मन खट्टु झाले.

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
30 Sep 2013 - 8:51 am

मंडळी,
दूरवर बसलेल्या माणसांशी काही तरी वाद - संवाद घडेल आणि दुरून का होईना थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, आशिर्वाद , लाभेल या हेतूने इथे आलो. पण इथे टंकन करण्या संबधी कोणी मदत करीत नही असे दिसले.
अगदी पहिल्या पासून माझे ३ mail हे सांकेतिक शब्द परत परत मागायला लागतो अशी तक्रार करून झाले पण काही नाहि. साधी त्या e-mail ची पोच सुद्धा कोणी देत नाही. माझ्या वैयक्तिक email id वरून सुद्धा मी नीलकांत यांना आणि admin ला सन्देश पाठवून झाले. काहीच उत्तर नाही.
कोणी दादच देत नाही.

तात्या अभ्यंकर या भल्या माणसास भेटायचे आहे म्हणून त्यांचा फोन नं. मागितला तर त्याही mail चा reply नाही.(त्यांना अशा साठी भेटायचे होते के जी लता दीदी , बाबूजी, भिमाण्णा, किशोर कुमार यां थोर कलावंतांनना ते भेटले आहेत त्या व्यक्तिचे प्रत्यक्ष दर्शन झाले असते तर आम्ही कृतकृत्य झालो असतो. कारण वारीला जाणे ज्या कोणाला जमत नाही ते लोक नाही का वारीवरून परत आलेल्या इतर वारकर्यांची गळाभेट घेतात. तसेच काही तरी)

असो कामाच्या रगाड्यात चालायचेच!

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

आपले इथे स्वागतच आहे...

खटपट्या's picture

30 Sep 2013 - 10:33 am | खटपट्या

मराठी टंक लेखनासाठी खालील लिंक वापरून बघा.

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

स्पंदना's picture

1 Oct 2013 - 5:25 am | स्पंदना

मध्यंतरी मिपाला थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे सगळेच विस्कळीत झाले होते. त्यात स्पॅमर्सचा त्रास, अन हे संकेतस्थळ विनामोबदला फक्त वेल वीशर्सच्या योगदानावर चालते, थोडा वेळ लागला काही माहीती मिळायला तर इतके रागावु नका भाऊ! तुम्हाला तात्यांना भेटायच आहे का? तुम्ही त्यांच्या शिळोप्याची ओसरी...वर जाउ शकता.