हे ठिकाण

टोल भैरव !!

नितिन शेंडगे's picture
नितिन शेंडगे in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 8:30 pm

नमस्कार !!,

आज काल सगळीकडे टोल चा मुद्दा खूप गाजतोय. नुकताच सरकार ने काही टोल बंध केले आणि काही ठिकाणी तात्पुरती टोल माफी दिली .

मी सुरुवातीला स्पष्ट करतोय कि कोणत्याही राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मी हे लिहित नाहीये.

हा तर चला मग, ज्या वेळेस मनसेने टोल चा मुद्दा घेतला त्याच्या आधी आपल्यासारख्या सामान्य माणसाचे तरी लक्ष होते का कि आपण किती आणि का टोल देतो ?? कधीतरी आपण विचारले का रे बाबा किती दिवस टोल घेणार ?

हे ठिकाणवावरजीवनमानविचार

जायचे आहेच तर जावेस आता ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Apr 2015 - 8:54 pm

जायचे आहेच तर जावेस आता
का असे वाटेत थांबावेस आता

मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता

ही किती तलखी जिवाची होत आहे
ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता

संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल
जवळ थोडे आणखी यावेस आता

अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता

मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता

- डॉ.सुनील अहिरराव

हे ठिकाणकवितागझल

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

पुष्कर विजयकुमार जोशी's picture
पुष्कर विजयकुमा... in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 3:12 pm

"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.

राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए…
वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके…

एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"

हे ठिकाणसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमतप्रतिभा

रघूची गोष्ट

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
12 Mar 2015 - 5:00 am

शाळेत असताना, सहावी किंवा सातवीत, हिंदीच्या पुस्तकात आम्हाला एक धडा होता, 'जादुके सिक्के’. त्यात एका रघु नावाच्या १० वर्षाच्या मुलाची कथा होती.

हे ठिकाण

बर्था बेंझ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.......

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in जनातलं, मनातलं
8 Mar 2015 - 8:38 pm

सरदार हे जसे अकारण चेष्टेचा विषय झाले आहेत, त्याचप्रमाणे ‘स्त्रियांचे ड्रायव्हिंग’ हा सुद्धा एक चेष्टेचा, टवाळीचा विषय झाला आहे. गुगलवर सर्च केले असता असंख्य विनोदी विडीयो ह्या विषयावर दिसतील. परंतु जगातली सर्वात पहिली ऑटोमोबाईल, (स्वयंचलीत गाडी) ही एका स्त्रीने चालवली, आणि इतकेच नव्हे तर तिच्यामुळेच ‘ऑटोमोबाईल’ ही कल्पना नुसती रुजलीच नाही तर चांगलीच फोफावली, हे फारच कमी जणांना ठाऊक असेल.

हे ठिकाण

दिल्ली विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
9 Feb 2015 - 6:41 pm

नमस्कार मंडळी,

या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन.

तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी.

धन्यवाद
क्लिंटन

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 4:08 pm

मागिल भाग..
काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..!
पुढे चालू....
=======================

हे ठिकाणविरंगुळा

डु आयडी आणी चपला

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in काथ्याकूट
28 Jan 2015 - 6:39 pm

आज बर्‍याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?

' यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
12 Jan 2015 - 10:38 am

यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा
प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा

छान हा दु:खासही आला फुलोरा
ये, वसा घे वेदनेला माळण्याचा

आणशी हे रोज तू कोठुन बहाणे
केवढा हा सोस तुजला टाळण्याचा

मी करू चिंता कशाला काजळाची
सोडला संकल्प मी डागाळण्याचा

श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी
ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा

डॉ.सुनील अहिरराव

हे ठिकाण