सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या. इथे प्रकाशित करतो!
कधी पाऊस म्हणजे वाहणारे ओढे आणि रस्त्यांवरती पाणी,
तर कधी थांबलेल्या गाड्या आणि रेडिओवरची गाणी!
कधी पाऊस म्हणजे पत्र्यांचा आवाज आणि कोसळणाऱ्या सरी,
तर कधी नाचणारी मुले आणि भिजण्यातली गम्मत खरी!
कधी पाऊस म्हणजे नवीन रेनकोट आणि खिश्याला लागलेली कात्री,
तर कधी कोणाचे चिंब ओले कपडे आणि हरवलेली छत्री!
कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी,
तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी…
प्रत्येकासाठी पाऊस वेगळा आणि वेगळे त्याचे पाणी,
थोडे मी हि भिजावे म्हणतो पण सोबत असावे कोणी!
आशिष
प्रतिक्रिया
23 Jul 2015 - 7:30 pm | रातराणी
छान.
23 Jul 2015 - 7:48 pm | दमामि
क्या बात!!!!!
24 Jul 2015 - 3:29 pm | शब्दबम्बाळ
धन्यवाद! :)
24 Jul 2015 - 8:05 pm | पद्मावति
कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी,
.....टचिंग.तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी…
26 Jul 2015 - 12:55 am | एक एकटा एकटाच
कधी पाऊस म्हणजे कोणासाठी तिच्या पहिल्या भेटीची निशाणी,
तर कधी कोणाच्यातरी आठवणीने डोळ्यांतून ओघळते पाणी…
हे मस्तच