( स्टार्कची लेकरे )
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )
एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )
एवढ्यात महाभारताशी संबंधित काही लेख वाचत होतो. जाणकारांमध्ये महाभारत कालासंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की महाभारताचे युद्ध ऑक्टोबर महिन्यात घडले. (त्यावेळेस ख्रिस्ती कालगणना अस्तित्वात नव्हती पण लोकांना नीट समजावे म्हणुन ऑक्टोबर लिहिण्याची पद्धत आहे.) महाभारत मुळात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. पण बाकीच्या तारखांबद्दल एकुणात गोंधळच आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की कृष्णाचा जन्म २७ जुलैचा. ही तारीख काढण्यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता महाभारतावर एक लेख लिहायचा विचार पक्का केला.
डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम
मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले.
ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो.
सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो.
यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो.
श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1
श्री निरंजन रघुनाथ चरित्र
माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड सहज हाती लागले. ... ते नेमके आज सहज अन्य काही दस्तावेज पडताळताना दिसले. व हे उर्वरित लेखन त्याला जोडून हे वाचकांना सादर.
जन्म – कळंब, परळी वैजनाथजवळ, मराठवाडा
शके 1704, कार्तिक शु.8 (इ.स.1782) ते भाद्रपद शु.11(इ.स.1855)
पूर्वाश्रमीचे नाव - अवधूत
(मिपावर)
जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !)
जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …)
जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! )
तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ?
तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ?
तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ?
श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1
पावसात जळाया लागलो...
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।।
सक्काळी सक्काळी उठून
ब्रशला पेस्ट मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। १ ।।
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। २ ।।
हाफिसात निघताना
बुटाची लेस मी बांधली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ३ ।।
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ४ ।।