नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
19 Aug 2014 - 2:34 pm | संजय क्षीरसागर
सुरेख उपक्रम.
19 Aug 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि
नक्की भाग घेणार......
आपला निदान शेवटचा क्रमांक तरी नक्की....
19 Aug 2014 - 3:01 pm | स्पा
स्तुत्य उपक्रम :)
19 Aug 2014 - 3:09 pm | गवि
उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.)
विषयाची रेंज अधिक स्पष्ट करण्यासाठी उपरोक्त उदाहरणे दिली आहेत.
स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून.
Infrastructure या अर्थाचे सर्वकाही स्वीकारार्ह आहे.
19 Aug 2014 - 4:03 pm | संजय क्षीरसागर
स्ट्रक्चरचं काही पण बोला!
19 Aug 2014 - 4:23 pm | संजय क्षीरसागर
19 Aug 2014 - 4:04 pm | चित्रगुप्त
अतिशय समयोचित उपक्रम.
कृपया दोन गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यावे:
१. फोटो अपलोडवताना जास्तीत जास्त रुंदी किती ठेवावी ?
२. फ्लिकर मधे अपलोडवलेले फोटो अलिकडे दुसरीकडे वापरता येत नाहियेत, (copy image URL हल्ली गायब झालेले दिसते) यावर काय उपाय करावा? फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?
19 Aug 2014 - 7:42 pm | धन्या
या कामासाठी फोटोबकेट डॉट कॉम ही उत्तम वेबसाईट आहे.
फेसबुक, फ्लिकर किंवा तत्सम सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो आयटीत काम करणार्या आमच्यासारख्या गरीबांना पाहता येत नाही. या सायटी आयटी हापिसांमध्ये ब्लॉक केलेल्या असतात.
20 Aug 2014 - 3:47 pm | पैसा
६००-६५० एवढ्या आकाराचे फोटो चांगले दिसतात. त्याहून मोठे कॉलमच्या बाहेर जातात. फ्लिकर वापरत नाही त्यामुळे माहिती नाही. गुगल फोटो/पिकासा वरून कधी काही प्रॉब्लेम येत नाही.
19 Aug 2014 - 5:12 pm | एस
'ऐसी...' वरील छायाचित्रण आव्हाने छान असतात. आपल्याकडेही असा उपक्रम चालू झाल्याबद्दल आनंद वाटला. :-)
जागतिक छायाचित्रणदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
19 Aug 2014 - 5:37 pm | प्रचेतस
सुरेख उपक्रम.
स्पर्धेत भाग घेईनच.
19 Aug 2014 - 6:28 pm | स्पा
कृष्ण धवल प्रकाशातली तीन छायाचित्रे टाकत आहे
१. दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली
ह्या कोनातून दिपमाळेची भव्यता खुलून दिसतेय
Exif data: nikon coolpix digicam f /4.2, iso:125, exposure time: 1/320 sec
२.गेट वे ऑफ इंडिया
हि जगप्रसिद्ध इमारत सर्वांना माहित आहेच, पण नेहमीप्रमाणे पूर्ण फोटो न घेता, त्यातलाच एक दरवाजा कॅमेरात पकडायचा प्रयत्न केलाय
Exif data: nikon डि ३१००, f /१०, iso:४००, exposure time: १/१६० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी
३.ताज हॉटेल,मुंबई
Exif data: nikon डि ३१००, f /११, iso:४००, exposure time: १/५०० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी
19 Aug 2014 - 7:44 pm | धन्या
एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क चालेल का?
या स्पर्धेच्या निमित्ताने स्पा यांनी काढलेली "वॉटरमार्कविरहीत" प्रकाशचित्रे पाहायला मिळाली. :)
19 Aug 2014 - 7:56 pm | पैसा
मात्र हा वॉटरमार्क नाकापेक्षा मोती जड झाल्यास पब्लिक मार्क्स देणार नाही. येवढे लक्षात ठेवायचे.
27 Aug 2014 - 3:09 pm | शैलेन्द्र
तु तुझा मास्टर पिस का नाही टाकलास?
19 Aug 2014 - 6:55 pm | पिंगू
स्पर्धा एक नंबर होणार यात शंका नाहीच..
19 Aug 2014 - 8:40 pm | भाते
छान उपक्रम. सर्व मिपाकरांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
19 Aug 2014 - 8:45 pm | संजय क्षीरसागर
मार्क किती पैकी, कुठे आणि कसे द्यायचे?
19 Aug 2014 - 10:06 pm | पैसा
२६ तारखेपर्यंत स्पर्धक छायाचित्रे अपलोड करतील, आणि सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्या आणि तिसर्या नंबराला त्याप्रमाणे कमी.
19 Aug 2014 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे २६ पर्यंत नुसते फोटो पाहायचे आणि २७ पासनं मार्कप्रणाली कार्यन्वित होणार. ओके!
19 Aug 2014 - 10:20 pm | श्रीरंग_जोशी
वाह, जगभरातल्या मिपाकरांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल.
एक सूचना: ज्या वास्तूचे वा रचनेचे चित्र आहे ती तेवढी प्रसिद्ध नसल्यास इतर माहितीखेरीज त्या स्थळाचा गूगल मॅप्सचा दुवा पण द्यावा.
19 Aug 2014 - 10:50 pm | एस
एखादे छायाचित्र हे विषयाला धरून आहे की नाही हे कसे ठरवणार? ;-)
19 Aug 2014 - 11:32 pm | पैसा
ठरवायचं नाहीच मुळी! एखाद्याला वाटलं की दहीहंडीचे थर हे मानवी स्थापत्य आहे, तर त्याने फोटो द्यावेत. सगळे मिपाकरच त्याचा काय तो निकाल करतील!
19 Aug 2014 - 11:42 pm | श्रीरंग_जोशी
म्हणजे ते एसएमएसद्वारे महागायक /महागायिका वगैरे निवडले जातात तसेच ना?
19 Aug 2014 - 11:44 pm | पैसा
पण एसेमेस करण्यासाठी लोकांना सिमकार्डे आणि फोन देऊन बसवतात. इथे प्रत्येक आयडीला एकदाच मत देता येईल. डु आयडी असल्यास तसे सांगावे ही विनंती! :-/ :P
19 Aug 2014 - 11:51 pm | श्रीरंग_जोशी
गुप्त मतदानपद्धती नसल्याने काही आयडींची अडचण होऊ शकते. विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पहिल्या, दुसर्या व तिसर्या क्रमांकाची मते दिली जाणार आहेत. फिक्सिंग करणे अवघड आहे ;-).
बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).
20 Aug 2014 - 12:07 am | पैसा
ज्यांना गुप्त मतदान करायचं आहे त्यांनी सं मं ला नंबराचा व्यनि करून इथे तशी नोंद करावी. पुन्हा पुन्हा बारशी करणार्यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने त्यांना काही गडबड करता येणार नाही. फिक्सिंगसाठी आधी एक कंपू तयार करावा लागेल. ते फार वेळखाऊ काम आहे असे एकूणात दिसते.
21 Aug 2014 - 1:55 pm | इरसाल
आमाला नाय बोलवलत बारश्याचं जेवाला. आमीबी खाल्या असत्यान घुगर्या नि पेढं !
21 Aug 2014 - 9:28 pm | पैसा
म्हणून बाळानेच सांगितलं कोणाला बलवू नका.
21 Aug 2014 - 5:55 pm | प्यारे१
>>> पुन्हा पुन्हा बारशी करणार्यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने
ओ आम्हाला आठवत नाही. कधी आलेलात?
प्यारे१-प्रशांत आवले-प्यारे१ (हे एलिझाबेथ टेलर सारखं झालं असं वाटत असल्यास निव्वळ योगायोग समजावा)
21 Aug 2014 - 9:30 pm | पैसा
आम्ही असतो यत्र तत्र सर्वत्र.
20 Aug 2014 - 10:05 am | प्रशांत
काळजी नसावी बारसे झाले तरी बिल्ला नंबर तोच असतो.... हा का ना का.
20 Aug 2014 - 4:41 am | कंजूस
चला फोटो जत्रा सुरू होतेय
खेचुया शटर .
20 Aug 2014 - 5:13 am | खटपट्या
माझा निवणूक पूर्व अंदाज - स्पा जिंकणार !!
20 Aug 2014 - 9:12 am | प्रचेतस
१. अजिंठा (लेणी क्र. २६, चैत्यगृह)
छायाचित्रातील चैत्यगृहातील स्तंभांवरील कोरीव भाग आहे.
Camera: Canon EOS 550D
Lens: 18-55mm f/4.4-28
Focal Length: 30 mm
Exposure 1/40
F Number: f/4.5
ISO: 2500
Flash Not used
२. ७ व्या ते ८ व्या शतकात निर्मिलेली वेरूळची कैलास लेणी (लेणी क्र. १६)
Camera: Canon EOS 550D
Lens: 18-55mm
Focal Length: 55 mm
Exposure 1/125
F Number: f/7.1
ISO: 100
Flash Not used
३. वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ
Camera: Canon EOS 550D
Lens: 18-55mm
Focal Length: 50 mm
Exposure 1/30
F Number: f/5.6
ISO: 3200
Flash Not used
वरील तिन्ही छायाचित्रात कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.
20 Aug 2014 - 9:41 pm | अनुप कोहळे
तिनही चित्रे फारच छान आहेत.
22 Aug 2014 - 3:27 pm | सुधीर
स्थापत्य कला मनमोहक त्यात छायाचित्रण कला अप्रतिम! पहिला फोटो विशेष आवडला.
20 Aug 2014 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार
फारच सुरेख कल्पना. या स्पर्धे निमित्त चांगली छायाचित्रे पहायला मिळतिल.
पैजारबुवा,
20 Aug 2014 - 9:39 am | श्रीरंग_जोशी
~ विस्कॉन्सीन स्टेट कॅपिटॉल ~
Exif Details: Sony Nex-5N, F-stop: F/11, ISO:100, Exposure 1/100
~ मिलवॉकी आर्ट म्युझियम ~
Exif Details: Sony Nex-5N, F-stop F/13, ISO:100, Exposure 1/250
~ माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियल ~
Exif Details: Canon SX-30IS, F-stop:F/4.5, ISO:80, Exposure:1/1000
वरील तिन्ही छायाचित्रात पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.
मूळ आकारात चित्रे बघायची असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे.
माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
24 Aug 2014 - 8:18 pm | श्रीरंग_जोशी
अमेरिकेत राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी स्टेट कॅपिटॉल असते. तिथे त्या राज्याच्या विधिमंडळाची सभागृहे, गवर्नर चे कार्यालय व स्थानिक सिनेटर्स, काँग्रेसमन यांची कार्यालये त्याखेरीज त्या राज्यातील सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय असते. विस्कॉनसिन चे स्टेट कॅपिटॉल राजधानी चे शहर मॅडिसन मध्ये आहे. डाऊनटाऊन मॅडिसन हे दोन जलाशयांचे मध्ये वसले आहे (लेक मेंडोटा व लेक मोनोना). स्टेट कॅपिटॉलच्या इमारतीचे स्थापत्य अत्यंत भव्य व आकर्षक आहे. ठोकळेबाजपणा कुठल्याही कोनातून जाणवत नाही. पर्यटकांना आत बाहेर मुक्त प्रवेश असल्यामुळे तेथील स्थापत्याच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. घुमटाच्या आतील बाजूचे नक्षीकाम व रंगसंगती वाखाणण्याजोगी आहे.
विस्कॉनसिन मधील सर्वात मोठे शहर मिलवॉकी येथील मिलवॉकी आर्ट म्युझियम संग्रहालय म्हणून वाखाणण्याजोगे आहे पण २००१ साली बांधल्या गेलेल्या Quadracci Pavilion या इमारतीने त्याचे स्थापत्य एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लेक मिशिगनच्या काठावर असल्यामुळे लांबून पाहिल्यास एकादे जहाज नांगर टाकून उभे आहे असा भास होतो. स्थापत्य रचनाकार आहेत सॅंतियागो कलात्रावा. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका प्रसिद्ध हॉलिवूडपटातील एक दृश्य येथे चित्रित झाले आहे. ओळखा पाहू हा चित्रपट.
साऊथ डाकोटा या राज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियलची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून निर्मिती झालेले महाशिल्प प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. Gutzon Borglum यांच्या हाताखाली ४०० शिल्पकार व संबंधित कामगारांनी १४ वर्षे (१९२७ ते १९४१) राबून हे महाशिल्प डोंगरात घडवले. चार राष्ट्राध्यक्ष, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन यांची ही शिल्पे प्रत्यक्षात योजल्यानुसार कंबरेपर्यंत घडवायची होती. Gutzon Borglum यांच्या मृत्यूनंतर (मार्च १९४१) त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली पुढचे काही महिने काम चालले परंतु निधीअभावी ते अर्धवट राहिले व आजही त्याच अवस्थत आहे. ही बाब ठाऊक नसणाऱ्यांना ते काम अपूर्ण आहे असे वाटत नाही.
20 Aug 2014 - 9:43 am | पैसा
आतापर्यंतच्या तीनही प्रवेशिका एकापेक्षा एक भारी आहेत! निर्णय द्यायचं मिपाकरांचं काम फार कठीण करताय तुम्ही फटुग्राफर लोक!
20 Aug 2014 - 11:46 am | एस
मेजवानी मिळणार आहे मस्त! जरा ती मुदत कमी वाटतीय हो. सात दिवसांत कितीशा प्रवेशिका येतील!
20 Aug 2014 - 10:50 am | स्पा
साॅलिड फटु श्रीरंग राव :-)
20 Aug 2014 - 6:06 pm | श्रीरंग_जोशी
तुमचे तर मेटलगिअर सॉलिड आहेत.
सर्वच प्रवेशिका एकाहून एक आहेत. आता काही दिवस पर्वणीच.
20 Aug 2014 - 11:56 am | ज्ञानोबाचे पैजार
महाबळेश्वर जवळ काढलेला धरणाचा फोटो
पावसाळ्यातला मुंबई पुणे एक्सप्रेस वे
कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर
पैजारबुवा,
20 Aug 2014 - 11:56 am | आतिवास
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, अफगणिस्थान
आजही धडकी भरवणारा सेल्युलर जेल, अंदमान
गोळकोंडा मधलं हे बहुतेक बाजार भरण्याचं ठिकाण असावं का? का घोड्यांच्या पागा? माहिती नाही!
21 Aug 2014 - 10:38 pm | संजय क्षीरसागर
काय नज़ाक़त आहे, सुभानल्ला!
22 Aug 2014 - 3:36 pm | सुधीर
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ प्रथमच पाहतोय!
20 Aug 2014 - 12:17 pm | असंका
शंका
१. डुआयडीने फोटो पोस्ट बिस्ट केले तरीही चालतील का हो?
२. फोटो बदलता येतील का?
20 Aug 2014 - 12:24 pm | पैसा
१. एका आयडीला जास्तीत जास्त ३ फोटो अपलोड करता येतील. तुमचे किती आयडी आहेत?
२. फोटो बदलता येणार नाहीत. कारण नंतर लोकांना मत देताना क्न्फ्युजन होईल.
20 Aug 2014 - 3:35 pm | असंका
मिसळपाव वर? एकच आहे.
20 Aug 2014 - 12:21 pm | प्रमोद देर्देकर
ओ पैतै,
अगोदरच्या जुन्या धाग्यात एकदा मिपावर डकवलेली, छा.चि. पुन्हा एकवार डकवली तर चालतीलय काय?
20 Aug 2014 - 12:25 pm | पैसा
जास्तीत जास्त ३. आणि ती तुम्ही काढलेली हवीत.
20 Aug 2014 - 12:31 pm | कंजूस
मस्त फोटो .छान सुरूवात .
20 Aug 2014 - 1:13 pm | चिंतामणी
20 Aug 2014 - 1:29 pm | चिंतामणी
श्री क्षेत्र माहूली येथील कृष्णा नदीवरील पूल.
शिंदे छत्री- पुणे
श्री क्षेत्र माहूली येथील शिव मंदीर
27 Aug 2014 - 4:18 pm | बाळ सप्रे
दुसर्या फोटोला बक्षीस मिळालच पायजे !!
20 Aug 2014 - 1:30 pm | विलासराव
१) विपश्यना पॅगोडा ईगतपुरी
२) आनंदसागर उद्यान शेगाव
३) आदर्श मुंबई.
20 Aug 2014 - 1:44 pm | एस
हे वाचा
मस्त प्रतिमा आहेत इथे.
20 Aug 2014 - 1:45 pm | पैसा
पैजारबुवा. आतिवास, चिंतामणी, विलासराव सगळ्यांचे फोटो उत्तम आहेत!
20 Aug 2014 - 2:14 pm | अजया
वा!मजा येते आहे एक से बढकर एक फोटो बघायला.
20 Aug 2014 - 2:53 pm | अविनाश पांढरकर
मस्त उपक्रम
20 Aug 2014 - 3:52 pm | असंका
थोडक्यात माहिती लिहा असेपण आहे हो...फोटो बरोबर माहिती पण लिहा ना आपले चान्स वाढवण्यासाठी!
20 Aug 2014 - 6:10 pm | मीता
२.
20 Aug 2014 - 9:10 pm | श्रीरंग_जोशी
20 Aug 2014 - 9:25 pm | पैसा
आणखीही नावीन्यपूर्ण विषय सुचतील तसे नोंद करून ठेवा!
20 Aug 2014 - 11:44 pm | चित्रगुप्त
पुढील फेर्यांसाठी सुचवल्या जाणार्या विषयांसाठी एक नवीन धागा काढावा, ज्यात विविध विषय एकाच ठिकाणी साचवता येतील.
मला सुचणारे विषयः
१. निरागस
२. प्रयत्न
३. माझी आवडती वस्तु
४. सावल्या
५. बिंब-प्रतिबिंब
६. मूर्तीकला
७. सौंदर्य
८. वृद्ध्त्व
९. विचित्रता
१० फुरसतीचे क्षण
20 Aug 2014 - 9:40 pm | अनुप कोहळे
ISO-100 Shutter speed - 1/200, 1/800, 1/100 लेन्स १४ मि. मि.
हे छायाचित्र माझे खूप आवडीचे आहे. ३ प्रतिमांचे प्रोसेसिंग Lightroom ह्या प्रणाली मधे करून Photomatix ह्या प्रणाली मधे HDR तयार केले आहे.
आशा आहे कि तुम्हाला सुद्धा हे छायाचित्र आवडेल.
20 Aug 2014 - 9:44 pm | श्रीरंग_जोशी
अप्रतिम.
शक्य असल्यास आपल्या चित्रांचा माहितीसकट वेगळा धागा काढावा ही विनंती.
22 Aug 2014 - 10:30 am | सूर्य
निव्वळ अप्रतिम
- सूर्य
22 Aug 2014 - 11:24 am | संजय क्षीरसागर
फोटो बहारदार झाला असता.
22 Aug 2014 - 3:40 pm | सुधीर
प्रोसेसिंग शिवाय असलेले मूळ छायाचित्र पाहण्याचाही मोह होत आहे.
27 Aug 2014 - 4:16 pm | बाळ सप्रे
या फोटोला बक्षीस मिळालच पायजे !!
20 Aug 2014 - 9:40 pm | वेल्लाभट
१. अहमदाबाद जवळ असलेली अडालज ही भव्य विहीर.
अडालज की बावड़ी (गुजराती : अडालजनी वाव) एक सीढ़ीदार कुँआ (बावड़ी) है जो गुजरात के अडालज नामक गाँव में है। दूर-दराज से बड़ी संख्या में लोग इस कुएं को देखने आते रहते हैं। वास्तव में यह एक बड़े भवन के रूप में निर्मित है। भारत में इस तरह के कई सीड़ीनुमा कूप हैं. (मला अत्ताच कळलंय की पुण्याजवळ निंब येथे अशीच एक, बहुदा याच्याहून भारी विहीर आहे शिवकालीन. तेंव्हा ती बघायला जायचंय आता.)
फोटोबाबतः
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस
शटरस्पीड - १/६४०
अॅपर्चर - एफ ४.०
आयएसओ - २००
पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट
२. सटाणा येथील मांगी-तुंगी या जुळ्या शिखरांकडे जाणा-या पाय-या. ४०००+ पाय-या चढून या शिखरांवर जाता येतं.
मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. हे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे चार हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.
फोटोबाबतः
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एचएस
शटरस्पीड - १/८००
अॅपर्चर - एफ ४.०
आयएसओ - १००
पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट
३. जिनिवा, स्वित्झर्लंड येथील एक गल्ली. दोनही बाजूंना उत्तमोत्तम स्विस शैलीतल्या इमारती, त्यांवरची नक्षी, सजावट इत्यादी.
Geneva (/dʒɨˈniːvə/; French: Genève, is the second most populous city in Switzerland (after Zürich) and is the most populous city of Romandy, the French-speaking part of Switzerland. Situated where the Rhône exits Lake Geneva, it is the capital of the Republic and Canton of Geneva.
फोटोबाबतः
कॅमेरा - ऑलिंपस एफई २०
शटरस्पीड - १/२५
अॅपर्चर - एफ ३.१
आयएसओ - १२५
पोस्ट प्रोसेसिंग - लेव्हल अॅडजस्टमेंट, ब्राईटनेस/कॉन्ट्रास्ट
21 Aug 2014 - 12:05 am | खटपट्या
हायला एक सो एक आहेत मिपा वर !!
बहुतेक पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक विभागून द्यावे लागणार :)
21 Aug 2014 - 10:23 am | किल्लेदार
चित्रे दिसत नाहीत हो वेल्लाभट....
21 Aug 2014 - 10:47 am | वेल्लाभट
मला तर दिसतायत हो. बघा जरा अॅड्रेस बार च्या खाली काही पिवळी लाल पट्टी येतेय का एरर वाली?.....
21 Aug 2014 - 11:13 am | एस
छायाचित्रे अप्रतीम येताहेत. डावंउजवं करणं खरोखरच अवघड जाणार आहे. :-)
21 Aug 2014 - 1:48 pm | स्वैर
१.फ्रान्समधील इटाम्स गावातील चर्चचा दरवाजा:
२.आएफेल टॉवरवरुन काढलेला फोटो:
३.आळंदीरोडवरील साईमंदिर परिसरात असलेला स्तंभ :
21 Aug 2014 - 5:50 pm | पैसा
मीता, kohalea तुम्ही अजून फोटो देऊ शकता. वेल्लाभट आणि स्वैर, खूपच छान फोटो! स्वैर, पहिला फोटो तर जबरदस्त आवडला!
21 Aug 2014 - 8:37 pm | बोका
दिल्लीतील माझे आवड्ते ठिकाण.
पर्यटक फारसे नसतात आणि सुंदर परिसर.
(अवांतर - मकबरा, कबर, थडगे सारे एकच का ?)
कॅनन EOS 1000D
लेन्स - टॅमरॉन 17-50mm @ 17mm
1/400, f/6.3, आयएसओ 200
21 Aug 2014 - 10:35 pm | संजय क्षीरसागर
हा तर मस्तच आहे!
21 Aug 2014 - 11:36 pm | खटपट्या
एकदम मस्त !! पोस्ट्कार्ड फोटो !!
वास्तू परफेक्ट मधोमध आलीय !!
21 Aug 2014 - 9:32 pm | sagarparadkar
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस
लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा
व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग
धन्यवाद
21 Aug 2014 - 9:37 pm | पैसा
पण लोकाना अॅक्सेस दिला नाहीये बहुतेक, कारण शेअर होत नाहीये. आणि इथे दिसतही नाही.
23 Aug 2014 - 11:02 am | संजय क्षीरसागर
पण कॅमेर्याचा अँगल खास वाटला नाही.
22 Aug 2014 - 7:27 pm | sagarparadkar
स्वित्झर्लंड मधील अपेन्त्सेल कौंटिमधील स्टाईन गावातील चीझ फॅक्ट्रीच्या मगील खास अपेंत्सेलर हाउस
http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/AppenzellerHouse_z...
लेक कोन्स्टान्झ किंवा बोडेन्झे मधील 'मायनाउ' बेटावरील संस्थानिकाचा राजवाडा
http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/MainauPalace_zpsac...
व्हिएन्नाच्या सुप्रसिद्ध 'ऑपेरा हाउस'चे अंतरंग
http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/OperaHouseVienna_z...
स्वित्झर्लंड्च्या लुझर्न मधील जनरल पोस्ट ऑफिसची इमारत
http://s1383.photobucket.com/user/sagarparadkar/media/LucernPostOffice_z...
22 Aug 2014 - 9:40 pm | पैसा
मूळ प्रतिसादात अपलोड केलेत. मात्र ३ च फोटो देता येतील. त्यामुळे चौथा टाकला नाही. तो हवा असेल तर आहे त्यापैकी एखादा काढावा लागेल.
फोटो सुरेख!
21 Aug 2014 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझे पण तीन फोटो...
१. कंबोडियातिल बांतीय श्रेइ मंदिरातील एक कोरीवकाम :
२. चीन मधिल लेशान येथिल बसलेल्या बुद्धाचे शिल्प :
३. शांघाईच्या पर्ल टॉवरच्या काचेच्या जमिनीतून दिसणारा टॉवरचा स्तंभ व शेजारच्या मोठ्या चौकात असलेल्या उंच वर्तुळाकार पादचारी मार्गासह इतर परिसर :
(कॅमेरा: Soni DSC-TX7)
22 Aug 2014 - 11:45 am | गवि
बुद्ध एकदम जबरदस्त.. अफाट..