जातीयेसच तर जा...!!!

वटवट's picture
वटवट in जे न देखे रवी...
25 Jun 2015 - 11:20 am

जातीयेसच तर जा.. पण बरंच काही राहिलंय बघ..
बारमाही ग्रीष्म, भारवाही श्रावण.. अन चुकचुकणारं जग..
अर्ध्यातच थांबू पाहणारी मैफिल.. अर्धवट भैरवी.. लांबलेला मल्हार..
अस्तित्वावरच कोरल्या गेलेल्या तुझ्या खुणा.. काळाचे बदलत जाणारे संदर्भ.. आणि.. सुन्न गंधार ..
उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा..
विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा..
अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने..
कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे..
हुळहुळलेले तळे.. तळमळलेले डोळे.. निपचित शांत रान..
खूप आतलं ऐकायला आसुसलेले कान..
अगदी ढवळून निघालेला माझ्या मनाचा तळ..
माझं दार ठोठावत बसलेलं ते वादळ..
नावंही घेत नाहीये, अजून तिथून उठायचं ..
थोडं राहिलंय बहुतेक, माझं आभाळ अजून फाटायचं..
.
.

अजून काय बरं.. अगं ते संध्यारंगात बेमालूम मिसळून आता विरक्तीचा आव आणणारे अश्रू राहिलेच कि....
आणि तिला विसरून कसं चालेल.. अगदी माझ्याही नकळत लागणारी तुझी "उचकी...."
एकदाही होऊ दिली नाही चूक.. तिनं मी तुला विसरू देण्याची...
आणि दोघांनी मिळून डोळ्याखाली कोरलेल्या लेण्याची..
आणि.. अपूर्ण राहिलेल्या बर्याच कविता.. त्यांचा तर हिशोब कसा मांडू..?
आणि त्यातून काळाला निमंत्रणे कशी धाडू..?
भूतकाळाला, भविष्यकाळाला आणि वर्तमानाच्या भानाला..
कळ्यांनी उमलून येण्यासाठी गाऊ वाटणारया गाण्याला..
ह्या असल्या ताटकळत्या प्रश्नांना मिळणारी मौनांकित उत्तरं..
आणि मग हळहळती संध्याकाळ आणि तळमळती रात्र..
.
.
अजून बरंच काही निघेल बरं अगदी काढायचंच म्हटलं तर..
पण मासांत गोंदवलेलं अक्षर नाही खोडता येत, कितीही खोडायचंच म्हटलं तर..
अवघड आहे ह्या सार्यांसोबत धरून राहणं तग...!
.
.
.
जातीयेसच तर जा... पण........ बरंच काही राहिलंय बघ..!

-चेतन दीक्षित

कविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

25 Jun 2015 - 11:49 am | रातराणी

भन्नाट! प्रचंड आवडली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2015 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जियो... ! हो हो, जायचं तर जा म्हणावं.
आम्ही आमचं पाहून घेऊ.
आवडली कविता.

(आपल्या नावासहित कविता वाट्सपवर फ़ॉरवर्ड करतो)

-दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब तुमचा प्रत्येक प्रतिसाद खूप उत्साह वाढवणारा असतो… खूप खूप आभारी आहे…

अनुप ढेरे's picture

25 Jun 2015 - 12:10 pm | अनुप ढेरे

अप्रतिम!

यशोधरा's picture

25 Jun 2015 - 12:11 pm | यशोधरा

आवडली.

मस्त एकदम! अगदी खरंच सगळं जग उभं केलंत 'त्याचं' :)

चुकलामाकला's picture

25 Jun 2015 - 12:39 pm | चुकलामाकला

प्रचंड आवडली!

नाखु's picture

25 Jun 2015 - 12:45 pm | नाखु

"जीवघेण्या " कवीतासाठी मिका-गणेश्याची कटकट होती आता ही "वटवट" !!!! भोगा!

मूळ अवांतर : जब्री कवीता अगदी आतून आलेली. पुलेशु

मिकाग पंखा
नाखु

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2015 - 12:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

फार म्हणजे फारच आवडली

पैजारबुवा,

विशाल कुलकर्णी's picture

25 Jun 2015 - 1:05 pm | विशाल कुलकर्णी

वाह...सुंदर !!

खेडूत's picture

25 Jun 2015 - 1:10 pm | खेडूत

कविता खूप आवडली !

सस्नेह's picture

25 Jun 2015 - 3:56 pm | सस्नेह

तगमग पोचली !!

मित्रहो's picture

25 Jun 2015 - 4:16 pm | मित्रहो

मस्त कविता. खूप म्हणजे खूप आवडली

वेल्लाभट's picture

25 Jun 2015 - 4:20 pm | वेल्लाभट

कड्ड्डाक्क !

अजया's picture

25 Jun 2015 - 4:47 pm | अजया

मस्त कविता.आवडली.

सदस्यनाम's picture

25 Jun 2015 - 5:02 pm | सदस्यनाम

मस्तच हो. भारीतली चीज एकदम.
लिहित रहा.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jun 2015 - 5:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

उतू जाऊ पाहणारे अनावर कढ.. चंद्राचं हितगुज.. चांदण्याचा पसारा..
विस्कटलेला भूतकाळ.. ढासळणारी संध्याकाळ.. घुसमटलेला वारा..
अस्ताव्यस्त रात्र.. अस्वस्थ गात्रं.. उद्ध्वस्त स्वप्ने..
कळ्यांभोवती रेंगाळणारे, प्राक्तनाचे नं सुटलेले उखाणे..
आणि.. अपूर्ण राहिलेल्या बर्याच कविता.. त्यांचा तर हिशोब कसा मांडू..?

पण मासांत गोंदवलेलं अक्षर नाही खोडता येत, कितीही खोडायचंच म्हटलं तर..

हे मस्तच... आवडली.

एक एकटा एकटाच's picture

25 Jun 2015 - 5:43 pm | एक एकटा एकटाच

छान आहे

सुंदर!! ठेहेराव मस्तच!!

मधुरा देशपांडे's picture

25 Jun 2015 - 8:32 pm | मधुरा देशपांडे

आवडली.

विशाखा पाटील's picture

25 Jun 2015 - 9:14 pm | विशाखा पाटील

वा! शब्द, लय, भाव...सुरेख!

वटवट's picture

26 Jun 2015 - 10:31 am | वटवट

सर्व सहृदय प्रतिसादकर्त्यांचा मनापासून आभारी आहे…. आभाळभर धन्यवाद… :)

वपाडाव's picture

26 Jun 2015 - 1:40 pm | वपाडाव

ह्या वातावरणात फक्त मी आणि मी, निराशा, हातात एक मद्याचा ग्लास, तिची आठौण अन काळीज कुरतडणारी रात्र...

जियो... जियो...

कौशिकी०२५'s picture

26 Jun 2015 - 5:09 pm | कौशिकी०२५

अतिशय आवडली कविता वटवट..खूप छान..

ही कविता म्हणजे अरिजित सिंगच्या गाण्यासारखी आहे. आताच माझा बारावा ब्रेकअप झाल्यासारखा फील आला. आता चहा घेऊन यायलाच हवं.

चिगो's picture

26 Jun 2015 - 7:47 pm | चिगो

वियोगाचं किंवा निकट भविष्यात जो स्प्ष्ट दिसतोय, अश्या वियोगाचं दु:ख अत्यंत टोकदारपणे जाणवतंय.. आजच गुलजारवर चर्चा आणि 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड है'च्या भावार्थाशी जवळ जाणारी ही कवितापण आजच वाचायला मिळावी, हा विलक्षण योगायोग आहे..

ही कविता वाचता-वाचता ५०फक्त ची ही कविता आठवली, आणि खपली निघाली एका जुन्या घावावरची..

वटवट's picture

2 Jul 2015 - 12:03 pm | वटवट

व्वा..

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jun 2015 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा

आवडली

वटवट's picture

27 Jun 2015 - 1:47 pm | वटवट

सर्वांचे मनापासून आभार