निरोप........
आभाळही आज जरा भरुन आलयं
डोळ्यांमध्ये आठवणींचा पाऊस दाटलायं
विशेष असं काही नाही, फक्त आज एक बाप
आपल्या मुलीला निरोप देऊन आलायं
साताजन्मांची पुण्याई एकसाथ फळाला आली
जेव्हा एक इवलिशी नाजुक परी माझ्या पदरी आली
स्मरते तुझ्या चिमुकल्या बोटांची पकड घट्ट
विश्वासावर जिच्या तुझी माझ्याशी नाळ जोडली गेली
तुझ्यावर ठरवूनही कधी मला नाही चिडता आले
तुझ्या लाडीगोडीने सदा माझ्या रागावर मात केली
नाही घातला कधी तडजोडीचा लगाम तुझ्या हौसेला
केवळ तुझ्या हट्टापायी लग्नाचीही सगळी सरबराई केली