अश्वत्थामा-2

निलरंजन's picture
निलरंजन in जनातलं, मनातलं
5 Oct 2014 - 11:08 am

अश्वत्थामाला घेऊन द्रोणाचार्य पांचाल राज्य सोडून हस्तिनापुरला आले
तोपर्यंत पांडव माता कुंती सोबत वनवासातून राजमहालात पोहचले होते
पंडुच्या अकस्मात निधनामुळे पितामह देवव्रत भीष्म पांडवाबद्दल जास्त प्रेमभाव बाळगून होते
पण दुर्योधन आणि इतर भांवडे यामुळे पांडवाचा जास्त दुस्वास करू लागली होती
त्यावेळी राजवाड्यातच कृपाचार्य सर्व राजपुत्रांना शिकवित असतं
कृपाचार्यांनीच पितामह आणि द्रोणाचार्यांची भेट घडवून आणली
द्रोणाचार्यांच्या विद्वत्तेवर प्रभावित होऊन त्यांना हस्तिनापुरच्या राजपुत्रांना शिकविण्याची विनंती केली
द्रोणाचार्यांनी अट ठेवली की मी राजपुत्रांबरोबर अश्वत्थामालाही शिकवू इच्छितो आणि ती विनंती मान्य झाली
आणि गुरू द्रोणाचे द्रोणाचार्य झाले,
पांडव कौरवांचे ते आचार्य झाले.
आपल्या सगळ्या शिष्यांवर त्यांचे प्रेम होते पण ते तितकेच गुणग्राही सुद्धा होते सर्व शिष्यांना त्यांनी त्यांच्या योग्यतेनुसार रथी महारथी बनविले आणि उत्तम पिताही होते माता कृपीच्या निधनानंतर त्यांनी अश्वत्थामाला एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही.
वडिल द्रोणाचार्य जगातले सर्वश्रेष्ठ धनुर्विदयेचे गुरू होतेच आणि पुत्र अश्वत्थामाही कुशाग्र बुध्दीचा आणि बलवान होता त्यामुळे सर्व कलागुणांत तो पारंगत होता.
शिक्षणात कुठलीही कमी राहण्याची शक्यता नव्हतीच
अश्वत्थामाला द्रोणाचार्यांनी धनुर्विदयेचे
सारे रहस्य सांगितले.
अश्वत्थामाला द्रोणाचार्यांनी दिव्यास्त्र, आग्नेय, वरुणास्त्र, पर्जन्यास्त्र ,वायव्यास्त्र , ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र,ब्रह्मशिर हया सर्व दिव्य अस्ञांनी सिध्द केले होते अश्वत्थामा द्रोण, भीष्म, परशुराम हयासारखाच उच्चकोटीचा धनुर्धर झाला होता,
आणि कृपाचार्य, अर्जुन व कर्णही त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नव्हते.
नारायणास्त्राचा प्रयोग कसा करावा हे फक्त द्रोणाचार्यांना माहीत होते आणि ते ज्ञान त्यांनी अर्जुनालाही सांगितले नाही ते फक्त अश्वत्थामा लाच सांगितले
अश्वत्थामाचे ब्रह्मतेज, वीरता, धैर्य, शस्त्रज्ञान, नीतिज्ञान, बुध्दिमत्ता ह्याविषयी कुणाच्याही मनात तिळमाञ शंका नव्हती
महाभारतकालीन सर्व प्रमुख व्यक्ति हया अश्वत्थामाच्या बळ, बुध्दि व चरित्र्याचे
प्रशंसक होत्या
महाराज धृतराष्ट्र अश्वत्थामाला परम वीर मानायचे
"शस्त्र ज्ञानात जो श्रीरामासारखा,
युध्दात देवादिदेव इंद्रासारखा,
विक्रम व शक्ति कार्तवीर्याला तुल्यबळ,
बुध्दित देवगुरू बृहस्पतिचा बाप असा थोर योद्धा म्हणजेच अश्वत्थामा"
तरीही अर्जुनावर पिताश्रींचा जास्त जीव जडलाय असा अश्वत्थामाचा समज होऊन अर्जुनाच्या दुस्वासामुळे जाणते अजाणतेपणी तो नकळत दुर्योधनाच्या कौरव कंपूत पोहचला हे त्याचे त्यालाच कळले नाही.
शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी द्रुपदाचे पांचाल राज्य जिंकून आणण्यास सांगितले त्यावेळी ही अश्वत्थामा अग्रभागी होता आणि स्वबळावर जिंकून आणण्याची मनिषा त्याने पिताश्री द्रोणाचार्यांकडे व्यक्त केली पण सर्वांनी मिळून पांचाल जिंका अशी आज्ञा द्रोणाचार्यानी दिली
त्यानंतर पांडवाच्या पराक्रमाने पांचाल राज्य जिंकले आणि मिञ द्रुपदाला द्रोणाचार्यांनी जीवदान तर दिलेच वर जिंकलेले असून सुद्धा
अर्ध राज्य द्रुपदाला देऊन आपल्या उदारतेचा परिचय दिला
उत्तर पांचालचे अर्ध राज्य द्रोणांनी
अश्वत्थामाला दिले.
अश्वत्थामा राजा झाला त्याची राजधानी अहिच्छ्त्र होती
द्रोण शिष्यांच्या दिग्वजयानंतर संपूर्ण भारतभर ते सर्वश्रेष्ठ आचार्य म्हणून मानले जाऊ लागले
कुरुराज्य हस्तिनापुरमध्ये भीष्म, धृतराष्ट्र, विदुर हयांच्या नजरेत गुरूदेवांचा सम्मान वाढला,
आता अभावाचे दिवस जाऊन प्रभावाचे दिवस आले

क्रमशः

संस्कृतीधर्मइतिहासमाहिती

प्रतिक्रिया

मी पयला.
वाचत आहे.पुभाप्र.

विनोद१८'s picture

5 Oct 2014 - 2:06 pm | विनोद१८

उत्तम मांडणी, हा भागसुद्धा पहिल्या भागासारखा रंजक व लहानसा वाटला. माझ्या मते हे दोन्ही भाग मिळुन एक भाग होउ शकेल अशी नम्र सुचना.

माम्लेदारचा पन्खा's picture

5 Oct 2014 - 3:01 pm | माम्लेदारचा पन्खा

मम...

निलरंजन's picture

5 Oct 2014 - 3:54 pm | निलरंजन

एक तासाच्या मालिकेपेक्षा अर्धा तासाच्या मालिका मला जास्त आवडतात म्हणून ही थोडक्यात गंमत

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2014 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान चालली आहे मालिका.

* (t+r+a = त्र)

बाबा पाटील's picture

6 Oct 2014 - 1:06 pm | बाबा पाटील

मोहित्यांचे जिवनराव कुठे असतात हो सध्या..?

काउबॉय's picture

6 Oct 2014 - 1:13 pm | काउबॉय

या व्यक्तिमत्वाबद्दल कधी विचार फारसा केला न्हवता. आता मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत पण उत्तरे मीळतील असे वाटतय. बघुया. पुभाप्र.

कविता१९७८'s picture

6 Oct 2014 - 3:09 pm | कविता१९७८

खुपच छान माहीती, कुठल्या देशाचा राजा होता हे आताच माहीती पडले आधी वाचनात आले नव्हते किंवा आले असेल तरीही लक्षात राहीले नाही.

अश्वत्थामाची राहणी, त्याने केलेला राज्याचा विस्तार, त्याच्या कुटंबाबद्द्लची माहीती. अश्वत्थामा बरोबर त्याचा मामा कृपाचार्यही देखील चिरंजीवी आहे . गुगलुन पाहिले तर अश्वत्थामा कधी कधी कृपाचार्याना भेटायला ते हिमालयात जातो असे वाचले पण ते खरे नसेल कारण त्याला खुप कमी लोकांनी पाहिल्याचे ऐकले आहे.

निलरंजन's picture

8 Oct 2014 - 6:34 am | निलरंजन

काही घरगुती कारणांमुळे पुढचा भाग इच्छा असूनही लवकर लिहिता आला नाही
पण येत्या दोन दिवसात नक्की भेटेन नवीन भागासहित

आपला
निलरंजन

आयुर्हित's picture

8 Oct 2014 - 7:53 am | आयुर्हित

कृपाचार्य, अर्जुन व कर्णही त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नव्हते.

नारायणास्त्राचा प्रयोग कसा करावा हे फक्त द्रोणाचार्यांना माहीत होते आणि ते ज्ञान त्यांनी अर्जुनालाही सांगितले नाही ते फक्त अश्वत्थामा लाच सांगितले

असे असताना अश्वत्थामा युद्धात का हरतो?

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 8:59 am | प्रचेतस

खिक्क

कारण अगोदरच सेटिंग केली होती- यतोधर्मस्ततो जयः अर्थात जिथे युधिष्ठिर तिथेच जय. अश्वत्थामा हे ऐकूनही साईड न बदलल्याने हरला ;)

प्रचेतस's picture

8 Oct 2014 - 7:08 pm | प्रचेतस

नारायणास्त्र हे कृष्णाला देवत्व प्राप्त झाल्यानंतर घुसडलेले प्रकरण आहे.

बॅटमॅन's picture

8 Oct 2014 - 7:10 pm | बॅटमॅन

प्रक्षिप्त भागाबद्दलचे यार्दी यांच्या पुस्तकातील विवेचन पुनरेकवार वाचावे लागेल आता.

आयुर्हित's picture

9 Oct 2014 - 1:27 am | आयुर्हित

यत्र योगेश्र्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।78।।

नेमके खरे कोणते?

मदनबाण's picture

8 Oct 2014 - 9:19 am | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX