कविता

पैंजणे

सटक's picture
सटक in जे न देखे रवी...
26 Jun 2015 - 11:20 am

कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे
वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे !

उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे
प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे !

आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे
थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे !

पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे
एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !

शृंगारकविता

फैज अहमद फैज च्या एका कवितेचा अनुवाद

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 7:06 pm

गझलसम्राट सुरेश भटांनी ज्यांना आपलं दैवत म्हटलं आहे त्या फैज अहमद फैज यांची खासियत म्हणजे त्यांच्या शायरीतला अद्भुतरम्य (romantic) आणि क्रांतिकारी (revolutionary) आशयांचा अतिशय सुंदर मिलाफ. त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे. सहजच आवड म्हणून:

काव्याचा विषय

विझत चालली आहे उदास, धुमसत जाणारी सांज
न्हाऊन निघेल आता चांदण्याच्या झऱ्यात रात
आणि आसुसलेल्या डोळ्यांची इच्छा पूर्ण होईल
आणि त्या हातांना स्पर्श करतील हे तहानलेले हात

कविता

आंगणवाडी ते ....

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 3:29 pm

नमोच्या जपाने काँगी हरले,
खेळ तोच हो,
फक्त खेळाडू बदलले ,

पल्ला माझा हजार कोटींचा,
घेवु द्या ना मोठी उडी,
आताशी हडपलेत फक्त २०० कोटी,
ही तर नव्हे जगबुडी,

वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल,
बाळ गोपाळांच्यात मी रमले,
कधी, कुठे, कशी,
खायची चिक्की,
आंगणवाडीनेच शिकवले,

तुझा मोठा घोटाळा की माझा ,
हे ठरवेल जनता किंवा समिती,
तु आधी मी आधी करत,
भरुन टाकुया स्वीसची खाती ,

पापा होते तो कहते ,
बडा नाम करेगी बेटी मेरी,
पण बाबा गेला दुर देशी
न ये तो माघारी,

बालसाहित्यभावकविताहझलभयानकधोरणमांडणीकविता

जातीयेसच तर जा...!!!

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 11:20 am

जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ..
बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग..
अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार..
अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार ..
उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा..
विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा..
अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने..
कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे..
हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे.. निपचित शांत रान..

कविता

पाऊस

सटक's picture
सटक in जे न देखे रवी...
24 Jun 2015 - 8:06 pm

रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे !
निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !!

सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे !
अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !!

जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे !
लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !!

बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे !
धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !!

या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे !
जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!

कविता

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
24 Jun 2015 - 8:40 am

नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?

गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?

हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?

सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?

अभय-काव्यअभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीवाङ्मयकविता

पाऊस म्हणजे?

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
22 Jun 2015 - 11:49 pm

पाऊस म्हणजे?

पाऊस म्हणजे
उल्हास मनी दाटलेला,
निसर्गाच्या सानिध्यात
मन वेडा फुललेला।

पाऊस म्हणजे
चौफेरे दाटलेली हिरवळ,
क्षणात दूर करते
मनात आलेली मरगळ।

पाऊस म्हणजे
उत्साह शरीरात दाटलेला,
रखडलेली कामे करण्यास
बोनस वेळ मिळालेला।

पाऊस म्हणजे
उगाच सुट्टी मिळालेली,
विसरून चिंता कामाची
कुटूंबासोबत घालवलेली।

पाऊस म्हणजे
चिखलाचाच राडा सारा,
उग्रट दर्प हवेत अन्
वाटेभर कचरा पसारा ।

कविता

रानी

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
22 Jun 2015 - 11:44 pm

नथं नाकातं खुलली
लाली गालात फुलली
कई होटातं ऊलली
कोन्या जगातं भुलली

खाली झुकली नजर
कायं दिसलं गोजरं
मले पाऊनं खरचं
तूह्यं हासनं लाजरं

तुले कोनाची कदरं
डोई घेतला पदरं
चालू नकोसं तर्तरं
जीवं उळते वधरं

पापन्याची फळंफळं
पदराची सळंसळ
कायं मनी गळंबळं
सांग मले घळंघळं

डूलं डुलतातं कानी
मानं सुरई च्या वानी
मोठ्या मोठ्या डोयातनी
रूपं साकारलं रानी

कविता

पाऊस पडून गेल्यावर

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
20 Jun 2015 - 4:56 pm

खेळ खेळते ऊन सावली
पाऊस पडून गेल्यावर
गवतावरचा थेंब चमकतो
किरणांची भेट झाल्यावर

पाऊस पडून गेल्यावर
पाखरांची किलबिल झाली
नव्या नवरी सारखी धरती
हिरवळ लेवून सजली

मन भारावून गेले
पाऊस पडून गेल्यावर
सुखावून मी जातो
गारव्याचा स्पर्श झाल्यावर

हरवून जातो शब्दात
पाऊस पडून गेल्यावर
नकळत सुचतात शब्द
कविता सजते कागदावर

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०१५

९८९२५६७२६४

कविता

पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
20 Jun 2015 - 2:56 pm

खेड्यातला जाणता पाऊस
जबाबदारीनं गाव रान भिजवणारा,
म्हातार्या कोतार्यांची अलाबला
नी पिकांची दुवा घेणारा ....!!

शहरातला अप टु डेट पाऊस
ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा
नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी
गप गुमानपणे ऐकणारा...!!

घाटातला धटिंगन पाऊस
निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा ,
धबधब्यांना जागं करून
आनंदानं नाचविणारा....!!

बागेतला खट्याळ पाऊस
रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा ,
प्रेमीकांची भिड चेपायला
सजल हस्ते मदत करणारा...!!

भावकविताकविता