( स्टार्कची लेकरे )

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
23 Jul 2015 - 12:32 pm

एवढ्यात राजसिंहासन-क्रिडा* शी संबंधित, दिव्यपटलावर काही दृष्टांत बघत होतो.
(*ह.ब.ओ.उक्त राजसिंहासन प्राप्त्यर्थम्, प्राप्तसिंहासन चीरकाल संरक्षणार्थम्, अंतर्बाह्यरिपू नाशार्थम् पातकक्रिडा. इतिः हिम अग्नी सुगमगीत )

जाणकारांमध्ये विंटरफेलचा सुभेदार, उत्तरदिगरक्षक स्वामी एडार्ड स्टार्कच्या लेकरांसंदर्भात बरेच मतभेद असले तरी एका बाबतीत एकवाक्यता आढळते की जॉन स्नो हा स्टार्क वंशाशी संबंधित होता. राजसिंहासन-क्रिडा* मुळात वास्तवात घडले की नाही ही चर्चा आपण तुर्तास बाजुला ठेउयात. त्याच्या लेकरांबद्दल एकुणात गोंधळच आहे, विशेषतः ब्रान व रीकॉन बद्दल (पण ते पुन्हा कधीतरी ).
एक इंटरेस्टिंग गोष्ट इतक्यात वाचली की जॉन स्नोचा जन्म हा लायेनाच्या (एडार्डची बहिण) पोटचा. असे का ?... यामागची अनेक कारणे त्या लेखात दिली होती. मला त्यात फारसा रस नव्हता पण तो लेख वाचता वाचता राजसिंहासन-क्रिडा* वर एक लेख लिहायचा विचार पक्का केला. नेहमीच्या पात्रांबद्दल अथवा घटनांबद्दल लिहिण्यापेक्षा थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र डोक्यात होते पण मग नंतर एडार्ड स्टार्कच्या सगळ्याच मुलांवर एक लेख लिहावा असा विचार केला (फोकस तरीही जॉन स्नोवर आहे) :). जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग ही सगळी स्टार्कची लेकरे :)

जॉन स्वतः राजसिंहासन-क्रिडा*तल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. जॉनभवतालचे वलय खरे सांगायचे तर टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अश्या इतर पात्रांमुळे झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अशी पात्रे मिळुन राजसिंहासन-क्रिडा*वर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते, असे नाही पण या पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते. कृष्णकिल्ल्याचा जुना किल्लेदार सेर आलीसरच्या वलयातुन बाहेर पडुन जॉनने स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो पण त्यातही शेवटी आपल्याला , 'अरेरे बिचारा कोवळा जीव ६ लोकांनी मिळुन मारला' अशी हळहळच जास्त दिसते. रॉबसुद्धा त्याच्या साहसी मोहिमातील शक्तीमुळे जास्त भाव खाउन जातो. त्यामानाने एका साध्या ४-५ माजली उंचीच्या बुरूजावरून पडल्यामुळे अपंगत्व आलेला ब्रान किंवा त्यासोबतचा रीकॉन मात्र त्या मानाने कमी प्रसिद्धी पावतात.

त्यामुळेच अश्या कमी माहितीतल्या स्टार्कपुत्रांसाठी हा लेख. हिम अग्नी सुगमगीतानुसार एडार्डला ५ औरसमुले:
१.रॉब
२.सांन्सा
३.आर्या
४. ब्रान
५. रीकॉन
(६. जॉन स्नो अनौरस पुत्र)

हिम अग्नी सुगमगीतामध्ये जॉन स्नो रॉबपेक्षा काही वर्षांनी मोठा होता असे म्हणतात (हे देखील माझे एक अनुमानच आहे. स्पष्ट उल्लेख बहुधा कुठेही नाहित). त्यामुळे बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.

अजुन एका मुलाचा उल्लेख काही दृष्टांतामध्ये येतो. नेमक्या दृष्टांताचे नाव मला आत्ता आठवत नाही पण बहुधा पहिल्या दुसर्या पर्वात रीकॉनचा उल्लेख येतो. हा एडार्डचा सगळ्यात धाकटा मुलगा. युद्धाच्यावेळेस हा खुपच लहान असल्याने याने युद्धात भाग घेतला नव्हता. यापर्वानुसार रीकॉन ब्रानबरोबर प्राणरक्षणार्थ पलायनामध्ये सहभागी होता आणि बर्याच ठिकाणी त्याने शौर्य दाखवले. हिमभिल्लां बरोबर त्यांचे छोटेखानी चकमक झाली त्यात होडॉरबरोबर ब्रानदेखील बेपत्ता झाला. मात्र नंतर पुढीलकाळात त्यांचे काय झाले आणि विंटरफेलचे राज्य त्याला मिळते का सांन्साला का मिळाले याबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही.
पुर्वी युद्धाचे काही नियम ठरवले गेले होते. ठराविक अंतराने जवळजवळ सगळ्याच नियमांना तिलांजली दिली गेली. युद्धाच्या अनेक नियमांपैकी एक नियम होता की कुणीही इशारा न देता दुसर्या यौद्ध्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करु नये, विशेषतः ज्याच्या संरक्षणात इतकी वर्षे आपण लाहानाचे मोठे झालो . या नियमाला थिऑन ग्रेजॉयकडून तिलांजली दिली गेली. त्यामुळे बहुतेक प्रमुख यौद्धांना मारण्यासाठी कुठुनही कसाही हल्ला होउ शकतो हे लक्षात घेउन सगळ्याच प्रमुख यौद्धांचे रक्षण आजुबाजुला राहुन इतर दुय्यम दर्जाचे यौद्धे नंतर करत असत.

एडार्ड व कँटलीनची जेव्हा तुलना होते तेव्हा एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की एडार्डच्या उपस्थितीत फार कमी कुटुंबियांचे बळी गेले. त्याने जवळजवळ सर्वांना वाचवले. कधी पुढुन विद्रोह करून तरी कधी मागुन राजहस्तपद स्वीकारून. कँटलीन मात्र आपल्या उपस्थितीत आपल्या मुलांना वाचवु नाही शकली किंवा कदाचित तिला तितकीशी संधी नाही मिळाली. तिच्या दोन मुलांवर तर शत्रूने तिच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ले केले. सर्वप्रथम बळी गेला रॉबचा. त्याला बोल्टनने मारले. त्याच्यापूर्वी ब्रानचा देखील बळी जायचा मात्र ऐनवेळी पाळलेल्या कोल्ह्याने हल्लेखोरापासुन त्याला वाचवले आणी स्वतः हल्लेखोराशी युद्ध सुरु केले. एडार्ड व कँटलीन स्वतः मात्र इतके सुदैवी नव्हते. या दोघांनाही शत्रूने मारले.

जॉन स्नोच्या मरणोत्तर संदर्भात बराच सावळागोंधळ आहे. एकतर त्याच्याच सहकार्यांनी पाठीत वार केले असे एकेठिकाणी दृष्टांतात दाखवतात, तर दुसरीकडे हेच म्हणतात की त्याला अग्निपूजक चेटकीण मेलीसांद्रे पुनर्जीवित करते. कोणी म्हणतो तो श्वेतचलवादी बनतो, नक्की काय कळत नाही. पण तो जिवंत असताना हिमभिल्लीण यीग्रीट (त्याची एकेकाळची प्रेमी), ऐमनऋषी, सँमवेलं टारली ही लोकं म्हणजे जॉनचे कवच होते. जोपर्यंत हे आजूबाजूला होते तोपर्यंत जॉन सुरक्षित राहिला. मात्र एक एक करत त्याचे विश्वासु संरक्षक मृत्यू पावले किंवा दूर गेले. रानटी हिमभिल्लांना, महाभिंती आड येऊ देणे म्हणजे मृत्युला आमंत्रण द्यायचे असे वाटून, रात्रप्रहरी दलातले इतर सर्व कृष्णयौद्धे, मनाने जॉन स्नोपासून दुरावले, त्याच्या अंतिम काही पळांमध्ये तर आजुबाजुच्या विश्वासू लोकांनी वार केले. तिथे सँमवेलं टारली असता तरीही फारसा फरक पडला नसता.

इतर सर्व प्रमुख यौद्ध्यांच्या विश्वासघातासमोर जॉन थोडासा किरकोळीत गेला आहे. परंतु हिम अग्नी सुगमगीताने त्याचे शौर्य वेळोवेळी मान्य देखील केले आहे. एडार्ड स्टार्कचा सर्वात निष्णात शूर पुत्र दगाफटक्याने पडला. सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला.

मंगल सिध्यर्थम्, अमंगलता नाशार्थम्, निंदाबूध्दी नाशार्थम्, मिपाआचार्य वचनात .............. कर्म अहं करिष्ये II
सुचना --- मिपासमस्त ब्रम्हवृंदांच्या सेवेस्तव अल्पज्ञानात लिहीलेले आहे.

संस्कृतीधर्मइतिहासप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सिंहासनलीलेबद्दल आहे काय....आम्हांला अव्हञ्जरचमूबद्दल आहे असे वाटले म्हणून धागा उघडला तर सिंहासनलीला. त्या लीळाचरित्राशी अजूनवेरी आमचा परिचयू जाहला नाही तस्मात पास.

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 12:49 pm | पगला गजोधर

अर्र … लोच्या झाला मग, वाल्गुदनर, आता ह्या लेखाचे, अधिक चांगले रसग्रहण, जनतेला कोण करून देणार ????

पगला गजोधर's picture

23 May 2016 - 6:57 pm | पगला गजोधर

alive

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Jul 2015 - 12:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जॉन स्नो इज अ टार्गारिअन. मार्क माय वर्ड्स. :)

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 12:55 pm | पगला गजोधर

बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 12:56 pm | पगला गजोधर

बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 1:35 pm | द-बाहुबली

सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला.

खिक्क. _/\_

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 2:20 pm | अस्वस्थामा

घरातील स्त्री वंशजांना असे बेदखल करून तुम्ही पाशवी शक्तींना आमंत्रण देत आहात काय ?? ;)

पिशी अबोली's picture

23 Jul 2015 - 3:13 pm | पिशी अबोली

जॉन 'स्नो' होता.. स्टार्क नव्हता..

बाकी एंजॉय दुर्लक्षिंग आर्या आणि सान्सा.. :p

जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग स्टार्क

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 3:56 pm | द-बाहुबली

रात्रपहार्‍यावर पाठवण्यापुर्वी नेड स्टार्क स्वतः जॉन-स्नोला सांगतो यु मे नॉट हॅव माय नेम, बट यु हॅव माय ब्लड...

पिशी अबोली's picture

23 Jul 2015 - 5:07 pm | पिशी अबोली

दॅट डजन्ट मेक हिम अ स्टार्क. दॅट्स द होल पॉईंट.. :)
-R+L=J ची फॅन, पिशी.

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 5:26 pm | पगला गजोधर

आधुनिक युगातल्या लोकांकडून, बिचार्या जॉनला, 'तु सूतपुत्र' यासारख्या, भेदभावी कुत्सातेला सामोरे जावे लागत असल्यामुळे, एक मिपाकर म्हणून शरम ……… वै वै

हर्मायनी's picture

1 Jul 2016 - 1:50 pm | हर्मायनी

हाहा .. शेवटच्या एपिसोडात कळलेच की जॉन कोणाचा मुलगा आहे ते .. रे + लि = जॉ कन्फर्मड!

पगला गजोधर's picture

13 Feb 2016 - 8:34 am | पगला गजोधर

sansa

पगला गजोधर's picture

13 Feb 2016 - 8:36 am | पगला गजोधर

aarya

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 1:43 pm | द-बाहुबली

राजसिंहासन-क्रिडा* अत्यंत गहन (खरे खोटे हा वेगळा मुद्दा) तरिहि आवडिचे. जॉण स्नो आणि डिनेरीस हे तर आवडिचे पात्र. पण नेड स्टार्कच्या मुलांची खूप कमी माहिती मराठी अंजावर मिळते वाचायला.(त्यातल्या त्यात ह्या धाग्यामधेच जास्त)बाकी जॉण स्नो चा उल्लेख ऐसीवरती वाचलाय पण इतर मुल दुर्लक्षितच. त्यामुळे या विषयावर लिहिलेला लेख आवडलाच.

त्यामुळे यावर कोनी लिहता झाला यात अतिशय आनंद आहे.

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 1:49 pm | पगला गजोधर

;)

स्वामी संकेतानंद's picture

23 Jul 2015 - 1:49 pm | स्वामी संकेतानंद

वॅलार मॉर्गुलिस!!

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 1:50 pm | पगला गजोधर

वालार डोहैरीस….

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 2:23 pm | अस्वस्थामा

जर इंटरेष्ट असेल तर "राजसिंहासन-क्रिडे"चा पूर्वेतिहास तूनळीवर अ‍ॅनिमेशन स्वरुपात उपलब्ध आहे. तो पण तितकाच मस्त आहे. ज्यांनी "राजसिंहासन-क्रिडा" पाहिली नाही त्यांनी ते भाग आधी बघावेत असे सुचवेन.. :)

बाकी लिहिलय मस्तच.

कपिलमुनी's picture

23 Jul 2015 - 3:57 pm | कपिलमुनी

दुवे द्या आणि दुवा घ्या

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 5:06 pm | अस्वस्थामा

हे घ्या. हे आमचे आवडते क्म्पायलेशन आहे. तशी इतरपण आहेत तिथे लिस्टमध्ये.

त्याचबरोबर, हे पण बघा. इन्टरेष्टींग आहे.

प्रत्येक सीझन वर एक एक का-कू निघू शकतो राव.

[टिरियनचा (आणि पक्षी (पीटर डिंकलेज) सहानुभुतीदार अन चाहता. माझ्यामते या मालिकेतला तो "कर्ण" आहे. एवढुस्सा माणूस पण खाऊन टाकतो सगळ्यांना.]

द-बाहुबली's picture

23 Jul 2015 - 5:56 pm | द-बाहुबली

तो शकुनी आहे :)

अस्वस्थामा's picture

23 Jul 2015 - 6:36 pm | अस्वस्थामा

हा हा हा.. अगदी अगदी मामा-भान्जे.. :)
पण त्याचं काम सगळ्यात जास्त आवडलंय आणि तो तसाही सर्प्राईज पॅकेज निघाला..

फक्त आमच्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे, "कोणत्याही पात्रावर जीव लावू नका, कधी टपकेल कै सांगता यायचं नै.. खासकरुन स्टार्कशी संबंध आला तर अजिबातच नको. " ;)

द-बाहुबली's picture

25 Jul 2015 - 12:36 pm | द-बाहुबली

आम्हीही मित्राला सांगीतलं एक्स्पेक्ट द अनएक्सपेक्टेड. थोडक्यात जे घडणार नाही याची १००% खात्री वाटते नेमके तेच घडणार अपवाद फक्त खलीसी सोडुन. कारण ती बॉय हु लिवड आहे :)

द बॉय हु लिव्ड :- माझ्या अल्पमती प्रमाणे जेके रोलींग या संक्लपनेची जन्मदात्री आहे. बॉय हु लिव्ड म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्पेशल तर असते पण मुदाम परीपुर्ण नसते. थोडक्यात ते हिरो असले तरी हमखास इतरांच्या सॉलीड मदतीनेच (व कधी नशीबाने) कार्यभाग साधतात. दॅट मेक्स देम मोर (क्लोजर टु) ह्युमन. ( हा प्रकार त्या आधी गिरवलेल्या हिरोंच्या अगदी विरोधी होता. म्हणजे ते हिरो स्पेशल अन बहुतांश परिपुर्ण असत. त्यांना इतरांची मदत लागत नसे हिरोगीरी चालु ठेवायला). पण हॅरी पॉटर नंतर हा ट्रेंडज बदलला स्पायडरमॅन, आयर्नमॅन पासुन बॅटमॅन परेंत रॉबीन्हुड पासुन शरलॉ़क पर्यंत सगळेच आता बॉय हु लिव्ड साच्यात बसवले जातात.

आणी या साच्यात बसणारे एकमेव पात्र म्हणजे खलीसी आहे. जॉन स्नो पासुन स्टार्क बराथीऑन पर्यंत सगळे मेले या खुर्चीच्या खेळात अन खॅलीसी मात्र सरप्राइजींगली एक एक पडाव पार करतच आहे आता तर शकुनीसुधा तिला येउन भेटला आहे. त्यामुळे सान्सा अथवा खलीसी यापैकी एकच थ्रोनवर बसणार हे नक्कि. थ्रोनवर स्त्रिपात्रच बसणार असा कयास कारण सेर्सइची भवीष्यवाणी सांगते की ती अल्पकाळ राणी बनेल व लगेचच तिच्या पेक्षा सुंदर तरुणी राणी बनुन राज्य करेल. ( पुन्हा हा कयास आपण केला म्हणजेच एक्सपेक्ट द अनएक्स्पेक्तॅड हा नियम मोडला आहे नाही का ?)

अस्वस्थामा's picture

27 Jul 2015 - 3:08 pm | अस्वस्थामा

द बॉय हु लिव्ड :- माझ्या अल्पमती प्रमाणे जेके रोलींग या संक्लपनेची जन्मदात्री आहे. बॉय हु लिव्ड म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्पेशल तर असते पण मुदाम परीपुर्ण नसते. थोडक्यात ते हिरो असले तरी हमखास इतरांच्या सॉलीड मदतीनेच (व कधी नशीबाने) कार्यभाग साधतात. दॅट मेक्स देम मोर (क्लोजर टु) ह्युमन. ( हा प्रकार त्या आधी गिरवलेल्या हिरोंच्या अगदी विरोधी होता. म्हणजे ते हिरो स्पेशल अन बहुतांश परिपुर्ण असत. त्यांना इतरांची मदत लागत नसे हिरोगीरी चालु ठेवायला). पण हॅरी पॉटर नंतर हा ट्रेंडज बदलला स्पायडरमॅन, आयर्नमॅन पासुन बॅटमॅन परेंत रॉबीन्हुड पासुन शरलॉ़क पर्यंत सगळेच आता बॉय हु लिव्ड साच्यात बसवले जातात.

याबाबत असहमत.. ही "बॉय हु लिव्ड" कन्सेप्ट आधीपासून आहे. एक उदाहरण म्हणजे LOTR मध्ये फ्रोडो असंच पात्र आहे की. इतर पण स्टोरीज आहेत तशा. रादर हॅरी पॉटर मध्ये खूप सार्‍या कॉपीज आहेत इतडून तिकडून (तरीपण भट्टी मस्त जमलीय आणि आवडते हे महत्वाचे).

इथे खलीसी मला इंटरेस्टींग वाटते (पोरगी दिसते मस्त. ;) ) पण पात्र म्हणून तेवढी भावत नाही. अजून तरी तिचे स्वतःचे काही राणी म्हणून नीटनेटके समोर आलेले नाही. तो द्रोगा तिच्या नादात मेला. तिच्याबरोबर जे राहिले त्यातले निम्मे अधिक मारले गेले. तिने जी नगरे जिंकली तिथे नीट व्यवस्था लावू शकली नाही..
तिच्या निष्ठावानांना (मर्माँट) ती जुन्या गोष्टींसाठी एका आताच भेटलेल्या (टिरियन) आधी शत्रुपक्षाचा असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने तडीपार करते.
हे सगळं एक राज्यकर्ती म्हणून तिला "राहूल गांधी" बनवतं असं वाटतं. म्हणजे फक्त ती जन्माने मोठ्या घराण्याशी संबंधित आहे म्हणून सगळ्यांनी तिला राणी करायचं असं काहीतरी. जे पटत नाही. असो. :)

तुमच्याशी या सगळ्या गोष्टींबद्दल निवांत गप्पा मारायला आवडतील कधी तरी.. :))

द-बाहुबली's picture

27 Jul 2015 - 4:04 pm | द-बाहुबली

हम्म मग असे म्हणता येइल के रोलींगने बॉय हु लिव्ड कन्सेप्ट पराकोटीची फेमस केली... कारण त्या नंतर सगळेच हिरो जमीनीवर आणले गेले. फार काय अगदी ड्वेन रॉक जॉन्सनचा हर्क्युलीसही माणूस दाखवला गेला व तो झेउसचा मुलगा आहे ही अफवा आहे असे दाखवण्याचे प्रयत्न झाले. त्याची अचाट कमे त्याने एकट्याने न्हवे तर टीमने केली असे चित्रीत केले वगैरे वगैरे वगैरे...

खलीसी दिसतेच मस्त. वादच नाय. ( सपकशब्दयोजने बद्दल दिलगीर आहे)

अजून तरी तिचे स्वतःचे काही राणी म्हणून नीटनेटके समोर आलेले नाही. तो द्रोगा तिच्या नादात मेला. तिच्याबरोबर जे राहिले त्यातले निम्मे अधिक मारले गेले. तिने जी नगरे जिंकली तिथे नीट व्यवस्था लावू शकली नाही..
तिच्या निष्ठावानांना (मर्माँट) ती जुन्या गोष्टींसाठी एका आताच भेटलेल्या (टिरियन) आधी शत्रुपक्षाचा असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने तडीपार करते.

हीच तर वर विषद केलेली बॉय हु लिव्ड संकल्पना आहे. खलीसी विषेश आहेच (मदर ऑफ फ्रीकी ड्रेगॉन्स) तरीही ती (मुदाम) परिपुर्ण नाही पण हिरो तिच. तीच्या अचिवमेंट्स या टीमवर्कच असतील. जसे ड्रोगा मेला.. पण कबिल्याचा ताबा तिनेच घेतला. ज्या नगरांची व्यवस्था लावणे तिला जमत नाहीये तिथे आता चक्क लिनेस्टर एक्स हँड ऑफ अ किंग (टीरीअन) तिच्या मदतीला उभा राहीला... जिथे तिचे साथीदार तिला मदत करु शकणार नाहीत तिथे तिचे ड्रॅगन राडा करतील... धिस इज अ बॉय हु लिव्ड कंन्सेप्ट. हिरो विषेश आहे पण परिपुर्ण नाही तो इतरांच्यावर अवलंबुन आहे, म्हणून जास्त जवळ व भावणारा आहे. .. जसे हॅरी जगला... आइ-बापामुळे. पण जास्त प्रसिध्द मात्र आइबापांपेक्षा तोच झाला. द बॉय हु लिव्ड. :)

बाकी निवांत गप्पांच म्हणाल तर केंव्हाही यावे.. पुणे आपलेच असा :)

बाप से बेटी सवाई अशी नवी म्हण प्रचलित करू शकतील या बाई.

पिशी अबोली's picture

23 Jul 2015 - 3:11 pm | पिशी अबोली

थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र

आर यू सिरियस? जॉन स्नो बद्दल जेवढ्या चर्चा होतात तेवढ्या क्वचितच दुसर्‍या पात्राबद्दल होत असतील.
ही आख्यायिका ऐकलीच असेल की बेनियॉफ आणि वेस जीआरआर कडे गेले असता त्याने त्यांना 'जॉन स्नो ची आई कोण' असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर योग्य दिल्याने त्यांना या सिरीज चे हक्क मिळाले.
बाकी स्टार्क मुलांच्या दुर्दैवाला त्यांचे आई-वडील सर्वार्थाने जबाबदार आहेत. नेड आणि कॅटचे सतत चुकीच्या लोकांवर विश्वास असणे दुर्दैवी होते. दोघंही इतके बाळबोध आदर्शवादी, की जीओटी मधे अगदीच कुचकामी ठरणारच..

पगला गजोधर's picture

23 Jul 2015 - 3:43 pm | पगला गजोधर

जॉन स्वतः राजसिंहासन-क्रिडा*तल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. जॉनभवतालचे वलय खरे सांगायचे तर टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अश्या इतर पात्रांमुळे झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अशी पात्रे मिळुन राजसिंहासन-क्रिडा*वर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते, असे नाही पण या पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते.

"त्यामुळे, तुलनात्मकदृष्ट्या थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र "
असे वाचावे.

पिशी अबोली's picture

23 Jul 2015 - 6:42 pm | पिशी अबोली

वोके..
बाकी हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मिपावर याविषयी चर्चा नाही म्हणून चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं..
;-)

मी-सौरभ's picture

23 Jul 2015 - 5:19 pm | मी-सौरभ

आवडेश

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2015 - 6:18 pm | टवाळ कार्टा

अजून कधी बघितली नै त्यामुळे पास

मी-सौरभ's picture

24 Jul 2015 - 4:00 pm | मी-सौरभ

जॉन स्नो परत येनार आहे असा अंदाज आजच्या टाईम्स मधे आहे.

ख खो दे जा :)

पगला गजोधर's picture

24 Jul 2015 - 4:13 pm | पगला गजोधर

बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला तोच जॉन स्नो. मग नेड त्याला आपला मुलगा म्हणून जगाशी ओळख करून देतो वैगरे. फ़्लँशबँक दाखवणार बहुतेक, हर्षमनोर्याचे नेपथ्य उभारलं वैगरे गोष्टी ऐकिवात आल्या, बट अगेन ख. खो. दे. व जॉ. मा. जा.

अंतु बर्वा's picture

25 Jul 2015 - 12:01 am | अंतु बर्वा

यु नो नथिंग जॉन स्नो :-)
आवडत्या पात्रावर लिहिल्याबद्दल धन्यवाद...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Jul 2015 - 1:41 am | निनाद मुक्काम प...

ब्रान चे काय झाले ह्या बद्दल खुलासा
वंश संपला नाही असे मला तरी वाटते

द-बाहुबली's picture

25 Jul 2015 - 12:14 pm | द-बाहुबली

अहो मेसि विल्यम्सनेच (आर्या) चेपुवर कमेंट टाकली होती इफ एनीवन थिंक्स स्टार्क्स आर फिनिश्ड दे आर मिस्टेकन. अर्थात ख.खो.दे.जा. कारण कलाकारांना स्टोरिबाबत कोणतीही गोष्ट प्रत्यप्रत्यक्ष उघड करायला नक्किच परवानगी नाही.)

"सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला."

रिकॉन आणि (Raisin) ब्रॅनला विसरलात का हो?

त्यांच्या बरोबर तो होडॉर कुठे गायबलाय…. हे फक्त सप्तस्वर्ग व सप्तनर्क वाले नवेपुराने देव जाणे !

पगला गजोधर's picture

24 Jun 2016 - 3:39 pm | पगला गजोधर

r1
r2

Pain6's picture

11 Aug 2015 - 11:20 am | Pain6

बाकी लेख आवडला.
महास्फोटाचा तर्क, तुझ्या आयला कसा भेटलो, पत्त्यांचे घर, मृतचलत किंवा वाईट मोडण्याबद्दल लिहिता का? तेवढीच मिपाकरांना दर्जेदार कार्यक्रमांची ओळख होईल.

पगला गजोधर's picture

11 Aug 2015 - 11:27 am | पगला गजोधर

महास्फोटाचा तर्क, तुझ्या आयला कसा भेटलो, पत्त्यांचे घर, मृतचलत किंवा वाईट मोडण्याबद्दल लिहिता का?

पंडित शेल्डन, सभ्य बार्नी, संसदपटू, मृतचलवादी, प्रा. पांढरे ....

पिशी अबोली's picture

21 Jun 2016 - 7:03 pm | पिशी अबोली

सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष करायचे होते म्हणे.. ;) ;)
फायनली..माझं आवडतं आणि सर्वात रियॅलिस्टिक पात्र सान्सा इज इन द गेम.. *खुश खुश*

पगला गजोधर's picture

22 Jun 2016 - 2:41 pm | पगला गजोधर

आहाहा काय दिवे लावलेत सांसाबाईने, इन फर्स्ट प्लेस, ज्या पीडोफाईल लॉर्ड बेलीशने, तिला रेपिस्ट रामसे स्नोच्याच्या हवाली केले, त्याच बेलीश बरोबर परत गठबंधन साधून रामसेला हरवलं, म्हणजे काय आगीतून फुफाट्यात...

s

पिशी अबोली's picture

22 Jun 2016 - 9:25 pm | पिशी अबोली

बरं..

म्हणजे तिने काहीही न करता त्या लिटलफिंगरपेक्षा भयंकर आणि वरून बेशिस्त वाईल्डलिंग्सची सेना लीड करणाऱ्या सोज्वळ जॉन स्नोवर अवलंबून राहायला हवं होतं नाही? रामसेला ती ओळखते..जॉन हरणार, रामसे माईंड गेम्स खेळणार हे तिला माहीत आहे..तरी तिने अन्य स्टार्क लोकांप्रमाणे सोज्वळपणाचा कहर करत 'ऑनरेबल मरण' स्वीकारायला हवं होतं..चुकलंच बुवा तिचं..

ती आयुष्यभर यापेक्षा वाईट आगींमध्ये आणि फुफाट्यांमध्ये इच्छेविरुद्ध पडली आहे..कमीतकमी हा तिचा चॉईस होता..

असो..ती पुढच्या एपिसोडमध्ये मरूसुद्धा शकते, कुणी सांगावं? पण हे युद्ध ती जिंकलीये..

अस्वस्थामा's picture

22 Jun 2016 - 9:35 pm | अस्वस्थामा

अगदी सहमत..
संख्या कमी असताना देखील सिकंदर ग्वागामालाच्या युद्धात जिंकला होता तसं काही जॉनराव करु शकले असते तर त्याला चांगला कमांडर मानले असते (त्याच्याकडे बेशिस्त वाईल्डलिंग्स होते हे मान्य पण दावोस आणि एक जायंट पण होताच की. जे आहे त्याचा त्याने काहीही धड उपयोग केला नाही ही वस्तुस्थिती आहे).
स्पष्टच सांगायचं तर बॅटल रॅमसेने जिंकले (परत जन्मून पण जॉनराव इमोशनल फूल निघाले) पण युद्ध सान्साने जिंकले (लिट्लफिंगरच्या मदतीने का होईना) हे स्वीकारायला हवे.
आता सान्सा त्याचे (लिट्लफिंगरचे) प्यादे बनते की तो तिचे त्यावर पुढचे सग़ळे. :)

अगदी याचसाठी मला टीव्ही सिरीज आवडेनाशी झालीये. लिटिलफिंगर चे राजकारण दाखवण्यासाठी जॉन भाबडा-भावनिक दाखवलाय.
वास्तविक पाहता आधीच्या पूर्ण गोष्टीत तो भावनिक आहे पण त्याचबरोबर आवश्यक दूरदृष्टी देखील राखून आहे.
जर लढाई जॉन इ. मंडळींच्या बेताप्रमाणे होती तर लढाईची क्लिष्टता फार वाढती (हरता-जिंकता हा वेगळा विषय). त्यापेक्षा दाखवलेला प्रकार अधिक सोपा झाला. मुख्यतः जायंट च्या हालचाली मर्यादित झाल्याने ग्राफिक्स सोपे झाले.
अर्थात दाखविलेल्या गोष्टीत सान्सा अधिक प्रबळ खेळाडू दिसली, परंतु उत्तरेतील लोकांत या लढाई मुळे नक्कीच जॉन बद्दल चा आदर वाढेल. शक्यता आहे की सान्सा बद्दल लोकांमध्ये काहीसा अविश्वास व भीती निर्माण होईल (कारण तिने स्वतःच्या भावाला देखील मदतीच्या शक्यतेबद्दल अंधारात ठेवलं), जर ही माहिती असती तर अधिक चांगला प्लॅन बनू शकता.
सान्सा अर्थात अधिक प्रगल्भ राजकारणी आहे (व माझ्या मते ती लिटलफिंगरला गंडवणारे) पण या खेळात राजकारणच सर्व काही नाही.

अंतु बर्वा's picture

23 Jun 2016 - 7:59 pm | अंतु बर्वा

(कारण तिने स्वतःच्या भावाला देखील मदतीच्या शक्यतेबद्दल अंधारात ठेवलं)>>>

स्वतः सुद्धा शुअर नव्हती त्याच्यामदतीबद्दल म्हणुन कदाचित मागच्या एपिसोड्मध्ये रेवन पाठवताना दाखवलीय ती, तो त्यालाच असणार आणी त्याचं काहीच confirmation न आल्यामुळे ती लढाईच्या आदल्या रात्रीपर्यंत सजेस्ट करताना दाखव्लीय की कदाचित खुप घाई होतीये. पण तो सर्प्राईज एलिमेंट दाखवायच्या नादात अगदी शेवटी त्याची हेल्प येताना दाखवलीय. एकंदरीत जेवढा शानदार एपिसोड असेल असं वाटलं होतं तितका झाला नाही... ड्रॅगनची एंट्री मात्र एकदम झोकात झाली :-) सुपर्ब सीजीआय!

पण सामान्य सैनिकाला हे कुठे माहिती आहे? त्याच्या नजरेस ऐन वेळेला "सान्सा घेऊन आलेले सैन्यच" आहे व सोबत आलेला धुतलेला तांदूळ लिटलफिंगर.

पण शोवाले एवढा विचार करतात का ते काय माहिती!?

अंतु बर्वा's picture

23 Jun 2016 - 8:49 pm | अंतु बर्वा

अग्रीड, त्यांच्या नजरेत सांसानेच जिंकवलेल युद्ध आहे हे. जे काही अंशी खरही आहे म्हणा. सांसाच्या पात्रात झालेला खुप मोठा बदल आहे हा. कुठे परिस्थितीपुढे हतबल होउन रडणारी सांसा आणि कुठे ऐन वेळी बेलिश तर बेलिश पण वेळ पडल्यावर शत्रुलाही मित्र बनवावे लागते हे समज्लेली, किंवा राम्झी माईंड गेम खेळणार्च याची ग्वाही देणारी सांसा!

पगला गजोधर's picture

23 Jun 2016 - 1:22 pm | पगला गजोधर

ओ काकू, शिरेस होऊ नका, "ल्लूल्लूल्लूल्लू ;)" स्मायली पण ध्यानात घ्या ... चेष्टा केली होती ...

अवांतर : नै तरी ती पोरगी (सांसा) अंमळशी मंदच आहे.....

त्याऐवजी आर्या पहा ... सुऱ्याने २-३ वार होऊनही, चेहऱ्यावरच्या वेदना पहा, जसकही अजीर्णामुळे थोडंसं पोटांत दुखतंय... असे ...

अति अवांतर : मुलीं मध्ये पहा थिऑन ची बहीण, डीनेरिस, आर्या, ब्रियेन पहा कश्या ऍक्टिव्ह आहेत .....
नै तर ही ...
http://www.theverge.com/2016/6/20/11974424/game-of-thrones-recap-season-...

sagarpdy's picture

22 Jun 2016 - 6:11 pm | sagarpdy

+1

sagarpdy's picture

27 Jun 2016 - 12:12 pm | sagarpdy

सान्सा...लय भारी
हिवाळा आलाय :)

पिशी अबोली's picture

28 Jun 2016 - 7:09 pm | पिशी अबोली

हिवाळा आलाय... :)

शेवटचा एपिसोड काय काय धक्के देऊन गेला.. पण त्या बॅकग्राऊंड स्कोरने वेड लावलंय. काटा उभा केला अंगावर. एरवी मारामारीच्या बाबतीत जीओटीकडे सटल्टी म्हणतात ती नसते असं मला वाटतं. एकदम डायरेक्ट कत्तल. पण या म्यूझिकने असली काही वातावरण निर्मिती केली, की कायतरी महाभयंकर होतंय याची जाणीव होत राहिली..

स्रुजा's picture

28 Jun 2016 - 8:35 pm | स्रुजा

अगदी अगदी, बाप निघाली ती सरसे सगळ्यांचा. म हा न एपिसोड !!!

आर्या पण भन्नाट. मला तो ब्राव्होस चा ट्रॅक थोडा वेळ वाया घालवणारा वाटला होता पण तो शेवटी योग्य मार्गाला लागला.

जेमी ची प्रतिक्रिया बघायची आहे आता, त्याचा शेवटचा मुलगा ही मेला.

टीरियन/ जेमी / आर्या अथवा इलारिया सॅण्ड (इंदिरा वर्मा) यांच्यापैकी कोणाच्यातरी हातून

यातील टीरियन/ जेमी हे लहान भाऊ आहेत, (जेमी जरी जुळा असला तरी काही क्षण नंतर जन्मलेला) आणि सरसेई च्या लहानपणी (सीजन ५) चेटकिणीचं भाकीत असतं ... तुझी तिन्ही मुलं तुझ्या हयातीत मरतील व तुझा मृत्यू कोणीतरी जवळच्याच्या हातून येईल ....

किंवा आर्या बदला घेईल

किंवा इलारिया ही ओबेरायन च्या मृत्यूचा बदला घेईल.

सरसी नक्की शत्रूच्या हातून मरत नाही. एकतर जेमी नाहीतर स्वतःच सुरू केलेल्या आगीत मरेल.

सरसे जेमी किंवा टिरियन च्या हातुन च मरणार नक्की ! जेमी च्या हाताने मेली तर जेमी चा केटलीन ने सोडल्यापासून आणि हात गमावल्यामुळे जो सद्सदविवेक बुद्धी जागी होण्याचा प्रवास सुरु झालाय तो पूर्ण होणार.

पिशी अबोली's picture

1 Jul 2016 - 4:51 pm | पिशी अबोली

सर्सी इतक्या लवकर मरेल असं वाटत नाही. आता टॉमेन गेल्यावर माणुसकीशी शेवटचा संबंध संपलाय तिचा. स्वतःचंच भूत जिवंतपणी कसं छळेल तिला ते नक्कीच दाखवतील ते. 'इन द गेम ऑफ थ्रोन्स आयदर यू विन ऑर यू डाय' हे तिचं तत्वज्ञान होतं. पण ते तसं नाही हे हा तिच्या पात्रामार्फत शो पुरेपूर दाखवेल असं वाटतंय.

मार्जरी गेली याचं फारफार वाईट वाटलं. तिच्या हातात काहीच नव्हतं..तिने सर्सीला हाय स्पॅरोइतकं कमी लेखलं नसतं. पण ती कधी ना कधी जाणार हे माहीतच होतं.. तरी.. :(

या सीजनने बोल्टन, फ्रे, बराथियन(नावापुरता तरी शिल्लक असणारा), आणि टायरेल असे हाऊस संपवून टाकले डायरेक्ट!

आणि सान्सा..माझी आवडती सान्सा.. सत्तेसोबत येणार्‍या गोष्टी माहीत आहेत तिला. सत्ता नको असं नाही, पण या क्षणी मिळवणं किती धोक्याचं आहे हे ओळखून आहे ही बया. 'मी तुझं प्यादं नाही' हा संदेश लिटलफिंगरला अगदी स्पष्ट दिला तिने.. मरेल ती नक्की लवकरच.पण मार्जरीसारख्याच बारीक बारीक गोष्टी कळतात तिला सत्तेच्या राजकारणातल्या असं दिसतंय आत्तातरी.

बाकी मला व्यक्तिशः देनिरीस, आर्या, ब्रियेन यांच्यासारख्या स्त्री पात्रांना फक्त स्ट्राँग म्हणणं आवडत नाही. ओलेना, मार्जरी आणि सान्सा यांच्यासारख्या माईंड गेम्स खेळणार्‍या बाया जास्त आवडतात. युद्धं फक्त युद्धभूमीवर खेळली जात नाहीत हे दाखवणारा शो म्हणून तर हा शो आवडतो इतका.

पगला गजोधर's picture

1 Jul 2016 - 6:08 pm | पगला गजोधर

सर्सी पुढच्या सीजन मधेच मरणार, पण त्याआधी तिचा अंगरक्षक सर ग्रेगोर क्लिगेनला मरावे लागेल बहुदा.
मग त्याचा तोडीच्या नाही पण निदान जवळपास जाणारा हाऊंड (सुधारित आवृत्ती) सॅन्डोर क्लिगेन हा कदाचित ग्रेगोर क्लिगेनला मारेल काय ?
म्हणजेच सर्सीला मारण्यात आर्या आघाडी घेती का काय ????

चंपाबाई's picture

22 Jun 2016 - 9:54 pm | चंपाबाई

?

एनिग्मा's picture

24 Jun 2016 - 2:43 am | एनिग्मा

बेलिश आणी वेरिस ही दोन पात्र थोडी मनोरंजक आहेत. एक पुर्वेला तर दुसरा पश्चिमेला आहे. दोघे वेस्टोरस पासून लाम्ब राहून वेस्टोरसला कमजोर करत आहेत.

येणार्‍या भागान्मधे ह्या दोघाना पाहाण्यात मजा येइल.

हर्मायनी's picture

22 Jun 2017 - 12:32 pm | हर्मायनी

आणि शेवटचं सान्साचं वाक्य ..

"When the snows fall and the white winds blow, the lone wolf dies but the pack survives."

आता तर्क-वितर्कांना उधाण.. आय होप इट्स नॉट जॉन स्नो शी इस टॉकिंग अबाऊट..

पगला गजोधर's picture

22 Jun 2017 - 2:05 pm | पगला गजोधर

लॉर्ड बेलिशला खतम करून टाकणार आहे बहुदा ..... आर्या किंवा सांसा !

हर्मायनी's picture

22 Jun 2017 - 3:45 pm | हर्मायनी

आधीच्या ट्रेलर मध्ये आर्याच्या हातात बेलीश चा Dagger होता म्हणे !