समर्पण
ओढ लागली दत्ताची
वाढे गोडी परमार्थाची
मिळे स्फूर्ती साधनेची
होई पूर्ती आनंदाची ll १ ll
मूर्ती साजिरी मायेची
प्रेमळ सावली वात्सल्याची
उभी पाठीशी कायमची
चिंता वाहे भक्तांची ll २ ll
घ्यावी प्रचीती दत्तांची
चित्तवृत्ती हो पावनतेची
सेवा करिता चरणांची
मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll
दत्तनाम घेता वाची
स्वानुभव अष्टांग रोमांची
राख होतसे दु:खांची
हि किमया दत्तकृपेची ll ४ ll
काय चिंता भविष्याची
भीती कायसी अशाश्वताची
मनी भावना समर्पणाची
फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll