आधुनिकता व भारत :- काही इंटरेस्टींटिंग मुद्दे

मन's picture
मन in काथ्याकूट
3 May 2015 - 7:03 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
१ मे रोजी वसंत व्याख्यानमालेत राजीव साने ह्यांचं व्याख्यान होतं.
इंटरेस्टिंग वाटलं. त्यातील मुद्दे आठवतील तसे आता चोवीस तासानं लिहून काढलेत.
.
.

दिनांक १ मे .वसंत व्यख्यानमाला. साडेसहाची वेळ. टिळक स्मारक मंदिर. वक्ते राजीव साने.
त्यांची काही पुस्तकं गाजलित; काही पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही आहे.
मला त्यांचं लोकसत्तेतलं 'गल्लत गफलत फजहब ' हे सदर आवडलं. तार्किक मांडणी आवडली.
'आधुनिकता व भारत' हा विषय. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पाच दहा मिनिटं नजर फिरवली. सभागृह अर्ध्याहून थोडं जास्त भरलं असावं. ज्येष्ठ नागरिकांचा भरणा अधिक. तरुण थोडेच.(फार तर गर्दीपैकी वीसेक टक्केच.)
आख्ख्या सभाग्रुहात मिळून उपस्थित स्त्रिया आठ दहा असाव्यात. त्याही जवळपास सर्वच मध्यमवयीन किंवा सिनिअर सिटिझन गटातल्या. ब्राम्हणी हौस असेल भाषणाची; असं मला वाटलं आधी; पण उपस्थितांत माझ्या समोरच्या एक दोन रांगांत ग्रामीण वेशभूषा व बोलणं( गावंढळ, खेडवळ, खेडूत म्हणता येतील तसे) असणारे बर्रेच जण होते. अर्थात भाषणाच्या शेवटी आम्ही वक्त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मुद्दे चांगले उपस्थित केले.
शुद्ध उच्चारी लोकं मात्र तर्कात गंडले होते अध्यात्माच्या प्रेमामुळं.
असो.
.
.
मुद्दे मला आठवतील तसे लिहितोय. व्याख्यान ऐकून चोवीसहून अधिक तास झालेत.
किती,कसं , काय आठवेल ठाउक नाही. किती नेमकं समजलय ठाउक नाही; पण प्रयत्न करतो.
मला मुद्दे इंटरेस्टिम्ग वाटले.
.
.

  1. आधुनिक समाजात vertical mobility असते. खालच्या स्तरातल्या व्यक्तीला कष्ट करुन वरच्या स्तरात जायची अधिक संधी असते. सैद्धांतिकदष्ट्यातरी ते पूर्णतः मान्यच आहे. व्यवहारातही आधुनिक व्यवस्था ते अधिकाधिक आणू पाहते. पारंपरिक व्यवस्थेत जन्मजात भूमिका ही अंतिम असल्यासारखीच होती. किंबहुना एखाद्या व्यक्तीचा जन्म ते मृत्यू ह्यादरम्यान त्याने काय करायचे हे निश्चित केलेले असे. vertical mobility चा फरसा स्कोप नाही. एका अर्थानं ह्यामुळेच बेरोजगारी ही नसल्यासारखीच होती. वर्षभरात खूप काही काम नसले तरी एक ठराविक असा उत्पन्नाचा वाटा- बलुतं उपलब्ध असे.
  2. आधुनिक काळाचे अजून एक लक्षण म्हणजे अनोळखी लोकांशी अधिक प्रमाणात केले जाणारे व्यवहार. गावापेक्षा शहर मोठं असणार. उत्पादकता, ग्राहक वर्ग अधिक असणार. कोण कुठून येणार, कुठून खरेदी करणार; काही साम्गता येणार नाही. ह्याऐवजी पूर्वी परिचयातील व्यक्तीकडूनच खरेदी होइ. एका गावातील सर्वच व्यक्ती एकमेकांना ओळखत, ठराविक काम ठराविक लोकच करत. मला शेजारच्या गावातील एखादा कारागीर अधिक उत्तम काम करतो असे वाटले तरी मी शक्यतो त्याला बोलावत नसे. एकत्रित कुतुंबप्द्धती काय किम्वा ग्रामव्यवस्था काय, ही पूर्ण सिस्टिम एक इन्शुरन्स प्रॉडक्ट असल्यासारखी होती. तुम्ही अडीअडचणीत असाल तर तुम्हाला इतर कुणी मदत करेल; कुणी पुण्या,धर्मादाय कार्य म्हणून करेल. उद्या त्याच्यावर वाईट वेळ आली, तर तुम्ही मदत करणे अपेक्षित असे. पण हे सर्व लिखित अशा रुपात नव्हते. ठळक, औपचारिक असे इन्शुरन्सचे रुप त्यास नव्हते. त्यात एक अनौपचारिकता होती; कायदेशीर बंधन नव्हते. अध्याह्रुत अपेक्षा होती परस्पर सहकार्याची. आणि ह्या अपेक्षेवर खूपदा कामे होउनही जात असत कारण-- सर्वच माणसे परिचयातली!
  3. आधुनिक व्यवस्था व आधुनिक पूर्व (म्हंजे मध्ययुगापर्यंंतची ) व्यवस्था ह्यात अजून एक प्रमुख फरक म्हणजे व्यवस्थेचा समाजकेम्द्रित असण्याकडून व्यक्तिकेंद्रित होण्याकडे झालेला प्रवास.
  4. आधुनिक काळ म्हणजे लोकशाही. लोकशाही इतरही महत्वाची लक्षणे आहेत. काटेकोर व्याख्या आहेत; पण "आधुनिकता" ह्या संदर्भात पहायचे झाले तर महत्वाचे लक्षण म्हणजे लोकशाहीत विरोध इज नॉट इक्वल टू द्रोह. विरोध म्हणजे वैर नव्हे.
    हे मान्य होणे; त्यावर व्यवस्था चालणे हे खरोखर कौतुकास्पद व अधिक प्रगल्भ असण्याचे लक्षण आहे.
  5. मध्ययुगापासून आधुनिकतेकडे होणारा प्रवास irreversible आहे. अटळ आहे. पुन्हा परतवून लावण्यासारखा नाही.
    आपण सर्वच आधुनिक व्यवस्थेचा पुरेपूर(किंवा जमेल तितका) लाभ घेतो.
    पण खूपदा मनात कुठेतरी आधुनिक पूर्व व्यवस्थेबद्दल एक जबरदस्त आकर्षण असते; तो आपल्या मनातला जणू एक युटोपिया असतो.
    'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट' अशी ती स्थिती असते. आपण त्याबद्दल फॅण्टसाइझ करत असतो.
    प्रत्यक्षात मात्र आपलं संपूर्ण जीवन हे नव्या व्यवस्थेतलच असतं.
    कुणीही व्यक्ती नव्या व्यवस्थेशी कधी जोडली जाते ? ती शिशु असताना पहिल्यांदा लस घेते; तेव्हापासूनच.
    साधा विचार करुन पहा. पेनकिलर अस्तित्वातच नाहित. तुमचा दात दुखतो आहे. कसं जगाल ?
    जीवनाचा काय दर्जा राहिल ? आपलं जीवन ह्याकाळात बरच सुसह्य झालेलं आहे; पण हे आपल्याच्यानं स्पष्ट, थेट मान्य होत नाही!
    मानवी मन मोठं गंमतीदार्/गुंतागुंतीचं आहे.
  6. मात्र तरीही मोठमोठ्या लोकांनाही जुन्या काळानं बरीच भुरळ घातलेली आहे. गांधींनी 'हिंदस्वराज' ह्या नियतकालिकात
    काही अशीच चमत्कारिक, विज्ञान विरोधी विधानं केलित.(सानेंनी उदाहरणं दिली, पण सध्या आठवत नाहियेत.)
    टिळकांनी 'संमतीवयाच्या कायद्या'ला विरोध केला. बालविवाहाचं एकप्रकारे समर्थन केलं. कारण काय ?
    तर 'ब्रिटिशांनी आमच्यात ढवळाढवळ करु नये. आम्हालाही चांगले-वाईट काय ते समजते. आम्ही काय ते करु'.
    नेमाडेंनी 'हिंदू-जगण्याची एक समृद्ध अडगळ' मध्येही मध्ययुगातलं क्रौर्य वगैरे रेखाटलय; पण पुन्हा ते सगळ्म सांगून
    झाल्यावर त्याबद्दल एक सुप्त आकर्षणही मांडलय. 'कोसला' लिहिणारे नेमाडेच स्वतः 'शामची आई' ही मराठीतली थोर कादंबरी
    आहे असं म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटतं. श्यामची आई ही कथा श्यामच्या बापाच्या नजरेतून पहा. एका अपयशी, कर्तव्य न केलेल्या
    मानसाची व पर्यायाने त्याच्यामुळे कुटुंबाची जी परवड झाली, त्याची कहाणी आहे. खोत असणे ; हे श्यामच्याअ बाबांचं काम. खोत बनून,
    चाम्गली बक्कळ वसुली त्यानं करायला हवी. किंवा ते करवत नसल्यास इतर काही मार्गाने चांगले अर्थार्जन करावे. तेही हा इसम करत नाही.
    आणि ह्या असल्या घराचं, वातावरनाचं गौरवीकरण कसलं करताय ?
    त्याकाळात कामगारांना ठराविक आठवडी सुटी नव्हती.(ह्यावर आज विश्वास बसणं कठीण आहे; पण असं होतं खरं.)
    कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुटी मिळावी म्हणून जे आंदोलन सुरु होतं; त्यालाही टिळकांनी विरोध केला.
    प्रमुख कारण काय , तर सुटीचा दिवस रविवार--ख्रिश्चनांसाठीच काय तो सोयीचा असणार होता म्हणून.
    म्हणून सुटी नाही मिळाली तरी चालेल; प्ण ख्रिश्चनांच्या दिवशी कशाला घ्यावी, अशी टिळकांची भूमिका.
    एतद्देशीयांसाठी रविवारचे कुठे काय महत्व ? असा त्यांचा सवाल. पण नारायण मेघाजी लोखंडे ह्या ग्रेट्ट कामगार
    नेत्यानं ह्यातून एक मार्ग काढला. आम्हा (तत्कालीन) कामगार मंडळींपैकी बहुतेकांचं दैवत खंडोबा आहे;
    खंदोबाचा वार रविवार आहे; म्हणून रविवारीच सुटी देणं समर्थनीय आहे; असा त्यांनी युक्तीवाद केला.
    तो मान्यही झाला.
    ही कामगार मंडळी तीच होती ज्यांनी टिळकांना सतत पाठिंबा दिला; टिळक तुरुंगात गेले तेव्हा ह्यांनी लाक्षणिक संपही केला.
    त्यांच्याबद्दल टिळकांची ही भूमिका!
  7. हे विज्ञान बिज्ञान, आधुन्निक व्यवस्था 'त्यांची' फ्याडं. आपल्याला काय त्याचं. भांडवलशहांनी आणलेलं कैतरी. तिथं आम आदमीला विचारतो कोण, त्याची किंमत कोणाला. ह्या व्यवस्थेत कोनाला काही करण्यासारखं आहे का. असं म्हणत नाकं मुरडत असाल तर ... थांबा. दोन मिनिटं विचार करा.
    तिकडच्या सार्वकालिक थोर व्यक्तींपैकी एक मानला जातो तो फ्यारडे. आज जे इंडस्ट्रियल युग आलय, त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे ह्याचे शोध.
    ह्यानं वीज-चुंबकशक्ती-मेक्यानिकल यम्त्रना ह्यांचं जबरदस्त परस्परांत होणारं रुपांतर अभ्यासलं. आजचा सगळा इंडस्ट्र्यांचा, आपल्या घरात चालनार्या वीज-पंखा-प्रकाश डोलारा त्यावर उभा आहे. असा हा फ्यारडे. ह्याची आर्थिक स्थिती उत्तम म्हणावी अशी नव्हती. तो फार तर पहिली दुसरीपर्य्म्तच शाळेत शिकला असेल.
    नंतर तो चक्क रद्दीत मिळतील ती पुस्तकं उत्सुकता म्हणून वाचू लागला. त्यातून इतका तरबेज झाला. ह्या व्यवस्थेत जो काम करेल, योगदान करण्यास तयार आहे, त्यास नक्कीच संधी आहेत. त्याचप्रमाणे लुई पाश्चर हा 'तिकडचा' की 'इकडचा' ह्यानं नक्की काय फरक पडतो ?
    त्याच्या शोधांचा सगळ्या मानवजातीलाच फायदा होतो आहे ना ?
    त्याच्या कालात त्यालाही बराच त्रास्/विरोध झाला. आधुनिक काळ, व्यवस्था ब्रिटिशांनी आणली म्हणून केवळ ती वाईट असं कसं म्हणायचं मग ?
  8. आधुनिक काळात पेट्ण्ट कायद्याच्या नावाखाली ज्ञानाची मक्तेदारी निर्माण केली जाते आहे; ज्ञानाची फक्त विक्री होत आहे; एकूण समाज म्हणून ते आपनास नुक्सानकारक आहे वगैरे प्रचार केला जातो. पण त्यात खरच तथ्य आहे ? मुळात ज्ञाननिर्मितीसाथी प्रचंड कश्ट घ्यावे लागतात. त्या ज्ञानाची किंमत घेतली जाते म्हनजे त्या ज्ञानाची समाजाला गरज आहे; हेच त्यातून सिद्ध होते. अशा ज्ञाननिर्मितीस उत्तेजन म्हणून पेटण्ट कायदा आहे. शिवाय तुम्ही कोणतेही पेटण्ट अनंत काळ आपल्याकडे ठेवू शकत नाही. पाच-सात वर्षात ते जगाला फुक्कट उपलब्ध होतेच. उलट पेटण्ट कायदा म्हनजे एकप्रकारे पाच-सात वर्षात ज्ञान सर्व जगाला खुले करण्याची सक्तीच आहे. शिवाय तुम्ही पेटण्ट घेतले आणि त्याचा वापर न करता ते तसेच कुजवत ठेवले; तर तेही चालत नाही. ते वापरणे भाग असते कायद्यानुसार. आणि पेटण्टचा तो पिरियद संपल्यावर पहा ना किंमती कशा धडाधड कमी होतात ते.
  9. पेटण्टच्या गाजलेल्या दोन केसेसबाबतही असे बर्रेच गैरसमज आहेत. एक म्हणजे हळदीच्या पेटण्टची कथा.
    तेव्हा दोन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी हळदीचा औषधी गुणधर्म आपणच शोधत असल्याचा दावा केला.
    त्याचे पेटण्ट क्लेम केले. प्रत्यक्षात त्यांचा डोळा अमेरिकन ग्राहकावर होता; ते त्यांच्याकडून बक्कळ पैसा उकळू पाहत होते.
    ह्यातून भारतीय नागरिकांना थेट असा काहिच धोका नव्हता. पण वातावरण मात्र तसे उभे केले गेले.
    पेटण्टवर दावा करु पाहणार्‍यांविरुद्ध माशेलकरांनी केस जिंकली. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी अमेरिकन ग्राहकांवर अनेकानेक उपकारच केले होते.
    भारतीयांना तसाही त्यातून काहिच धोका नव्हता. पण तसा धोका असल्याचा समज मात्र भारतात पसरला.
  10. पेटण्टची अजून एक गोष्ट म्हणजे बासमती तांडलाच्या तथाकथित पेटण्टची.
    जगभरात भारताचा बासमती हा ब्रॅण्ड बराच फेमस/लोकप्रिय आहे. टेक्सासम्धील अमेरिकन शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे
    एक तांदूळ प्रजाती विकसित केली. जी तिथलीच होती. तीही बासमती सारखीच लांबसडक होती. बर्‍यापैकी चविष्ट होती.
    त्यांनी त्यांच्या त्या नव्या तांदूळ प्रजातीचं नाव 'टेक्समती' ठेवलं. पण अशा 'बासमती'शी साधर्म्य राखणार्‍या नावानं ग्राहकांत संभ्रम होउ शकतो.
    बासमती ब्रांडचे ग्राहक प्रभावित/मिसलीड होउ शकतात म्हणून अशा नावाला बासमतीवाल्यांनी विरोध केला. केसही जिंकले.
    पण म्हणजे काय झालं ? 'टेक्समती'चं उत्पादन वगैरे थांबलं का? त्यावरचा शास्त्रज्ञांचा हक्क गेला का ? तर अजिबात नाही!
    त्यांनी फक्त नाव टेक्समती ऐवजी काहीतरी वेगळं नाव वापरलं. बस्स. इतकच झालं. पण आपल्याकडे मात्र तोवर भलतीच हवा झाली होती.
  11. स्वाध्याय परिवारातील पांडुरम्गशास्त्री आठवले ह्यांनीही अशीच कै च्या कै विधानं केलीत. बालविवाहाचं समर्थन करताना
    "स्त्री वयात येताना पहिला मनात भरलेल्या पुरुषाचे गुणच अपत्यात उतरतात. त्यामुळे लहान वयातच विवाह उरकावा हे उत्तम" अशी भूमिका त्यांनी घेतली.
    आता ह्यात शास्त्रीय तथ्य नाहीच; पण क्षणभर ते आहे असं ग्रुहित धरलं तरी लवकर लग्न केल्यानं इतर कोणता भलताच पुरुष मनात भरनार नाही; ह्याची काय ग्यारंटी; ह्याबद्दल ते काहे बोलत नाहित. आणि शिवाय मनात भरलेला पुरुष खरोखर नेमका भला,सज्जन असेल; तर चांगलय की; अहो आख्खी मानवजात भली,सज्जन, कर्तबगार वगैरे होणार नै का ?
    आठवल्यांची अजून काही अशास्त्रीय विधानं --" ज्याप्रमाणं घोडी -गाधव ह्यांच्या संकरातून खेचर न्निपजतं; जे पुनरुत्पादन करण्यास असमर्थ असतं; त्याचप्रमाणं घोडीचा पुन्हा घोड्याशी संब्म्ध घदला तर त्या घोडा-घोडीच्या संबंधातून निर्मिलेली अपत्येसुद्धा पुनरुत्पादनास असमर्थ असतात ! ह्याचे कारण पूर्व-संस्कार.
    एकदा गाढवाशी संब्म्ध घडला, म्हणजे इथून पुधे घोड्याम्शी संबंध घडला तरी उपयोग नै. पूर्व-स्म्स्कारानं सगळ्याची वाट लावली आहे."
  12. वीज वाईट? औश्णिक वीज नको. फार ग्लोबल वॉर्मिंग होतं. राख वगैरे बनते. मग जलविद्युत ? नै नै , नको. त्यासाठी तर धरणं लागतात. त्यातून सगळं वाटोळं होतं. डिझेल-पेट्रोल नको. ते तर घातक व मर्यादित! आणि अणु ऊर्जा? त्याचे तर नावही काढणे फार मोठे पाप. ते तर फक्त दुरितच आहे.
    वस्तुतः जैतापूरच्या प्रकल्पात इतकं धोकादायक असं काहीहीए नाही. त्या जमिनी तशाही कसल्या जात नव्हत्या. अगदि तिथले सातबारेही अगदि अलिकडेपर्यंत अपडेटेड नव्हते.(राबत्यात नसलेल्या जमिनिकडे कोण कशाल लक्ष देत बसेल ?) पण प्रकल्प बननार म्हटल्यावर लोकांनी धावाधाव करुन सातबारे वगैरे काढले. कंपन्यांना अडवून पाहिलं; चांगली मस्तपैकी डील पदरात पाडून घेतली. इतकं केल्यवर मग निदान प्रोजेक्टतरी सुरु व्हावा ना ? तर तेही नाही. कारण राजकीय विरोध! खरं तर जैतापूर प्रकल्प वाजपेयी सरकारच्या काळातच अप्रूव्ह झालेला. त्यावेळी शिवसेनेनंही मान्यता दिलेली.(केंद्र सरकारात तेही मंत्री होते ना.)
    पण आता वेळ बदलली. राजकीय नफे-तोटे व त्याची गणितं बदलली. विरोध सुरु!
    मग महाराष्ट्र वीजेवाचून तडफडला तरी हरकत नाही.
  13. GM बियाणांविरोधात हल्ली बरच बोललं जातय.(ननिंचा धागा 'लढवय्या शेतकरी' आठवतोय ?)
    पण त्यात नेमकं काय वाईट आहे कुणी सांगत नाही. सलग काही दशकं अमेरिकेत वापरात आहेत GM तरी काही झालेले नाही.
    मागील पंधरावर्षापासून खुद्द भारतात GM कापूस वापरतोच की आपण. त्याचं कापड-कापूस नॉर्मलच असतं की. त्याची सरकी निघते , त्या सरकीचं तेल आपण वापरतोच की. शिवाय ती नुसती सरकीसुद्धा कैक लाख पाळीव पशू खातातच की. इतक्या दिवसात काही दिसलय विचित्र ? मग नक्की भीती कशाची आहे ?
    GM ला सर्वात कडादून विरोध आहे ग्रीनपीस ह्या स्म्स्थेचा. ह्या संस्थेला कीटकनाशकांच्या लॉबीचं बक्कळ फंदिंग आहे.
    GM बियाणांत जनुकातच असे काही बदल असतील की कीटकनाशकांची गरज असणार नाही. मग त्यांचं दुकान कसं चालेल ?
    म्हणून मानवतेचं नाव घेउन कंथशोश सुरु आहे.
    "GM कापूस आपण वापरत असलो तरी कापूस उत्पादक आत्महत्या करतोय हे वास्तव आहे " असलं एक आर्ग्युमेंट आहे.
    हे आर्ग्युमेंत तार्किक नाही. आत्महत्या प्रामुख्याने विदर्भात होतात; इतरत्र तितक्या होत नाहित तेच बियाणं वापरुनही.
    कारण आत्महत्यांचं खरं कारण सरकारचं 'कापूस एकाधिकारशाही ' हे जुलमी धोरण आहे; ते बियाणं नव्हे.
  14. स्त्री अधिक वयस्कर पुरुषाला पती म्हणून निवडते ह्यामागे उत्क्रांती आहे.
    'लीथल जीन्स'चं लॉजिक त्यामागं आहे. अधिक सशक्त प्रजा निर्माण होण्याची अधिक शक्यता त्यामागं आहे.
  15. अजूनही दोन चार मुद्दे बाकी आहेत; त्यात भारतीय वृत्तीबद्दल काय दोष वाटतात त्याबद्दल साने बोलले.

  16. "देशीवाद" ही जी काही संकल्पना आहे; त्यास मुलात अधिकाधिक हवा काही प्रगत देशच देताहेत आडून आडून. "आधुनिकता हे पाश्चात्त्य पिल्लू आहे. आपलं स्वतःचं असं काही खास असावं. आपण आपल्या मुळांकडे परत

    जावं." असं जे काही लोकांना वाटतय त्यास अप्रत्यक्षपणे पण जानीवपूर्वक्/मुद्दाम प्रगत देश हवा देताहेत.
    इतरांनी प्रगत होउन आपल्याशी स्पर्धा करु नये असा त्यांचा प्रयत्न आहे.(अगदि अस्साच मुद्दा सान्यांनी गल्लत गफलत गजहब ह्या सरातही मांडला होता. त्यांच्या मते,; जागतिकीकरणाची थासून आग्रही मागनी करनारे देश

    चीन-देश-ब्राझील हेच आहेत. प्रगत देशांना ते नको आहे. प्रगत देशातल्या काही कामगार संघटना मुद्दाम इथल्या काहींना फण्डिंग देउन जागतिकीकरनाविरोधात हवा करु पाहतात. त्यांना त्यांचा रोजगार वाचवायचा आहे. जागतिकीकरनाचा

    उलट भारत चीन ब्राझील ह्यांना फायदाच आहे; त्यांना ते हवे आहे. आणि प्रगत देश आज ते इच्छा असूनही अडवू शकत नाहियेत. )

  17. आधुनिक व्यवस्थेत लोकांना "प्रजा " समजत नाहित; तर "नागरिक" समजतात. प्रजा हा शब्द सरळसरळ प्रजनन ह्या शब्दातून आलेला आहे. टोळीतला सर्वात ताकतवान नर स्वतःची प्रजा वाढवणार . एका अर्थानं तो त्यांचा

    पालक. त्यातून 'प्रजा' ही संकल्पना आलेली. 'नागरिक ' ह्या संकल्पनेत लोकांचं अधिक जबाबदारीपूर्ण वर्तन अपेक्षित आहे.

  18. युग ही संकल्पना घसरगुंडी सारखी आहे. सत्ययुग --> त्रेतायुग --> द्वापरयुग -->कलियुग ही जणू काही लोकांमधील चांगुलपणाची उतरंडच आहे. इथे फक्त चांगल्याकदून वाईटाकडे प्रवास होतो. जे जे होणार ते

    अधिकाधिक वाईटच होनार अशी मानसिकता त्यामुळे बनते. उलट प्रवास नॉर्मल केसेस मध्ये शक्य नाही. अपवाद फक्त एकच. तो म्हणजे प्रलय! त्यावेळी सगळं काही आधी नष्ट होणार. पुन्हा जवळपास शून्यातून सुरुवात केल्यासारखी

    स्थिती. पुन्हा सत्ययुग; आणि हो.
    पुन्हा तीच घसरगुंडी सुरु! दर युगाच्या शेवटी अभ्युत्थानम् अधर्मस्या, तदात्मानं सृजाम्यहम् म्हनत साक्षात परमेश्वर अवतार घेतो. पण हाती काय लागतं ?
    घसरगुंडी थांबते का ? दरवेळी उलट अधिक वाईट असे पुढचे युग सुरु होते. रामावताराच्या शेवटीही तेच; कृष्णावताराच्या शेवटीही तेच. ही घसरगुंडी साक्षात देवही थांबवू शकत नाहित. मग सामान्य माणसाला काही करावसं वाटणं तर

    दूरच. तो तर सतत नियतीच्या हातातीलच कुणीतरी असल्याच्या मानसिकतेत वावरणार. पुरुषार्थ गाजवायला स्कोप आहे कुठे ?

  19. 'मायावाद ' हा प्रकार असाच. ऐहिक जगात काही नाही; ऐहिक जग हे खओटे/मिथ्याच आहे; पारमार्थिक अचिव्हमेंट हेच काय ते यश असे म्हटल्याने भौतिकाकडे दुर्लक्ष. सगळे लक्ष स्वतःपुरती मुक्ती-मोक्ष मिळवण्याकडे; तीही

    पारमार्थिक जगातील; ऐहिक तर सोदून देण्यायोग्य. एका मायावादाच्या फ्यान असलेल्या मित्राला सानेंनी साम्गितलं -- "होय, आहे हे स्वप्नच आहे; मान्य. पण हे स्वप्न आम्ही दु:स्वप्न नव्हे तर सुखद स्वप्न म्हणून जगू/घडवू. ते संपेल

    तेव्हा बघता येइलच की बाकी काय ते. तोवर ह्याच भौतिक जगात कर्तबगारी गाजवावी." अजून एक मुद्दा सानेंनी डिट्टो कुरुंदकराम्सारखाच मांडला. 'ब्राम्हनांनी बहुजनांना ज्ञानापासून वंचित ठेवले' असे म्हटले जाते. पण नीट पाहू गेल्यास

    प्रश्न पडतो की ज्ञान ब्राम्हणांकडे तरी होते कुठे ? त्यांनी फार तर स्वतःचे अज्ञान चांगले मस्त प्याकेजिंग करुन लपवून ठेवले; इतरांकडे जे प्र्याक्टिकल्/व्यावहारिक ज्ञान्/कौशल्य होते; ते ज्ञानच नव्हे; असे त्यांना पटवले. उदा:-

    कुंभारकाम, नक्षीकाम, बांधकाम , शेतीतील अवजारे बनवणे, सांभाळणे, लोहारांची कामं... ही खरोखर अधिक उपयुक्त होती गावगाडा चालवायला. पण ह्यांनी त्यालाच दुय्यम ठरवण्याची लबाडी/हुशारी केली.
    शिवाय 'न्याय' ही संकल्पना पुरेशी रुजलेलीच नाही समाजात, मानसिकतेत. अस्तेय, अपरिग्रह पाळायचे; दुसर्‍याचे काही चोरायचे नाही; ही शिकवण.
    ही शिकवण म्हणून चांगलिच आहे. पण "दुसर्‍याचे चोरु नये; कारण त्यावर त्याचा हक्क आहे" ही न्यायाची संकल्पना त्यामागे नाही. "आपण अस्तेय, अपरिग्रह पाळले नाहित; तर आपली हानी होइल; मोक्ष मिळणार नाही " ही भीती.

    सगळा स्वतःपुरताच स्वार्थी विचार. व्यापक दृष्टी नाही. न्यायविचार स्पष्ट नाही.
    अर्थात ह्या विचारसरनीविरोधातही वेळोवेली वैचारिक बंडे झाली; सुधारणांचे प्रयत्न झाले. उदा:- मर्यादित प्रमानात टिळकांसारख्या एरव्ही सनातनी वाटणार्‍याने ते केले. किंवा पूर्णवादाचा प्रसार्/प्रचार करणार्‍या पारनेरकर महाराजांनीही

    सुधारणांचे बरेच विचार मांडले.
    त्यांनी आपल्या सुधारणांनाही वेदांताचाच कसा आधार आहे; हे ही दाखवले. होय; एका अर्थाने ही सर्व समावेशकता आपल्या संस्कृतीत आहे;
    ही चांगली गोष्ट आहे.

  20. तपश्चर्या ही संकल्पना. स्वतःला त्रास करुन घेणे चांगले; गौरवास्पद.आत्मक्लेशाचं गौरवीकरण. का ? तर म्हणे त्याने तुमच्या पापाचा ब्यालन्स संपत जातो; भोग भोगण्म त्यामुळे बरच असतं एका अर्थी. आणि हो

    चुकून आनंदी असाल, मजा करत असाल तर प्रत्यक्षात तुम्ही सुखाचा ब्यालन्स कमी करत असता; कन्झ्युम करत असता. हा पाप-पुण्याचा ब्यालन्स पर्फेक्ट झिरो करणं जमलं तर मोक्ष म्मिळणार. नैतर अम्गाला कर्म चिकटनार. मुक्ती

    नाही; सुटका नाही. तुम्ही काय क्रुती केली; त्यातून काय निर्मिती झाली; कर्म्/कार्य किती ऊपयुक्त होतं; ह्यास महत्व नाही; फक्त तुम्ही त्यात ते न गुंतता केलं की नाही; इतकच महत्वाचं. कारण न गुम्तता केलं की तुमचा ब्यालन्स

    शून्याजवळ असतो; मुक्ती पक्की होत असते. प्रत्यक्षात तुमच्या क्रुत्यावरून व तुम्ही जी निर्मिती केली आहे; त्यावरुन तुमचे महत्व ठरायला हवे. पण असे होत नाही आपल्याकडे. आधुनिक व्यवस्थेत मात्र हे होते; म्हणून ती त्यातल्या त्यात

    बरी.(त्यातही दोष आहेतच. पण ती काही अपरिवर्तनीय नाही. तीही प्रवाही आहे. त्यात सतत सुधारणा कालानुरुप करत राहता येणं शक्य आहे.) निर्मिती ऐवजी भोगाला महत्व आहे आपल्याक्डे.
    आंधळा नवरा मिळाला तर आपणही त्याच्यासारखच आंधळं व्हावं; असं वाटणारी गांधारी. तिचं आपल्याला कोण कौतुक.
    आपण जग पाहून नवर्‍याची मदत करावी असं तिच्या डोक्यात येत नाही. ती स्वतःलाही डोळ्यावर पट्टी बांधते-- आत्मक्लेश.
    त्याचं आपल्याला कौतुक --गौरवीकरण. डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून "पट्टीची " पतिव्रता आपण तिला समजतो. (इथे हशा पिकला)

.
.
.
व्याख्यान झाल्यावर मी त्यांना विचारलं. "तुम्ही म्हणता मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे प्रवास म्हणजे म्हणजे समाजकेंद्री व्यवस्थेकडून व्यक्तिकेंद्री व्यवस्थेकडे प्रवास आहे. पण उलट लोकशाही म्हणजे अधिकाधिक समाजाला सामावून घेणे,

अधिकाधिक समाजाचे इन्क्लुजन नै का. उलट मध्ययुगात एकाच व्यक्तीकडे--राजकडे किंवा फर त्याच्या निकटवर्तीयांकडे--राजमंडळाकडे अधिकार असत. त्यामुळं तुम्ही म्हणता त्याच्या बरोब्बर उलट परिस्थिती नाहिये का. मध्ययुगात उलट

अधिक व्यक्तिकेंद्री व्यवस्था होती. आता ती अधिक समाजकेंद्री होते आहे. " त्यांचं उत्तर :- "personal आणि individual ह्या दोन सारख्या वाटनार्‍या शब्दांत सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे.मध्ययुगाबद्दल तुमचं म्हण्णं

personal ह्या प्रकारात येतं. पण त्या काळात इतर प्रजेचे अधिकार किती होते ? individual म्हणून त्यांना कितपत मान होता ?
मी म्हणतो आहे ते हे की individualism आता प्रवास सुरु आहे. काही ठराविक लोकांनाच जणू अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य असं नाहिये. सर्वांनाच सारखे अधिकार असावेत व म्हणून, हे तत्वतः तरी सर्वत्र मान्य आहे.
.
.
भारतीय स्म्स्कृतीचे काही चाहते मात्र ह्यामुळे दुखावले गेले असावेत. त्यांनी भाषणानंतर सान्यांना साधारणतः "तुम्ही अमुक अमुक मुद्दे भाषणात सामील करुन घायला हवे होतेत(पक्षी :- स्वत; समजून घ्यायला हवे होतेत)" असच त्यांना

सांगितलं. "आमच्याकडे खूप काही होतं. उडती विमानंही असण्याची शक्यता होती" असा त्यांचा मुद्दा असावा असं वाटलं. उलट ग्रामीण वेशभूषा, बोलणं वगैरे असणारी मंडळी अधिक तार्किक बोलताहेत असं वाटलं. "साने, तुम्ही म्हणताय ते

बरोबर असेल तर हजारो वर्षापूर्वी विमानं उडण्याचा दावा करणार्‍यांवर कारवाई का होत नसावी" असा प्रश्न त्यातल्या एकानं विचारला.
मला आंतरजालावरचा "अनश्व रथ " अशा टायटलचा उत्पलचा लेख आठवला. सान्यांचे काही मुद्दे त्यासारखेच होते.
हे सगळं लक्षात ठेवलं म्हणजे १००% डोक्यात आहे असं नाही. प्रवेशासाठी पाच रुपये तिकिट होतं. आपल्या बेस्ट किंवा पीएमटीच्या तिकिटाइतक्या आकाराचं. भाषण रंगात आल्यावर मला त्यातले महत्वाचे कीवर्ड्स लिहून घ्यावेत असं वाटलं. त्या तिकिटावर मी पंधरावीस कीवर्ड्स लिहून घेतले.(एकेका मुद्द्याला एकेक कीवर्ड्.)

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

3 May 2015 - 8:57 pm | तुषार काळभोर

मोजकंच असतं, पण विचार करायला भाग पाडणारं (डोक्याला शॉट न देता); आणि तरी (बर्‍याचदा) पटणारं असतं .

राजीव सानेंचे बहुतेक मुद्दे पटले.

(अवांतर : " बर्‍याचदा " आणि "बहुतेक" हे शब्द केवळ फॉर्मॅलिटी म्ह्णून वापरलेत. त्याऐवजी "नेहमी" आणि "सर्व" हे शब्द जास्त योग्य आहेत. पण " बर्‍याचदा " आणि "बहुतेक" हे शब्द डिप्लोमॅटिक वाटतात, म्हणून वापरलेत. नाहीतर शब्दाचा कीस काढून वाद घालणारे लोक सगळीकडेच पावलीला पन्नास सापडतील.)

पैसा's picture

3 May 2015 - 9:03 pm | पैसा

बरंच काही भरलंय या भाषणात! मनोबा, बरेच दिवसांनी मिपावर लिहिल्याबद्दल धन्यवाद! आता सावकाशीने वाचेन आणि भाषणाबद्दल काय वाटलं ते लिहीन. अशा भरपूर मुद्दे असलेल्या भाषणात लक्ष केंद्रित करून ऐकणे फार कठीण जाते! धन्य तुझी!

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 10:15 am | श्रीरंग_जोशी

लेखाची लांबी बरीच असल्याने केवळ चाळला आहे. निवांतपणे वाचीनच.

त्यांनी फक्त नाव टेक्समती ऐवजी काहीतरी वेगळं नाव वापरलं.

अमेरिकेतील दुकानांत टेक्समती तांदूळ मिळतो, तसेच जास्मती तांदूळही मिळतो.
TexmatiBrown TexmatiJasmati

चित्रांवर क्लिक केल्यास त्या उत्पादनाचे अ‍ॅमेझॉनवरील पेज उघडेल.
अमेरिकेतील स्टोअर्समध्ये जिथे हे तांदूळ ठेवले असतात तिथेच भारतातून आयात केलेले विविध बासमती तांदूळ देखील ठेवले असतात.

विशाखा पाटील's picture

4 May 2015 - 11:30 am | विशाखा पाटील

भाषणातले मुद्दे सोप्या भाषेत दिल्याबद्दल खूप धन्यवाद! मुळात राजीव साने यांचं लेखन समजायलाच थोडा वेळ लागतो, पण मुद्दे विचार करण्याजोगे असतात. त्यांचं भाषण समजून घेऊन ते मांडणं, हे खरंच अवघड आहे.
अलीकडेच लोकसत्तात बासमती तांदळाच्या पेटंटवर मृदुला बेळे यांचे लेख आले आहेत. त्यात दुसरी बाजू दिसतेय.

आयुर्हित's picture

4 May 2015 - 2:10 pm | आयुर्हित

"स्त्री वयात येताना पहिला मनात भरलेल्या पुरुषाचे गुणच अपत्यात उतरतात"
हे कितपत खरे आहे हे माहित नाही, पण
"पुरुष (वयात येताना कि नंतर?) पहिला(कि अजून कितव्या?) मनात भरलेल्या स्त्रीचे गुणच अपत्यात उतरतात"
ह्याची मात्र खात्री पटली.

येथे पहा: Why Reena Roy looks like Sonakshi?

येथे फोटो पहा :10 pictures that hint at Sonakshi Sinha's resemblance with Reena Roy

आणि कारण आहे Sonakshi breaks her silence on her father's affair with Reena Roy

हेतू एवढाच कि ह्या विषयातील PHD करणाऱ्यां सुज्ञ लोकांनी जरूर विचार व अभ्यास करावा!

पहिला दुवा इंडिया टीव्ही या अतिशय उच्च संदर्भमूल्य असलेल्या संस्थळाचा आहे.

कपिलमुनी's picture

5 May 2015 - 11:09 am | कपिलमुनी

http://www.storypick.com/30-unbelievable-look-alikes-indian-celebrities/

आणि प्रतिक्रिया इथेच द्या

असंका's picture

5 May 2015 - 11:21 am | असंका

:-))

मन१'s picture

4 May 2015 - 10:07 pm | मन१

सर्व वाचक-प्रतिसादकाम्चे मनःपूर्वक आभार.
.
.
टेक्समतीच्या पेटण्टचा मुद्दा समजण्यात काही घोळ झालाय की काय माझा ?
सान्यांच्या कुणी संपर्कात असेल तर त्यांना ह्याधाय्ग्याची लिंक देउन त्यांना हेच म्हणायचं आहे का,
आणि काय्काय दुरुस्त्या सुचवाव्याशा वाटतात धाग्यात हे विचारलं तर बरं होइल.

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 10:40 pm | श्रीरंग_जोशी

टेक्समती तांदळाबाबत माझा असा अंदाज आहे की, अमेरिकेबाहेर हा तांदूळ टेक्समती नावाने विकता येत नसावा.

TED Case Studies

टेक्सासस्थित राइस सिलेक्ट ही कंपनी हा तांदूळ विकते.

अ‍ॅमेझॉनवरून हा तांदूळ खरेदी करताना अमेरिकेबाहेर मागवण्याचा पर्याय नाहीये.

International Shipping: This item is not eligible for international shipping.

अत्रुप्त आत्मा's picture

5 May 2015 - 12:41 am | अत्रुप्त आत्मा

मन्वंतर!

अतिशय नेमकं आणि उपयुक्त. राजीव सान्यांची व्याख्याने आता आवर्जून ऐकायला हवीत.

खंडेराव's picture

5 May 2015 - 11:42 am | खंडेराव

आवडला. बहुतांशी मुद्दे पटलेही.