मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न …
चू. भू. दे. घे.
प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित
वर्तुळ
वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही
आयुष्य व्यापून टाकेल इतका
कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही ….
अपुरेपणाच्या विस्तृत्वाला
कोणतीच रेषा छेदत नसते
कितीही 'सुटावं' म्हटलं
प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते ….
वर्तुळाच्या गोलाईचा
कोणताच एक आकार नाही
मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं
कोणतच एक सूत्र नाही ….
गुरफटलेल्या आकृत्यांना
खरंतर स्वत:ची नावंच नसतात
आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना
पत्यांना, गावंच नसतात ….
- शब्दवेडी
प्रतिक्रिया
14 Jul 2015 - 10:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
फारच छान, आवडली रचना..
14 Jul 2015 - 10:41 am | जडभरत
मला वाटतं दोन्ही ओळींच्या मध्ये तरी हा शब्द आवश्यक आहे.
14 Jul 2015 - 10:43 am | क्रेझी
मला पण असंच वाटलं पण कुठल्या वृत्तातली वगैरे कविता असेल तर माहित नाही..कवयित्रीने खुलासा करावा.
14 Jul 2015 - 10:57 am | शब्दवेडी
क्रेझी
पहिलीच कविता आहे. जाणीवपूर्वक वृत्तामध्ये लिहिलेली नाही. कदाचित जाणकार मदत करू शकतील.
14 Jul 2015 - 11:36 am | जडभरत
नाही, त्यांनी एक विनोद केलेला आहे. व्रित्त म्हणजे वर्तुळ, अशी कोटी आहे ती.
14 Jul 2015 - 10:49 am | जडभरत
नवीन आगमनाबद्दल स्वागत करतो. कविता चांगली आहे. शेवटच्या २ ओळी जरा अजून परिणामकारक करता आल्या असत्या तर चांगले!
14 Jul 2015 - 10:55 am | शब्दवेडी
हो… हे जास्त छान वाटेल . बदलते.
14 Jul 2015 - 11:04 am | तिमा
वर्तुळात फार फिरु नये
शिळेपणा दाटल्यावर
टॅजंट बनून निघून जावे
नव्या वर्तुळाच्या शोधात
14 Jul 2015 - 11:52 am | शब्दवेडी
तिमा
हाहाहाहा
प्ण आयुष्याचं वर्तूळ असं सहजासहजी थोडीच मोडता येतं....
14 Jul 2015 - 12:29 pm | जडभरत
हे वाक्य खूप म्हणजे खूप आवडलं. आयुष्याच्या चक्रात भिरभिरत राहणारा जीव, त्याची इच्छा असो वा नसो, हे वर्तुळ सोडून बाहेर जाऊ शकत नाही. यालाच म्हणायचं मायाजाल. जे काही थोडके लोक हे वर्तुळ भेदून जातात त्यांनाच तर लोक डोक्यावर घेतात क्रिष्ण, ख्रिस्त, बुद्ध, तीर्थंकर म्हणून.
14 Jul 2015 - 12:06 pm | मदनबाण
आवडली... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
14 Jul 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा
कवीता आव्डली...मला थोडा कच्चा मसालापण दिसतोय ;)
14 Jul 2015 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा
आवडली कविता. फक्त...
आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना
पत्यांना, गावंच नसतात …. या ऐवजी आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना
भू-मितींचे , गावंच नसतात …. हे कसं वाटतय पहा बरं. .. नै ...म्हणजे रुपकाला धरलय त्यातच पूर्णविराम दिला तर शेवटी ॥औम शांति:शांति:शांति:॥ म्हणायला कसं ग्गा ग्गार वाटेल..म्हणून सुचवलं.
14 Jul 2015 - 5:13 pm | जडभरत
सुंदरच अत्रुप्त भाऊ!
आता शेवट परीपूर्ण दिसतोय!
नादभरीच!
16 Jul 2015 - 12:14 pm | शब्दवेडी
अत्रुप्त
बदल खूप छान सुचवलात.जरूर बदलते.
सर्वांचे आभार!
14 Jul 2015 - 5:15 pm | जडभरत
ते कै अस्तंय न्हवे
ज्ञानान्जनशलाकया, अर्धोन्मीलितम नेत्रम, वगैरे वगैरे तेच खरे
शेवटी गुरुजीना यावे लागले.
15 Jul 2015 - 12:16 pm | एक एकटा एकटाच
चांगली आहे
पुढिल लिखाणास शुभेच्छा
आणि मीपावर स्वागत