संपर्क ईश्वराचा
अवघड आहे ....कलियुग आहे बाबा.........असले शब्द आजकाल फार कानावर पडत आहेत. कारण तसेच आहे;
जिकते तिकडे बजबजपुरी माजल्यासारखी वाटते, बारीक सारीक गोष्टींमध्ये माणसाचा तोल ढळलाय आणि अजून
ढळत चालला आहे असे स्पष्ट दिसते. कलियुग विक्षिप्तपणे ब्रह्मदेवांसमोर नाचत आले तेंव्हा त्याने विधान केले
होते कि, जे लोक कलियुगात देखील परमेश्वराचे चिंतन स्मरण करतील, आणि जे सत्याची कास धरून जगतील,
त्यांच्या वाटेला मी जाणार नाही.
हे वाक्य खूप साधे सोपे वाटते ऐकायला, पण नक्की काय करावे हे समजत नाही. सत्याची कास; चांगले वागणे
म्हणजे नक्की काय?, याच्या व्याख्या आपण कशा आणि कुठल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर करणार?. काही लोक कसेही
वाईट वागोत, त्यांचीच चलती आहे, आपण कुठले साधे काम करायला गेलो तर डोंगराएवढ्या अडचणी समोर येतात
मग आपण म्हणतो आमचेच काम होत नाही, काय पण ! देव आहे का नाही तेच कळत नाही. ती गोष्ट आहे ना;
कि महाभारतामध्ये कुंतीने श्रीकृष्णाकडे सतत दु:ख मागितले, जेणे करून ती सतत दु:ख निवारण्यासाठी माधवाचे
नाव घेत राहील, उद्देश हा कि तिला कृष्ण स्मरणापासून चुकूनही; अगदी सुखाच्या ओझ्याखाली असताना देखील
दूर जायचे नव्हते. मग आपण काय म्हणावे? कृष्ण आपल्यावर प्रसन्न आहे/ नाही, का तो सतत दु:ख /अडचणी
देतोय, मग काम नाही झाले कि आपण; अरे देवा ! म्हणतो. जसा प्रसंग येतो तसे विचारांचे घोंघावणे चालू होते.
उत्कर्षाला सीमा असते अध:पतनाला नसते असे थोर लोक सांगून गेले आहेत. खरे वाटते, आजूबाजूला; वर्तमानपत्रात
आणि बातम्या ऐकले कि हे खरे वाटते, उत्कर्ष म्हणजे पैसा-आडका, गाड्या, बंगले हि अतिउच्च भौतिक सुखे, त्यावर
पुढे जाऊन अध्यात्मिक बैठक साधून कुठे परमेश्वरी संकेत मिळाले; दृष्टांत जरी झाला तरी संपले, एक अत्त्युच बिंदू
गाठला, पण वाईट/सत्वहीन, असंग संग, व्यभिचार, चौर्य, माणुसकीची अवहेलना कितीही करा त्याला कुठे बंधन
दिसत नाही. आपण म्हणतो कि "पापाचा घडा भरतो" पण असे वाटते कि आजकाल वाक्य बदलावे लागेल,
"पापाचा रांजण भरतो" असे म्हणावे लागेल. कि परमेश्वरानेच प्रत्येकाचा पापभाग वाढवला कि काय? असे वाटायला
कारण; आज-काल लगेच घडा भरत असावा इतके माणसाचे वाईट वागण्याचे प्रमाण अधिक आहे, जो तो चढाओढ
करतो आहे; पापानुकरण करून एका अर्थाने अंधळ्या शर्यतीत कितीतरी पुढे पण सात्विकतेने तितकाच मागे पडत
जात आहे. कुठेतरी हिशोब द्यावयाचा आहे हे सोयीस्करपणे विसरून माणूस धावतोय, निश्चित शेवट असलेल्या
दिशेने अमर्याद भ्रमंतीचे खोटे अवसान आणून उधळला आहे.
जसा कलियुगाचा प्रभाव वाढत चालला आहे, आजूबाजूचे वातावरण कलुषित होत आहे, तसा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग
बिकट होत चालला आहे, "हवे ईश्वरी अनुसंधान तर ल्यावे सात्विक अवधान", मला वाटते ज्या प्रश्नांची उत्तरे
मिळत नाहीत; ती हवी असल्यास योग्य गुरु शोधणे अथवा, उच्चकोटीची साधना करून परमेश्वराशी संपर्क साधणे,
जेणे करून शंका समाधान होईल. तूर्तास इतुकेच वाटते कि आपण परमेश्वरी संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहोत,
चला संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात.
- सार्थबोध
प्रतिक्रिया
छान निरुपण... अजून येऊ द्या.
दिलीपजी...
धन्स.
दिलीपजी... आवडले
सार्थबोध जी
छान लिहिलंय
धागा आवडला नाही...
धर्म आणि ईश्वर
दोन धाग्यांवर एकच प्रतिसाद?
न्हाय हो.....
विषय तसा चांगला आहे.
अस्सल रामबाण शंका समाधान
पाप - पुण्य
विटेकर साहेब
कलयुग जेव्हा ब्रम्ह देवा समोर
सामाजिक स्वास्थ्य व आरोग्य दृष्ट्या जे अयोग्य ते निषेधार्ह
ग्रंथात कपडे धुवून ,पिळून वाळत घालणे
कलयुग जेव्हा ब्रम्ह देवा समोर आले............???
काय जिलबी बाबा... ३१ जुलै चे
परान्न
तुम्ही `गुरु चरित्र ' हा ग्रंथ प्रमाण मानता
तो ग्रंथ स्वयेच इतकी भारी
तुम्ही फक्त कल्पना करा हो
जिलबी बाबा तुमच्या स्टीफन
मबा. ही विधानं आणि दिलेली
गवि सगळे वैज्ञानिक मंडळी
तेच तर..
गवि, दॅट्स द पॉइंट!
"बिकॉज देअर इज अ लॉ सच ऍज ग्रॅविटी, दि युनिव्हर्स कॅन अँड विल क्रिएट इटसेल्फ फ्रॉम नथिंग"" स्पाँटेनिअस क्रिएशन इज द रिझन देअर इज समथिंग रादर दॅन नथिंग, व्हाय द युनिव्हर्स एक्झिस्टस, व्हाय वी एक्झिस्ट", ...हॉकिंग राईट्स>काय आहे ते जाणण्यातलं थ्रिल हाच फरक असेल तर ईश्वर ही संकल्पना जरुर थ्रिलिंग आहे. = काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न कुठे दिसतो? "ज्याला ईश्वर म्हणतात ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे (किंवा मूलतत्व) हा उलगडा सर्व गाठी सोडवु शकतो" म्हटलं की विषय संपला! >हां एक खरं, की स्टीफन हॉकिंग्ज हा मुळात "देव नाही" हा एककलमी मुद्दा गृहीत धरुन तो सिद्ध करण्याच्यामागे हात धुवून लागणार्यांपैकी नसल्याने त्याने त्याचे अस्तित्व प्रथमपासून नाकारलं नसून सर्व शक्यता गृहीत धरुन विवेचन केलं आहे. देवाच्या अस्तित्वाची अनावश्यकता हा मुद्दा संपूर्ण विवेचनातून आपोआप पुढे आलेला भाग आहे. = स्टीफनला देव नाही हे सिद्ध करण्यात रस नाही, त्याला अस्तित्वाच्या निर्मिती प्रक्रियेत रस आहे. मला देव नाही हे सिद्ध करण्यात रस आहे कारण त्या मुलभूत धारणेनं मानवी मनाचा फार मोठा प्रभाग व्यापला आहे. अर्थात, माझ्यासाठी देखील तो महत्त्वाचा असला तरी एकमेव मुद्दा नाही.स्टीफनला देव नाही हे सिद्ध
मधलीच वाक्यं घेऊन क्वोट
मित्रानो पटते का पहा .....
....मधलीच वाक्यं घेऊन क्वोट केल्यासारखी वाटली, कारण
जिलबीवाले बाबा... आपण जिलबी
ते जो स्टीवनच्या वक्तव्या बाबत मुद्दा समजवु पाहत आहेत..
नाही हो..
गवि ..__/\__ प्रणाम !
गवि, प्रतिसाद खाली दिला आहे
जय जिलबी बाबा !
दंगल का भडकते?
दंगल टाळण्यासाठी दंगल करणार्
हा:..हः..
प्रतिसाद, उपप्रतिसाद,
बाबौ तर्कट लय भारी !
विवस्त्र आहे हे कळलं पण तरीही अंगावर कपडे आहेत यावर माझा पूर्ण
हे काय...
तुमचा अजून तोच घोळ चालू आहे!
तुमचा घोळ तरी कुठे संपला आहे?
तुम्हाला तुम्ही काही नवं सांगतायं असं वाटतं का?
कशाबद्द्ल??
लय भारी चालू आहे
Pagination