सुंदरीचे ओझे
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले.
तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.