अटलजींना भारतरत्न
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.

अटलजींची सगळीच धोरणे मला पटत होती असे नाही.पण काहीही असले तरी आजही अटलजींचे नाव ऐकले तर पहिली भावना दाटते ती त्यांच्याविषयीच्या आदराचीच.

