ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!
नमस्कार,
ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.
नमस्कार,
ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.
मी मिपावर नवीन आहे, मदत करा.
एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?
आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य
**********************
राम राम मंडळी. :)
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.
हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा
मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा
पारखोनी घे जरासे भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा
शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा
सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा
देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !
डॉ.सुनील अहिरराव
कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.