संध्याकाळ चे सात वाजले होते.
गावदेवी ला ठेवलेली स्कुटर घेऊन वर्तक नगर ला जायचे होते.
वळणावर अंधार.
जो काय प्रकाश होता तो दुकानांच्या रोषणाईचा.
वळणावरच्या दुकानाचा बोर्ड.
त्यावरची जाहीरात उठुन दिसत होती.
अंधारामुळे अगदी हाईलाईट मधे.
म्युनिसिपालीटी बरोबर सेटींग, सुत, दोरा, रश्शी नक्की...
जाहीरात वाचली.
"कमी वजनाचे एक ग्राम सोन्याचे फोर्मीग (का फॉर्मिंग) दागिने. फरक नाही पडल्यास ३० दिवसात पैसे परत"
......
फ्लॅश बॅक
लग्नाला ५ वर्षे झालेली.
अक्षय त्रुतियेच्या दिवशी बायकोने हातात अंगठी दिली.
नवरत्नाची.
" आईने दिलीय".
वा. वा. वा. दहाव्या ला नउ का?
" ३० दिवसात फरक पडेल असे म्हणाली"
असे का? पण फरक नेमका कशात पडेल ह्यावर काही डीटेलींग...
"३० दिवसानी बघुया"
बरोब्बर ३० दिवसाने तोच प्रश्न परत विचारला.
"प्रसाद म्हणुन दिला तु मिठाई म्हणुन खा. २० ग्रॅम ची आहे ती. लग्नात ५ ग्रॅम ची दिली होती. त्याला फ्ळे कापायला सुरी असे जावे ने म्हटले होते." असे उत्तर मिळाले.
.....
आता दागिने बहुतांशी बायकांकरिता.
मग नेमका फरक कुठे केंव्हा आणि कसा आणि नेमका कुणाला पडतो? ह्याचा फॉर्म शी संबंध आहे का? म्हणजे समजा क्रिकेटरच्या बायकोने घातले तर क्रिकेटरच्या फॉर्म मधे फरक पडतो का? किंवा राजकारणी लोकांच्या बायकोने घातले की लगेच मंत्रीपद मिळते का?
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 12:29 pm | एस
थोडंसं समजलं हे क्रिप्टिक. बाकी त्यावर भाष्य काय करावं हे मात्र समजलेलं नाहीये. :-)
21 Nov 2015 - 12:48 pm | नाखु
किमान ५-१० प्रतीसदांनंतर कळेल असे वाटते.
प्रभु की लीला प्रभु ही जाने !! अगदी हलके घ्या
21 Nov 2015 - 1:21 pm | रातराणी
हंम. काहीतरी कळलंय असं वाटतंय.
23 Nov 2015 - 9:52 am | शित्रेउमेश
फरक तो पडता है भाई....
रेल्वे क्रॉसिंग पे हमेश सावधानी बरतो.... :)