संपर्क ईश्वराचा

सार्थबोध's picture
सार्थबोध in काथ्याकूट
24 Jul 2013 - 9:26 am
गाभा: 

अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले
होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील,
त्यांच्या वाटेला मी जाणार नाही.

हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे
म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही
वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात
मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना;
कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे
नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील
दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी
देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते.

उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात
आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर
पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू
गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन
दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल,
"पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला
कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ
करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत
जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या
दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे.

जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग
बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे,
जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत,
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.

- सार्थबोध

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परमेश्वरानेही माणसं संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्याआधी परमेश्वरानेही त्याच्या बाजूने माणसाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावेत असे मला वाटते. म्हणजे देवाने एक पाऊल पुढे टाकलं की आपल्याला दोन पावलं तरी त्याच्या दिशेने सरकता येईल. दोघांच्या बाजूने सारखे प्रयत्न व्हावेत याबाबतीत आपलं काय मत आहे ?

-दिलीप बिरुटे
(धार्मिक)

सार्थबोध's picture

24 Jul 2013 - 10:46 am | सार्थबोध

आदरणीय दिलीपजी ,
आपला मुद्दा योग्य आहे. मला वाटते त्या करुणामय परमेश्वराने माणसाचा जन्म दिला, बुद्धी आणि ज्ञान संपादन करायची पात्रता दिली. पावन आईबाप दिले जेअजाण जीवाला योग्य मार्ग दाखवतील . या सगळ्याला आपण त्याने टाकलेले एक पाऊल म्हणू शकतो का?…परमेश्वर हा सागर आहे, आपण लहान लहान ओढे नाले प्रवासाचा शेवट हा तिथपर्यंत वाहूनच होणार …आपल्यालाच जास्त यत्न करायला हवेत… … काय वाटते तुम्हाला?…लहन तोंडी मोठा घास …. फक्त विचार मांडतोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2013 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री सार्थबोध आदराबद्दल आभारी आहे जालावर इतकं कोणी आदराने बोललं की मला संकोचल्यासारखं होतं. बिंधास्त दिलीप म्हणा.

हं तर आपण म्हणता ते काही मला चुक वाटत नाही. चराचर सृष्टीकडे अगदी विवेकानं पाहिलं की असं वाटतं की काही तरी या सृष्टीत दडलं आहे. पण परमेश्वारानं जरा भेदभाव केला की काय असे वाटते. सर्वांना सारखी बुद्धी दिली नाही, सर्वांना सुंदर बनवलं नाही, कुठे प्रचंड दु:ख तर कुठे प्रचंड आनंदी आनंद, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील पण आपण म्हणता तसं आपली आणि जीवाशी शीवाची भेटा निश्चित अर्थात ही कल्पना आहे की सत्य ते मला काही माहिती नाही. पण, आपण जन्माला आलो आणि त्याने आपल्याला भौतिक सुखसागरात लोटून दिले आपण तिथेच रममाण झालो आणि तो मात्र आपली तटस्थपणे गम्मत पाहतोय असे वाटत राहते. एक वेळ आपण कोणाशी भांडत असलो तर आई तरी सोडवा-सोडवी करायला येईल हा देव येत नाही, हं आता देवाच्या निमित्ताने आई म्हणजेच देव असते, कोणी मित्र ते भांडण सोडवायला येत असेल तर त्याच्यातही आपल्याला त्याचे रुप पाहता येते. पण, थेट देव येत नाही, याबद्दल मला देवाचा जरा रागच येतो, अर्थात ही सुद्धा माझी कल्पनाच आहे.

आपल्याला जास्त प्रयत्न करायला हवेत पण ते कसे करावे याचे काही निश्चित असे उत्तर दिसत नाही. अनेक मार्ग देव देवतांकडे माणसाला घेऊन जातांना प्रचंड अशा कोणत्या तरी गोष्टी ग्रासून टाकतात. ती माणसं वास्तव जीवन विसरुन जातात ते त्यातुन बाहेर पडतच नाही. अगदी वेडे म्हणावेत अशा अवस्थेला जातात ती अवस्था बरी नाही. दिसला आपला देव त्याला नमस्कार करुन पुढे चालायचं फार वाहवत जायचं नाही, असं मला वाटतं. काय म्हणता ?

आणि हो कोणी लहान नाही आणि कोणी मोठे नाही आपण सारखे....काय चुभु असेल तर देऊ घेऊ आणि नाही पटलं तर सोडून देऊ. हाय काय अन नाय काय.

-दिलीप बिरुटे

सार्थबोध's picture

24 Jul 2013 - 11:24 am | सार्थबोध

वाह … आवडले दिलखुलासपणा आणि "जे आहे ते स्वीकारायची" शैली आवडली...धन्यवाद

विजुभाऊ's picture

27 Jul 2013 - 6:29 pm | विजुभाऊ

सार्थबोध जी
देवाने कलीयुगात बरीच कामे मदतीची कामे केल्याचे दाखले दिले जातात.
उदा: जनीचे दळण दळून दिले.
एकनाथांच्या घरी पाणी भरले.
मीरेसमोरचा विषाचा पेला हरी स्वतः प्याला.
शंका उद्भवते.
जनीला दळण्यात मदत करण्या ऐवजी हरीने तीला तहहयात पीठ मिळेल असे अ‍ॅटोमॅटीक जाते का करून दिले नाही
एकनाथांच्या घरी पाणी भरण्या ऐवजी त्याने तेथेच झरा का निर्माण केला नाही
मीरेला विषाचा पेला देणार्‍याला ढकलून पाडले का नाही तेणे करून पेला सांडून गेला असता.
देवाला जर सर्व काही ज्ञात असते तर तो ती गोष्ट घडण्या अगोदरच टाळ्त का नाही. ( की देवच हे सारे ब्याकग्र्रुंड जॉब शेड्यूल करून फक्त पहात असतो )
आणखी एक शंका : हरी किंवा देव हा स्वभक्तीचा इतका भुकेला का आहे? त्याची स्तुती केली तर तो पावतो म्हणे.
देव स्तुतीचा भुकेला असेल तर त्याचे सर्वव्यापित्व शंकास्पद ठरते. की इश्वरी स्तुती हा एक सर्वधर्मीय भ्रम आहे?
..... शंकासूर विजुभाऊ.

स्पा's picture

24 Jul 2013 - 10:54 am | स्पा

छान लिहिलंय

दादा कोंडके's picture

24 Jul 2013 - 11:03 am | दादा कोंडके

आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग
बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा,

आवरा!!!

मंदार कात्रे's picture

24 Jul 2013 - 11:04 am | मंदार कात्रे

धर्म आणि ईश्वर यासारख्या संकल्पनांचा प्रभाव ओसरण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे विकसित जगात तर्कशुद्ध विचारसरणीचा उदय आणि प्रसार आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाप-पुण्य यासारख्या संकल्पनांच्या बाबतीतला भोंगळपणा होय

भारतातच नव्हे तर जगात इतरत्र देखील धर्म ही संकल्पना न मानणार्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते याचे प्रमुख कारण नीतिसूत्रे आणि पाप-पुण्य यात ताळमेळ नसणे

मांसाहार जर एका माणसासाठी पाप ठरत असेल तर दुसर्यान माणसासाठी ते पाप नाही. दारू पिणे पाश्चात्य जगात अतिशय कॉमन असताना आपल्याकडे अपेयपान/अभक्ष्यभक्षण इत्यादि धर्मनियम लावण्यात येतात.

सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह ठरवणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा गुरुचरित्रा सारख्या ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे हेही पाप असे सांगितले जात असेल, तर अशा भाकड आणि भ्रामक धर्मनियमांचे पालन करणे हे खुळेपणाचे आणि हास्यास्पद ठरते . तीच गत परान्न-भोजन आणि तत्सम कालबाह्य नियमांची...

धर्म वाचवायचा असेल तर तो प्रवाही बनवला पाहिजे ,कालानुरूप बदल घडलेच पाहिजेत .सतीप्रथा ,विधवा केशवपन यासारख्या कुप्रथा धर्माने कधीच बंद केल्या नाहीत , सामाजिक चळवळी /कायद्याच्या रेट्यानेच अशा कर्मठ प्रथा बंद कराव्या लागल्या , हे सत्य आहे.

सती जाणारी स्त्री आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करते , विधवा स्त्रीने आपले केस कापले नाहीत तर त्या केसांचा फाशीचा दोर होवून मृत नवर्यासच्या गळ्याला अडकून पडतो अशा अनेक भ्रामक कपोलकल्पित रूढी/शास्त्र / समजुती गेल्या 70-80 वर्षापूर्वी प्रचलित होत्या .अशा गोष्टींना आज आपण अंधश्रद्धा म्हणतो, मग सध्या अस्तीत्वात असलेले भ्रामक धर्मनियम भविष्यकाळात अंधश्रद्धा ठरू शकतात .
अर्थात सर्वच श्रद्धा या अंधश्रद्धा नसतात हे मान्य. पण म्हणून धर्म आणि शास्त्राचा /नियमांचा बडेजाव न करता कालानुरूप धर्माने प्रवाही व्हायला हवे,आणि समाजधुरीणानी याबाबतीत पावले उचलावीत ,अशी अपेक्षा!

प्रभाकर पेठकर's picture

24 Jul 2013 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर

गल्ली चुकलं काहो पीएल हे?

उद्दाम's picture

25 Jul 2013 - 8:10 pm | उद्दाम

ते एका ठिकाणी काहीतरी लेख लिहितात.

मग दुसर्‍या ठिकाणी तेच सगळे कशाचा तरी प्रतिसाद म्हणून पुन्हा लिहितात.

हे बघा .... http://www.maayboli.com/node/44280

रुमानी's picture

24 Jul 2013 - 11:46 am | रुमानी

आपले म्हणे अतिशय योग्या असेच आहे मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यांच्या संपर्क क्षेत्रात राहण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे .पण नेमके कोणत्या कसोटीने चांगले किंवा वाईट ह्याचे प्रमाण ठरवायचे आपण ते जरा सविस्तर लिहा कि कारण पाप आणि पुण्या चे मोज माप तरी कळाले पाहिजे . तरच त्याच्याशी संपर्क साधने सोपे जाईल . मग तसे एक काय तर दहा पाऊले उचलताही येतील . पण देवानीच इतक्या पळवाटा करून ठेवल्यात कि जसे खोटे बोलणे हे कधी पुण्या ठरते तर कधी पाप ... मग नेमके काय करायचे हो ?बिचारया माणसाने :( अत्ता तुम्हिच सांगा ?

सार्थबोध's picture

24 Jul 2013 - 12:15 pm | सार्थबोध

तुम्ही मांडलेला प्रश्न यथा योग्य आणि जटील आहे. मी पूरक उत्तर देणे आत्ता आवाक्याबाहेरचे दिसते. पापपुण्य , चांगेल वाईट हे ज्याच्या त्याच्या दृष्टीनुसार आहे. आपण एक मार्ग पत्करावा त्याप्रमाणे वागत राहावे. आयुष्य माणसाला सर्व शिकवते अनुभव देते त्या अनुभवातून संदर्भ घेत पुढे जावे. गुरु या विषयावर श्रद्धा असल्यास योग्य मार्ग/ योग्य उत्तर मिळण्याकरिता ती जमेची बाजू ठरू शकते , असे मला वाटते. अस्सल रामबाण शंका समाधान तर सगळ्यांनाच हवे आहे …ते मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद

विटेकर's picture

24 Jul 2013 - 12:55 pm | विटेकर

पापपुण्य , चांगेल वाईट हे ज्याच्या त्याच्या दृष्टीनुसार आहे

पाप - पुण्याची सगळ्यात सोपी व्याख्या व्यास महर्षी नी केली आहे- परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम !
हीच कसोटी लावली तर आयुष्य फार सोपे होते.पण जेव्हा पाप- पुण्याचा आणि धर्माधिष्ठीत कर्तव्यांचा conflict of Intrest (मराठी शब्द?) होतो , तेव्हा गोची होते आणि त्यावेळी चक्क शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. ( पूर्व-सुरीनी अशा प्रसंगी कसे वर्तन केले होते ?)
आणि म्हणूनच कर्म करताना त्याच्या फळापेक्षा त्याचा हेतु काय होता यांवर पाप की पुण्य हे अवलंबून आहे !समजायला थोडे कठीण वाटेल पण मला वाट्ते प्रत्येक कृती करताना , कर्त्याला आपण नेमेके पाप करतो की पुण्य याचे जाणिव असते. तो आतला आवाज ऐकायचा की नाही ? एवढाच प्रश्न असतो. दुर्योधनासारखे प्रामाणिक सरळ कबुली देतात की
जानामि धर्म नच मे प्रवृत्ती |
जानाम्यधर्म न च मे निवृत्ती |

सार्थबोध's picture

24 Jul 2013 - 1:04 pm | सार्थबोध

छान आवडले मला तुमचे उत्तर

conflict of Intrest - स्वारस्य विरोध चालू शकेल का?

कलयुग जेव्हा ब्रम्ह देवा समोर आले तेव्हा त्याने एका हाताने जिव्हा धरली होती आणि एका हाताने स्वतःचे लिंग.ते मधेच हसत होते,मधेच रडत देखील होते. ज्या व्यक्तीचा स्वतःच्या जिव्हेवर (जिभेवर) आणि लिंगावर (भोगासक्ती) ताबा राहणार नाही त्यावर कली प्रभाव टाकण्यास समर्थ आहे.

भगवान श्रीकॄष्णाच्या अवतार समाप्ती नंतर कलीयुगाची सुरुवात झाली असे समजले जाते. युधीष्ठीराचे कलियुग विषयक संभाषण महाभारतातील वनपर्वात आढळुन येते.
संदर्भ :-
Vana Parva
Vana Parva
ब्रम्ह वैवर्त पुराणात देखील कलियुगा संबंधी संदर्भ पहायला मिळतो.
राजा परिक्षिता समोर जेव्हा कलियुग परास्त्र झाले तेव्हा त्याने स्वतःच्या निवासाठी स्थान मागितले, तेव्हा द्यूत, मद्यपान, परस्त्रीगमन आणि हिंसा ही स्थाने त्याने कलियाग त्याच्या प्रभाव पाडण्यासाठी दिली.येव्हढे असुनही कलिचे समाधान झाले नाही, तेव्हा पाचवे स्थान त्याने सुवर्ण म्हणुन दिले.
कलियुगा विषयी सर्व गोष्टी वाईट दिसत असल्या तरी संतांनी मात्र कलि युगा विषयी आनंदच व्यक्त केला आहे, कारण कलियुगात कोणत्याही धार्मिक गोष्टीचे फळ लवकर मिळते असे त्यांचे म्हणणे आहे.
महर्षी व्यासांच्या म्हणण्या नुसार कॄत युगात १० वर्ष जप-तप आणि उपास केल्यावर फळ मिळते हेच फळ त्रेता युगात एक वर्षात आणि द्पापार युगात एक महिन्यात मिळते आणि हेच फळ कलियुगात मात्र १ दिवसात मिळते.कॄत युगात ध्यान योगाने जे फळ मिळते तेच कलियुगात केवळ श्रीकॄष्णाचे नाम घेतल्यानी मिळते.यामुळेच कलियुगातील सर्व संतानी त्यांच्या अवतार कार्यात नामाचे महत्व आणि महात्म कथन केले आहे.

सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह ठरवणे यात काहीच गैर नाही, पण जेव्हा गुरुचरित्रा सारख्या ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे हेही पाप असे सांगितले जात असेल, तर अशा भाकड आणि भ्रामक धर्मनियमांचे पालन करणे हे खुळेपणाचे आणि हास्यास्पद ठरते . तीच गत परान्न-भोजन आणि तत्सम कालबाह्य नियमांची...

मन्दारजी,
मी स्वता श्रीगुरुचरित्र वाचले आहे,पण त्यात आपण सन्गितलेले वाचण्यात आले नाही म्हणुन हा प्रपन्च.(मी कामत यानी सन्शोधीत सम्पादित प्रत वाचली आहे)

बापरे, कायकाय स्टोर्‍या लावल्यात! तरीच म्हटलं साध्या-सोप्या गोष्टी का समजत नाहीत!

काय जिलबी बाबा... ३१ जुलै चे काम आटपले वाट्ट... नाय प्रतिसाद रुपी निरर्थक जिलबी टाकुन गेलात म्हणुन !;)
माझ्या प्रतिसादातल्या पहिल्या भागाला संदर्भ आहे श्री गुरु चरित्र अध्याय २ रा.

जाता जाता :--- तुमच्याकडुन अश्याच बेशर्त जिलब्यांची अपेक्षा असल्याने माझा अपेक्षा भंग झालेला नाही. ;)

बाकी कात्रे साहेबांनी जे काही सांगितले ते पडताळायला जमल्यास नक्की करेन (कुठल्याही गोष्टीचा योग्य संदर्भ लगेच लागेल असे नाही.) परंतु परान्न न घेणारे अनेक जण मी पाहिले आहेत्,आणि आजच्या काळातही असे लोक अभावाने का होईना आढळुन येतात.

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 4:36 pm | अनिरुद्ध प

माझ्या मते गुरुचरित्र सप्ताह करत अस्ताना परान्न घेत नाहित किवा शक्यतो टाळ्तात.परन्तु कात्रे यानी जो कपडे पिळुन वाळ्त घालणे असे वाचनात आले असे वाटत नाही आपल्या जवळ कही सन्दर्भ अस्ल्यास तो जरुर कळ्वावा.

यावरनं सगळा उलगडा झाला!

>तुमच्याकडुन अश्याच बेशर्त जिलब्यांची अपेक्षा असल्याने माझा अपेक्षा भंग झालेला नाही.

= तो ग्रंथ स्वयेच इतकी भारी जिल्बी आहे की तुमच्या अपेक्षा अनंत राहतील.

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 11:29 am | मदनबाण

तो ग्रंथ स्वयेच इतकी भारी जिल्बी आहे की तुमच्या अपेक्षा अनंत राहतील.
हॅहॅहॅ... जिलबी बाबा तुमच्या या बेशर्त प्रतिसादाची पाकॄ खाली दिलेली आहे. :)

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2013 - 12:11 pm | संजय क्षीरसागर

अर्धवटारावांच्या या ग्रँड थियरमवर :

ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो.

खुद्द स्टीफन हॉकिंग्जशी चर्चा.

आणि साक्षात मदनबाण त्यांच्या मदतीला आधार ग्रंथ घेऊन मागे उभे! कोणता तर म्हणे `श्री गुरु चरित्र!!

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 12:24 pm | मदनबाण

जिलबी बाबा तुमच्या स्टीफन हॉकिंग्ज या नविन जिलबीला माझ हे नविन पीठ :-
स्टीफन बाबा म्हणतात :- Thus it seems Einstein was doubly wrong when he said, God does not play dice. Not only does God definitely play dice, but He sometimes confuses us by throwing them where they can't be seen.
ते असही म्हणतात :-
One could calculate probabilities, but one could not make any definite predictions. Thus, the future of the universe is not completely determined by the laws of science, and its present state, as Laplace thought. God still has a few tricks up his sleeve.

संदर्भ :--- http://www.hawking.org.uk/does-god-play-dice.html

जाता जाता :- तुमच्या निरर्थक जिलब्या किती बेशर्त रुं किलो ? ;)

मबा. ही विधानं आणि दिलेली लिंक योग्य असली तरी ग्रँड डिझाईनमधल्या पूर्ण विचारप्रक्रियेनंतर ईश्वराच्या सध्या आहे तशा स्वरुपाच्या अस्तित्वाच्या संकल्पनेची "अनावश्यकता"च अधोरेखित होते. अशा इनिशिएटर स्वरुपाच्या ईश्वराचे अस्तित्व नसण्याकडेच कन्क्लुजन वळते. तू वर उल्लेखलेली ही वाक्ये स्टीफनच्या लिखाणातली इंटरमिजिएट वाक्ये आहेत. मधलाच भाग आहे हा.

हां एक खरं, की स्टीफन हॉकिंग्ज हा मुळात "देव नाही" हा एककलमी मुद्दा गृहीत धरुन तो सिद्ध करण्याच्यामागे हात धुवून लागणार्‍यांपैकी नसल्याने त्याने त्याचे अस्तित्व प्रथमपासून नाकारलं नसून सर्व शक्यता गृहीत धरुन विवेचन केलं आहे. देवाच्या अस्तित्वाची अनावश्यकता हा मुद्दा संपूर्ण विवेचनातून आपोआप पुढे आलेला भाग आहे.

या सर्वामधे मुळात देव / ईश्वर कशाला म्हणायचं हा मुद्दा वेगळाच आहे. जे आहे ते तसं असावं, मुळात अस्तित्वात यावं / घडून यावं अशी ईशणा करणारं कोणीतरी आहे असं मानलं तर त्याला ईश्वर म्हणता येईल.

पण अशी ईषणा न करताही जग (अ‍ॅज वी नो इट) अस्तित्वात येऊ शकतं आणि घडू शकतं याची तपशीलवार चर्चा स्टीफन हॉकिंग्ज करतो.

त्या ज्या काही गुंतागुंतीच्या, क्लिष्ट, आपल्या आवाक्याबाहेरच्या सुरुवातीच्या घटना आहेत त्यांमधल्या तत्वांनाच ईश्वर म्हटलं तर तो एक नामकरण (नॉमिनक्लेचर) स्वरुपाचा भाग झाला. अशा प्रकारे "ईश्वर म्हणून काहीतरी आहे" हा वादाचा मुद्दा होऊ नये. पण आपण त्याच्याशी / त्याच्यासोबत काही करु शकतो, त्याच्याशी संपर्क करु शकतो, किंवा आपण त्याला समजून घेऊन काही फरक पडेल किंवा कसं हे सांगणं सध्यातरी अशक्य.

काय आहे ते जाणण्यातलं थ्रिल हाच फरक असेल तर ईश्वर ही संकल्पना जरुर थ्रिलिंग आहे.

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 1:03 pm | मदनबाण

गवि सगळे वैज्ञानिक मंडळी बिगबॅंग थेअरी पर्यंत येउन पोहचतात, माझे काही मित्र देखील या विषयावर चर्चा करताना बिग बँगचा आधार घेतात. मी त्यांना दरवेळी दिवाळीतल्या सुतळी बाँबचे उदाहरण देतो...
सुतळी बाँब फुटतो आणि त्याचा आवाज होवुन तो फुटतो आणि त्याचे तुकडे इकडे तिकडे पडतात. मग स्वतःलाच प्रश्न विचारा की सुतळी बाँब कोणी तरी बनवला आणि तो पेटवला म्हणुन त्याचा स्फोट झाला.तसेच या विश्वा विषयी देखील म्हणता येईल. स्फोट होउन विश्व निर्माण झाले तरी स्फोट होण्यासाठीचे मटेरिअल कुठुन आले ? कोणी आणले ? या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ विज्ञानाच्या कसोटीवर देउ शकले नाहीत.

गवि's picture

25 Jul 2013 - 1:39 pm | गवि

तेच तर..

स्टीफन हॉकिंग्ज बिग बँगपर्यंत जाऊन थांबलेला नाहीये. मुळात तो बिग बँग थियरी अशा नावाच्या एका थियरीने सर्वकाही एक्सप्लेन करु पाहातही नाहीये. त्याने सर्व शक्य असलेल्या थियरीज विचारात घेतल्या आहेत.

एकदम थोडक्यात सांगायचं तर ईश्वराचं अस्तित्व नाही हे सिद्ध करणं हा त्याच्या संशोधनाचा मूळ हेतूच नव्हे. त्याने असं पटवून दिलं आहे की बिग बँगसदृश इव्हेंटसाठी मुळात "ईश्वरी अस्तित्वा"ने काही आधी कृती केल्याशिवायदेखील ते घडणं एक्सप्लेन करता येतं.
त्याने देवाला विरोध करण्याऐवजी असं म्हटलं आहे की:"One can't prove that God doesn't exist, but science makes God unnecessary."

याउपर त्याचा मुख्य भार हा "बिग बँग" या घटनेलाच थिअरी मानण्यापेक्षा जास्त "अँथ्रॉपिक प्रिन्सिपल", टॉप डाउन थियरी इत्यादिंवर आहे. हे नुसते जड शब्द मांडून गोंधळात पाडण्याचा उद्देश नसून काही रोचक थियरीजची नावं इथे मांडण्याचा प्रयत्न आहे.

शेवटी थियरी ही थियरीच असते हे बेसिक तत्व कोणीच अमान्य करु शकणार नाही. त्यातल्यात्यात आभासात्मकरित्या तरी काहीतरी आउट ऑफ बॉक्स शक्यतेपर्यंत नेणार्‍या या थियरीज आहेत.

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2013 - 1:32 pm | संजय क्षीरसागर

पण अशी ईषणा न करताही जग (अ‍ॅज वी नो इट) अस्तित्वात येऊ शकतं आणि घडू शकतं याची तपशीलवार चर्चा स्टीफन हॉकिंग्ज करतो.

स्टीफनची ती वाक्य अशी आहेत :

"गॉड डिड नॉट क्रिएट दि युनिव्हर्स अँड द बिग बँग वॉज ऍन इनएवीटेबल कॉन्सिक्वन्स ऑफ द लॉज ऑफ फिजीक्स"

"बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग"

" स्पाँटेनिअस क्रिएशन इज द रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग, व्हाय द युनिव्हर्स एक्झिस्टस, व्हाय वी एक्झिस्ट", ...हॉकिंग राईट्स

>काय आहे ते जाणण्यातलं थ्रिल हाच फरक असेल तर ईश्वर ही संकल्पना जरुर थ्रिलिंग आहे.

= काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न कुठे दिसतो? "ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो" म्हटलं की विषय संपला!

>हां एक खरं, की स्टीफन हॉकिंग्ज हा मुळात "देव नाही" हा एककलमी मुद्दा गृहीत धरुन तो सिद्ध करण्याच्यामागे हात धुवून लागणार्‍यांपैकी नसल्याने त्याने त्याचे अस्तित्व प्रथमपासून नाकारलं नसून सर्व शक्यता गृहीत धरुन विवेचन केलं आहे. देवाच्या अस्तित्वाची अनावश्यकता हा मुद्दा संपूर्ण विवेचनातून आपोआप पुढे आलेला भाग आहे.

= स्टीफनला देव नाही हे सिद्ध करण्यात रस नाही, त्याला अस्तित्वाच्या निर्मिती प्रक्रियेत रस आहे. मला देव नाही हे सिद्ध करण्यात रस आहे कारण त्या मुलभूत धारणेनं मानवी मनाचा फार मोठा प्रभाग व्यापला आहे. अर्थात, माझ्यासाठी देखील तो महत्त्वाचा असला तरी एकमेव मुद्दा नाही.

स्टीफनला देव नाही हे सिद्ध करण्यात रस नाही, त्याला अस्तित्वाच्या निर्मिती प्रक्रियेत रस आहे. मला देव नाही हे सिद्ध करण्यात रस आहे कारण त्या मुलभूत धारणेनं मानवी मनाचा फार मोठा प्रभाग व्यापला आहे. अर्थात, माझ्यासाठी देखील तो महत्त्वाचा असला तरी एकमेव मुद्दा नाही.

मबाने वरती दिलेली स्टीफनची वाक्यं ही इंटरमिजिएट आहेत हे दाखवण्यासाठी ते म्हटलं आहे. मधलीच वाक्यं घेऊन क्वोट केल्यासारखी वाटली, कारण कन्क्लुजन वेगळं आहे. पण त्या कन्क्लुजनपर्यंत येताना त्याने देव, देवाने, देवाला, देवाचे इत्यादि प्रकारे शब्द वापरुन वाक्यरचना केली आहे. त्यात अनेक ठिकाणी विनोदबुद्धीही वापरली आहे, पण त्या विधानांचा अर्थ त्याला देव मान्य आहे असा नव्हे,( कारण देवाला कोणताही तात्विक विरोध आहे म्हणून नव्हे तर ते त्याचे साध्यच नव्हे) अशा स्वरुपाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी मबाला दिलेल्या प्रतिसादात तसा उल्लेख केला आहे.

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 1:50 pm | मदनबाण

मधलीच वाक्यं घेऊन क्वोट केल्यासारखी वाटली, कारण कन्क्लुजन वेगळं आहे.
हे मान्य आहे. आपला मुद्दा कळला.

चौकटराजा's picture

25 Jul 2013 - 4:15 pm | चौकटराजा

निसर्गात पाप पुण्य, भले वाईट, रात्र उजेड, आस्तिक नास्तिक, आपला परका, कायदेशीर वेकायदेशीर असे काहीही नसते.
आपण चार आंधळ्याप्रमाणे आपल्या परिसराची कल्पना करीत असतो.मनबुद्धी हे जितके सत्यशोधनाचे प्रभावी साधन आहे तितकेच ते भ्रामक चित्र उभे करण्यात पटाईत आहे.मानवी जीवनाच्या पलिकडे ना कोणत्या उपपत्तीला अर्थ आहे ना स्वार्थ !
म्हणूनच मानवी जीवनाने निर्माण केलेल्या कोणत्याही मूल्याला कोणतेही भैतिक मूळ ( पंच महाभुते ) भीक घालीत नाही. जग हे मिथ्या आहे. पण मानवी जीवन तात्विकते वर चालत नाही. सबब निसर्गाच कायदा प्रथम, नंतर समाजाचा नंतर स्वप्रवृतीचा आपल्याला पाळावा लागतो.

>कन्क्लुजन वेगळं आहे. हे मान्य आहे. आपला मुद्दा कळला?

आता तुमच्या या प्रतिसादाचं काय?

कुठे असतो हा राम?
आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! मला वाटत बाह्य मनातुन तो आंतरमनात साठवावा म्हणु चिंतन करण्यावर भर दिला जातो.

कुठे जाणार त्या पोस्टवर तुमच्या मागे धावणारे?

मदनबाण's picture

26 Jul 2013 - 11:04 am | मदनबाण

जिलबीवाले बाबा... आपण जिलबी पाडणे बंद करा आता ! किती रतीब घालणार अजुन ?
मी मधलीच वाक्य कोट केली हे मी मान्य केल आणि ते जो स्टीवनच्या वक्तव्या बाबत मुद्दा समजवु पाहत आहेत तो मला कळला असा त्या प्रतिसादाचा अर्थ आहे.परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो अढळ आहे.
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥६- ३०॥

भगवद गीता अध्याय ६ वा श्लोक ३०
अर्थः- For one who sees Me everywhere and sees everything in Me, I am never lost,
nor is he ever lost to Me.

या भगवंताच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने तुमच्या पोकळ शब्दरुपी जिलब्यांनी माझे मत बदलत नाही.कॄपया आपल्या मनातला परमेश्वर नसल्याचा किंवा ती संकल्पना असल्याचा भ्रम दुर करा म्हणजे जिलब्या पाडणे कमी होईल.
बाकी तुम्हाला काही सांगुन समजणे की कठीण गोष्ट आहे कारण बेशर्त स्वीकृतीवर सीडी अडकल्याने ही केस हाताबाहेरची असल्याचा निष्कर्ष मी आधीच काढलेला आहे.

>तो मला कळला असा त्या प्रतिसादाचा अर्थ आहे?

काय कळला मुद्दा? आहो स्टीफनचं म्हणणंय : "देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे"

आणि मुद्दा कळून परत तुम्ही म्हणतायः "परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो अढळ आहे."

हे म्हणजे एखाद्यानं ` विवस्त्र आहे हे कळलं पण तरीही अंगावर कपडे आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे' असं म्हणणं झालं.

गवि's picture

26 Jul 2013 - 11:54 am | गवि

नाही हो..

त्याने जी वाक्ये क्वोट केली ती मधलीच वाक्ये (कन्क्लुजनचा संदर्भ सोडून) काढलेली आहेत आणि स्टीफनचा अंतिम निष्कर्ष त्या वाक्यांतून भासणार्‍या निष्कर्षापेक्षा वेगळा (निरीश्वर) असा आहे हा मुद्दा मबाला मान्य आहे. याचा अर्थ स्टीफनच्या वाक्यांची आणि अंतिम मताची सांगड त्याने मान्य करुन ती वाक्ये पूर्ण संदर्भाने पाहिल्यासच स्टीफनचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळेल हे मान्य केलं.

याचा अर्थ त्याला स्टीफनचा पॉईंट ऑफ व्ह्यू पटला असं नव्हे. त्याचं व्यक्तिगत मत आस्तिक्यवादीच असून त्याने केवळ आधीच्या प्रेझेंटेशनमधली विसंगती मान्य केली आहे.

अन्य सुसंगत उदाहरण देऊन आस्तिक्याला सपोर्ट करणारी मतं मांडता येतीलही.

"कारल्याची भाजी मला आवडत नाही." हा मुद्दा मांडताना समजा आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या वाक्याचा दाखला दिला की बघा, जोफन कफिंगने असं म्हटलं आहे की "कारल्यातील अमुक द्रव्यामुळे ते कडू असते"

त्यावर समोरच्याने असा मुद्दा मांडला की "पुढे कफिंग असंही म्हणतो, की फ्राय करण्याच्या क्रियेत हा कडूपणा निघून जात असल्याने कारल्याची भाजी तितकीशी कडू लागत नाही.'

मग आपण मान्य करतो की कारल्याचा कडूपणा हा मुद्दा आपण पूर्णपणे क्वोट केला नाही.

याचा अर्थ आपल्याला कारल्याची भाजी आवडायला लागली असा होत नाही. आता आपली कारल्याची नावड आपल्याला अन्य मार्गाने मांडावी लागेल किंवा आपापतः नाही बुवा आवडत कारल्याची भाजी, त्याला काही कारण नाही असं मानून शांत रहावं लागेल. पण मतपरिवर्तनाने भाजी आवडून घ्याच हा काय प्रकार आहे?

उगीचच गैरसमजाचं वातावरण वाढवून आणि शाब्दिक खेचाखेची करुन संवादापेक्षा वादच वाढणार. विषय चांगला विचारांची देवाणघेवाण करण्याच्या योग्यतेचा असताना उगीच तिखट शब्दयोजनेमुळे फोकस भरकटवण्याला हातभार कशाला लावायचा?

विटेकर's picture

26 Jul 2013 - 12:38 pm | विटेकर

व्वाव, क्या बात है ! काय सुरेख समजावून सांगितले आहे.
तुमी मास्तर हाय काय ?
विषाद एवढाच वाट्तो की आपली ऊर्जा असल्या कामासाठी खर्च व्हावी. मूल्यवर्धन शून्य !
@ अतृप्त आत्मा ..

एक झकास स्मायली टाका की राव !

संजय क्षीरसागर's picture

26 Jul 2013 - 2:04 pm | संजय क्षीरसागर

पाहावा.

मदनबाण's picture

26 Jul 2013 - 12:11 pm | मदनबाण

काय कळला मुद्दा? आहो स्टीफनचं म्हणणंय : "देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे"
स्टीफन काय म्हणतो ते कळले, पण ते मला मान्य आहे हा निष्कर्ष तुम्ही कुठल्या सोर्‍यातुन काढलात ? गविंनी संपूर्ण लेखाबद्धल विवेचन केल्यावर स्टीफनला नक्की काय सांगायचे आहे ते मला कळले परंतु याचा अर्थ स्टीफनचे मत मला मान्य झाले असा थोडीच होतो ?

एक तर तुम्ही दुसरा काय लिहतो ते धड वाचत नाहीत्,वाचलेत तर स्वतःला हवा तसाच अर्थ काढता ! यावरुन तुमची मुद्ध्याला बगल द्यायची हातोटी ( की वॄत्ती ? ) दिसुन येते. काही झाल तरी माझीच लाल ! छ्या आवरा ! आवरा आता स्वतःला.

हे म्हणजे एखाद्यानं ` विवस्त्र आहे हे कळलं पण तरीही अंगावर कपडे आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे' असं म्हणणं झालं.
तुमच्या इतक्या भाराभर निरर्थक जिलब्या पाहुन प्रेम चोप्रा यांचा दुल्हे राजा चित्रपटातील एक संवाद आठवला जो तुम्हाला अगदी लागु पडतो. संवाद :- नंगा नहायेगा क्या ? और निचोडेगा क्या ? ;)

जाता जाता :- बाकी बर्‍याच वेगाने जिलब्या पाडत आहात... काय गाव जेवण घालायचे ठरवले आहे काय ? ;)

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2013 - 12:26 pm | प्रभाकर पेठकर

'दंगलसदृश परिस्थिती उद्भवली की मुंबई पोलीस स्थानिक गुंडाना 'राऊंडाअप' करतात आणि दंगल टाळतात.' असे अनेक वर्षांचे निरिक्षण आहे. मिपावर अशी कांही सोय राबविता येईल का? विचार केला पाहिजे.

कवितानागेश's picture

26 Jul 2013 - 6:21 pm | कवितानागेश

दंगल टाळण्यासाठी दंगल करणार्‍यांनाच टाळावे! ;)

स्वगतः आता पेठकरकाका मला टाळतील की काय?!! :P

प्रभाकर पेठकर's picture

26 Jul 2013 - 8:09 pm | प्रभाकर पेठकर

गुंडांना 'राऊंडअप' करतात. 'गुंडी' ला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2013 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद, उपप्रतिसाद, उपौपप्रतिसाद... असे होताना लेखनाची चौकट अधिकाधीक अरुंद होत जाते आहे... पुढे केव्हातरी वाचता न येण्याएवढी अरूंद होईल असे दिसत आहे. ही मिपाची अंतर्रचीत सुरक्षा व्यवस्था (इनबिल्ट डिफेंस मेकॅनिझम) म्हणावी काय? ;)

चौकटराजा's picture

27 Jul 2013 - 10:25 am | चौकटराजा

अमेरिकेतला पनामा, ग्रीसमधला कोरिन्थ व मध्यपूर्वेतील सुवेझ असे कालवे बुजवायची ही पायलट ट्रायल असावी बहुदा !

अगदि बरोबर्,ही उक्ति आप्ल्या आत्म्या सन्दर्भात एकदम लागु पडते कारण मानवी शरिर हे आत्म्याचे वस्त्र आहे असे कुठेतरी वाचले आहे.

अर्धवटराव's picture

25 Jul 2013 - 6:47 pm | अर्धवटराव

स्टीफनच्या जीलबीत मनाला मनाबाहेरुन ऐच्छीक कंट्रोल करण्याचं प्रोव्हिजनच नाहि ? आणि तरिही स्टीफन भोंगळ, पराभूत वगैरे नाहि? आश्चर्य आहे.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2013 - 7:40 pm | संजय क्षीरसागर

स्टीफननं मनाविषयी काहीही म्हटलेलं नाही. त्याचं म्हणणं इतकंच आहे:

>"देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे"

माझं म्हणणं आहे "देव ही कल्पना आहे". त्याबाबतीत स्टीफन आणि माझ्या मतात एकवाक्यता आहे.

आणि तुमचा फंडा (अर्थात गंडलेला) हा आहे :

>"ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो"

यात मनाला ऐच्छिक करण्याचा प्रश्न कुठे येतो?

आणि त्याहूनही पुढे जाऊन तुम्ही म्हणतायं "स्टीफन भोंगळ, पराभूत वगैरे नाहि? आश्चर्य आहे". तुम्ही लाईन ऑफ आर्ग्युमंट कशी ठेवता? असं विचारलं की तुम्ही परत मला न्यायाधिश म्हणणार!

तुमच्या मित्राला जरा तरी प्रकाश पडलाय, वर गविला दिलेल्या प्रतिसादात मुद्दा पटल्याचा प्रामाणिकपणा आहे :

>मधलीच वाक्यं घेऊन क्वोट केल्यासारखी वाटली, कारण कन्क्लुजन वेगळं आहे. हे मान्य आहे. आपला मुद्दा कळला.

तुमचा मात्र अजून तोच घोळ चालू आहे!

अर्धवटराव's picture

25 Jul 2013 - 10:40 pm | अर्धवटराव

>>स्टीफननं मनाविषयी काहीही म्हटलेलं नाही...यात मनाला ऐच्छिक करण्याचा प्रश्न कुठे येतो?
--> स्टीफनशी (काल्पनीक) चर्चा झाली असता तो आम्हाला उभे करेल कि नाहि हा मुद्दा तुम्ही काढलात. मी तिच (काल्पनीक) चर्चा पुढे तुमच्या मनाच्या धारणांविषयी पुढे नेली. इथेच मनाला ऐच्छीक करण्याचा मुद्दा येतो... हे कळणं खरच अवघड आहे का?

>> माझं म्हणणं आहे "देव ही कल्पना आहे". त्याबाबतीत स्टीफन आणि माझ्या मतात एकवाक्यता आहे.
--> स्टीफनचे देवाविषयी काय मतं आहेत हे मलाहि माहित आहे... फॉर्च्युनेटली हा धागा निघण्यापुर्वीपासुन. आणि ते त्याचं मत कसं बनलं याचेही तर्क माझ्याकडे आहेत. स्टीफनसमोर चर्च वगैरे व्यवस्थेने लादलेलं, जिज्ञासा नाकारणारं, देव नावाचं काल्पनीक बुजगावणं आहे. हे काल्पनीक बुजगावणं कुठलेच प्रश्न सोडवु शकत नाहि (कारण ते मुळातच काल्पनीक आहे) हे देखील अगदी उघड आहे. त्याच्या अगदी विरुद्ध, तर्काधारे विचार शृंखलेत ईश्वर हे मूळतत्व म्हणुन माझ्या समोर आलं आणि तेच मी मांडलं. पण त्यावर तार्कीक विचार न करता तुम्ही नेहमीप्रमाणे भोंगळ वगरे शब्दांचा वापर सुरु केला... कारण "देव कल्पना" हि तुमच्या मनाची धारणा तुम्हाला विचार करुच देत नाहि... तर्क चालवुच देत नाहि... दुसर्‍याचे तर्कविचार आपल्याशी मॅच करत नाहित म्हणुन ते स्विकारायला तुमचं मन तयारच नाहि. स्टीफन कुठला निराकार "ऐच्छीकपणे" मनाला कंट्रोल करतो असं कुठे म्हणत नाहि... मी तरी तसं कुठे वाचलं नाहि. देव कल्पनेबद्दल तुमच्यात आणि स्टीफनमधे एकवाक्यता आहे याचा तुम्हाला अभिमान असेल तर मनाबद्द्ल तुमच्या धारणा स्टीफनसमोर चालणार नाहित याची तुम्हाला लाज वाटेल काय?

>>तुम्ही लाईन ऑफ आर्ग्युमंट कशी ठेवता? असं विचारलं की तुम्ही परत मला न्यायाधिश म्हणणार!
-- तुम्हाला न्यायाधीश का म्हणु नये? "ईश्वर हे मूळतत्व आहे" या वाक्यार्थ मी "घडवण्याची क्षमता" या धाग्याने एक तार्कीक मुद्दा मांडला. पण ति तार्कीक शृंखला पुढे नेण्याऐवजी, किमान त्याला काहि तार्कीक प्रतिवाद करण्याऐवजी तुम्ही नेहमीप्रमाणे आपले भोंगळ वगैरे अस्त्र बाहेर काढले. मग त्याऊपर तुम्ही कुठल्या प्रतिसादाची अपेक्षा कराल?

>>तुमच्या मित्राला जरा तरी प्रकाश पडलाय, वर गविला दिलेल्या प्रतिसादात मुद्दा पटल्याचा प्रामाणिकपणा आहे
--> अगदी नेमकं बोललात... प्रामाणीकपणा... आपल्याला काहि कळलय, नाहि कळलय, आपले तर्क चालले, नाहि चालले, दुसर्‍याचं म्हणणं पटलं, नाहि पटलं... तर ते तसं प्रामाणिकपणे कबुल करणं हि खरच प्रकाशाची खुण आहे... तुम्ही मात्र सदैव स्वत:ला "भोंगळ" कोषात गुरफटुन ठेवलत... मग प्रकाश कसा पोचणार तुमच्यापर्यंत? (मला आणखी कुठल्या प्रकाशाची गरज नाहि, माझ्या समोर सगळं स्वच्छ आहे वगैरे टाईपचा तुमचा नेक्स्ट प्रतिसाद असेल... असा माझा तर्क आहे)

>>तुमचा मात्र अजून तोच घोळ चालू आहे!
--> अरे मित्रा संक्षी...(वय, अनुभव, विद्वत्ता वगैरे बाबतीत तुमची जेष्ठता मान्य करुन देखील मित्रा म्हणुन हाक देण्याचा मोह होतोय) इतक्या सार्‍या चर्चांमधे तुला इतकी सारे निगेटीव्ह रीमर्क मिळाले... त्यात सदैव तुला ठोकुन काढायची कोणची वृत्ती नसुन तुझ्यातला आडमुठेपणा त्याला कारणीभूत असु शकेल याबद्द्ल कधि अगदी तटस्थ विचार करुन बघितलास का? जसं तुला इतरांच्या विचारात घोळ दिसतो तसाच इतरांना तुझ्यात घोळ दिसत असेल हे पारखुन पाहणार आहेस का? किंबहुना या सगळ्या उपद्व्यापाला आपल्यातला काहि घोळ तर कारणीभूत नाहि ना असा विचार करुन बघितलास का? वैचारीक सिद्धांत, अनुभवसिद्ध गृहितकं हे जसे तुला तुझे पक्की, स्वच्छ वाटतात तसे इतरांचे देखील असु शकतात हि शक्यता स्विकारण्यात तुला प्रॉब्लेम येतोय हि गोष्ट तुझ्या ध्यानात येतेय का? वैचारीक, सैद्धांतीक वेगळेपण आदरणीय असतं, त्याला भोंगळपणाच्या अक्षता लावणे म्हणजे मानवी विचारशक्तीचा अपमान आहे हे स्विकारण्यास कधि तयार होणार आहेस तु? तुझ्या शब्दांवर, वाक्यांवर, धाग्यांवर जि हीट निर्माण होते त्याला तुझे शब्द, वाक्य, विचार, धारणा (देखील) कारणीभूत असु शकतात याचा नीर-क्षीर विवेक दाखवायच्या मनस्थितीत तु येणार आहेस का?

असो. तुमचे प्रश्न जसे असतील त्याच टाईपचे उत्तरं माझ्याकडुन येतील... तो माझ्या मनाच्या धारणेचा प्रॉब्लेम समजा.

अर्धवटराव

"ईश्वर हे मूळतत्व आहे" या वाक्यार्थ मी "घडवण्याची क्षमता"

अस्तित्वाच्या निर्मितीसाठी कुणाही घडवणार्‍याची आवशयकता नाही हाच तर मुद्दा आहे.

बाकी माझ्या पोस्टवर वैयक्तिक प्रतिसाद येण्याचं उघड कारण लोकांच्या धारणा प्रश्नांकित होणं आहे. इथेच पाहा, जिल्बी वगैरे सुरुवात झालीच होती. पण एकतर स्टीफन म्हणतोय आणि गवि क्वोट करतोय म्हटल्यावर नाईलाज झाला इतकंच.

अर्धवटराव's picture

26 Jul 2013 - 1:41 am | अर्धवटराव

नेमक्या कशाबद्द्ल नव्या-जुन्याच्या संदर्भाबद्द्ल प्रश्न उपस्थीत होतोय? ईश्वरी व्यवस्थेला स्विकारणारे/नाकारणारे विचार देखील फार नवीन आहेत काय? तुम्ही किंवा स्टीफन काय नवीन सांगताहात? आणि ठिकाणी तर्क चालवायला काळाच्या संदर्भाची कुठे आवश्यकता भासतेय?

>>अस्तित्वाच्या निर्मितीसाठी कुणाही घडवणार्‍याची आवशयकता नाही हाच तर मुद्दा आहे.
-- माझ्या तर्कानुसार निर्मीती आणि घडण या एकाच कोटीच्या क्रिया आहेत व त्यातली जाणिवपूर्वकता कर्त्या एलिमेण्टचं प्रूफ आहे. अन्यथा निर्मीती निर्मीती नाहि आणि घडण घडण नाहि.

>>बाकी माझ्या पोस्टवर वैयक्तिक प्रतिसाद येण्याचं उघड कारण लोकांच्या धारणा प्रश्नांकित होणं आहे.
-- नाहि. धारणा प्रश्नांकीत झाल्या तर प्रतिसाद धारणेसंदर्भात येतील. वैयक्तीक प्रतिसाद येण्याचं कारण त्याची सुरुवात तुम्ही करता (कसं ते अगोदरच्या प्रतिसादात दिलं आहे)

>>इथेच पाहा, जिल्बी वगैरे सुरुवात झालीच होती. पण एकतर स्टीफन म्हणतोय आणि गवि क्वोट करतोय म्हटल्यावर नाईलाज झाला इतकंच.
-- (त्याचं कारण प्रतिसादकांना गवी सेन्सीबल वाटतो म्हणुन... असो...) मी प्रातिनीधीक उत्तर देऊ इच्छीत नाहि. वैयक्तीक उत्तर म्हणाल तर तो तुमचा गैरसमज आहे एव्हढच सध्या म्हणेन.

अर्धवटराव

रामपुरी's picture

26 Jul 2013 - 2:08 am | रामपुरी

अर्धवटरावांच्या खालील प्रश्नांची उत्तरे काय असतील याची (उत्तरे मिळणार नाहीत याची खात्री असूनही) उत्सुकता आहे. चालू द्या.....

"इतक्या सार्‍या चर्चांमधे तुला इतकी सारे निगेटीव्ह रीमर्क मिळाले... त्यात सदैव तुला ठोकुन काढायची कोणची वृत्ती नसुन तुझ्यातला आडमुठेपणा त्याला कारणीभूत असु शकेल याबद्द्ल कधि अगदी तटस्थ विचार करुन बघितलास का? जसं तुला इतरांच्या विचारात घोळ दिसतो तसाच इतरांना तुझ्यात घोळ दिसत असेल हे पारखुन पाहणार आहेस का? किंबहुना या सगळ्या उपद्व्यापाला आपल्यातला काहि घोळ तर कारणीभूत नाहि ना असा विचार करुन बघितलास का? वैचारीक सिद्धांत, अनुभवसिद्ध गृहितकं हे जसे तुला तुझे पक्की, स्वच्छ वाटतात तसे इतरांचे देखील असु शकतात हि शक्यता स्विकारण्यात तुला प्रॉब्लेम येतोय हि गोष्ट तुझ्या ध्यानात येतेय का? वैचारीक, सैद्धांतीक वेगळेपण आदरणीय असतं, त्याला भोंगळपणाच्या अक्षता लावणे म्हणजे मानवी विचारशक्तीचा अपमान आहे हे स्विकारण्यास कधि तयार होणार आहेस तु? तुझ्या शब्दांवर, वाक्यांवर, धाग्यांवर जि हीट निर्माण होते त्याला तुझे शब्द, वाक्य, विचार, धारणा (देखील) कारणीभूत असु शकतात याचा नीर-क्षीर विवेक दाखवायच्या मनस्थितीत तु येणार आहेस का"

तुम्ही आधी जे लिहीता त्याचं पुढच्या प्रतिसादात विस्मरण होतं असा प्रकार आहे. सुरुवातीला तुम्हाला स्टीफनशी चर्चा करायची होती आणि आता `नवीन काय'? विचारतायं!

तुमचा पहिला स्टँड :
>ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो.

नंतर बदलेला स्टँड :
>"ईश्वर हे मूळतत्व आहे" या वाक्यार्थ मी "घडवण्याची क्षमता"

आताचा नवा स्टँड :

>माझ्या तर्कानुसार निर्मीती आणि घडण या एकाच कोटीच्या क्रिया आहेत व त्यातली जाणिवपूर्वकता कर्त्या एलिमेण्टचं प्रूफ आहे. अन्यथा निर्मीती निर्मीती नाहि आणि घडण घडण नाहि.

= थोडक्यात `जाणिवपूर्वकता नसेल तर (अन्यथा) निर्मीती निर्मीती नाहि आणि घडण घडण नाहि.'

अस्तित्व समोर आहे, प्रकट आहे त्याचा जाणीवपूर्वकतेशी काहीही संबंध नाही. ते नाकराणं म्हणजे .... जाऊं द्या.

आता जाणीवपूर्वकता कोणाची? (तुमचा नवीन प्रश्न!) तर जाणीव स्वयेच आहे तिला `कोणाच्या असण्याची' आवश्यकता नाही. हा माझा (आणि स्टीफनचा) दावा आहे.

एकतर तुम्हाला नक्की काय स्टँड घ्यावा हे कळत नाही आणि स्वतःचा गोंधळ असून `नवा मुद्दा' मांडल्याचा अविर्भाव आहे. त्यातही कहर म्हणजे तुम्ही प्रश्न विचारतायं आणि तुम्हाला वाटतंय उत्तर देताय! मी तुम्हाला एक ही प्रश्न विचारलेला नाही याचं स्मरण असू द्या.

बाय द वे, तुम्ही माझ्या गैरसमजाची काळजी सोडा कारण गविनंच माझ्या आधीच्या पोस्टवर

आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय.

म्हटलंय.

अर्धवटराव's picture

26 Jul 2013 - 7:49 pm | अर्धवटराव

असंबद्ध प्रतिसाद देण्याची जी अपेक्षापूर्ती तुम्ही करताय तेव्हढी दिग्गीराज देखील करत नाहि. परत आभारी आहे.

>>तुम्ही आधी जे लिहीता त्याचं पुढच्या प्रतिसादात विस्मरण होतं असा प्रकार आहे. सुरुवातीला तुम्हाला स्टीफनशी चर्चा करायची होती आणि आता `नवीन काय'? विचारतायं!
--> माझ्या प्रतिसादातलं नाविन्य काय हे तुम्ही विचारलं. त्यावर, या चर्चेत मुद्द्यांच्या बाबतीत कुठलच नाविन्य नाहि, व त्याची गरजही नाहि, इतका सरळ प्रतिसाद तुम्हाला कळला नाहि... कारण एकच... विचार करण्याचा कंटाळा.

>>तुमचा पहिला स्टँड :...नंतर बदलेला स्टँड :...आताचा नवा स्टँड :
--> मी एका तर्क"शृंखले"बद्दल बोलतोय हे तुम्हाला कळले नसेलच... कारण तेच... विचार करण्याचा कंटाळा.

>>अस्तित्व समोर आहे, प्रकट आहे त्याचा जाणीवपूर्वकतेशी काहीही संबंध नाही. ते नाकराणं म्हणजे .... जाऊं द्या.
--> अस्तित्वाच्या कार्याचा त्याच्या जाणिवपूर्वकतेशी संबंध नाहि... ह्म्म्म... बरं चाललय.

>>आता जाणीवपूर्वकता कोणाची? (तुमचा नवीन प्रश्न!) तर जाणीव स्वयेच आहे तिला `कोणाच्या असण्याची' आवश्यकता नाही. हा माझा (आणि स्टीफनचा) दावा आहे.
--> स्टीफनचा असा दावा असणं जवळ्जवळ अशक्य आहे... कारण त्याला मराठी येत नाहि. असलच, तर त्याला जाणिवपूर्वकता (इंटेन्शन) आणि जाणिव (सेन्सेशन) यातला फरक नक्की कळेल. स्टीफन तर्काने बोलतो हो... त्याला प्लीज आपल्या लायनीत बसवु नका... कशाला बाटवताय त्याला.

>>एकतर तुम्हाला नक्की काय स्टँड घ्यावा हे कळत नाही आणि स्वतःचा गोंधळ असून `नवा मुद्दा' मांडल्याचा अविर्भाव आहे. त्यातही कहर म्हणजे तुम्ही प्रश्न विचारतायं आणि तुम्हाला वाटतंय उत्तर देताय! मी तुम्हाला एक ही प्रश्न विचारलेला नाही याचं स्मरण असू द्या.
--> आले न्यानधीश महोदय मूळपदावर. अपेक्षेप्रमाणे फार काहि वेळ लागला नाहि. विचार करण्याशी फारकत घेतल्यावर बाकी काम काय उरतं म्हणा... उबवा न्यायधीश खुर्ची.

>>बाय द वे, तुम्ही माझ्या गैरसमजाची काळजी सोडा कारण गविनंच...
--> आम्हाला हौस आहे हो... शिवाय गवीने तुमची (काहिश्या सौम्य शब्दात) कान उघडणी केली हे ही तुम्ही "जाणिवपूर्वक" समजायचं नाकारलं असेलच... वाटलच होतं. कारण एकच... विचार करण्याशी तुम्ही संबंधच तोडले ना.

अर्धवटराव

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 4:29 pm | अनिरुद्ध प

कलि पुरुष असे म्हणायचे असेल.

> बाहेर आहोत, चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.

= चला, कुठे नेताय? तुम्हाला माहितीये का अ‍ॅड्रेस नक्की?

> मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे, जेणे करून शंका समाधान होईल.

= उच्चकोटीची साधना म्हणजे नक्की काय करायच?

चौकटराजा's picture

24 Jul 2013 - 2:29 pm | चौकटराजा

परमेश्वराचा याड्रेस लई सोपा आहे. तो पिडात आहे ब्रह्मांडातही आहे. ( ही भाषा क्लिष्ट वाटत असेल तर.... आपल्या आत ही आहे व बाहेरच्या जगातही.).

परमेशाचा शोध कसा घ्यावा याचा संभ्रम पडण्याचे कारण काय बॉ... ?
मला तो सापडलेला आहे. काही अवघड नाहीये त्यात !

विटेकर's picture

24 Jul 2013 - 2:54 pm | विटेकर

तो पिडात आहे ब्रह्मांडातही आहे

शत-प्रतिशत सहमत.

मूकवाचक's picture

26 Jul 2013 - 10:18 pm | मूकवाचक

देवाचा पत्ता -

जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि मध्यांत
नित्य राहतो आत्म-रूप मी सर्वांच्या हृदयात
(भावार्थ गीता १०.२०)

देवाचा शोध घ्यायचा एक मार्ग:

मद्विभूती ह्या ओळखावया सामान्य अशी खूण
सांगेन तुजसी जेणे मजसी जाणशील संपूर्ण

असे वस्तु जी उदात्त अथवा वैभवशाली येथ
अंश निश्चिती मत्तेजाचा ती ती जाण यथार्थ!

अथवा पार्था, कशासि आता बहु-विभूती-ज्ञान
असे व्यापिले जग हे सगळे मी एकांशे जाण
(भावार्थ गीता १०.४१-४२)

हे सर्व देव शोधणे किंवा गुरु शोधणे आणि मानणे म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं "उत्तर" नसून न सुटणार्‍या अनेक प्रश्नांना एका सिंगल प्रश्नात ट्रान्सफर करण्यातला प्रकार आहे.

सतरा बँकांची कर्जे उचलून बेक्कार अवस्थेत अडकल्यावर एकच बेलआउट पॅकेज म्हणून एका सिंगल बँकेकडून सर्व लोन्स एकगठ्ठा टेकओव्हर करवून घेऊन एकच मोठे लोन तयार करावे आणि सतरा छोट्या लोन्समधून सुटका करुन घेतल्याचं समाधान मिळवल्यासारखा भास व्हावा तशातला प्रकार.

अनिरुद्ध प's picture

24 Jul 2013 - 2:02 pm | अनिरुद्ध प

सध्यातरि ईतकेच.

ठीक आहे. "सतरा ठिकाणाहून कर्जे उचलून बेक्कार स्थितीत अडकल्यावर बेलआउट पॅकेज म्हणून" हा निगेटिव्ह आणि काहीसा छद्मी वाटणारा भाग मागे घेऊन माझं बाकीचं विधान तसंच ठेवतो.

भले त्यात काही कमीपणा नसेल किंवा दुरित उद्देश नसेल, पण स्टीफन हॉकिंग्जच्या "द ग्रँड डिझाईन"मधे आलेल्या उल्लेखानुसार देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे. स्टीफन हॉकिंग्जने म्हटलं म्हणजे मग ती एकदम काळ्या दगडावरची रेघ, अशा अर्थाने हा उल्लेख करत नाहीये, पण वाचून पटलं म्हणून.

जरा कळफलक थरथरतोयच..

देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे.

खरे तर आपल्याला कुठल्याच प्रश्नाच उत्तर मिळत नसते .. प्रत्येकवेळी प्रश्न स्थलांतरीत होत असतो ,तेव्हा तो "आपल्यापुरता" सुटलेला असतो. तो जात कुठेच नाही !
आपल्याला नोकरी लागली म्हणजे जगातील बेकारी संपली असे होत नाही. आपले पोट भरले म्हणजे जगातील उपासमार संपली असे होत नाही. प्रश्न सुटणे हे सापेक्ष आहे !
"देव " या संकल्पनेने " माझे" प्रश्न सुटत असतील तर बिघडले कुठे ? शेवटी विश्वाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाच आहे ना?
आणि ज्याला मुळापर्यंत जायचेच आहे , त्याला ज्ञानाचे भांडार खुले आहे, घ्यावा शोध ! एका त्या अंतिम सत्याशिवाय सारी सत्ये देखील सापेक्षच आहेत. म्हणजे मी इथे उभा आहे , पण ते झाले अर्ध सत्य , खरे म्हणजे मी या इमारतीत उभा आहे ,,.. ते देखील अर्ध सत्य .. मी पृथ्वी वर उभा.. पण मी उभा कोठ आहे.. मी तर फिरतोय .. पृथ्वी बरोबर .. पण ते देखील फिरतेच आहे ...सुर्याभोवती ! त्यापुढचे मला अज्ञात आहे .. मला तरी! मग मी पूर्ण सत्य सांगतो आहे का ?

जरा कळफलक थरथरतोयच..

बस का मालक..!!? ;) भलतेच अतिशयोक्त हां..

तुमच्या प्रतिसादात तुम्ही योग्य तेच म्हटलं आहे. पण हे काय?

"देव " या संकल्पनेने " माझे" प्रश्न सुटत असतील तर बिघडले कुठे ? शेवटी विश्वाचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाच आहे ना?

आधीचं सगळं कळत असूनही बुद्ध्याच देवाविषयी गृहीतकं मानण्यात काय सार्थता आहे?

मी तर इतकंच म्हणत होतो की प्रश्नाचं उत्तर मिळत नाही हे माहीत असूनही तो ट्रान्सफर करुन जणू उत्तर मिळालंच असा आभास निर्माण करण्याची जाणूनबुजून काय गरज आहे. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी कोणतीतरी एक आभासात्मक गाठ मारुन टाका बंद केलाच पाहिजे का? राहीना का प्रश्न शिल्लक..

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 5:20 pm | अग्निकोल्हा

राहीना का प्रश्न शिल्लक..

म्हणून तर जग चालु आहे... प्रश्न शिल्लकच (ठेवलेले) असतात जोपर्यंत त्याचि तिव्रता त्रास देत नाही.

गविंना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्याचा आगाऊपणा करावा की नाही याबद्दल संभ्रमात होतो. शेवटी राहवलं नाही म्हणून हा प्रतिसाद:

भगवंताचा अनुभव अन्‌ जाणीव सापेक्ष असल्यानं त्यावर माझ्या अनुभवाविषयी अधिक काय बोलू? सध्या असे गृहित धरू की मला भगवंत असल्याचा स्वानुभव नाही. :)
पण काही व्यक्ती ज्यांच्यावर मी विश्वास ठेवतो, त्यांच्या अनुभवानुसार भगवंत आहे [त्याला नाव काहीही द्या] आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला घेता येऊ शकतो.
त्यामुळे आता प्रश्न मुळात असा येतो की मी ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, तो का ठेवतो?
त्या व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याजोगं पुरेसं कारण मला आढळत नाही, म्हणून मी विश्वास ठेवतो.
आता एकदा विश्वास/श्रद्धा हा प्रकार आला कि साधारण वैज्ञानिक दृष्ट्या मी मूर्ख ठरतो, तो भाग निराळा. पण जोवर मी दुसर्‍या कुणावर माझे मत लादण्याचा प्रयत्न करत नाही तोवर माझं मत योग्य वा अयोग्य यावर खल करण्याचा प्रश्न उद्भवणारच नाही, नाही का?

सुधीर's picture

25 Jul 2013 - 9:10 am | सुधीर

प्रतिसाद आवडला

संजय क्षीरसागर's picture

24 Jul 2013 - 7:10 pm | संजय क्षीरसागर

दॅट्स द पॉइंट! प्रश्न निरुत्तरित ठेऊन शांतता कुठे? द इश्युज किप पॉपींग अप इन द माइंड आणि सतत लक्ष वेधून घेतात.

>स्टीफन हॉकिंग्जच्या "द ग्रँड डिझाईन"मधे आलेल्या उल्लेखानुसार देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे.

एकदम सही! खरं तर तो `खोटा दिलासा' आहे. प्रश्न सुटत नाहीत फक्त `भासात्मक समाधान' मिळतं (ठेविले अनंते... चित्ती असू द्यावे समाधान!)

अर्थात, तू स्टीफन हॉकिंग्जचा दाखला दिलायंस म्हणून पब्लिक तुटून पडणार नाही. पण `देव ही कल्पना आहे' असं सरळ म्हटल्यावर मूळ धारणेला शह बसतो, एकदम निराधार वाटायला लागतं आणि प्रतिसादांचा कल्लोळ उठतो!

अर्धवटराव's picture

24 Jul 2013 - 9:49 pm | अर्धवटराव

देवाला संकल्पना म्हणुन गृहीत धरलं तर प्रश्न कधिच संपणार नाहित कारण बेसीक असप्शनच एक "कल्पना" म्हणुन ठरवुन टाकण्यात आलं आहे.
ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो.
पण बेसीक प्रश्न तो देखील नाहि... बेसीक प्रश्न हा आहे कि खरच आपल्याला या मूलतत्व वगैरे शोधायच्या भानगडीत पडायचं आहे काय? आपण या यात्रेत हौसे,गौसे,नवसे बनुन सामील झालो आहोत, तेंव्हा आपापल्या भुमीकेशी प्रामाणीक राहणं उत्तम.

स्टीफन हॉकिन्ग्स साहेबांचे मुद्दे फार विचार प्रवर्तक आहेत व तर्काच्या आधारे त्यावर उत्तम चर्चा करता येते. पण पोथीनिष्ठ वृत्ती इथेही आडवी येते. स्टीफनचं नाव घ्यायचं पण आपली तर्कविसंगत विचारसरणी लावुन धरायची खोड आणि पोथीनिष्ठांची अंधश्रद्ध ओरड सारख्याच मापाच्या असतात.

अर्धवटराव

>ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो.

= हा अत्यंत भोंगळ आणि चोथा झालेला मुद्दा आहे. याचा अर्थ `तो' सगळं घडवतो पण `त्याला' कुणी घडवलेला नाही. भावभोळ्या लोकांसाठी ही कल्पना म्हणूनच ठीक आहे.

>स्टीफन हॉकिन्ग्स साहेबांचे मुद्दे फार विचार प्रवर्तक आहेत व तर्काच्या आधारे त्यावर उत्तम चर्चा करता येते?

= कोणता मुद्दा आहे तुमच्याकडे स्टीफन हॉकिंग्जच्या स्टेटमंटवर? त्यानं तर उघड म्हटलंय "देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे"

आणि भक्तांनी तर विज्ञानाच्या नादी लागणं बरं कारण कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन मुख्य निकष आहेत. ईश्वर त्या निकषांवर सिद्ध होणं अशक्य आहे.

अग्निकोल्हा's picture

25 Jul 2013 - 4:18 am | अग्निकोल्हा

.

अर्धवटराव's picture

25 Jul 2013 - 8:10 am | अर्धवटराव

= हा अत्यंत भोंगळ आणि चोथा झालेला मुद्दा आहे.
--> एखादी गोष्ट तुम्हाला कळत नसेल तर त्यावर विचार करणे हा साधा उपाय आहे. त्यापेक्षा तिला भोंगळ वगैरे म्हणुन सोडुन देणे हा जरा जास्त सोपा उपाय आहे. असो. विचार करण्याचा कंटाळा करणे हि देखील मनाची धारणा आहे.

>> याचा अर्थ `तो' सगळं घडवतो पण `त्याला' कुणी घडवलेला नाही. भावभोळ्या लोकांसाठी ही कल्पना म्हणूनच ठीक आहे.
-- अच्छा. म्हणजे मनुष्यात एकतर काहि "घडवण्याची" क्षमताच नाहि, आणि असेल तर अपघाताने आलि व अपघातानेच विरुन जाईल नाहि का? पण आमच्या विज्ञानाला "अपघात" मंजुर नाहि ना... त्याला कार्य-कारण भाव समजतो. अर्थात, कार्य-कारण हा मनाचा एक भोळाभाव असेल तर तसच सही. तसंही, मनाला मनानेच नाकारुन मनाचा ऐच्छीक कंट्रोल करणारं तत्वज्ञान देखील तर्कसंगत नाहि... पण तसं मानणारे जगात आहेतच ना.

>>= कोणता मुद्दा आहे तुमच्याकडे स्टीफन हॉकिंग्जच्या स्टेटमंटवर? त्यानं तर उघड म्हटलंय "देव ही कल्पना मानणे म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे"
-- त्याचच उत्तर दिलय ना वर, कि देव कि कल्पना मानलं तर प्रश्न केवळ ट्रान्स्फर होईल व ते म्हणजे मूळतत्व आहे हे उमगलं तर प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकतर "घडवण्याची" क्षमता नावाचा प्रकारच नाहि, असलाच तो सदा-सर्वदा विद्यमान आहे, इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ मनुष्याचं एक्झीस्ट्न्स... अशा बर्‍याचश्या मुद्द्यांवर स्टीफन साहेबांशी चर्चा करता येईल... स्टीफन साहेब याविषयी काहि चिंतन करतील काय हे ठाऊक नाहि, पण मनाबाहेरुन कोणि मनाला "ऐच्छीक" कंट्रोल करतं या विनोदावर ते प्रचंड हसतील हे नक्की.

>>आणि भक्तांनी तर विज्ञानाच्या नादी लागणं बरं
-- बरोब्बर. भक्तांनी विज्ञानाच्या नादी लागणं मस्ट आहे... कारण विज्ञान म्हटलं कि विचार करण्यावाचुन पर्याय नाहि. पण असे लोक जे "जगतात किंवा विचार करतात" त्यांनी कशाच्या नादी लागावं बरं? कारण ज्याला विचार करण्याचच वावडं आहे त्याने विज्ञानाच्या मागे लागुन काहि फायदाच नाहि.

>>कारण कोणतंही वैज्ञानिक सत्य सिद्ध करायला : १) निर्वैयक्तिकता २) स्थल-काल निरपेक्षितता आणि ३) वारंवारिता हे तीन मुख्य निकष आहेत. ईश्वर त्या निकषांवर सिद्ध होणं अशक्य आहे.
-- आता कसं बोललात... संजय क्षीरसागर ( व अर्धवटराव देखील) आयडी धारण करणारे व्यक्ती १) निर्वैयक्तीक नाहित २) स्थल-काल निरपेक्ष नाहित ३) त्यांच्या माय बापांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची वारंवारीता शक्य नाहित. म्हणजे एकतर तुम्ही-आम्हि अस्तित्वात नाहि किंवा मग विज्ञान खोटं पडलं म्हणा कि.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

25 Jul 2013 - 9:10 am | संजय क्षीरसागर

>याचा अर्थ `तो' सगळं घडवतो पण `त्याला' कुणी घडवलेला नाही. भावभोळ्या लोकांसाठी ही कल्पना म्हणून ठीक आहे.

हा तुमचा विशद मुद्दा केला आहे! कारण हे तुमचं म्हणणं आहे :
>ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो.

पुढे तर काय वाट्टेल ते ठोकलंय :

>अच्छा. म्हणजे मनुष्यात एकतर काहि "घडवण्याची" क्षमताच नाहि, आणि असेल तर अपघाताने आलि व अपघातानेच विरुन जाईल नाहि का? पण आमच्या विज्ञानाला "अपघात" मंजुर नाहि ना.....

= मनुष्यात घडवण्याची क्षमता नाही हा अर्थ कुठून काढला? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या तुमच्या विधानावर तुम्हाला सुसंगत प्रतिवाद करायचा आहे.

आणि "आमच्या विज्ञानाला?" कुठे खेटताय? स्टीफन देव साफ नाकारतो. तो वैज्ञानिक असल्यानं कार्यकारणाचा शोध घेतो. "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" असल्या भोंगळ धारणा असल्या की कार्यकारणाचा संबंधच नाही! तुमचा देवंच मूळ कारण झाला, विषय संपला.

>त्याचच उत्तर दिलय ना वर, कि देव कि कल्पना मानलं तर प्रश्न केवळ ट्रान्स्फर होईल व ते म्हणजे मूळतत्व आहे हे उमगलं तर प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकतर "घडवण्याची" क्षमता नावाचा प्रकारच नाहि, असलाच तो सदा-सर्वदा विद्यमान आहे, इर्रेस्पेक्टीव्ह ऑफ मनुष्याचं एक्झीस्ट्न्स... अशा बर्‍याचश्या मुद्द्यांवर स्टीफन साहेबांशी चर्चा करता येईल.

= तुम्ही काय लिहीलंय ते कळतंय का ते प्रथम पाहा, स्टीफनशी कशावर चर्चा करणार?

त्याचं म्हणणं तर स्पष्ट आहे "देव ही कल्पना मानणे! (म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे)" तुम्हाला तो उभं देखील करेल की नाही शंका आहे.

>मनाबाहेरुन कोणि मनाला "ऐच्छीक" कंट्रोल करतं या विनोदावर ते प्रचंड हसतील हे नक्की.

= येस! मनाला ऐच्छिक करण्यासाठी सुसंगत वैचारिक क्षमता लागते... आणि

"ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या भक्तीमार्गीयांच्या `महान कल्पनेवर' तुम्ही स्टीफनशी चर्चा करणार हा तर या शतकातला सर्वात मोठा विनोद होईल.

>आणि भक्तांनी तर विज्ञानाच्या नादी लागणं बरं

"......कारण ज्याला विचार करण्याचच वावडं आहे त्याने विज्ञानाच्या मागे लागुन काहि फायदाच नाहि."

काय विचार आहे तुमच्याकडे? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" हा विचार नाही धारणा आहे.

>आता कसं बोललात... संजय क्षीरसागर ( व अर्धवटराव देखील) आयडी धारण करणारे व्यक्ती १) निर्वैयक्तीक नाहित २) स्थल-काल निरपेक्ष नाहित ३) त्यांच्या माय बापांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांची वारंवारीता शक्य नाहित. म्हणजे एकतर तुम्ही-आम्हि अस्तित्वात नाहि किंवा मग विज्ञान खोटं पडलं म्हणा कि

इतका पोकळ विचार असू शकतो? वैज्ञानिक सत्य म्हणजे व्यक्ती नाही, नियम. उदा. गुरुत्त्वाकर्षण हा नियम आहे, व्यक्ती नाही. एकतर तुम्हाला मुद्देसूद चर्चा करता येत नाही कारण तुम्ही कोणतीही गोष्ट कुठेही जोडता आणि त्यात तुमचे फंडाच इतके गंडलेयत की बोलायची सोय नाही.

माझं लेखन तुम्हाला कळत नाही याचं खरं कारण ते आहे. हा मुद्दा मी आणणार नव्हतो पण माझ्या लेखाचा विषय तुम्ही काढल्यामुळे लिहावं लागलं.

अर्धवटराव's picture

25 Jul 2013 - 11:21 am | अर्धवटराव

तार्कीक प्रतिवाद करता येत नसेल तर सरळ न्यायाधीशाची खुर्ची पकडायची आणि दुसर्‍याला भोंगळ, पराभूत वगैरे ठरवुन मोकळं व्हायचं हे तुमची नेहमीची स्टाईल. त्यालाच अनुसरुन मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.

>>पुढे तर काय वाट्टेल ते ठोकलंय :
-- आले न्यायधीश महोदय. मी अगोदरच म्हटलं होतं... दुसर्‍याचं म्हणणं काय आहे हे जर कळत नसेल तर त्यावर विचार करणं हि साधी पद्धत आहे व त्याला "ठोकुन देणे" सारख्या वाटाण्याच्या अक्षता लावणे हि अत्यंत साधी पद्धत आहे... विचार करायचा कंटाळा आणि काय.

>>"ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या तुमच्या विधानावर तुम्हाला सुसंगत प्रतिवाद करायचा आहे.
-- अर्थात. आणि ते समजुन घेण्याकरता "घडवण्याची क्षमता" हि मनुष्य निर्मीत नाहि तर ति मनुष्याला "मिळाली" आहे हे कळणं आवश्यक आहे. पुढील तर्कसंगतीच्या विश्लेषणाची ति सुरुवात आहे. पण विचार करण्याचं वावडं असेल तर तर्क कसे कळतील?

>>आणि "आमच्या विज्ञानाला?" कुठे खेटताय?
-- विज्ञानालाच खेटतोय, आणखी कुठे. कारण काय ना, आम्हि "विचार करणे किंवा जगणे" करत नाहि, तर विचारपूर्वक जगतो... तसा प्रयत्न करतो म्हणा हवं तर. विज्ञानाला ते कंपल्सरी आहे ना... तिथे विचार न करुन भागत नाहि.

>> स्टीफन देव साफ नाकारतो.
-- हो ना. पण त्याने मनाबाहेरुन मनाला ऐच्छीक कंट्रोल करणारं तत्वज्ञान अगदी मनापासुन स्विकारलं असं ऐकलं कुठेतरी... बाय द वे, स्टीफन "देव" या "कल्पनेला" नाकारतो... कारण धर्मग्रंथ प्रणीत नियमांतर्गत जि़ज्ञासा नाकारणारी दैवी व्यवस्था त्याला अस्वस्थ करते. मूलतत्वाच्या शोधात स्टीफनचे मन देखील धावत असतं (सृष्टीचा आरंभ बिंदु मानला जाणारं बीग बँग याच मूलतत्वाच्या शोधाची अभिव्यक्ती आहे) आणि त्याकरता तो आपल्या मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती वापरतो. विचार करण्यात कंजुसपणा त्याला खपत नसावा.
>> तो वैज्ञानिक असल्यानं कार्यकारणाचा शोध घेतो.
-- हो तर. आणि त्याकरता त्याला विचार करावा लागतो. आणि गंमत म्हणजे जो जगतो देखील... भन्नाट आहे ना तो??
>> "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" असल्या भोंगळ धारणा असल्या की कार्यकारणाचा संबंधच नाही!
तुमचा देवंच मूळ कारण झाला, विषय संपला.
-- विचार करायचा कंटाळा असला तर तसंही कार्यकारण वगैरे शब्दांचा काहि अर्थ उरत नाहि. आपल्या करता एखादा विषय संपला तरी दुसर्‍यकरता ति एक वैचारीक श्रुंखला असेल हे उमगायला थोडा कॉमनसेन्स लागतो. तिथेही कंजुशी केली कि मग दुसर्‍यांना भोंगळ वगैरे ठरवुन आपण न्यायधिशाची खुर्ची उबवायला मोकळे... झकास.

>>= तुम्ही काय लिहीलंय ते कळतंय का ते प्रथम पाहा, स्टीफनशी कशावर चर्चा करणार?
-- यंदा तुम्हाला चान्स दिला विचार करायचा. नेहमीप्रमाणे तुम्ही तो घालवला... असो आश्चर्य नाहि वाटत आता. राहिला मुद्दा स्टीफनशी चर्चा करायचा, तर बातोबातोमे विषय रंगेलच.
>>त्याचं म्हणणं तर स्पष्ट आहे "देव ही कल्पना मानणे! (म्हणजे प्रश्नाचं उत्तर नसून प्रश्न ट्रान्स्फर करणं आहे)" तुम्हाला तो उभं देखील करेल की नाही शंका आहे.
-- आपण स्टीफनला मनाच्याबाहेरुन ऐच्छीक कंट्रोल करायचे क्लासेस देऊन आले वाटतं. आपल्याला कुठे उभं केलं त्याने?

>>= येस! मनाला ऐच्छिक करण्यासाठी सुसंगत वैचारिक क्षमता लागते...
-- "क्षमता" ऐवजी "तिलांजली" म्हणायचं असेल तुम्हाला.

>>"ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" या भक्तीमार्गीयांच्या `महान कल्पनेवर' तुम्ही स्टीफनशी चर्चा करणार हा तर या शतकातला सर्वात मोठा विनोद होईल.
-- हम्म्म... आता तुम्ही कॉमेडी सर्कस मिपावर चालवलीच आहे... तेंव्हा आम्हालाही थोडं स्फुरण चढलं...

>>काय विचार आहे तुमच्याकडे? "ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे" हा विचार नाही धारणा आहे.
-- तुमच्या करता असेल ना ति धारणा... आम्हि कुठे नाहि म्हणतोय?? पण आमच्या करता तो एक विचार आहे... आता एव्हढं स्वातंत्र्य तरी घेऊ देत कि.

>>वैज्ञानिक सत्य म्हणजे व्यक्ती नाही, नियम.
-- अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. आम्हाला वाटायचं कि वैज्ञानीक सत्य म्हणजे कार्यकारण पद्धतीनं दिलेले एक्सप्लनेशन. चला. आणखी एक व्याख्या मिळाली. पण आम्हि या व्याख्येवर विचार करु... एकदम तुम्हाला भोंगळ वगैरे म्हणणार नाहि.

>>उदा. गुरुत्त्वाकर्षण हा नियम आहे, व्यक्ती नाही.
-- धत तेरे कि. गुरुत्वाकर्षण म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं बल, ज्याचं कार्यकारणाने एक्स्प्लनेशन देता येतं, असं वाटायचं मला. तो नियम आहे होय? यावर पण आम्हि विचार करु.

>> एकतर तुम्हाला मुद्देसूद चर्चा करता येत नाही कारण तुम्ही कोणतीही गोष्ट कुठेही जोडता आणि त्यात तुमचे फंडाच इतके गंडलेयत की बोलायची सोय नाही.
-- आता कसं एकदम ओरीजनल तुम्ही बोलल्यासारखं वाटतय :) न्यायधीशमहोदयांचा आवाज कसा खुलुन आलाय, व्वा. अर्थात, आमच्या मुद्द्यांची जोड आणि फोड करायला थोडा विचार करायला लागेल... त्याकरता तुमची तयारीच नाहि म्हटल्यावर आणखी काय एक्सपेक्ट करणार.

>>माझं लेखन तुम्हाला कळत नाही याचं खरं कारण ते आहे. हा मुद्दा मी आणणार नव्हतो पण माझ्या लेखाचा विषय तुम्ही काढल्यामुळे लिहावं लागलं.
-- त्यात तुमची चुक नाहि हो. तुम्ही तुमच्या मनाला हे पटवुन दिलय कि त्याचे मनाबाहेरुन ऐच्छीक कंट्रोलींग होतेय.
स्वतःच्या मनाची इतकी फसगत तुम्ही स्विकारल्यामुळे त्यातल्या विसंगती तुम्हाला दिसणारच नाहित... व इतरांनी त्या
दाखवुन दिल्या तर त्यांना आपले लेखन कळत नाहि हे मनाला पटवुन देण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाहि. इट्स ऑल युअर माईंड ड्युड. मनाची हि बंधन तुम्ही टाळु शकत नाहि. पर्सेप्शन्स ड्राईव्ह यु.

अर्धवटराव

विटेकर's picture

25 Jul 2013 - 3:49 pm | विटेकर

माझा स्टीफन साहेब काय म्हणतात याचाशी कधी संबंध आला नाही. पण ढोबळपणाने हिंदू मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा मी वाचलेला भाग पुढीलप्रमाणे...
अगोदर अगदी निश्चळ निर्विकार होते,, त्यामध्ये हलचाल झाली ( का? माहीत नाही) त्याला एकोहं बहुस्याम व्हावे वाट्ले.. त्यातून मूळ मायेची निर्मिती - तिथूनच प्रकृती किंवा गुणक्षोभिणी- त्यातून अष्ट्धा प्रकॄती ( त्रिगुण +पंचमहाभूते ) --त्यातून पुढची जीवसृष्टी .चारी खाणी चौर्यांशी लक्ष जीव योनी...

आणि शेवटी महाप्रलयानंतर हे सारे उलट्या क्रमाने नष्ट हो़ईल.
जे शिल्लक राहील ते परब्र्ह्म.. तोच् खरा ईश्वर / खरा देव / थोरला देव / परमात्मा ! जो विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी होता आनि विनाशानंतर ही असणार आहे ! आणि सारे विश्व व्यापून आहे.
ही सारी मायिक जीव सृष्टी ज्या जाणीवेमुळे चालते .. ती जगज्जोती ही त्या परमात्म्याचा ( अविनाशी तत्व) अंश आहे. तोच आपला अथबा जीवांचा अंतरात्मा !
.. बाकी सारे नाश पावणार आहे.
( यामध्ये विविध पंथांच्या मान्यतेनुसार किरकोळ भेद आहेत. वरिल सांगणे सांख्य मतांप्रमाणे आहे. )

कवितानागेश's picture

25 Jul 2013 - 3:59 pm | कवितानागेश

अरे बाप्रे!!!

प्रभाकर पेठकर's picture

25 Jul 2013 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर

अरे बाप्रे!!!

लगेच एवढ्यात काही होत नाही. घाबरू आणि घाबरवू नका.

मदनबाण's picture

25 Jul 2013 - 5:01 pm | मदनबाण

अरे बाप्रे!!!
माउने मजबुत बटर हादडुन बमचिक बमचिक केल्यामुळे सध्या लांडगा मागे लागलेला दिसतोय ! ;)

(बोका) ;)

मालोजीराव's picture

26 Jul 2013 - 4:08 pm | मालोजीराव

एकझाक्ट तारीख मिळाली असती तर बरं झालं असत…लय कामं पेंडिंग हायेत :P ;)

अनिरुद्ध प's picture

25 Jul 2013 - 5:10 pm | अनिरुद्ध प

माऊ ईतकी घाबरुन जावु नकोस कि अध्यात्मावरुन ईसापनीतिवर उडि मारु नकोस,हे सर्व होण्यासाठी लाखो कोटी वर्ष जावे लागतात,अशी किति युग येवुन जतिल याची काही कल्पना नाही,कारण आपले वारकर्याचे दैवत गेली २८ युगे भक्तान्साठी ठाम उभे आहे,वीटेकर काका बरोबर ना?

विटेकर's picture

25 Jul 2013 - 9:57 pm | विटेकर

येस... यू आर म्हणिंग राईट्ट !
"Nimesh" is the time it takes to blink an eye. This is the smallest unit of time (similar to seconds).
Fifteen Nimesh add up to one "Kashth". Thirty Kashth's equal a "Kaal", and thirty Kaal's make a
"Muhurt". Thirty Muhurt's sum up to a "Ahoratr". One Ahoratr constitutes a day.
Thus there are thirty Muhurts in a day (or in one Ahoratr) – fifteen each for day and night. A God
Ahoratr (day) equals one man year. The first six man months- when Gods have their first half of a
day is called "Uttar Yaan" and the next six man months - when Gods have their night is called
"Dakshin Yaan".
Three hundred and sixty human years equal one God year. Thus 12,000 God years equal
4,320,000 man years. This is a "Maha Yug".
There are four major Yugas or periods/eras. Satya Yug, Tret Yug, Dvapar Yug and Kali Yug.
Satya Yug lasts 1,440,000 man years; Tret Yug for 1,080,000 ; Dwapar Yug for 720, 000 and Kali
Yug for 360,000 man years. In addition ,there are other time periods between these four Yugas.
These periods are referred to as "Sandhyamsh" and they last for 720, 000 man years. Adding up
the four Yugas and the Sandhyamsh we get a total of 4,320,000 man years or a Maha Yuga.
One "Manvantr" equals seventy one Mahayugas. Thus there are
296,720,000 man years in a Manvantr. One "Kalp" equals a thousand Mahayugas. Thus there are
4,320,000,000 man years in a Kalp. One Kalp corresponds to one Brahma day ! Thus there are
8,640,000,000 man years in one day/night of Brahma. Between the time he opens his eyes- to start
all over again. Time between creation and destruction.
That is a count of 8.64 billion years !! (साभार - संजीव त्रिगुणी आणि के. रवि, ड्ल्लास )
मराठी करुन टंकायचा कंटाळा आला. क्श्मस्व!

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 2:01 pm | अनिरुद्ध प

हि सगळी माहिती पन्चागात मराठीत लिहीलेली आहे,कदाचित आकडे वेगळे असु शकतिल तपासुन पहावे लागेल.

विटेकर's picture

24 Jul 2013 - 2:13 pm | विटेकर

असा "संपर्क" कुठे करायची खरे म्ह्णजे काही आवश्यकता नाही.
मी कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच त्या ईश्वराच संपर्क होय. बाह्य साधने अथवा गुरु या प्रवासांतील मैलाचे दगड अथवा मार्गदर्शक आहेत ( म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही ), त्यांचे साह्य होतेच होते पण अनुभुती ज्याची त्यानेच घ्यायची आहे. एकदा त्या सार्वभौम शक्तिचाच मी अंश आहे हे जाणले / तशी अनुभुती घेतली की तो संपर्क झाला असेच आहे. मग त्यामध्ये भक्तिमार्ग आहे , ज्ञान मार्ग आहे , कर्ममार्ग आहे पण जाण्याचे ठिकाण एकच आहे.

सत्याची कास; चांगले वागणे
म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?.

अशी व्याख्या धर्माने केली आहे. चांगले वागणे म्हणजे धर्माने वागणे. धर्माने आखून दिलेल्या चौकटीत राहून उपभोग घेणे. त्याचा अतिरेक म्हणजे " ययाती" आणि अशाश्वतता आणि दु: ख !

वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन
दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल,
"पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल.

याचे उत्तर कर्माच्या सिद्धांतात आहे. पापाचा घडा भरणे म्हणजे संचित संपून गेले आहे आणि आता भोगा ! आपण आपल्या समजुतीप्रमाणे निष़्कर्ष काढ्त असतो.प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ मिळते असेच वाईटाचे पण मिळते. कालावधीला आपण आपले परिमाण लावतो म्ह्णून आपल्याला वाटते असे कसे ?

परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय?

परमेश्वर काहीही करत नाही ! तुमचा कर्मांश तुम्हाला फळ देत असतो. तो दयाळु तर अजिबात नाही ! पण तो न्यायी आहे. त्याचेकडे कसलेच कर्तृत्व नाही. मना त्वाचि रे पूर्व संचित केले,तयांसारखे भोगणे प्राप्त झाले !

आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत,
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.

आपण बिल्कुल त्याचाच स्ंपर्क क्षेत्रात आहोत.आपला फोन बिझी असल्याने त्याला लाईन मिळत नाही !!
अस्तु . प्राध्यापक बिरुटेची लाईन आवडली - सही म्हणून असायला हरकत नाही.. तेव्हा असे म्हणतो की ..

आणि हो कोणी लहान नाही आणि कोणी मोठे नाही आपण सारखे....काय चुभु असेल तर देऊ घेऊ आणि नाही पटलं तर सोडून देऊ. हाय काय अन नाय काय.

तुमचा हा प्रतिसाद भारतीय अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा अर्क आहे. :)

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 4:12 pm | अग्निकोल्हा

.

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 4:52 pm | कवितानागेश

शिवाय कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे वाचून मला फार आनंद झालाय! ;)
- मुलखाची आळशी माउ

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 5:15 pm | अग्निकोल्हा

आता तुम्हि उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी अवश्य संपर्क करावा.

कलियुगात फाष्ट पुण्य मिळतं हे ऐकून आमचेही डोळे पाणावले. जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे, स्कॅम करणारे, इ.इ. अनेक पुण्यवान लोक नजरेसमोर आले.

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 6:58 pm | कवितानागेश

जमिनी विकून एका रात्रीत गबर होणारे>>>
?????
जमिन विकणे घोर पाप अहे काय?
एका रात्रीत किंवा अजून बर्‍याच दिवसात गबर होणं पाप आहे का? =))

बॅटमॅन's picture

24 Jul 2013 - 7:05 pm | बॅटमॅन

पाप नै म्हणूनच पुण्यवान म्हणालो गं माऊ ;) गबर होणारे लोक अजून बाकीची पुण्यकर्मे करतात ती सगळ्यांना माहितीच असतील, वेगळे कशाला स्तवन करा =)) =))

कवितानागेश's picture

24 Jul 2013 - 7:24 pm | कवितानागेश

पण गबर असण्यात वाईट काय?
आम्ही नै ज्जा!! :(

मग तुमच्याकडे अरे ओ सांबा आहे का? तरच तुम्ही गब(ब्)र!

बॅटमॅन's picture

24 Jul 2013 - 9:08 pm | बॅटमॅन

नाहीच वाईट! गब्बर होणार्‍यांच्या अन्य पुण्यकर्मांमुळे ते आठवले इतकेच. त्याचा गब्बर होण्याशी कैकदा संबंध असतो. पण अर्थातच-गब्बर होण्यात वाईट कैच नै.

अग्निकोल्हा's picture

24 Jul 2013 - 10:19 pm | अग्निकोल्हा

शोले निघावा लागतो.

बॅटमॅन's picture

25 Jul 2013 - 2:12 am | बॅटमॅन

हे बाकी खरं! रामगढ़ उभारल्याशिवाय शोलेही निघणं कठीणच म्हणा.

म्हणजेच जे कोणी एका रात्रित गबर होणारे पुण्यवान असतात असे आप्ले मत आहे तर.

आभि जित's picture

24 Jul 2013 - 5:09 pm | आभि जित

जो देतो तो देव, देव कोणी आकाशातला बाप किन्वा खान्द्यावरचा चित्र गुप्त नाही , बाकि विटेकर बरोबर सहमत

अर्धवटराव's picture

24 Jul 2013 - 10:08 pm | अर्धवटराव

>>अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते.
-- मला तरी असं अजीबात वाटत नाहि. सध्या उपलब्ध प्रागैतेहासीक इतीहास हेच सांगतो कि आज मानव समाज संख्या दृष्टीने, भौतीक प्रगतीच्या दृष्टीने, वैज्ञानीक सत्याच्या दृष्टीने सर्वात जास्त प्रगत आहे. त्यामुळे त्यातली गुंतागुंत देखील प्रचंड आहे. त्याला बजबजपुरी कसं म्हणावं ? आजकाल माणसाचा तोल ढळलाय, ढळत चालला, हे देखील सत्य नाहि. माणुस नेहमी असाच होता. अगदी पुराणकाळातलं साहित्य (तो इतिहास मानला तर)देखील ऋषीमुनींच्या काम-क्रोधाचे आणि राज्यकर्त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेचे प्रदर्शन आहे. मग हे सगळं आज कलियुगातच होतय असं कसं म्हणता येईल?

>>मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे,
जेणे करून शंका समाधान होईल.
-- येस. ज्याला खरच उत्तर शोधायचं आहे त्याला त्याच्यापरिने प्रयत्न करण्यावाचुन गत्यंतर नाहि. ज्याला त्याच्यशी काहिही घेणं देणं नाहि तो त्या भानगडीत तसंही पडणार नाहि.

अर्धवटराव

रामपुरी's picture

24 Jul 2013 - 10:25 pm | रामपुरी

कोण कलियुग? कोण देव?? कोण परमेश्वर???

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2013 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> कोण कलियुग?

कलियुग

>>> कोण देव??
देव उर्फ गॉड

>>> कोण परमेश्वर???
परमेश्वर.

:)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2013 - 8:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया वापरून परमज्ञान मिळवून करून मो़क्षप्राप्ती करून घ्या ! :)

कलियुगात अनेक गोष्टी सोप्या आहेत म्हणतात, त्यातलीच ही एक सोय म्हणावी काय? ;)

(सगळ्यांनीच ह घ्या, हेवेसांनल)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2013 - 8:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

म्हणजे थोडक्यात, विकिपिडिया वापरून परमज्ञान मिळवून मो़क्षप्राप्ती करून घ्या ! :)

कलियुगात अनेक गोष्टी सोप्या केलेल्या आहेत म्हणतात, त्यातलीच ही एक सोय म्हणावी काय? ;)

(सगळ्यांनीच ह घ्या, हेवेसांनल)

स्पंदना's picture

25 Jul 2013 - 9:03 am | स्पंदना

देवा! पाहतोयस ना?

बॅटमॅन's picture

25 Jul 2013 - 12:15 pm | बॅटमॅन

बाकी काही असो, कुर्ट गोडेल नामक गणितीने देवाचे अस्तित्व गणिती पद्धतीने सिद्ध करून दाखवले आहे.

http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof

त्यामुळे चक्क गणिताने देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे =)) =))

या ग्रँड थिअरमपुढे कुठलीही जिलबी बेशर्त मागे घ्यावीच लागेल म्हणा बाकी.

अनिरुद्ध प's picture

25 Jul 2013 - 1:32 pm | अनिरुद्ध प

अगदि अगदि.

धन्या's picture

25 Jul 2013 - 11:39 pm | धन्या

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

असं भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगातच सांगितलं आहे. आणि आता कलीयुगातसुद्धा भगवान महाविष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत.

शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति।।

शम्भल नावाच्या गावाच्या ब्राम्हण प्रमुखाच्या घरी भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेणार आहेत.

ह्यावेळ्ची चारधामाची यात्रा चुकवलात. Direct संपर्क होता.

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 1:13 pm | अनिरुद्ध प

चारधाम यात्रेची गरज नाही हे योग्य वेळ आल्याशिवाय होत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jul 2013 - 1:38 pm | प्रकाश घाटपांडे

कठीण आहे बुवा! इश्वर या संकल्पनेचे स्थान आपल्या मेंदुत आहे. तिथे संपर्क असला म्हणजे झाले. आणी अस्तोच तो. इश्वर ही संकल्पना आहे हे मानणे आणि इश्वर मानणे यात फरक आहेच ना? आपण मेलो कि तो संपर्क तुटतो. असो आपण मेलो जग बुडाल.इश्वर माना नका मानु जगाच्या रहटगाडग्यात काही फरक पडत नाही.

कारलं फाय केल्यावर त्यातला कडूपणा निघून जातो तरीही मला कारलं आवडत नाही हे उदाहरण खोलवर रुजलेल्या धारणांबाबत तितकंस लागू होत नाही.

मनाचा फंडा असा आहे "समझ आचरणमे बदल जाती है"

एकदा कळलं आणि पटलं की `देव कल्पना आहे' आणि मनाशिवाय आणि धारणेशिवाय त्याला कुठेही अस्तित्व नाही की विषय संपतो. मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही.

याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार? पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या). अर्थात, आकलन निर्विवादपणे मांडायचा प्रयत्न होतो कारण ज्याला ते पटेल त्याचा वेळ, पैसा आणि एनर्जी वाचणार असते. आणि त्याही पुढे जाऊन वैज्ञानिक नाही झाला तरी वास्तविक दृष्टीकोन निर्माण होण्याची शक्यता असते. या गोष्टींच्या सामाजिक आणि जागतिक परिमाणांवर (धर्म, युद्ध, जातीय आणि धार्मिक कलह, भारताची (या धारणांमुळे काही प्रमाणात तरी निश्चितपणे ओढवलेली सध्याची अनिर्बंध स्थिती) ; `देवाला रिटायर का करा?' या पोस्टवर चर्चा झाली आहे.

आता प्रश्न असा आहे : पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या पण जनमानसाची अवस्था द्विधा होते. `देव कल्पना आहे' याचा प्रतिवाद त्यांना करता येत नाही आणि ते मान्य करणं झेपत नाही. इथपर्यंत ठीक आहे. त्यामुळेच मी लेखमालेतल्या पहिल्या लेखात नामसाधनेवर चर्चेला तयार नव्हतो, तुम्ही करा तुमची साधना.

आता मी नुसतं `बॅक-ट्रॅक' या प्रोसेसवर लिहीलं असतं तर लोक `नामसाधना हा संतमहंतांनी सांगितलेला मनःशांतीचा सोपा मार्ग आहे' असं ठासून सांगणार. त्यामुळे प्रकियेतला नक्की दोष मला विशद करावा लागतो. मग व्यक्तिगत प्रतिसाद सुरु होतात. मी कधीही व्यक्तिगत सुरुवात केलेली नाही.

एका गणितीने देवाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्याला काँट्रॅडिक्ट करा. बघू गणितापुढे शब्दबुडबुडे कसे चालतात ते.

http://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof

आदूबाळ's picture

26 Jul 2013 - 7:15 pm | आदूबाळ

त्याच विकीपानावरचं हे

"The argument does not, to a modern mind, seem very convincing, but it is easier to feel convinced that it must be fallacious than it is to find out precisely where the fallacy lies."

बाकी पटलं मला.

बॅटमॅन's picture

27 Jul 2013 - 4:04 pm | बॅटमॅन

अर्थात!!!

प्रकाश घाटपांडे's picture

26 Jul 2013 - 2:59 pm | प्रकाश घाटपांडे

मग कोणत्याही कारणासाठी देवाला जवाबदार धरणं नाही, पूजापाठात वेळ घालवणं नाही, नवस बोलणं नाही की देवदर्शनाला रांग लावणं नाही.

हे सुद्धा मनाचेच खेळ आहेत ना? मनच त्याला सांगत असत कि देवाला जबाबदार धर पुजापाठात वेळ घालव नवस बोल देवदर्शनाच्या रांगेत जा.....

संजय क्षीरसागर's picture

26 Jul 2013 - 4:37 pm | संजय क्षीरसागर

देव या कल्पनेच्या भीतीनं (किंवा तो माझं रक्षण करेल, भलं करेल या भ्रमापायी) एखादा रोज देवदर्शनाला जातो, पूजा-अर्चा करतो, निरनिराळी व्रतवैकल्य करतो. (पण वरुन दाखवतो की त्यातनं मन:शांती लाभते, माझी श्रद्धा आहे... वगैरे).

आता त्याला कळतं की ती फक्त त्याच्या मनाची कल्पना आहे. त्याला कुणी सांगितलं नसतं तर त्यानं असा वेळ घालवला नसता. काम झालं! मनाच्या एका कप्प्यातून त्याची जाणीव मोकळी होते. त्याला विकासाचे नवे पर्याय उपलब्ध होतात, तोच वेळ, पैसा, उर्जा त्याला पेंडींग कामं, संगीत, खेळ, घरच्यांबरोबर वेळ घालवणं, नवं काही शिकणं यासाठी वापरता येते. मुख्य म्हणजे हाताबाहेर जाणार्‍या प्रत्येक गोष्टीला देवाशी जोडायची सवय जाऊन विचारात वस्तुनिष्ठता येते. आणखी काय हवं?

धमाल मुलगा's picture

26 Jul 2013 - 5:49 pm | धमाल मुलगा

साहेब,
तुमचा मानसशास्त्राचा अभ्यास आहे?

बॅटमॅन's picture

26 Jul 2013 - 5:59 pm | बॅटमॅन

मनच जिथे भ्रम आहे तिथे मानसशास्त्र म्हंजे मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळच नव्हे काय धमुशेठ? =)) =))

*वरील उपमा ययातिकार श्री. भौसाहेब खांडेकर यांच्या ययाति कादंब्रीच्या उपसंहारातून घेतलेली आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2013 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

@मृगजळात लावलेल्या
कल्पवृक्षाच्या
फुलांची
वंध्याकन्येने
घातलेली
माळच
नव्हे काय
धमुशेठ? >>>http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif धन्य...धन्य...आहेस रे वाघळा तू!!!... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

निराकार गाढव's picture

26 Jul 2013 - 11:41 pm | निराकार गाढव

व्वा व्वा! क्या बात है|

------------------------------
सही: मला भांडायला लै आवडतं...

अनिरुद्ध प's picture

26 Jul 2013 - 3:42 pm | अनिरुद्ध प

या सन्कल्पनेबद्दलची आपली व्याख्या काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

याचा अर्थ असा नाही की इतरांनाही ते पटावं यासाठी जुलूम होतो (नेटवर काय जुलूम होणार?

---टवाळी मोड सुरु
"मना"बद्दल चे लेख वाचणे हा जालियजुलूम किंवा जालजुलूमच होय.
--टवाळी मोड समाप्त

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2013 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

अगागागा... काय डेंजर काथ्या कुटायलेत सगळीजणं! :-D ह्या धाग्यावर इतरांच सोडा,पण देवाचं बाकि काही खरं नै!!! =))

चौकटराजा's picture

26 Jul 2013 - 5:29 pm | चौकटराजा

केरळी लोक आता येथील काथ्या विकत घेउन नवी कॉयर म्याट फ्याकटरी काढणारेत म्हणे !

मदनबाण's picture

26 Jul 2013 - 3:50 pm | मदनबाण

J

म्हैस's picture

26 Jul 2013 - 4:58 pm | म्हैस

परमेश्वरानेही माणसं संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाण्याआधी परमेश्वरानेही त्याच्या बाजूने माणसाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावेत हे आपन कशच्या आधारावर म्हनत आहात कलेल का जरा ? " जो मला अनन्य भावाने शरन येतो त्याचा योग क्शेम मि चालवतो" अस भग्वन्तानि गितेत म्हनल आहे. आपन कधि अस शरन जातो का? दिवसातुन १ दा तरि आप्ल्यला देवाचि अथवन तरि येते का?

धन्या's picture

26 Jul 2013 - 8:05 pm | धन्या

अनन्य भावाने भगवंताला शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सांगाल का?

मूकवाचक's picture

27 Jul 2013 - 8:10 am | मूकवाचक

याचे उत्तर भगवद्वीता १२.८ - १२.१२ या पाच श्लोकांमधे दिलेले आहे.
(या पाच श्लोकांवरचे ज्ञानेश्वरीतील भाष्यही अवश्य वाचा)

विटेकर's picture

27 Jul 2013 - 6:26 am | विटेकर

अनन्य म्हनजे " अन्य " कोणीही नाही .. न - अन्य !
एका त्या परमेश्वरांशिवाय दुसरा कोणीही नाही .
एकदा एका गिर्यारोहकाचा रस्ता चुकला, गटाबरोबर चुकामुक झाली. रात्रीची वे़ळ , हवामान अचानक बदलले.. घाबरलेल्या मनस्थितीत याचा पाय घसरला आणि हा कोसळला,केवळ कमरेशी लावलेल्या दोरांमुळे हवेत लट्कत राहीला.
डोळ्यात बोटे घातली तरी दिसणार नाही असा अंधार ! जीव घेणी थंडी !
अत्यंत आर्ततेने त्याने देवाचा धावा केला.. देवा मला वाचव ! अचानक अंधारातून आवाज आला..
" दोर कापून टाक ! "
हा आता आणखी घाबरला ,ही भुताटकी आहे की माझ्याच मनाचे खेळ आहेत ? पुन्हा आर्त धावा .. पुन्हा आवाज !
हा थकून गेला आणि त्याला ग्लानी आली , गात्रे काम करेनाशी झाली !
--दुसर्या दिवशी सकाळी त्याच्या मित्रांना त्याचे प्रेत जमिनीपासून ५ फुटांवर... दोरावर लटकलेले .. सापडले.
समर्थ म्हणतात..
देवावेगळे कोणी नाही | ऐसें बोलती सर्वही |
परंतु त्यांची निष्ठा काही | तैसी नसे ||४-८-१९ दासबोध ||

आमची दोर कापायची तयारी आहे का? तरच तो योग्क्शेम चालवेल.
सकल जीवांचा करितो सांभाळ , तुज मोकलील ऐसे नव्हे !

देवाला सर्वस्व मानायचे मात्र त्याच्या भरोशावर रहायचे नाही. हे थोडे विचित्र वाटते.
त्याबाबतीत असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. हे जास्त प्रॅक्टीकल वाटते.

शिल्पा ब's picture

28 Jul 2013 - 11:30 am | शिल्पा ब

विटेकर अन चौरा यांचे काही प्रतिसाद आवडले. बाकी नेहमीचंच "मी मी मी मी" याने आता मनोरंजन होत नै त्यामुळे अर्धवटरावांनाच विनंती की "जौद्या भौ !"

तिमा's picture

3 Aug 2013 - 11:16 am | तिमा

माझा तर देवाशी थेट संपर्क आहे. आणि तो सुद्धा, कुठल्याही देवळात न जाता आणि कधीही पूजा अर्चा न करता. त्याला सांगितलं की काम झालंच! पण ही सेवा इतरांना उपलब्ध नाहीये.

Gawade Jawaharlal Ramchandra's picture

3 Aug 2013 - 11:28 am | Gawade Jawaharl...

माझ्या मते माझे अंतर्मन हाच माझा देव आहे. संत तुकाराम व संत रामदास यांनीही मनालाच महत्व दिले आहे .
जवाहरलाल

अनिरुद्ध प's picture

3 Aug 2013 - 12:12 pm | अनिरुद्ध प

बहिर्मनाचे काय? त्याला विसर्लात काय?

मदनबाण's picture

3 Aug 2013 - 11:42 am | मदनबाण

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama