तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
पावसात जळाया लागलो...
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.
१० दिवस ज्याच्या साक्षीने ऐश केली त्या गणपती बप्पाला त्याच्या घरी पोचवायला आम्ही मिरवणूकीने निघालो होतो. मोठे मोठे डिस्कोलाईट होते आणि डिजेचा फुल साउंड सोडला होता आणि आम्ही सगळेजण त्याच्या तालावर बेभान होउन नाचत होतो. बर्याच वेळेला गाणे कोणते चालले हे पण समजत नव्हते. फक्त रीदम ऐकून मी त्यावर नाचत होतो. कारण मी जवळजवळ गेले १० तास त्या मिरवणूकीत नाचत होतो पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. आजूबाजूला मिरवणूक बघायला येणारे लोक सारखे बदलत होते. त्यांच्यात कोणी एखादी चांगली आयटम दिसली की आम्ही जास्तच जोरात नाचायचो. मुद्दाम तिच्या समोर जाउन अचकट विचकट आवभाव करत नाचायला मजा यायची. असा प्रकार सुरु झाला की बर्याचश्या जणी तिकडून निघून जाणे पसंत करायच्या. मग त्यांच्यावर काहीतरी विचकट कॉमेंट पास करत आम्ही परत नाचायला लागायचो. एकादी मात्र तयारीची असायची. काहिही केले तरी तिकडून हलायची नाही.
त्या दिवशी एकीने आमच्या पक्याचा असाच पोपट केला. तो नाचायला लागला की ती त्याच्याकडे बघत हसून टाळ्यावाजवून प्रोत्साहन देत होती. आणि पक्या चेकाळून येड्यासारखा नाचत सुटला होता. जवळजवळ तासदिडतास हा खेळ चालला होता. शेवटी पायामधे गोळे येउन पक्या खाली पडला. जागेवरुन त्याला उठताच येत नव्हत. कसाबसा उचलून गाड्यावर टाकला "फुकटच शायनिंग मारत होता xxx, XXX मधे दम नाही तर कशाला उडत होता XXX, पुचाट आहे साला" पक्याला ऐकू जाईल एवढ्या मोठा आवाजात कॉमेंट करुन ती तिकडून निघून गेली आणि इकडे पक्याने पिसाळून दंगा करायला सुरुवात केली. त्याला शांत करताना सगळ्यांची लै एनर्जी गेली होती. पण तो काय ऐकत नव्हता, त्या पोरीच्या मागेच जायला निघाला होता. "आज त्या XXX सोडतच नाही तीला कापूनच टाकतो" असे म्हणत जोरजोरात जागेवरच उड्या मारत होता. कुठल्याच पोराच तो कायपण ऐकायला तयार नव्हता. शेवटी अण्णा मधे पडला आणि त्यानी त्याला शांत केला.
अण्णा आमच्या मंडळाचा अध्यक्ष. कोणताच कार्यकर्ता त्याच्या शब्दा बाहेर नव्हता.
आम्ही मधेच गणपतीच्या मागे ठेवलेल्या बॅरल मधून एखाद दुसरा ग्लास ढोसून यायचो. तेवढीच नाचायला ताकद मिळायची. एक चौक कमीतकमी तासभर तरी सोडायचा नाही असे ठरवून पोलीसांकडे दुर्लक्ष करत आम्ही भन्नाट नाचत होतो. डिजेवर गाणे सुरु झाले "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागल" परत चेकाळून, जोरजोरात ओरडत आम्ही नाचायला सुरुवात केली आणि माझ्याच कडे पहात उभी असलेली ती मला दिसली. मी आपला पक्या व्हायला नको म्हणून थोडेसे दुर्लक्ष करत नाचत होतो. पण ही बया मला काही सोडायलाच तयार नव्हती. एकटक माझ्याकडे बघत ती तिकडे उभी होती. मग म्हटले चला डेरींग करु, म्हणून तिच्या समोर गेलो आणि म्हटले "येतीस का नाचाया" ती पण बहुतेक वाटच बघत होती अवताणाची. लगेच तीने ओढणी कमरेला बांधली आणि आमच्या बरोबर नाचायला लागली. दोन तीन वेळा गाण्याचा वन्समोअर झाला. त्यानंतर नविन पोपट, बघ बघ बघ सये कस बुगु बुगु वाजतय, तुझा झगा ग.. अशी कितीतरी गाणी झाली, ती तेव्हढा वेळ भन्नाट नाचत होती. २५-३० पोरांमधे एकटी पोरगी बिनधास्तपणे नाचत होती. सगळ पब्लिक तिच्याकडे टकामका बघत होत. नंतर गणपतीचा गाडा पोलीसांनी पुढे घ्यायला लावला. आम्ही चौक ओलांडेपर्यंत ती कुठे गेली समजलच नाही. पण घागर नळाला लाव आणि त्यावर नाचणारी ती माझ्या मनात एकदम फेव्हीकॉलसारखे घट चिकटून बसले ते कायमचेच.
त्या नंतर बर्याच दिवसांनी गोसाव्यांच्या शाम्या कडे सत्यनारायण होता. त्याच्या घरासमोरच पाचसहा स्पिकरवर दणदणाटी गाणी लावली होती. सगळ्या पोरांच्या तिर्थप्रसादाची सोय शाम्याने शेपरेट केली होती. प्रत्येकाचे विमान थोडे थोडे उडायला लागले होते आणि तेव्हढ्यात स्पिकरवर गाणे सुरु झाले "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं" माझ्या मना समोर गणपतीची मिरवणूक, आणि मिरवणूकीत नाचणारी ती उभी राहिली आणि मी बेभान पणे नाचायला लागलो. मी नाचतोय म्हटल्यावर बाकीची पोरं पण माझ्या बरोबर नाचायला लागली. आम्ही कितीवेळ नाचत होतो आणि कोणत्या गाण्यांवर ते मला समजत नव्हत. माझ्या डोक्यात घागर नळाला लाव सुरु होत आणि त्याच तालावर मी नाचत होतो. तेवढ्यात तिकडे पोलीसांची गाडी आली. आम्हा सगळ्यांना धरुन त्यांनी गाडीत कोंबले आणि मग लॉकप मधे नेउन टाकले. लॉकप मधे यायची आमची काही पहिलीच वेळ नव्हती. अण्णा थोड्यावेळात सोडवायला येईल हे माहित असल्याने आम्ही बिनधास्त होतो. पण त्याला कुठेतरी अर्जंट सुपारी आली होती. आम्हाला त्या लॉकप मधे फुल नाईट काढायला लागली. च्यामायला असले बेडकाएवढे मोठे मोठे ढे़कुण होते आणि चिमणी एवढे मोठे डास. रात्री हवालदाराने त्याच्या मोबाईलवर नेमक हेच गाण लावल आणि माझ्या डोक्यात या ओळींनी घर केल..
नको करू बाई, लई सांडासांडी,
गर्दी झाल्यावर होईल भांडाभांडी . . २
तुझ्या ओढाओढीन कॉक सुटाया लागलं - २
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं - २
रात्रभर येड्यासारखा याच ओळी गुणगुणत मी बसलो होतो. किती डास चावले आणि किती ढेकुण ते कळाच नाही. सकाळी अण्णा आला आणि सगळ्यांना सोडवून घेउन गेला. अण्णाच्या गाडीतपण मी हेच गुणगुणतच होतो "तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं". आता या गाण्याबरोबर आता अजून एक आठवण जोडली गेली होती. लॉकपची....
अण्णा नगरशेवक झाला म्हणून गल्ली मधे एक ऑर्केष्ट्राचा कार्यक्रम ठेवला होता. अण्णाने तर हात एकदम सैल सोडला होता. ज्याला जे पाहिजे ते द्यायच, चिकण, मटन, दारु कशाला पण कुणाला नाही म्हणायच नाही. असा केर्टींग वाल्यांना त्याने दम दिला होता. दोन हातात दोन तंगडी कबाब आणि काखेमधे बाटली पकडून समोरच्या खुर्चीवर तंगड्या पसरुन मी ऑर्केष्ट्रा वेनजॉय करत होतो. आणि त्यांनी गाण सुरु केल... "जाग झाल सार गाव, तांबड फुटाया लागल... तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागल. ऑरकेष्ट्रा बरोबर आलेल्या डान्सर पैकी दोघी त्या गाण्यावर नाचायला लागल्या आणि मला एकदम २००० व्होल्टचा झटका बसला. त्या दोघींपैकी एक तीच होती गणपती मधे नाचलेली. मीच काय आमच्या गल्लीतली सगळी पोरे अवाक होउन बघत होती. सोनेरी कलरचा झगझगीत टॉप आणि काळ्यारंगाची टाईट जीन पँट घालुन नाचणारी ती मला एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती. मला एकदा ती कतरीना दिसत होती, तर एकदा ऐश्वर्या राय, तर एकदा सनी लीऑन सारखी. च्यायला डोळ्यात ठरतच नव्हती ती. नाचता नाचता तिने एकदम माईक हातात घेतला आणि माझ्या कडे बोट दाखवत म्हणाली "येतूस का नाचाया" मला दोन मिनीट काही सुधरलेच नाही. तो पर्यंत बाकिच्या पोरांनी मला स्टेजवर ढकलला होता. मी झपाटल्यासारखा तिच्या बरोबर नाचत सुटलो. नंतर कधी प्रोग्राम संपला आणि मी कधी घरी येउन झोपलो मला कळालेच नाही. पुढचे दोनतीन आठवडे मी त्याच गाण्याच्या आणि नाचाच्या धुंदी मधे वावरत होतो. माझ्या आणि तिच्या डॅन्सचा विडीओ तर मी १०० २०० वेळा पाहिला असेल.
आज पण कुठे हे गाणे ऐकले की माझ्या डोळ्या समोर नाचणारी ती उभी रहाते आणि माझी पावले आपोआप नाचाया लागतात. आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?
साऱ्या गावांत काल बोभाटा झाला,
पाणी येणार नाय, सार्वजनिक नळाला . . २
लवकर उरकून घे , लोक उठाया लागलं - २
तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं - २
वाचने
14231
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
मस्त हो पैजार बुवा....
ढिंचाक
जमलं बरं का विडंबन!! =))
In reply to जमलं बरं का विडंबन!! =)) by सूड
आयला हे विडंबन आहे??? वर्जिनल
In reply to आयला हे विडंबन आहे??? वर्जिनल by टवाळ कार्टा
अभ्यास वाढवा टक्कोजीराव!!
In reply to अभ्यास वाढवा टक्कोजीराव!! by सूड
पैजारबुवांनी आपल्या
In reply to पैजारबुवांनी आपल्या by सतिश गावडे
पैजारबुवासुद्धा डायरीतलं पान
In reply to पैजारबुवासुद्धा डायरीतलं पान by सूड
मिपाकरांना संसर्गजन्य डायरीया
In reply to मिपाकरांना संसर्गजन्य डायरीया by सतिश गावडे
आयला अस्से आहे का....दणदणीत
कहर!!!
क्या ब्बात! छान लिहिलय!
जबरा लिहिलंय. याच गाण्याचं
झकास जमलंय सट्ल विडंबन ;)
=))
नुसता लेख म्हणाल तर भारी आहे
In reply to नुसता लेख म्हणाल तर भारी आहे by उगा काहितरीच
असे विडंबन करता यायला
In reply to असे विडंबन करता यायला by टवाळ कार्टा
हेच म्हणतो...
In reply to हेच म्हणतो... by सतिश गावडे
छे हो ! मी कसलं सोडतोय मिपा ?
In reply to छे हो ! मी कसलं सोडतोय मिपा ? by उगा काहितरीच
मिपानी मला सोडू नये म्हणजे
In reply to मिपानी मला सोडू नये म्हणजे by सतिश गावडे
वा! काय वाक्य आहे!!मिपाधोरणात
In reply to मिपानी मला सोडू नये म्हणजे by सतिश गावडे
आपण ताळतंत्र सोडला नाही तर
In reply to आपण ताळतंत्र सोडला नाही तर by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्याशेठ
In reply to नुसता लेख म्हणाल तर भारी आहे by उगा काहितरीच
कधीकाळी 'बाईकच्या सीट वर
In reply to कधीकाळी 'बाईकच्या सीट वर by सूड
कहर आहेस
In reply to कधीकाळी 'बाईकच्या सीट वर by सूड
कधीकाळी 'बाईकच्या सीट वर
वाह. झकास जमलंय.
हा लेख
आप तो सटीक निकले पैजारबूवा!
बहोत खूब
काही-काही गाणी असल्या प्रिय
In reply to काही-काही गाणी असल्या प्रिय by अजया
खिक्क
In reply to काही-काही गाणी असल्या प्रिय by अजया
शिट्टी वाजली...
In reply to शिट्टी वाजली... by स्वप्नांची राणी
शिरशीरी का बिर्शिरीवालं एक
In reply to शिट्टी वाजली... by स्वप्नांची राणी
"शिट्टी वाजली गाडी सुटली" हे
In reply to शिट्टी वाजली... by स्वप्नांची राणी
'तुज्या पीरतीचा हा इंचू मला
In reply to काही-काही गाणी असल्या प्रिय by अजया
वाट माझी बघतोय रिक्षावाला
बाकी पैजारबुवा फटू राह्यला की
आवडला आपल्याला
काय अफ्फ्फाट विडंबने =)) =))
त्यांच्यात कोणी एखादी चांगली
In reply to त्यांच्यात कोणी एखादी चांगली by तुडतुडी
हे सगळे उद्योग करताना गणपती
येक लंबर!!!
आप तो बडे झॅन्टेमॅटिक निकले
आजकाल ऐकून घेत नैत हो असलं हे
हंगाश्शी! हे कस अगदी व्हळी
आनि त्ये
विडंबन आहे हे लक्षात येऊ नये