प्रश्नाला उत्तर द्यायचे काही कारण होते का?
ते सुद्धा भर पंक्तीत.
गप्प बसायचे.
मोठ्याने विचारला म्हणुन काय झाले?
इतरांचा विचार करायला नको.
किती ठसके?
किती उचक्या?
अन्न नलिकेत कण गेला असता तर किती वांधे झाले असते?
.....
सकाळी नाश्त्याला गुळ,मध आणि कुमठा मसाला चे कालवलेले(शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेले) पोहे २ प्लेट.
मिक्स ग्रेन तिखट पुर्या ६ (३इंच व्यास)
वांगी बोंडा २ (६ इंच व्यास) वांगी खास गावावरुन मागवलेली मोठ्या पपईच्या आकाराची.
पण ३ वाजलेले होते. भुक कडकडुन लागलेली होती.
५ वेळा हे आण ते आण म्हणुन खाली उतरलेला.
५ आरत्या च्या ऐवजी आज एका जावयाने १२ आरत्या पर्यंत खेचलेले प्रकरण
पंगत मोठी.
वाढणारे कमी.
आईच्या आशिर्वादाने क्रुष्णार्पण नियम लागु नाही.
पानात पडल्यावर वाट कोण बघतय.
हाण.
इतरांचे २५% तर त्याचे ७५% जेवण पुर्ण.
"तुला पाईसम देउ का?" ती
हाइलाईट मधे.
मोठ्याने प्रश्न विचारला.
"ह्याची सदा सर्व काळ घाई."
"जेवणबिवण, आंघोळीबिंघोळीत पण अशीच घाई असते का ह्याची?"
मोठ्याला जोडशब्दात बोलायची खोड
त्याने डोळ्याने काहीही बोलु नकोस चा इशारा केला.
समोर बसलेल्या पुतणीने तो टिपला.
गालातल्या गालात हसली.
"अण्णा तुम्हाला बिस्कीट आंबाडे आणि हुल्यार वाढु का"?
हो छान झालय. पण माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. ११वी च्या पेपरातबिपरात पण ह्याने हाच कारभार केला होता. मराठी चा पेपर अर्धा तास आधी देउन मोकळा.मोठा इरेस पेटलेला.
" हो देते. तुम्ही मुगामॉळो घ्या बघु."
तु उत्तर देणार आहेस का?
"हे बघा अण्णा. फक्त आंघोळीचे विचारत असला तर ती ५ मिनिटात."
इथे एक ठसका(भाची)
"जेवणाचे म्हणाल तर ते सुद्धा ५ मिनिटात"
इथे एक उच़की(पुतणी)
"पेपराबद्दल बोलत असाल तर ते अगदी वेळ संपेपर्यंत. घंटा वाजली तरी लिखाण सुरु असते. सुपरवाइझर आल्यानंतर पुरवण्या दोर्याने जोडायचा उद्योग असतो".
अजुनही कसल्या परिक्षा देतो हा?
इथे पंगत टीपेवर.
वाढणार्यावर जेवणाचे फवारे
मोठ्याला काय झाले ते कळे ना.
...
जाता जाता: " हे अन्नपुर्णे थोडक्या शब्दात सुखी संसाराचे गुपीत सांगितल्याबद्दल तुला हा साष्टांग नमस्कार. आयुष्यभर लक्षात राहील आजचे जेवण आजचा दिवस" एक जावयाची जाता जाता क्रुतज्ञता.
.....
प्रतिक्रिया
12 Nov 2015 - 9:59 pm | प्रीत-मोहर
मास्तर इज ब्याक!!
12 Nov 2015 - 10:19 pm | परिकथेतील राजकुमार
दोन वाक्यांचे क्रिप्टिक इतक्या विस्ताराने संगितल्याबद्दल धन्यु __/\__
परवा लक्षात आले होते पण आता विस्तार मिळाला.
12 Nov 2015 - 10:30 pm | रेवती
नेहमीप्रमाणेच......................समजले नाही. नका अशी परिक्षा बघत जाऊ.
13 Nov 2015 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी पाय लागु. येत जावा लिव्हित र्हावा.
देवा शप्पथ, थोडं कळलं आहे. ;)
-दिलीप बिरुटे
13 Nov 2015 - 9:43 pm | आनंद
"बिवण"
कळल्या सारखे वाटतय पण खात्री नाही,मास्तरांची खासियतच आहे ही.