✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Tue, 08/19/2014 - 14:30  ·  लेख
लेख
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल. स्पर्धेचे अन्य नियमः १)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो. २)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात. ४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा. ५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी. ६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी. ७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल. ८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील. स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
कला
जीवनमान
तंत्र
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
102139 वाचन

💬 प्रतिसाद (182)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

संजय क्षीरसागर
Tue, 08/19/2014 - 14:34 नवीन
सुरेख उपक्रम.

उपक्रम मस्त......

मुक्त विहारि
Tue, 08/19/2014 - 14:53 नवीन
नक्की भाग घेणार...... आपला निदान शेवटचा क्रमांक तरी नक्की....

स्तुत्य उपक्रम

स्पा
Tue, 08/19/2014 - 15:01 नवीन
स्तुत्य उपक्रम :)

उदा. धरणे, झोपडी, स्मशाने,

गवि
Tue, 08/19/2014 - 15:09 नवीन
उदा. धरणे, झोपडी, स्मशाने, घाट, पूल, मंदिरे, रस्ते , बोगदे, दळणवळणाचे मार्ग (मेट्रो, मोनो इ.) विषयाची रेंज अधिक स्पष्ट करण्यासाठी उपरोक्त उदाहरणे दिली आहेत. स्थापत्य म्हणजे फक्त इमारत असे मानले जाऊ नये म्हणून. Infrastructure या अर्थाचे सर्वकाही स्वीकारार्ह आहे.

इन्फ्राचं माहिती नाही

संजय क्षीरसागर
Tue, 08/19/2014 - 16:03 नवीन
स्ट्रक्चरचं काही पण बोला!
↩ प्रतिसाद: गवि

आयला विषयात पण फिट बसतंय!

संजय क्षीरसागर
Tue, 08/19/2014 - 16:23 नवीन
मानवनिर्मित स्थापत्य!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अतिशय समयोचित उपक्रम

चित्रगुप्त
Tue, 08/19/2014 - 16:04 नवीन
अतिशय समयोचित उपक्रम. कृपया दोन गोष्टींबद्दल स्पष्टीकरण द्यावे: १. फोटो अपलोडवताना जास्तीत जास्त रुंदी किती ठेवावी ? २. फ्लिकर मधे अपलोडवलेले फोटो अलिकडे दुसरीकडे वापरता येत नाहियेत, (copy image URL हल्ली गायब झालेले दिसते) यावर काय उपाय करावा? फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?

फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे

धन्या
Tue, 08/19/2014 - 19:42 नवीन
फ्लिकर खेरील अन्य कुठे कुठे अपलोडवलेले बरे?
या कामासाठी फोटोबकेट डॉट कॉम ही उत्तम वेबसाईट आहे. फेसबुक, फ्लिकर किंवा तत्सम सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो आयटीत काम करणार्‍या आमच्यासारख्या गरीबांना पाहता येत नाही. या सायटी आयटी हापिसांमध्ये ब्लॉक केलेल्या असतात.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

फोटो रुंदी

पैसा
Wed, 08/20/2014 - 15:47 नवीन
६००-६५० एवढ्या आकाराचे फोटो चांगले दिसतात. त्याहून मोठे कॉलमच्या बाहेर जातात. फ्लिकर वापरत नाही त्यामुळे माहिती नाही. गुगल फोटो/पिकासा वरून कधी काही प्रॉब्लेम येत नाही.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खूपच छान उपक्रम

एस
Tue, 08/19/2014 - 17:12 नवीन
'ऐसी...' वरील छायाचित्रण आव्हाने छान असतात. आपल्याकडेही असा उपक्रम चालू झाल्याबद्दल आनंद वाटला. :-) जागतिक छायाचित्रणदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सुरेख उपक्रम.

प्रचेतस
Tue, 08/19/2014 - 17:37 नवीन
सुरेख उपक्रम. स्पर्धेत भाग घेईनच.

स्पर्धेसाठीची प्रकाश चित्रे

स्पा
Tue, 08/19/2014 - 18:28 नवीन
कृष्ण धवल प्रकाशातली तीन छायाचित्रे टाकत आहे १. दीपमाळ - सिद्धेश्वर कुरोली ह्या कोनातून दिपमाळेची भव्यता खुलून दिसतेय Image removed. Exif data: nikon coolpix digicam f /4.2, iso:125, exposure time: 1/320 sec २.गेट वे ऑफ इंडिया हि जगप्रसिद्ध इमारत सर्वांना माहित आहेच, पण नेहमीप्रमाणे पूर्ण फोटो न घेता, त्यातलाच एक दरवाजा कॅमेरात पकडायचा प्रयत्न केलाय Image removed. Exif data: nikon डि ३१००, f /१०, iso:४००, exposure time: १/१६० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी ३.ताज हॉटेल,मुंबई Image removed. Exif data: nikon डि ३१००, f /११, iso:४००, exposure time: १/५०० sec,फोकल लेन्थ,: ५५ मिमी

एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क

धन्या
Tue, 08/19/2014 - 19:44 नवीन
एक शंका: फोटोंवर वॉटरमार्क चालेल का? या स्पर्धेच्या निमित्ताने स्पा यांनी काढलेली "वॉटरमार्कविरहीत" प्रकाशचित्रे पाहायला मिळाली. :)
↩ प्रतिसाद: स्पा

चालेल की!

पैसा
Tue, 08/19/2014 - 19:56 नवीन
मात्र हा वॉटरमार्क नाकापेक्षा मोती जड झाल्यास पब्लिक मार्क्स देणार नाही. येवढे लक्षात ठेवायचे.
↩ प्रतिसाद: धन्या

तु तुझा मास्टर पिस का नाही

शैलेन्द्र
Wed, 08/27/2014 - 15:09 नवीन
तु तुझा मास्टर पिस का नाही टाकलास?
↩ प्रतिसाद: स्पा

स्पर्धा एक नंबर होणार यात

पिंगू
Tue, 08/19/2014 - 18:55 नवीन
स्पर्धा एक नंबर होणार यात शंका नाहीच..

शुभेच्छा!

भाते
Tue, 08/19/2014 - 20:40 नवीन
छान उपक्रम. सर्व मिपाकरांना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

स्पावड्यानं भारी ओपनिंग केली आहे!

संजय क्षीरसागर
Tue, 08/19/2014 - 20:45 नवीन
मार्क किती पैकी, कुठे आणि कसे द्यायचे?

लिहिलंय बघा!

पैसा
Tue, 08/19/2014 - 22:06 नवीन
२६ तारखेपर्यंत स्पर्धक छायाचित्रे अपलोड करतील, आणि सर्व सदस्यांनी त्यानंतर ७ दिवसपर्यंत म्हणजे २ तारखेपर्यंत आपल्या आवडीच्या चित्रांना क्रमांक १ २ ३ असे द्यायचे आहेत. सर्वात शेवट सर्व मार्क्स एकत्रित करून निकाल जाहीर केला जाईल. पहिल्या नंबराला अर्थातच जास्त वेटेज असेल. दुसर्‍या आणि तिसर्‍या नंबराला त्याप्रमाणे कमी.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

येस!

संजय क्षीरसागर
Tue, 08/19/2014 - 23:58 नवीन
म्हणजे २६ पर्यंत नुसते फोटो पाहायचे आणि २७ पासनं मार्कप्रणाली कार्यन्वित होणार. ओके!
↩ प्रतिसाद: पैसा

स्पृहणीय उपक्रम

श्रीरंग_जोशी
Tue, 08/19/2014 - 22:20 नवीन
वाह, जगभरातल्या मिपाकरांच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल. एक सूचना: ज्या वास्तूचे वा रचनेचे चित्र आहे ती तेवढी प्रसिद्ध नसल्यास इतर माहितीखेरीज त्या स्थळाचा गूगल मॅप्सचा दुवा पण द्यावा.

अजून एक शंका

एस
Tue, 08/19/2014 - 22:50 नवीन
एखादे छायाचित्र हे विषयाला धरून आहे की नाही हे कसे ठरवणार? ;-)

हाहा!

पैसा
Tue, 08/19/2014 - 23:32 नवीन
ठरवायचं नाहीच मुळी! एखाद्याला वाटलं की दहीहंडीचे थर हे मानवी स्थापत्य आहे, तर त्याने फोटो द्यावेत. सगळे मिपाकरच त्याचा काय तो निकाल करतील!
↩ प्रतिसाद: एस

:-)

श्रीरंग_जोशी
Tue, 08/19/2014 - 23:42 नवीन
म्हणजे ते एसएमएसद्वारे महागायक /महागायिका वगैरे निवडले जातात तसेच ना?
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी अगदी!

पैसा
Tue, 08/19/2014 - 23:44 नवीन
पण एसेमेस करण्यासाठी लोकांना सिमकार्डे आणि फोन देऊन बसवतात. इथे प्रत्येक आयडीला एकदाच मत देता येईल. डु आयडी असल्यास तसे सांगावे ही विनंती! :-/ :P
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

=))

श्रीरंग_जोशी
Tue, 08/19/2014 - 23:51 नवीन
गुप्त मतदानपद्धती नसल्याने काही आयडींची अडचण होऊ शकते. विधानपरिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची मते दिली जाणार आहेत. फिक्सिंग करणे अवघड आहे ;-). बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Wed, 08/20/2014 - 00:07 नवीन
ज्यांना गुप्त मतदान करायचं आहे त्यांनी सं मं ला नंबराचा व्यनि करून इथे तशी नोंद करावी. पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने त्यांना काही गडबड करता येणार नाही. फिक्सिंगसाठी आधी एक कंपू तयार करावा लागेल. ते फार वेळखाऊ काम आहे असे एकूणात दिसते.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पैतै

इरसाल
गुरुवार, 08/21/2014 - 13:55 नवीन
आमाला नाय बोलवलत बारश्याचं जेवाला. आमीबी खाल्या असत्यान घुगर्‍या नि पेढं !
↩ प्रतिसाद: पैसा

पेढे संपले होते

पैसा
गुरुवार, 08/21/2014 - 21:28 नवीन
म्हणून बाळानेच सांगितलं कोणाला बलवू नका.
↩ प्रतिसाद: इरसाल

>>> पुन्हा पुन्हा बारशी

प्यारे१
गुरुवार, 08/21/2014 - 17:55 नवीन
>>> पुन्हा पुन्हा बारशी करणार्‍यांची बारशी आम्ही इथे जेवून बसलेलो असल्याने ओ आम्हाला आठवत नाही. कधी आलेलात? प्यारे१-प्रशांत आवले-प्यारे१ (हे एलिझाबेथ टेलर सारखं झालं असं वाटत असल्यास निव्वळ योगायोग समजावा)
↩ प्रतिसाद: पैसा

अस्सं कस्सं!

पैसा
गुरुवार, 08/21/2014 - 21:30 नवीन
आम्ही असतो यत्र तत्र सर्वत्र.
↩ प्रतिसाद: प्यारे१

बारसे करवुन घेतात

प्रशांत
Wed, 08/20/2014 - 10:05 नवीन
बाकी काही आयडी पुन्हा पुन्हा बारसे करवुन घेतात. दर वेळी नव्याने मतदान केल्यास अधिकच घोळ होईल =)).
काळजी नसावी बारसे झाले तरी बिल्ला नंबर तोच असतो.... हा का ना का.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चला फोटो जत्रा सुरू होतेय

कंजूस
Wed, 08/20/2014 - 04:41 नवीन
चला फोटो जत्रा सुरू होतेय खेचुया शटर .

माझा निवणूक पूर्व अंदाज -

खटपट्या
Wed, 08/20/2014 - 05:13 नवीन
माझा निवणूक पूर्व अंदाज - स्पा जिंकणार !!

१. अजिंठा (लेणी क्र. २६,

प्रचेतस
Wed, 08/20/2014 - 09:12 नवीन
१. अजिंठा (लेणी क्र. २६, चैत्यगृह) छायाचित्रातील चैत्यगृहातील स्तंभांवरील कोरीव भाग आहे. Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm f/4.4-28 Focal Length: 30 mm Exposure 1/40 F Number: f/4.5 ISO: 2500 Flash Not used Image removed. २. ७ व्या ते ८ व्या शतकात निर्मिलेली वेरूळची कैलास लेणी (लेणी क्र. १६) Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 55 mm Exposure 1/125 F Number: f/7.1 ISO: 100 Flash Not used Image removed. ३. वेरूळच्या कैलास लेण्यातील प्रदक्षिणापथ Camera: Canon EOS 550D Lens: 18-55mm Focal Length: 50 mm Exposure 1/30 F Number: f/5.6 ISO: 3200 Flash Not used Image removed. वरील तिन्ही छायाचित्रात कसलेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.

तिनही चित्रे फारच छान आहेत.

अनुप कोहळे
Wed, 08/20/2014 - 21:41 नवीन
तिनही चित्रे फारच छान आहेत.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खल्लास!

सुधीर
Fri, 08/22/2014 - 15:27 नवीन
स्थापत्य कला मनमोहक त्यात छायाचित्रण कला अप्रतिम! पहिला फोटो विशेष आवडला.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लै भारी

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/20/2014 - 09:25 नवीन
फारच सुरेख कल्पना. या स्पर्धे निमित्त चांगली छायाचित्रे पहायला मिळतिल. पैजारबुवा,

मी काढलेली छायाचित्रे

श्रीरंग_जोशी
Wed, 08/20/2014 - 09:39 नवीन

~ विस्कॉन्सीन स्टेट कॅपिटॉल ~

Image removed. Exif Details: Sony Nex-5N, F-stop: F/11, ISO:100, Exposure 1/100

~ मिलवॉकी आर्ट म्युझियम ~

Image removed. Exif Details: Sony Nex-5N, F-stop F/13, ISO:100, Exposure 1/250

~ माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियल ~

Image removed. Exif Details: Canon SX-30IS, F-stop:F/4.5, ISO:80, Exposure:1/1000 वरील तिन्ही छायाचित्रात पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. मूळ आकारात चित्रे बघायची असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

या स्थळांविषयी माहिती

श्रीरंग_जोशी
Sun, 08/24/2014 - 20:18 नवीन
अमेरिकेत राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी स्टेट कॅपिटॉल असते. तिथे त्या राज्याच्या विधिमंडळाची सभागृहे, गवर्नर चे कार्यालय व स्थानिक सिनेटर्स, काँग्रेसमन यांची कार्यालये त्याखेरीज त्या राज्यातील सर्वोच्च न्यायालयाचे कार्यालय असते. विस्कॉनसिन चे स्टेट कॅपिटॉल राजधानी चे शहर मॅडिसन मध्ये आहे. डाऊनटाऊन मॅडिसन हे दोन जलाशयांचे मध्ये वसले आहे (लेक मेंडोटा व लेक मोनोना). स्टेट कॅपिटॉलच्या इमारतीचे स्थापत्य अत्यंत भव्य व आकर्षक आहे. ठोकळेबाजपणा कुठल्याही कोनातून जाणवत नाही. पर्यटकांना आत बाहेर मुक्त प्रवेश असल्यामुळे तेथील स्थापत्याच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. घुमटाच्या आतील बाजूचे नक्षीकाम व रंगसंगती वाखाणण्याजोगी आहे. विस्कॉनसिन मधील सर्वात मोठे शहर मिलवॉकी येथील मिलवॉकी आर्ट म्युझियम संग्रहालय म्हणून वाखाणण्याजोगे आहे पण २००१ साली बांधल्या गेलेल्या Quadracci Pavilion या इमारतीने त्याचे स्थापत्य एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लेक मिशिगनच्या काठावर असल्यामुळे लांबून पाहिल्यास एकादे जहाज नांगर टाकून उभे आहे असा भास होतो. स्थापत्य रचनाकार आहेत सॅंतियागो कलात्रावा. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका प्रसिद्ध हॉलिवूडपटातील एक दृश्य येथे चित्रित झाले आहे. ओळखा पाहू हा चित्रपट. साऊथ डाकोटा या राज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर माउंट रशमोअर नॅशनल मेमोरियलची प्रतिमा डोळ्यासमोर येते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून निर्मिती झालेले महाशिल्प प्रत्यक्ष पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. Gutzon Borglum यांच्या हाताखाली ४०० शिल्पकार व संबंधित कामगारांनी १४ वर्षे (१९२७ ते १९४१) राबून हे महाशिल्प डोंगरात घडवले. चार राष्ट्राध्यक्ष, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन यांची ही शिल्पे प्रत्यक्षात योजल्यानुसार कंबरेपर्यंत घडवायची होती. Gutzon Borglum यांच्या मृत्यूनंतर (मार्च १९४१) त्यांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली पुढचे काही महिने काम चालले परंतु निधीअभावी ते अर्धवट राहिले व आजही त्याच अवस्थत आहे. ही बाब ठाऊक नसणाऱ्यांना ते काम अपूर्ण आहे असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वा!

पैसा
Wed, 08/20/2014 - 09:43 नवीन
आतापर्यंतच्या तीनही प्रवेशिका एकापेक्षा एक भारी आहेत! निर्णय द्यायचं मिपाकरांचं काम फार कठीण करताय तुम्ही फटुग्राफर लोक!

अगदी असंच

एस
Wed, 08/20/2014 - 11:46 नवीन
मेजवानी मिळणार आहे मस्त! जरा ती मुदत कमी वाटतीय हो. सात दिवसांत कितीशा प्रवेशिका येतील!
↩ प्रतिसाद: पैसा

साॅलिड फटु श्रीरंग राव

स्पा
Wed, 08/20/2014 - 10:50 नवीन
साॅलिड फटु श्रीरंग राव :-)

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 08/20/2014 - 18:06 नवीन
तुमचे तर मेटलगिअर सॉलिड आहेत. सर्वच प्रवेशिका एकाहून एक आहेत. आता काही दिवस पर्वणीच.
↩ प्रतिसाद: स्पा

माझेही तीन फोटु

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 08/20/2014 - 11:56 नवीन
महाबळेश्वर जवळ काढलेला धरणाचा फोटो Image removed. पावसाळ्यातला मुंबई पुणे एक्सप्रेस वे Image removed. कात्रज सिंहगड ट्रेक करताना रात्री दोन वाजता लागणारे एक मंदिर Image removed. पैजारबुवा,

ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ,

आतिवास
Wed, 08/20/2014 - 11:56 नवीन
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ, अफगणिस्थान Image removed. आजही धडकी भरवणारा सेल्युलर जेल, अंदमान Image removed. गोळकोंडा मधलं हे बहुतेक बाजार भरण्याचं ठिकाण असावं का? का घोड्यांच्या पागा? माहिती नाही! Image removed.

मज़हरे शरीफ़वर जान कुर्बान!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 08/21/2014 - 22:38 नवीन
काय नज़ाक़त आहे, सुभानल्ला!
↩ प्रतिसाद: आतिवास

सुंदर

सुधीर
Fri, 08/22/2014 - 15:36 नवीन
ब्लू मॉस्क, मझार ए शरीफ प्रथमच पाहतोय!
↩ प्रतिसाद: आतिवास

शंका

असंका
Wed, 08/20/2014 - 12:17 नवीन
शंका १. डुआयडीने फोटो पोस्ट बिस्ट केले तरीही चालतील का हो? २. फोटो बदलता येतील का?

एका आयडीला

पैसा
Wed, 08/20/2014 - 12:24 नवीन
१. एका आयडीला जास्तीत जास्त ३ फोटो अपलोड करता येतील. तुमचे किती आयडी आहेत? २. फोटो बदलता येणार नाहीत. कारण नंतर लोकांना मत देताना क्न्फ्युजन होईल.
↩ प्रतिसाद: असंका
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा