ह्ये वागनं बरं नव्हं
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत |
आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||
गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली
पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला
आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||
गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय,
गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि
आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||
समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला