घोस्टहंटर-१
"व्हू आर यू?"
"युवर डेथ!"
तो खाली कोसळला!
"मनिष उठ!"
एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती.
ग्रेग मॉरिसन मर्डर केस!
सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत.
"झोपू दे मला!"
"अरे मूर्ख उठ!"
"मी केस सॉल्व करतोय."