राधाबाई

प्रशु's picture
प्रशु in जे न देखे रवी...
13 Jul 2015 - 10:39 am

राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही !
नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई !
अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !
गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका !
वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका !
आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास !
अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस !
मरणासन्न होऊनी पडलीस, प्रसंग बाका बाई !!
राधाबाई, तुझं काही खरं नाही!!
ऐकून काक वचन राधिका हासलीसे मंद !
पिया मीलन ची आस ही इतूकि ह्या डोळ्यांचा छंद !
आर्जव इतुके नेत्र सोडूनी बाकि सारे खाई !
राधाबाईचं आता खरच काही खरं नाही !!!
:-प्रशू

फ्री स्टाइलकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Jul 2015 - 10:20 am | पैसा

कशाचे भाषांतर आहे का?

काही कन्सेप्ट समजल्या नाहीत.
भद्रा-अनया यांचा क्रिष्ण चरित्रात कुठे उल्लेख नाही
काक वचन :- काक कुठुन आला? वरती तर त्याचा उल्लेख नाही?
कृष्ण मुरारी सवे आठ बायका :- साठ सहस्र होत्या ना?
गाळी मारे सास :- म्हणजे काय?
आर्जव इतुके नेत्र सोडूनी बाकि सारे खाई:- म्हणजे काय?
कविता खरेच समजून घ्यायची उत्सुकता आहे. म्हणून विचारले. चेष्टा समजू नये क्रिपया.
क्रिष्ण आणि क्रिपा हे शब्द कसे टैपायचे?

कविता खरेच छान आहे. म्हणून समजून घ्यायची उत्सुकता. पुन्हा सांगतो - खौचटपणा समजू नये.

जडभरत's picture

14 Jul 2015 - 10:34 am | जडभरत

अरेच्चा! साठ नव्हे! सोळा सहस्र!!! गलती मुआफ हो किशन भगवान!

पद्मावति's picture

15 Jul 2015 - 7:16 pm | पद्मावति

काव्य खरोखर छान आहे. काव्याची मूळ संकल्पना सुरेखच आहे. पण काही शब्द, ओळ कळले नाही.

उदाहरणार्थ- कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा !
पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा !

आर्जव इतुके नेत्र सोडूनी बाकि सारे खाई.

गाळी मारे सास -इथे टंकलेखनात चुक झाली आहे का? (गाली मारें सांस--सासू टोमणे मारते असे वाचायचे आहे का)

मला स्वत:ला काही शब्द समजले नसले तरी कवितेचा अतिशय सुंदर आशय आहे.

बाकी जडभारत यांनी प्रतिसादात जे सांगितले तसच मला पण सांगायचे आहे की कविता खरच छान आहे म्हणून समजावून घेण्याची उत्सुकता आहे.