तुम्हाला कसं काय जमत हो.वाढदिवस च्या लाख लाख शुभेच्छ!!!!!
17 Aug 2015 - 2:05 pm | चिगो
शुभेच्छा.. शतायुषी व्हा.. तुमचा उत्साह लाजवाब आहे..
17 Aug 2015 - 3:04 pm | वामन देशमुख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
17 Aug 2015 - 3:06 pm | मदनबाण
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Live: PM Narendra Modi interacts with Indian workers at ICAD
PM Modi in UAE: Abu Dhabi has deep pockets, but will it loosen purse strings for India?
17 Aug 2015 - 3:48 pm | _मनश्री_
17 Aug 2015 - 6:48 pm | ऋतुराज चित्रे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
कुतुहल म्हणुन विचारतोय, आपण वयाच्या कितव्या वर्षी संगणक शिकलात?
19 Aug 2015 - 7:10 am | श्रीकृष्ण सामंत
मी माझ्या वयाच्या 27 वर्षावर म्हणजे 1960 पासून संगणकाच्या क्षेत्रात आहे.TIFRAC (Tata Institute of Fundamental Research Automatic Calculator) calculator म्हणजे आता मिळतात ते calculator असं पटकन वाटेल.पण ह्या calculator मधे म्हणजेच मशिनमधे जवळ जवळ 3000 valves म्हणजेच व्ह्याक्यूम ट्यूबस होत्या.2000 च्यावर जरमेनियम डायोड्स होते.त्यात 12 हजारच्यावर रेझिस्टन्स होती आणि त्याची फक्त 2,048 लोकेशनची 40 bits ची फेराईट कोरची मेमरी होती..ही मेमरी मॅगन्याटीक होती.ह्या मशिनचा वापर 1960 पासून केला गेला.अगदी त्याचवेळी मी ह्या प्रोजेक्टमधे शिरकाव केला.एका शंभर बाय चाळीस फूट लांबी रुंदीच्या खोलीत ही मशिन व्यापली गेली होती.आता पंचावन्न वर्षानंतर संगणक किती पावरफूल झाले किती मिनिएचर झाले ह्याची कल्पनाच करवत नाही.संगणक evolve होत गेला आणि मी पण.(जरा गम्मत)
19 Aug 2015 - 7:52 am | श्रीरंग_जोशी
हे सर्व आम्ही फक्त संगणकशास्त्राच्या अभ्यासक्रमात थेअरीमध्ये शिकलो होतो की पुर्वी संगणक असे असायचे.
बहुधा तुम्हाला रेझिस्टर्स म्हणायचे असावे.
19 Aug 2015 - 11:05 am | श्रीकृष्ण सामंत
होय टाइपो झाला.
19 Aug 2015 - 8:09 am | यशोधरा
सही आहे! ह्या बद्दल एखादा माहितीपूर्ण लेख होऊन जाऊदेत काका.
19 Aug 2015 - 12:22 pm | ऋतुराज चित्रे
धन्यवाद सामंतकाका. तुम्ही म्हणता त्या काँप्युटरबद्दलच्या आकाराचे वडिलांकडुन ऐकले होते. घरातील पाच वॉल्व्ह्च्या २ फूट बाय १ फूट आकाराच्या रेडिओवरून त्या काँप्युटरचा आकार तेव्हा डोळ्यासमोर आला होता.
दिवाळीत मोठ्या आकाराचे फटाके फुटल्यावर विखुरलेल्या कागदांवर १११ ००० व मधेच चौकोनी छिद्र असे आढळायचे तसेच शिवणाच्या दोर्याच्या कागदी रिळांवरही असे आ़कडे व छिद्रे आढळायची. वडिलाकडे चौकशी केली तेव्हा ते टाटाच्या गणकयंत्रात (तेव्हा गणकयंत्रच म्हणायचे) वापरलेले कागद आहेत असे समजले. हे खरे आहे का?
20 Aug 2015 - 11:50 pm | श्रीकृष्ण सामंत
ऋतुराज,
जर का आपल्या वडीलांना पंच कार्डचा संदर्भ द्यायचा असल्यास तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे.संगणाकात input करण्यासाठी अशा हजारो पंच कार्डामार्फत ते केलं जायचं.IBMच्या पंच कार्ड मशिन्स यायच्या.त्यावर ही कार्ड पंच केल्यावर चौकोनी आकाराचे slots काढले जायचे आणि त्यावर १११००० असे संदर्भ दिले जायचे.ह्या कार्डामार्फत प्रोग्राम input व्हायचे.ही वापरलेली कार्ड कदाचित फटाक्यात किंवा रिळात base म्हणून वापरली जात असावीत.
21 Aug 2015 - 12:05 am | ऋतुराज चित्रे
अरे बापरे! म्हणजे आम्ही त्या काळी प्रोग्राम 'फोडत' होतो तर.
धन्यवाद, रोचक माहीती दिल्याबद्दल.
19 Aug 2015 - 12:50 pm | पद्मावति
माझ्याकडून एक विनंती . तुम्ही अमेरिकेत गेलात तेव्हाचा काळ बहुतेक लेट फिफ्टीस किंवा अर्ली सिक्स्टीस असावा असा माझा अंदाज आहे. तेव्हाचे तुमचे त्या काळातले परदेशातले अनुभव, तुम्हाला आलेल्या अडचणी याविषयी तुम्ही लिहिले तर वाचायला खूप आवडेल. त्याकाळी नवीन देशाशी तुम्ही कसं जुळवून घेतले. त्यावेळी तर मला वाटतं की आपल्या भारतीय खाद्यपदार्थ सुद्धा अगदी कमी प्रमाणात तिथे मिळत असणार. या सगळ्या चांगल्या वाईट अनुभव, आठवणींविषयी लिहिलत तर छान वाटेल वाचायला.
15 Sep 2015 - 1:58 am | वॉल्टर व्हाईट
सहमत आहे, तुम्ही या विषयावर नक्की लिहाच.
19 Aug 2015 - 5:10 pm | मधुरा देशपांडे
हा लेख उशीरा वाचला. उशीराने वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. तुमचे अनुभव वाचायला आवडेल.
21 Aug 2015 - 2:33 pm | समीरसूर
सामंत काका,
विलंबाने वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपला उत्साह थक्क करणारा आहे. मी संगणक पहिल्यांदा हाताळला १९९८ मध्ये. आपण १९६० पासून संगणकक्षेत्रात आहात म्हणजे आपले संशोधन, कार्य नक्कीच स्पृहणीय असले पाहिजे.
सगळ्यांच्या आग्रहाप्रमाणे आपले विविध अनुभव वाचायला निश्चितच आवडतील. नुकतेच मी डॉ. जयंत नारळीकरांचे 'चार नगरातले माझे विश्व' वाचून संपवले. त्यांनी या पुस्तकात वाराणसी, केंब्रिज, मुंबई, आणि पुणे अशा चार नगरात व्यतीत झालेले त्यांचे आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीने शब्दबद्ध केलेले आहे. त्यांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. त्यांचे संशोधन कार्य, भ्रमंती, भारतात आलेल्या अडचणी यावर त्यांनी त्यांच्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे.
आपल्याला असाच दांडगा अनुभव असणार यात शंकाच नाही. कृपया असे एखादे पुस्तक आपणदेखील लिहावयास घ्यावे व प्रसिद्ध करावे. मिपावर लेख टाकून आम्हा सर्वांना आपले अनुभवातून आलेलॆ शहाणपण द्यावे ही विनंती.
आणि हो, वरील प्रतिसादाप्रमाणे आपल्या अमेरिकेतील अनुभवांबद्दल, आपण तिकडे का स्थायिक झालात याबद्दल, तिकडे आपण कधी गेलात, कसे गेलात, वगैरे बद्दल (आपली हरकत नसल्यास) सांगितल्यास नवीन माहिती आणि मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद!
आणि पुन्हा एकदा विलंबाने वाढदिवसाच्या शुभेच्छा! कसा केलात साजरा वाढदिवस? वृत्तांत येऊ द्या. आणि फोटोज देखील. :-)
15 Sep 2015 - 4:37 pm | सर्वसाक्षी
सामंत काका,
विलंबाने देत असलेल्या प्रतिसादा करीता क्षमस्व! बहुधा नजरेतुन सुटले असावे.
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! असेच चिरतरुण राहा.
(आमचे काही साठीनंतर खरे नाही.)