पाऊस.... .वेगवेगळा •○●¤°
खेड्यातला जाणता पाऊस
जबाबदारीनं गाव रान भिजवणारा,
म्हातार्या कोतार्यांची अलाबला
नी पिकांची दुवा घेणारा ....!!
शहरातला अप टु डेट पाऊस
ऑफीस शाळांच्या वेळेत हमखास येणारा
नौकरीदारांच्या शिव्या नी पालकांची बोलणी
गप गुमानपणे ऐकणारा...!!
घाटातला धटिंगन पाऊस
निर्वस्त्र, निर्लज्ज कसाही कोसळणारा ,
धबधब्यांना जागं करून
आनंदानं नाचविणारा....!!
बागेतला खट्याळ पाऊस
रेंगाळलत गुलाबी होवून पडणारा ,
प्रेमीकांची भिड चेपायला
सजल हस्ते मदत करणारा...!!