फरक
संध्याकाळ चे सात वाजले होते.
गावदेवी ला ठेवलेली स्कुटर घेऊन वर्तक नगर ला जायचे होते.
वळणावर अंधार.
जो काय प्रकाश होता तो दुकानांच्या रोषणाईचा.
वळणावरच्या दुकानाचा बोर्ड.
त्यावरची जाहीरात उठुन दिसत होती.
अंधारामुळे अगदी हाईलाईट मधे.
म्युनिसिपालीटी बरोबर सेटींग, सुत, दोरा, रश्शी नक्की...
जाहीरात वाचली.
"कमी वजनाचे एक ग्राम सोन्याचे फोर्मीग (का फॉर्मिंग) दागिने. फरक नाही पडल्यास ३० दिवसात पैसे परत"
......
फ्लॅश बॅक
लग्नाला ५ वर्षे झालेली.
अक्षय त्रुतियेच्या दिवशी बायकोने हातात अंगठी दिली.
नवरत्नाची.