कविता

समाधी

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
23 Jul 2015 - 11:22 am

ओली शेवाळलेली
दगडी जन्मठेप
कदंबकाठावर कोण
उसळून घेई झेप

चोरटा एक कटाक्ष
मध्यान्ही काळोखात
पेंगले निवांत नेत्र
मायाळू मंद सूरात

गारढोण श्वासस्पर्श
युगे धरला अबोला
अजागळ अजस्र देह
आतून अथांग ओला

स्पर्शून गंगामाई
घाबरे परत फिरे
दुधाळ स्तनामधुनि
पाझरती नीलहिरे

चुनखड़ी गा त्याचा
अनंत उच्छवास
सालीना मिळतो आहे
लोबानी मुखवास

कविता

.....ही मनाची अंतरे...

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जे न देखे रवी...
22 Jul 2015 - 9:36 pm

कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे
सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे...

होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे
स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे...

जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी
मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे ....

एकमेकाना इथे का आज सारे टाळती
सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे....

लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा
उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....

शांतरसकविता

पाऊस

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
22 Jul 2015 - 8:18 pm

सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या. इथे प्रकाशित करतो!

कधी पाऊस म्हणजे वाहणारे ओढे आणि रस्त्यांवरती पाणी,
तर कधी थांबलेल्या गाड्या आणि रेडिओवरची गाणी!

कधी पाऊस म्हणजे पत्र्यांचा आवाज आणि कोसळणाऱ्या सरी,
तर कधी नाचणारी मुले आणि भिजण्यातली गम्मत खरी!

कधी पाऊस म्हणजे नवीन रेनकोट आणि खिश्याला लागलेली कात्री,
तर कधी कोणाचे चिंब ओले कपडे आणि हरवलेली छत्री!

कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी,
तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी…

कविता

सरिंवर सरी आल्या ग...

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
22 Jul 2015 - 5:08 pm

कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो.

कलावाङ्मयकविताआस्वादविरंगुळा

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
16 Jul 2015 - 9:38 am

पहा कशी लोळते सुखाने उधारवारी
अजून खस्ताच खात आहे दुकानदारी

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले
निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी

खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे
उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी

शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही
उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी

बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते
मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी

डॉ.सुनील अहिरराव

gajhalहे ठिकाणकविता

बदसुरत न बना हकीकत

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
16 Jul 2015 - 6:27 am

कविता, लेख, कथा कितीही उत्कृष्ट असोत, जीवनाला हुबेहूब कोणीच रेखाटू शकत नाही. अगदी सिद्धहस्त लेखक देखील.

बुरबुराते शरारती झरनों की मासुमियत
या खिलखीलाती हरीयाली की तबस्सुम
समिंदर तरन्नुम गाता, फिरभी गुमसुम
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |

झुर्रीयोमें दबी सुष्क आंखें, खोजती शबाब
शगाफोंसे लदा चरगाह, ताकते फ़व्वार--------------------*शगाफे-cracks *चरगाह-field
दर्यामे आवाराह कश्ती, तलाश साहिल की
बदसुरत न बना फिजूल, गझलोमें ढाल इन्हे |

मुक्त कविताकविता

हवा एक पाऊस..........

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
14 Jul 2015 - 10:36 pm

हवा एक पाऊस

मला गाफिल पाहुन
अवचित बरसणारा...
लटक्या रागावर माझ्या
लडिवाळ हसणारा...

हवा एक पाऊस

ओळखीच्या खुणांवर
उगीचच रेंगाळणारा...
ओल्या वाटांवरल्या
पाउलखुणा जपणारा...

हवा एक पाऊस

बेधुंद उत्कट सरींनी
मला वेढणारा...
घेऊनी मिठीत मजला
अलवार शहारणारा...

हवा एक पाऊस

दूर माळरानात
रातराणीस छेडणारा...
मालवून चांदण्या सार्‍या
रात्र नशावणारा...........

हवा एक पाऊस

फक्त माझ्या अन
माझ्यासाठीचा झरणारा
पसरलेल्या आभाळातुन
ओंजळीत विसावणारा.........

कविता

वर्तुळ

शब्दवेडी's picture
शब्दवेडी in जे न देखे रवी...
14 Jul 2015 - 10:28 am

मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न …
चू. भू. दे. घे.
प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित

वर्तुळ

वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही
आयुष्य व्यापून टाकेल इतका
कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही ….

अपुरेपणाच्या विस्तृत्वाला
कोणतीच रेषा छेदत नसते
कितीही 'सुटावं' म्हटलं
प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….

वर्तुळाच्या गोलाईचा
कोणताच एक आकार नाही
मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं
कोणतच एक सूत्र नाही ….

काहीच्या काही कविताकविता

राधाबाई

प्रशु's picture
प्रशु in जे न देखे रवी...
13 Jul 2015 - 10:39 am

राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही !
नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई !
अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !
गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका !
वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका !
आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!

फ्री स्टाइलकविता

वादळ

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
13 Jul 2015 - 1:22 am

वादळ उठत..
एक मनात... एक दर्यात
पड-झड़ होतेच न दोघात
मोठी कुठली? सांग माझ्या कानात

मनात... भावना उध्वस्त;
दर्यात जीव अस्वस्थ!
मनातल्या नात्यात द-या बनतात;
सागरातल्या द-या भरून निघतात!

दर्याच्या वादळात आधार मनाचा
मनाच्या वादळात आधार कोणाचा?
सारंगाची नजर किनारा शोधते
उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

कविता