'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)
एका व्यक्तीचे तेल विकणार्या तेलिणीशी भांडण झाले, तो तिच्यावर रुसला आणि तिच्याकडचे तेल विकत घ्यायचे नाही या अट्टाहासापोटी बिनतेलाचे कोरडे खाऊ लागला, हे उदाहरण अभंगात देऊन संत तुकाराम संकोच सोडून स्वहीत पाहण्याचा सल्ला देतात. राग आणि अंह यांचे नाते सुंभ आणि पिळ या सारखे असावे बर्याचदा रागही गळून जातो पण अहं सुटता सुटत नाही, अभिमान आणि अहंकार यातला फरक बर्याचदा कळत नाही अथवा कळूनही वळत नाही असेही होते. खेळप्रेमी किंवा खेळात सहभागी होणारेही एखादे अपयश खिलाडूवृत्तीने स्विकारूशकतीलच याचीही खात्री देता येत नाही, मग कमेंट करताना आधीच विनोद आहे हे आधीच सांगून 'ह. घ्या.' हे वेगळ नमुद करण्याची पाळी अनेकदा येताना दिसते. शब्द शब्द जपून फेक, दुखविशील कधी अनेक या ओळी आळवत स्वतःच्या अभिव्यक्तीवर केव्हा आणि कशी बंधने येऊन पडतात, किंवा आपणच ती आपली लादून घेतो ते कळेनासेच होते.
जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. विश्वासाची जागा अविश्वास आणि कटूतेने केव्हा घेतली जाते ते आपले आपल्यालाच कळत नाही. ( अलिकडे म्हणजे २०१८ मध्ये मिपाकर जयंत नाईक यांनी त्यांच्या लेखातून वेदनाकोष ही संकल्पना मांडली आहे) खरेतर काळ्याकुट्ट ढगालाही चंदेरी किनार असते असे म्हणतात, परंतु एखादी व्यक्ती किंवा समुहाची एखाद्या किंवा काही गोष्टीत काही वावगे वाटले तर तेवढ्यापुरते ते नाकारून चांगले स्विकारावयास हवे हे कळले तरीही वळतेच असे नाही. बर्याचदा अमुक समुह, तमूक गोष्ट करतो किंवा करत नाही त्यावरून मी तमूक गोष्ट करावयाची कि नाही याचा निर्णय करत असतो, आपल्या गटातील इतरांना भाग पाडत असतो अथवा भाग पाडून घेत असतो. कपाळावर गंध (आजच्या काळात टिकली) न रेखाटलेल्या एका मुलीला तीची मैत्रिण कपाळावर गंध नाही लावलस, तू काय तमूक धर्माची आहेस ? असे विचारतानाचा संवाद किस्सा जरा जुना असला तरी अद्यापही चांगलाच आठवतो. तुम्ही अमूक धर्माचे आहात का तमूक धर्माचे आहात यावर शृंगार पोषाख आणि सांस्कृतीक निर्णय करणे, खास करून निष्ठांबद्दल विश्वास/अविश्वास तयार करणे, खरेच किती अत्यावश्यक असते?
प्रत्येक समुहाला वेगळी सांस्कृतीक ओळख असू नये असे नव्हे. पण दुसर्या समुहातील चांगल घेण्यासाठीच्या सांस्कृतीक देवाण घेवाणीवर टाकले जाणारे निर्बंध घालण्याचे समष्टीचे टोकाचे प्रयत्न अनेकदा अनाकलनीय असतात. धर्म आणि संस्कृतीची केली जाणारी गल्लत हा व्यक्तीशः मला कधीच न उमगलेला प्रकार आहे. उदाहरणार्थ रांगोळी, रंगपंचमी, राखी या वस्तुतः सांस्कृतीक गोष्टी आहेत विशीष्ट धर्माचे अथवा प्रदेशातील लोकच या गोष्टी करतात म्हणून इतर धर्मांतील लोकांनी ते टाळणे अथवा अमूक धर्मातले लोक केक खातात म्हणून तो आपण खाऊ नये हे असे स्वसमुहाच्या चांगल्या आनंदाला पारखे करून घेणे का होत असावे ? सांस्कृतीक देवाण घेवाण होतच नाहीत असे नाही पण ज्या दोन समुहात परस्पर अविश्वास असेल तेथे सांस्कृतीक ओळखी तटबंदीचेच काम करतात असे नव्हे तर दोन गटातील संघर्षात प्राणघातक सिद्ध होण्यासही कारणीभूत होत असतात.
या मानवी स्वभावाचा उपहासाचा प्रयत्न, मागे एका धागा लेखाच्या निमीत्ताने मी केला होता. काही अबकड भाषा वापरणार्या किंवा ग्रंथ लिहिणार्या हळक्षज्ञंनी मागच्या पिढ्यांवर अन्याय केला म्हणून अबकड भाषा अथवा त्याची लिपी किंवा अबकडच्या ग्रंथातील तमूक गोष्ट चांगली नव्हती म्हणून मी त्या ग्रंथकाराचे अथवा त्या भाषेतील सर्वच ज्ञान नाकारू इच्छितो असे आग्रह आणि अट्टाहासही पुर्वग्रहांवर आधारीत होताना आढळतात. किंवा अमुक समूहाच्या तमूक पुर्वजांनी ठमूक केले म्हणुन त्या समुहाच्या आजच्या वंशजांशी परकेपणा ते जीवघेणेपणा या विवीध स्तरीय भावनांवर काने फुंकत रहा दुष्वासाचे गाणे गात रहा ! हे म्हणजे बाळाच्या स्नानाच गढूळलेल पाणि फेकताना बाळालाही नाकारण्या सारखे नसते का ?
पुन्हा तेच, कळते पण वळत नाही, वर दिलेलाच संत तुकारामांचा अभंग चिंतनासाठी पुन्हा एकदा.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)
.
.
.
.
.
.
.
हे सुद्धा पहावे
* मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?
* आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान
* 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
* व्यक्तिगत संबंधातील रुसव्या फुगव्या बाबत माझा द्सर्या चर्चा धाग्यावरील अलिकडील प्रतिसाद.
प्रतिक्रिया
4 Nov 2014 - 5:01 pm | जेपी
इसको इदरके लोगां कंपुबाजी बोल्ते अप्पा
4 Nov 2014 - 5:15 pm | माहितगार
आप काय म्हणना चाहते जेपी अप्पा, जरा इस्कटून सांगेंगे प्लीज हमको.
-अनभिज्ञ माहितगार
4 Nov 2014 - 5:51 pm | जेपी
अण्णा,
आप अगर इत्ता बी नै समजते तो काय के माहितगार बोल्ते खुदकां.
4 Nov 2014 - 6:01 pm | माहितगार
हमको लगता कंपुबाजी कुछ अलग चिज रह्यता करके
4 Nov 2014 - 6:05 pm | विवेकपटाईत
लेख आवडला, पण अहंकार सोडणे सौपे कार्य नाही.
6 Nov 2014 - 9:47 am | माहितगार
सहमत आहे. आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.
4 Nov 2014 - 6:06 pm | जेपी
सरजी ,
दोन घ्यावे,दोन द्यावे(प्रतिसाद हो)
अवांतर -सर्व प्रतिसाद हलके घ्यावे. *wink*
6 Nov 2014 - 9:54 am | माहितगार
:) मी नको नको म्हणतानाही काही धागे शतक गाठतात. या धाग्या बद्दल आपण दोन दोनने (प्रतिसादांची) कंजुषी होऊ नये. इतर मंडळींनीही जेपींच्या प्रमाणेच दोन दोनने वाढवून प्रतिसादांचे शतक करुन दिल्यास आभारी असेन :)
6 Nov 2014 - 12:47 pm | मारवा
जेवढा इतिहास संघर्षांचा असेल तो दुखावलेल्या कोपर्यात नोंदवला आणि जागवला जात राहतो. सौहार्द विसरल जात. विश्वासाची जागा अविश्वास आणि कटूतेने केव्हा घेतली जाते ते आपले आपल्यालाच कळत नाही.
काय सुंदर मार्मिक विचार मांडलाय तुम्ही हे इतिहासाच्या अनेक घटनांतुन कितीदा समोर आलय. काहिही विसरल जात नाही.
लेखातील विचारांमागची तळमळ जाणवतेय.
सुंदर लेख !
6 Nov 2014 - 4:02 pm | नाखु
सध्याच्या पाकिस्तानच्या (आणि भारततील पाक प्रेमींच्या) भूमिकेचा पर्दाफाश करणारा खालील दुवा पहा म्हणजे कळेल नक्की भारत सहीश्णु आहे !!!
आणि हो हे जरी सिनेमात असले तरी हेच वास्तव आहे असे कसाब्-अफजल्-ओवेसींनी सप्रमाण करून दाखवले आहे (सिनेमात नेहमीच सारे काल्पनीक्/बेगडी नसते)
आमिरचे उत्तर
19 Jul 2018 - 1:20 pm | माहितगार
नाखु'सेठ आपला हा युट्यूब लिंक उघडत नाही पुन्हा एकदा देता येऊ शकेल का ?
6 Nov 2014 - 4:25 pm | माहितगार
मी साहेब वगैरे नाही. माझ्यासाठी भारताची खरी सीमा हिमालय ते कन्याकुमारी आहे (याला आपण पाकप्रेम म्हणता का बांग्लादेश प्रेम का भारत प्रेम ते माहित नाही). बाकी उर्वरीत सहमत.
माणसाला सध्याची प्रगती साधण्यासाठीच काही मिलीयन वर्षे गेली आहेत. मानवाला विवेक एवढाही सहज असता तर सध्याची प्रगती मानवाने काही लाख वर्षांपुर्वीच साध्य केली असती. सांगण्याचा मुद्दा हा की अजून काही शतके जातील विवेक येईल प्रगती नक्की होईल. या निमीत्ताने परत एकदा माझ्या "१५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश" या धाग्याची जाहीरात करुन घेतो.
6 Nov 2014 - 7:51 pm | कंजूस
सहमत. या गावातली तेलीण नाही आवडली तर दुसरी गावे, दुसऱ्या तेलीणी शोधाव्यात असे माझे मत आहे. कढी, सांभार, आमटी, दालफ्राइ, सार, रसम, सूप इ० पदार्थाँच्या शोधात निघावे परंतु कोरडेच जेवू नये. तुकारामाच्या काळात असे पर्याय अजमावले जात नव्हते आणि वेडे कुढत बसत होते. कोणी सांगावे हीच तेलीण काही उपऱ्यांना प्रिय होईल ?
आपल्या दांभिक समाजाने फारच राग लोभ ठेवून संकोच करून नुकसान करून घेतले. माझा मुद्दा थोड्या वेगळ्या वळणावर जातोय का?
6 Nov 2014 - 8:02 pm | माहितगार
अनुषंगिकच वाटतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण अद्याप मला पूर्ण ग्रास्प झाला नाहीए.
6 Nov 2014 - 8:06 pm | आदूबाळ
कंजूसभौ
"०" हे चिन्ह (सूप इ० मधलं) कसं देता?
6 Nov 2014 - 9:02 pm | कंजूस
तेलिणीचे उदा॰ देऊन संकोची आणि राग धरणाऱ्यांना उपदेश संत तुकारामाने केला आहे की तू हे सोड. परंतू असे करू न शकणाऱ्यांसाठी मी विनोदी शेपूट {इक्सटेंशन} जोडले.
फोनला मराठी +इंग्रजी कीपैड असल्यामुळे मी बोलतो मराठी टंकतो मराठी{अक्षरे.} त्यामुळे १)इ० २)इ0 ३)इ~ ४)इ॰ ५)इऽऽत्यादि
काहीही {एकाच दमात}लिहिता येते. क्रमांक (५)अधिक योग्य दिसते आहे का तुमच्या स्क्रीनवर आदुबाळ?
6 Nov 2014 - 10:33 pm | आदूबाळ
मी "४)इ॰" च्या मागे होतो.
"५)इऽऽ"चा अवग्रह SS (एस एस) वापरून काढता येतो.
7 Nov 2014 - 10:44 am | माहितगार
:)
धन्यवाद