अवघ्या जगाला
नको त्याची हाव
आरोग्याचा ठाव
घेतो कोण
ठेविले अनंते
तैसे न रहावे
नेटके ठेवावे
शरीरासी
पायात सामर्थ्य
हातामधे बळ
स्नायूंना हो पीळ
असावाच
असो जिम किंवा
असो खोली छोटी
असावी सचोटी
व्यायामात
कुणी उचलती
वजने ही फार
संसाराचा भार
पुरे कुणा
वेल्ला म्हणे जेथे
सहा बिस्किटे
पहा असे तेथे
पहिलवान
करावेच अॅब्स
भले प्लँक बिंक
नेहमीच थिंक
पॅाझिटिव्ह
करावी न व्यर्थ
जनाचिया पर्वा
पहा आणि ठरवा
आरशात
आरोग्यचि एक
उद्दिष्ट असावे
आपण झटावे
त्याच्यासाठी
जरी देव पूर्ण
करेल कामना
संकटी सामना
स्वतःचाच
जरी हे न रागे
खवळेल रक्त
रोखण्या सशक्त
असावेच
जरी हे शरीर
मनाच्या हवाली
मनाची खुशाली
शरीरात
व्यायामाची शिस्त
बाळगावी चित्ती
शरीर संपत्ती
चिरंतन
नको मद्य आणि
धुराचिया आस
प्रकृतीचा -हास
कशासाठी
पैसा मिळवावा
व्हावे न अधीन
आरोग्यचि धन
जाणावे जी
पुढे जावे मात्र
करावी न स्पर्धा
आनंदचि अर्धा
होई त्याने
वेल्ला म्हणे जोही
अंतर्बाह्य स्ट्रॉंग
तोचि लास्ट लॉंग
याद राखा
- अपूर्व ओक
आमचे आदर्श
प्रतिक्रिया
27 Jun 2015 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार
बजरंग बली की जय....
पैजारबुवा,
27 Jun 2015 - 3:35 pm | पद्मावति
आवडल्या ओव्या. मस्तं...
27 Jun 2015 - 7:42 pm | विवेकपटाईत
आवडल्या, मस्त पण वाचता वाचता जो व्यायाम होतो त्याला काय म्हणतात....
27 Jun 2015 - 7:50 pm | टवाळ कार्टा
लय भारी
27 Jun 2015 - 7:53 pm | मधुरा देशपांडे
मस्त ओव्या.
27 Jun 2015 - 9:44 pm | अत्रुप्त आत्मा
वाचुनी ओव्या
बसती नाना चाव्या
अतृप्त म्हणे घेती
ठाव मनाचा
27 Jun 2015 - 10:04 pm | सटक
स्ट्रॉंग बॉडीमध्ये
राहे स्ट्राँग मन
करा रे चिंतन
आर्नोल्ड!!
28 Jun 2015 - 3:06 am | बोका-ए-आझम
तुम्हाला दाद म्हणून हा एक अभंग पेश-ए-खिदमत आहे -
प्रेमभंग होता
करावा व्यायाम
गाळावाच घाम
जिममध्ये!
एक गेली तरी
दुसरी मिळेल
तशीपण बनेल
पर्सनॅलिटी!
सर्किट करावे
ट्रेडमिलवर धावावे
सायकलिंग करावे
कार्डिओव्हॅस्क्युलर!
मग अपचन आमांश
हृदयविकार
नाही हो होणार
वेल्ला म्हणे!
28 Jun 2015 - 9:26 am | वेल्लाभट
जमलाय ! क्या बात. उताराच सांगून टाकलात प्रेमभंगाचा :)



हे बघा
28 Jun 2015 - 9:37 am | अमितसांगली
प्रेमभंग होता
करावा व्यायाम
गाळावाच घाम
जिममध्ये!
एक गेली तरी
दुसरी मिळेल...
28 Jun 2015 - 9:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
विचार हा बाणवावा मनी, दुर्बलाचा नसे कोणीही धनी
चिमण म्हणे व्हा बलोपासनी, राहुनी सदा निर्व्यसनी ||१||
छातीपुढे लोंबकाळे ढेरी, अवकाळी आमंत्रण यमाघरी
नियमे व्यायाम जो करी, बळकट त्याची आयुष्यदोरी ||२||
उचलुनी वजने मारुनी जोर, बनवावे दंड लोहापरी थोर
बलोपासने करावे दुर्बलांचे रक्षण, शक्तींपासुन त्या असुर ||३||
शक्तीउपासना करोनी नित्य, बनले रामदास ते समर्थ
आचरुनी हे सत्य, द्यावा जीवनास नवा अर्थ ||४||
चिमणव्यायामग्रंथावली खंड- ४२!!
28 Jun 2015 - 9:28 am | वेल्लाभट
हरिहरि..... ! वा बुवा !
29 Jun 2015 - 7:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
_/\_ आपली आणि आत्मुगुर्जींची कृपा _/\_
28 Jun 2015 - 9:37 am | अमितसांगली
मस्त जमुन आलय सगळ...
28 Jun 2015 - 9:52 am | मदनबाण
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
28 Jun 2015 - 10:22 am | उगा काहितरीच
चला आता करायचीच सुरूवात !
28 Jun 2015 - 11:28 am | खटपट्या
मुळ ओवी आणि प्रतिसादातील ओव्या जबरदस्त.
28 Jun 2015 - 11:54 am | अजया
मस्त मस्त.वरिजनल आणि प्रतिसाद पण!
28 Jun 2015 - 11:59 am | सविता००१
सगळ्या ओव्या मस्त
29 Jun 2015 - 6:18 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली
29 Jun 2015 - 2:51 pm | पथिक
मस्त!
29 Jun 2015 - 3:29 pm | सूड
तिकडे लिहीलेलं तेच लिहीलंय असं समजा वेल्लाकाका!! ;)
29 Jun 2015 - 3:31 pm | स्पा
वववावववव