तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
30 Jun 2015 - 4:34 pm

पावसात जळाया लागलो...
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.

१० दिवस ज्याच्या साक्षीने ऐश केली त्या गणपती बप्पाला त्याच्या घरी पोचवायला आम्ही मिरवणूकीने निघालो होतो. मोठे मोठे डिस्कोलाईट होते आणि डिजेचा फुल साउंड सोडला होता आणि आम्ही सगळेजण त्याच्या तालावर बेभान होउन नाचत होतो. बर्‍याच वेळेला गाणे कोणते चालले हे पण समजत नव्हते. फक्त रीदम ऐकून मी त्यावर नाचत होतो. कारण मी जवळजवळ गेले १० तास त्या मिरवणूकीत नाचत होतो पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. आजूबाजूला मिरवणूक बघायला येणारे लोक सारखे बदलत होते. त्यांच्यात कोणी एखादी चांगली आयटम दिसली की आम्ही जास्तच जोरात नाचायचो. मुद्दाम तिच्या समोर जाउन अचकट विचकट आवभाव करत नाचायला मजा यायची. असा प्रकार सुरु झाला की बर्‍याचश्या जणी तिकडून निघून जाणे पसंत करायच्या. मग त्यांच्यावर काहीतरी विचकट कॉमेंट पास करत आम्ही परत नाचायला लागायचो. एकादी मात्र तयारीची असायची. काहिही केले तरी तिकडून हलायची नाही.

त्या दिवशी एकीने आमच्या पक्याचा असाच पोपट केला. तो नाचायला लागला की ती त्याच्याकडे बघत हसून टाळ्यावाजवून प्रोत्साहन देत होती. आणि पक्या चेकाळून येड्यासारखा नाचत सुटला होता. जवळजवळ तासदिडतास हा खेळ चालला होता. शेवटी पायामधे गोळे येउन पक्या खाली पडला. जागेवरुन त्याला उठताच येत नव्हत. कसाबसा उचलून गाड्यावर टाकला "फुकटच शायनिंग मारत होता xxx, XXX मधे दम नाही तर कशाला उडत होता XXX, पुचाट आहे साला" पक्याला ऐकू जाईल एवढ्या मोठा आवाजात कॉमेंट करुन ती तिकडून निघून गेली आणि इकडे पक्याने पिसाळून दंगा करायला सुरुवात केली. त्याला शांत करताना सगळ्यांची लै एनर्जी गेली होती. पण तो काय ऐकत नव्हता, त्या पोरीच्या मागेच जायला निघाला होता. "आज त्या XXX सोडतच नाही तीला कापूनच टाकतो" असे म्हणत जोरजोरात जागेवरच उड्या मारत होता. कुठल्याच पोराच तो कायपण ऐकायला तयार नव्हता. शेवटी अण्णा मधे पडला आणि त्यानी त्याला शांत केला.

अण्णा आमच्या मंडळाचा अध्यक्ष. कोणताच कार्यकर्ता त्याच्या शब्दा बाहेर नव्हता.

आम्ही मधेच गणपतीच्या मागे ठेवलेल्या बॅरल मधून एखाद दुसरा ग्लास ढोसून यायचो. तेवढीच नाचायला ताकद मिळायची. एक चौक कमीतकमी तासभर तरी सोडायचा नाही असे ठरवून पोलीसांकडे दुर्लक्ष करत आम्ही भन्नाट नाचत होतो. डिजेवर गाणे सुरु झाले "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागल" परत चेकाळून, जोरजोरात ओरडत आम्ही नाचायला सुरुवात केली आणि माझ्याच कडे पहात उभी असलेली ती मला दिसली. मी आपला पक्या व्हायला नको म्हणून थोडेसे दुर्लक्ष करत नाचत होतो. पण ही बया मला काही सोडायलाच तयार नव्हती. एकटक माझ्याकडे बघत ती तिकडे उभी होती. मग म्हटले चला डेरींग करु, म्हणून तिच्या समोर गेलो आणि म्हटले "येतीस का नाचाया" ती पण बहुतेक वाटच बघत होती अवताणाची. लगेच तीने ओढणी कमरेला बांधली आणि आमच्या बरोबर नाचायला लागली. दोन तीन वेळा गाण्याचा वन्समोअर झाला. त्यानंतर नविन पोपट, बघ बघ बघ सये कस बुगु बुगु वाजतय, तुझा झगा ग.. अशी कितीतरी गाणी झाली, ती तेव्हढा वेळ भन्नाट नाचत होती. २५-३० पोरांमधे एकटी पोरगी बिनधास्तपणे नाचत होती. सगळ पब्लिक तिच्याकडे टकामका बघत होत. नंतर गणपतीचा गाडा पोलीसांनी पुढे घ्यायला लावला. आम्ही चौक ओलांडेपर्यंत ती कुठे गेली समजलच नाही. पण घागर नळाला लाव आणि त्यावर नाचणारी ती माझ्या मनात एकदम फेव्हीकॉलसारखे घट चिकटून बसले ते कायमचेच.

त्या नंतर बर्‍याच दिवसांनी गोसाव्यांच्या शाम्या कडे सत्यनारायण होता. त्याच्या घरासमोरच पाचसहा स्पिकरवर दणदणाटी गाणी लावली होती. सगळ्या पोरांच्या तिर्थप्रसादाची सोय शाम्याने शेपरेट केली होती. प्रत्येकाचे विमान थोडे थोडे उडायला लागले होते आणि तेव्हढ्यात स्पिकरवर गाणे सुरु झाले "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं" माझ्या मना समोर गणपतीची मिरवणूक, आणि मिरवणूकीत नाचणारी ती उभी राहिली आणि मी बेभान पणे नाचायला लागलो. मी नाचतोय म्हटल्यावर बाकीची पोरं पण माझ्या बरोबर नाचायला लागली. आम्ही कितीवेळ नाचत होतो आणि कोणत्या गाण्यांवर ते मला समजत नव्हत. माझ्या डोक्यात घागर नळाला लाव सुरु होत आणि त्याच तालावर मी नाचत होतो. तेवढ्यात तिकडे पोलीसांची गाडी आली. आम्हा सगळ्यांना धरुन त्यांनी गाडीत कोंबले आणि मग लॉकप मधे नेउन टाकले. लॉकप मधे यायची आमची काही पहिलीच वेळ नव्हती. अण्णा थोड्यावेळात सोडवायला येईल हे माहित असल्याने आम्ही बिनधास्त होतो. पण त्याला कुठेतरी अर्जंट सुपारी आली होती. आम्हाला त्या लॉकप मधे फुल नाईट काढायला लागली. च्यामायला असले बेडकाएवढे मोठे मोठे ढे़कुण होते आणि चिमणी एवढे मोठे डास. रात्री हवालदाराने त्याच्या मोबाईलवर नेमक हेच गाण लावल आणि माझ्या डोक्यात या ओळींनी घर केल..

नको करू बाई, लई सांडासांडी,
गर्दी झाल्यावर होईल भांडाभांडी . . २
तुझ्या ओढाओढीन कॉक सुटाया लागलं - २
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं - २

रात्रभर येड्यासारखा याच ओळी गुणगुणत मी बसलो होतो. किती डास चावले आणि किती ढेकुण ते कळाच नाही. सकाळी अण्णा आला आणि सगळ्यांना सोडवून घेउन गेला. अण्णाच्या गाडीतपण मी हेच गुणगुणतच होतो "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं". आता या गाण्याबरोबर आता अजून एक आठवण जोडली गेली होती. लॉकपची....

अण्णा नगरशेवक झाला म्हणून गल्ली मधे एक ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम ठेवला होता. अण्णाने तर हात एकदम सैल सोडला होता. ज्याला जे पाहिजे ते द्यायच, चिकण, मटन, दारु कशाला पण कुणाला नाही म्हणायच नाही. असा केर्टींग वाल्यांना त्याने दम दिला होता. दोन हातात दोन तंगडी कबाब आणि काखेमधे बाटली पकडून समोरच्या खुर्चीवर तंगड्या पसरुन मी ऑर्केष्ट्रा वेनजॉय करत होतो. आणि त्यांनी गाण सुरु केल... "जाग झाल सार गाव, तांबड फुटाया लागल... तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागल. ऑरकेष्ट्रा बरोबर आलेल्या डान्सर पैकी दोघी त्या गाण्यावर नाचायला लागल्या आणि मला एकदम २००० व्होल्टचा झटका बसला. त्या दोघींपैकी एक तीच होती गणपती मधे नाचलेली. मीच काय आमच्या गल्लीतली सगळी पोरे अवाक होउन बघत होती. सोनेरी कलरचा झगझगीत टॉप आणि काळ्यारंगाची टाईट जीन पँट घालुन नाचणारी ती मला एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. मला एकदा ती कतरीना दिसत होती, तर एकदा ऐश्वर्या राय, तर एकदा सनी लीऑन सारखी. च्यायला डोळ्यात ठरतच नव्हती ती. नाचता नाचता तिने एकदम माईक हातात घेतला आणि माझ्या कडे बोट दाखवत म्हणाली "येतूस का नाचाया" मला दोन मिनीट काही सुधरलेच नाही. तो पर्यंत बाकिच्या पोरांनी मला स्टेजवर ढकलला होता. मी झपाटल्यासारखा तिच्या बरोबर नाचत सुटलो. नंतर कधी प्रोग्राम संपला आणि मी कधी घरी येउन झोपलो मला कळालेच नाही. पुढचे दोनतीन आठवडे मी त्याच गाण्याच्या आणि नाचाच्या धुंदी मधे वावरत होतो. माझ्या आणि तिच्या डॅन्सचा विडीओ तर मी १०० २०० वेळा पाहिला असेल.

आज पण कुठे हे गाणे ऐकले की माझ्या डोळ्या समोर नाचणारी ती उभी रहाते आणि माझी पावले आपोआप नाचाया लागतात. आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?

साऱ्या गावांत काल बोभाटा झाला,
पाणी येणार नाय, सार्वजनिक नळाला . . २
लवकर उरकून घे , लोक उठाया लागलं - २
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं - २

धर्मपाकक्रियाबालकथासाहित्यिकऔषधोपचारशिक्षणअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Jun 2015 - 4:45 pm | मुक्त विहारि

कुछ गाने ऐसे ही होते है....

साले मरने के बाद भी जन्नत तक पीछा करेंगे....

कपिलमुनी's picture

30 Jun 2015 - 4:49 pm | कपिलमुनी

येकदम ढिंचाक !

अवांतर : या गीताचे रसग्रहण आठवले.

सूड's picture

30 Jun 2015 - 4:53 pm | सूड

जमलं बरं का विडंबन!! =))

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 5:20 pm | टवाळ कार्टा

आयला हे विडंबन आहे??? वर्जिनल लेख कोणता मग?
नुस्ता लेख म्हणूनसुध्धा मस्त आहे :)

अभ्यास वाढवा टक्कोजीराव!!

सतिश गावडे's picture

30 Jun 2015 - 5:49 pm | सतिश गावडे

पैजारबुवांनी आपल्या स्मरणरंजनाच्या शेवटी त्या सोनेरी कलरचा झगझगीत टॉप आणि काळ्यारंगाची टाईट जीन पँट घालुन नाचणार्‍या त्यांच्या अप्सरेचा फोटो टाकला असता तर कदाचित टक्याला कळलं असतं.

पैजारबुवासुद्धा डायरीतलं पान इथे टाकतील असं वाटलं नव्हतं मात्र!!

मिपाकरांना संसर्गजन्य डायरीया झाला आहे.
एकाला संध्याकाळी एक आठवणीतील गाणे आणि त्यासंबंधी गतकाळातील सुंदर क्षण आठवू लागताच बाकिच्यांनाही आठवू लागले आहेत. :)

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 7:21 pm | टवाळ कार्टा

आयला अस्से आहे का....दणदणीत जम्लेय विडंबन :)

अन्या दातार's picture

30 Jun 2015 - 4:59 pm | अन्या दातार

कहर!!!

अनुप ढेरे's picture

30 Jun 2015 - 5:07 pm | अनुप ढेरे

क्या ब्बात! छान लिहिलय!

सतिश गावडे's picture

30 Jun 2015 - 5:13 pm | सतिश गावडे

जबरा लिहिलंय. याच गाण्याचं मिपावर पाच वर्षांपूर्वी आधी झालेलं रसग्रहण आठवलं.

आदूबाळ's picture

30 Jun 2015 - 5:56 pm | आदूबाळ

झकास जमलंय सट्ल विडंबन ;)

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jun 2015 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

=))

उगा काहितरीच's picture

30 Jun 2015 - 7:04 pm | उगा काहितरीच

नुसता लेख म्हणाल तर भारी आहे ! पण जर हे डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं विडंबन करण्याच्या हेतूने लिहीले असेल तर नाही आवडलं , कुणी जर मनापासून इतका सुंदर आणि सत्य लिहीत असेल तर प्लिज असे विडंबन नका करत जाऊ.

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 7:23 pm | टवाळ कार्टा

असे विडंबन करता यायला उच्चकोटीची प्रतिभा लाग्ते

सतिश गावडे's picture

30 Jun 2015 - 8:35 pm | सतिश गावडे

तरी बरं आहे हल्ली झ दर्जाची टमरेल विडंबनं थंडावलीत. नाही तर उकारावांनी मिपा सोडलं असतं.

उगा काहितरीच's picture

30 Jun 2015 - 9:35 pm | उगा काहितरीच

छे हो ! मी कसलं सोडतोय मिपा ? मिपानी मला सोडू नये म्हणजे झालं.

सतिश गावडे's picture

30 Jun 2015 - 9:51 pm | सतिश गावडे

मिपानी मला सोडू नये म्हणजे झालं.

आपण ताळतंत्र सोडला नाही तर मिपाही आपल्याला सोडत नाही. :)

वा! काय वाक्य आहे!!मिपाधोरणात घालायला हवं!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jul 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण ताळतंत्र सोडला नाही तर मिपाही आपल्याला सोडत नाही. :)

:) :) :) :) :) :)

नाखु's picture

1 Jul 2015 - 8:25 am | नाखु

मस्ताड.

स्वगत : धन्या आता सल्ला "गार" पदाला पोचला काय? बुवांकडून खातरजमा करून घ्यावी.

मूळ स्वगतः हे आतून आलेले "खरे" साहित्यीक मुक्त्क

चकाट्या मुवींंचा मित्र नाखुस

कधीकाळी 'बाईकच्या सीट वर मांजर ओरखडे मारतं, काय करु?' अशा संदर्भातला काथ्याकूट टाकणार्‍या आयडीला इतकं भान यावं म्हणजे कवतिक आहे.

टवाळ कार्टा's picture

30 Jun 2015 - 7:47 pm | टवाळ कार्टा

कहर आहेस

उगा काहितरीच's picture

30 Jun 2015 - 7:52 pm | उगा काहितरीच

कधीकाळी 'बाईकच्या सीट वर मांजर ओरखडे मारतं, काय करु?' अशा संदर्भातला काथ्याकूट टाकणार्‍या आयडीला इतकं भान यावं म्हणजे कवतिक आहे.

सूडभाऊ धन्यवाद !आता ती बाईक पुण्यातच आहे. एखाद्या कट्ट्याला भेट झाली तर निश्चित दाखवीन. (मिपाकरांची स्मरणशक्ती बाकी चांगली हो!)

मोहनराव's picture

30 Jun 2015 - 7:13 pm | मोहनराव

वाह. झकास जमलंय.

पैसा's picture

30 Jun 2015 - 8:56 pm | पैसा

हा लेख पैजारकाकूंनी इथे टाकण्यापूर्वी वाचलाय का?असल्यास त्यांची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.नसल्यास इथे वाचल्यावरची त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.

-बहुरन्गी

कवितानागेश's picture

1 Jul 2015 - 6:58 am | कवितानागेश

आप तो सटीक निकले पैजारबूवा!

चौकटराजा's picture

1 Jul 2015 - 7:10 am | चौकटराजा

वरील लिखाण वाचून भाउ पाध्ये, चंद्रकान्त खोत जयवंत दळवी यांची आठवण आली. त्यात जीनच्या पॅन्टचा रंग भडक पिवळा किंवा केशरी टाकावा.म्हणजे " त्या " पोरांचे वर्णन पुरे होईल.आपल्या लेखाचे इन्स्पिरेशन एका साहित्य संपादकाच्या नावावर आहे. नीलकांत यांचा " लिहिते" करण्याचा उद्देश अशा रितीने सफल झाला आहे.

बाकी " त्या' आठवणीचे विडम्बन असे असेल तर जमले नाही असे म्हणेन. तुमची ही स्वतंत्र कलाकृती आहे व ती सुरेख जमलीय. .
एकदा हायफाय सोसायतीतील नवरा बायकोचे विश्व असा बेस घेऊन असेच भन्नाट लिखाण करून पहा. फाटलेल्या पिवळ्या गंजीफ्राक वाल्यांचा गोष्टी वपुंनी भरपूर लिहिल्यात.

काही-काही गाणी असल्या प्रिय व्यक्ती बरोबरच नाचायची,
ही पोली साजुक तुपातली
पप्पी दे पारुला
ढगाला लागली कळ
शिट्टी वाजली गाडी सुटली
आणि
जवा नविन पोपट सारखं अजरामर गाणं
ही अशी गाणी, नगरशेवक निवडुन आल्याची मिरवनूक आणि तरंगलेला दिवस...बस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...
अजून काय हवे?

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2015 - 11:34 am | टवाळ कार्टा

खिक्क

स्वप्नांची राणी's picture

1 Jul 2015 - 11:40 am | स्वप्नांची राणी

पोरी जरा जपून दाण्डा धर, राहिलच की, एकदम शिरशीरी का बिर्शिरी काय ते...!!

सतिश गावडे's picture

1 Jul 2015 - 11:56 am | सतिश गावडे

शिरशीरी का बिर्शिरीवालं एक गाणं हंटर चित्रपटात आहे.

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2015 - 11:59 am | टवाळ कार्टा

"शिट्टी वाजली गाडी सुटली" हे तेच आहे हो ;)

'तुज्या पीरतीचा हा इंचू मला चावला' अ‍ॅडवलं की सिक्वेन्स पूर्ण होईल!!

अविनाश पांढरकर's picture

1 Jul 2015 - 3:58 pm | अविनाश पांढरकर

'वाट माझी बघतोय रिक्षावाला' अ‍ॅडवलं की सिक्वेन्स पूर्ण होईल!!

नूतन सावंत's picture

1 Jul 2015 - 8:41 am | नूतन सावंत

बाकी पैजारबुवा फटू राह्यला की.आनि व्हीडो आसुन्बी तुम्ही तो हिते चढवला ह्ये नाही लय ब्येक्कार.त्यातून ती तुमाला अनोळखी आसताना.

पाटील हो's picture

1 Jul 2015 - 9:08 am | पाटील हो

जबराट

बॅटमॅन's picture

1 Jul 2015 - 12:11 pm | बॅटमॅन

काय अफ्फ्फाट विडंबने =)) =)) =))

त्यांच्यात कोणी एखादी चांगली आयटम दिसली की आम्ही जास्तच जोरात नाचायचो. मुद्दाम तिच्या समोर जाउन अचकट विचकट आवभाव करत नाचायला मजा यायची. असा प्रकार सुरु झाला की बर्‍याचश्या जणी तिकडून निघून जाणे पसंत करायच्या. मग त्यांच्यावर काहीतरी विचकट कॉमेंट पास करत आम्ही परत नाचायला लागायचो. >>>
हे सगळे उद्योग करताना गणपती तुमच्याकडे बघत असतो . सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश धार्मिक किवा अध्यात्मिक मुळीच नाहीये . जो उद्देश ठेवून
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला होता तो उद्देश आता राहिलाच नाहीये . तेव्हा हे सार्वजनिक गणेशोत्सव बंद करून घरातच त्याचं धार्मिक , अध्यात्मिक महत्व जपावं .
बाकी हे गाणं माझं लई आवडतं हाय .

हे सगळे उद्योग करताना गणपती तुमच्याकडे बघत असतो .

यत्ता दुशली ब मधली पोरेही आजकाल ऐकून घेत नैत हो असलं हे.

तुषार काळभोर's picture

1 Jul 2015 - 3:42 pm | तुषार काळभोर

लय भारी विडंबन!!
शेपरेट लेख म्हणून पण चांगलाच आहे.
वाकडोजी धने यांची ही प्रतिक्रिया वाचेपर्यंत विडंबन आहे, हे सुद्धा लक्षात आलं नाही.

बाकी याच्याशी असहमत!

कवितानागेश's picture

1 Jul 2015 - 3:44 pm | कवितानागेश

आप तो बडे झॅन्टेमॅटिक निकले पैजारबुवा !

आजकाल ऐकून घेत नैत हो असलं हे>>>
नका का घेईना . त्यामुळे गणपती त्यांच्याकडे बघायचा राहतोय का ? ;-)

स्पंदना's picture

4 Jul 2015 - 2:22 pm | स्पंदना

हंगाश्शी! हे कस अगदी व्हळी पेटल्यागत झालय.हयात कूट काय लपून छपुन न्हाय.सगळ कस दणदणीत.बॅंड बाजासकट.खुल्लम खुल्ला. न्हाय म्हणजे ऑब्जेक्शन चा सवालच न्हाय.

तिमा's picture

4 Jul 2015 - 3:02 pm | तिमा

आनि त्ये, 'माझ्या हिरीला इंजन बसवा' राह्यलं की वो!!
- तंग इजारबुवा.

विडंबन आहे हे लक्षात येऊ नये इतकं चांगलं स्वतंत्र लेखन आहे हे.
"सटल" विडंबन मस्त जमलंय!