हे ठिकाण

एक लिंक शोधायला मदत करा

सुहासदवन's picture
सुहासदवन in जनातलं, मनातलं
27 Jul 2013 - 2:04 pm

मी मिसळपाव, मनोगत, मायबोली तसेच ऐसीअक्षरे या मराठी संस्थळांचा वाचक आणि जबरदस्त चाहता आहे. या संस्थळापैकी एकावर काही दिवसांपूर्वी मी अनेक जुने लेख आणि चर्चा वाचत असताना मला एक लिंक मिळाली होती - अमानवीय अनुभव. ते नेमके कोणत्या संस्थळावर होते ते मला आठवत नाही.

कृपया आपणांपैकी कोणीतरी मला ती लिंक देऊ शकाल काय. धन्यवाद.

हे ठिकाणसंदर्भ

संपर्क ईश्वराचा

सार्थबोध's picture
सार्थबोध in काथ्याकूट
24 Jul 2013 - 9:26 am

अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले
होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील,
त्यांच्या वाटेला मी जाणार नाही.

मोठीशी आरोळी

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
23 Jul 2013 - 3:56 pm

मोठीशी आरोळी कोण मारतुया वर.
यमाचा आवाज , मला कळली झालर.

माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे.
कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे.

अंधार होताहोता,निजू लेगेल झापड.
गालाचेही आता होऊ लागेल खापड.

किती आले किती गेले याची यमाला कल्पना.
आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना.

रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली.
रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी.

चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा.
पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा.

रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील.
हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील

हे ठिकाण

गज्याचे दुकान

सार्थबोध's picture
सार्थबोध in जनातलं, मनातलं
22 Jul 2013 - 3:15 pm

बऱ्याच दिवसांनी; एका अगदी लहान गावाकडे जायचा योग आला; खेडेगाव म्हणा हवे तर. मी एका मास्तरांना भेटायला गेलो होतो
तिथे एक लहान शाळा आहे असे ऐकले होते; शाळा फारच साधी आहे आणि एकूणच डबघाईला आलेली परिस्थिती आहे. शाळेला
काही मदत म्हणून वह्या-पेन, पाट्या-पेन्सिली, प्लास्टिक फळे-मार्कर-डस्टर असे साहित्य घेऊन गेलो होतो. प्रवास झाला; काम झाले,
पण एक गोष्ट कायमची लक्षात राहिली. गावात ज्यांच्याकडे काही कामाकरिता गेलो होतो, तिथे त्यांच्या आळीत एक दुकान पहिले;
किराणाचे, ते काही केल्या डोक्यातून जाईना. तुम्ही म्हणाल इतके काय आहे त्या दुकानात?;

हे ठिकाणअनुभव

संवेदना

सार्थबोध's picture
सार्थबोध in जनातलं, मनातलं
22 Jul 2013 - 12:11 pm

रोजच्याप्रमाणे कामावरून घरी जात होतो, दुकानातून काही घेण्याकरिता थांबलो, पुन्हा गाडी चालवत निघणार; तेंव्हा रस्त्यात कडेला एक कुत्रा विव्हळताना दिसला, बहुदा पायावरून गाडी गेली असावी, लोक पहात होते, मला फार वाईट वाटले, त्याला काही बिस्किटे टाकली. गडबड नेहमीची पाचवीला पुजलेली, घरी गेलो. काही केल्या तडफडणारा कुत्रा डोळ्यासमोरून जाईना. आवरून झोपायला गेलो, पुन्हा तेच विचार! काय वेदना होत असतील त्याला?, त्याचे सोबती? ते तरी काय मदत करणार? त्याचे खायचे काय? मला असले फार विचित्र प्रश्न पडू लागले, उत्तरे मिळत नव्हती मी कूस बदलून काही फरक पडत नव्हता.

हे ठिकाणलेख

समर्पण

सार्थबोध's picture
सार्थबोध in जे न देखे रवी...
22 Jul 2013 - 11:47 am

ओढ लागली दत्ताची
वाढे गोडी परमार्थाची
मिळे स्फूर्ती साधनेची
होई पूर्ती आनंदाची ll १ ll

मूर्ती साजिरी मायेची
प्रेमळ सावली वात्सल्याची
उभी पाठीशी कायमची
चिंता वाहे भक्तांची ll २ ll

घ्यावी प्रचीती दत्तांची
चित्तवृत्ती हो पावनतेची
सेवा करिता चरणांची
मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll

दत्तनाम घेता वाची
स्वानुभव अष्टांग रोमांची
राख होतसे दु:खांची
हि किमया दत्तकृपेची ll ४ ll

काय चिंता भविष्याची
भीती कायसी अशाश्वताची
मनी भावना समर्पणाची
फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll

हे ठिकाण

' ठोकळे '

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
21 Jul 2013 - 6:53 pm

' ठोकळे '

ठोकळे, ठोकळ्यांचा समूह, मग आख्खा एक ठोकळा
किंवा
आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच.

लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव
शंभरची पत्ती दाखव
दिली नाहीस तर तो भाव खाणार
रिंकाम्या खिशाने बोंबलत पुढे जाणार
एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ?

उजवीकडे मोठे भुयार
मग भुयारात भुयार !
आणि
मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे
काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे ,
मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट
लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे

हे ठिकाण

आकाश

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
15 Jul 2013 - 11:21 am

.. तर हे थेट तुझ्यापासून माझ्यापर्यंत पसरलेले आपले आकाश ..
त्यात पुन्हा तुझ्या बाजूने आपल्या दोघांचे आकाश वेगळे ;
आणि माझ्या बाजूने वेगळे !
त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे
आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे ..

..चल, आता हे सारे तुकडे एक करून टाकू !

- डॉ. सुनील अहिरराव

हे ठिकाण

भिंत

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
12 Jul 2013 - 11:56 am

आधी आपण वाळूवर घर बांधले
खेळता खेळता,
तू मोडून टाकलेस !
नंतर आपण हवेत स्वप्न बांधले
तू हलकेच फुंकर टाकलीस;
पत्त्यासारखे कोसळले !
आता
तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी
आपण एक कडेकोट भिंत बांधू !

- डॉ. सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_1956.html

हे ठिकाण