नमोच्या जपाने काँगी हरले,
खेळ तोच हो,
फक्त खेळाडू बदलले ,
पल्ला माझा हजार कोटींचा,
घेवु द्या ना मोठी उडी,
आताशी हडपलेत फक्त २०० कोटी,
ही तर नव्हे जगबुडी,
वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल,
बाळ गोपाळांच्यात मी रमले,
कधी, कुठे, कशी,
खायची चिक्की,
आंगणवाडीनेच शिकवले,
तुझा मोठा घोटाळा की माझा ,
हे ठरवेल जनता किंवा समिती,
तु आधी मी आधी करत,
भरुन टाकुया स्वीसची खाती ,
पापा होते तो कहते ,
बडा नाम करेगी बेटी मेरी,
पण बाबा गेला दुर देशी
न ये तो माघारी,
जर खाते राहता रिकामे,
होऊ कशी मी उतराई,
पद उतार होण्याची ,
मला हो कसली घाई.
प्रतिक्रिया
25 Jun 2015 - 4:50 pm | टवाळ कार्टा
:)
25 Jun 2015 - 4:52 pm | विशाल कुलकर्णी
माफ करा पण 'काव्यरस' निवडताना तुम्ही 'हझल' हा पर्याय देखील निवडलेला दिसतोय. हझल ही विनोदी असली तरी असते गझलच. तेव्हा तिला गझलेचे सर्व नियम लागू होतात. तेव्हा ही हझल नाहीये.