मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 7:40 pm

हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?

आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली.

मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.)

हा प्रवास असा झाला

a

सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.

पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्‍या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.

a

एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.

a

तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?

a

पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?

a

चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?

a

************************************

खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)

सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अ‍ॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.

जय हिंद. जय महाराष्ट्र.

हे ठिकाणसमाजजीवनमानमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jul 2014 - 7:45 pm | लॉरी टांगटूंगकर

वारलेलो आहे. शिरसाष्टांग नमस्कार स्विकारा.. _/\_

मानाच्या गणपतीत आमचं नाव पाहून धन्य जाहलो. आता डोळे मिटायला मोकळा!!

बॅटमॅन आणि प्रगो यांना मिपाचे द्रविड-तेंडूलकर अशी पदवी देण्यात यावी अशी सूचना करतो.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 5:27 pm | प्रसाद गोडबोले

बॅटमॅन आणि प्रगो ह्यांच्या मधे "द्रविड कोण आणि तेंडुलकर कोण " असा किमान शतकी वाद होवु शकतो !

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:29 pm | बॅटमॅन

ळॉळ. पायजे ती पदवी घ्या ओ प्रगो.

एस's picture

28 Jul 2014 - 7:48 pm | एस

पुढील अभ्यासाला शुभेच्छा! (ह्या धाग्यालाही :-) )

बॅटमॅन's picture

28 Jul 2014 - 7:49 pm | बॅटमॅन

वारल्या गेले आहे _/\_

तुम्हांला मिपाचे महालानोबिस अशी या निमित्ताने पदवी दिल्या गेली आहे. (प्रगो, हर्कत नै ना बे ;) )

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 5:25 pm | प्रसाद गोडबोले

मी तर "मिपाचे आर. ए. फिशर" http://en.wikipedia.org/wiki/Ronald_Fisher अशी वाढीव पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवत आहे *ok*

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:30 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!

म्हणजे उगीच कुणी 'फिशिंग फॉर काँप्लिमेंट्स' चा आरोपही करायला नको ;)

प्यारे१'s picture

28 Jul 2014 - 7:50 pm | प्यारे१

चालतंय!

बाळ सप्रे's picture

28 Jul 2014 - 7:54 pm | बाळ सप्रे

आता R किंवा तत्सम भाषा शिकुन घ्या (Predictive analysis) मग तुम्ही एखाद्या धाग्यावर किंवा प्रतिसादावर कोण आणि कसा प्रतिसाद देइल त्याची प्रोबॅबिलिटी वगैरे सुद्धा देउ शकाल!!
मार्केटमध्ये याला जोरदार मागणी आहे.. data scientist म्हणून नाव काढू शकाल !! :-)

आदूबाळ's picture

28 Jul 2014 - 8:00 pm | आदूबाळ

हे काय असतंय?

बॅटमॅन's picture

28 Jul 2014 - 8:03 pm | बॅटमॅन

आर ही एक सी, जावा, इ. सारखी लँग्वेज आहे आणि स्टॅटिस्टिक्सवाल्यांसाठीची संजीवनी वगैरे आहे.

हाडक्या's picture

29 Jul 2014 - 2:56 pm | हाडक्या

लै भारीये आर आदूभाऊ.. एका लाईनीत अख्खा ग्राफ तयार..!! आमी जावा फुडे (दुनियेला दाखवायला) आणि आर मागे (सगळी कामं करायला) वापरतो.. मज्जाय.

बादबा, तुमच्या या विश्लेषणात विंटरेष्ट आहे.. जसे की विदा कुठून आणि कसा मिळाला, कोणत्या फॉर्मॅट्मध्ये, इत्यदि. शक्य असेल तर अजून माहिती मिळावी.

विदा अत्यंत गावठी पद्धतीने मिळवलेला आहे.

१. पाचही पानांवरच्या कॉमेंट एक्सेलमध्ये चोप्य पस्ते केल्या
२. टेक्स्ट फिल्टर मध्ये "२०१४" टाकून स्ट्रिंग मिळवली --> लीमाउजेट - Thu, 17/07/2014 - 11:53
३. मग टेक्स्ट टू कॉलम्स वापरून "लीमाउजेट" "17/07/2014" आणि "11:53" हे तीन कॉलम्समध्ये वेगवेगळं काढलं
४. पाचही पानांवरच्या कॉमेंट्स एका शीटमध्ये एकत्र केल्या
५. पहिल्या चार पानांत प्रत्येकी नव्वद आणि टोटल ४३४ आहे ना हा सॅनिटी चेक केला. (एकूण ४३६ भरल्या, का कोण जाणे!)

एक्सेलव्यतिरिक्त काही येत नसल्याने इतकंच जमलं. आर शिकायचा शिरसली विचार करतो आहे. त्यासाठी प्रोग्रामिंग येणं आवश्यक असतं का?

प्रोग्रॅमिंग शिकायची इतकी काय गरज नस्ते. बेशिक टास्क्स अतिशय सोप्पी आहेत, जरा म्याट्रिक्स म्यानिप्युलेषण डोक्यात ठेवून असलं की झालं. एका लायनीत बरेच कै कै करता येते. लय समृद्ध भाषा आहे.

प्रचेतस's picture

29 Jul 2014 - 3:33 pm | प्रचेतस

'R' लै पॉवरफुल आहे. अगदी spss, minitab सारख्या महागड्या सॉफ्टवेयरपेक्षाही भारी आणि ती पण अगदी फुकट.

आदूबाळ's picture

29 Jul 2014 - 3:49 pm | आदूबाळ

आभार! प्रयत्न करून पहातो...

अगदी अगदी....

लईच दणक्यात प्रतवारी करून अहवाल काढलाय की !! धन्य आहात ..

बाकी नावीन्य असे नाही , बर्‍याच धाग्यात हेच दोन - पाच आयडी आलटुन पालटुन असतात , जगदमिपागुरु श्रीसल्लाबाबांचे नाव नसल्याने अमंळ दुखात कोसळलो ;)

हाडक्या's picture

30 Jul 2014 - 7:36 pm | हाडक्या

आदुभौ, जबराच. ! बराच पेशंस लागला असणार याला असे वाटतेय. :)

__/|\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2014 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरंच !

स्पा's picture

28 Jul 2014 - 8:04 pm | स्पा

वा र लो रे.....

आदु बाळा धन्य आहेस

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2014 - 9:01 pm | अत्रुप्त आत्मा

आजं(ही) ;) पां डुब्बाशी सहमत! :D

शिद's picture

28 Jul 2014 - 8:33 pm | शिद

वरील सर्वांशी सहमत.

मानाच्या गणपतीत आमचं नाव पाहून धन्य जाहलो.

मी पण.

यशोधरा's picture

28 Jul 2014 - 8:51 pm | यशोधरा

पैल्या पाचात न्हाय मी? म्होरल्या टैमाला येकद्म जंक्शान फैट देणार!

कवितानागेश's picture

28 Jul 2014 - 11:24 pm | कवितानागेश

मी दंग राहिलेय! =))

इरसाल's picture

29 Jul 2014 - 2:56 pm | इरसाल

आणी मी दंगलो....(दंग राहिलो चा शॉफॉ)

नंदन's picture

29 Jul 2014 - 12:18 am | नंदन

परेही परेटो बोलणे खुंटले :)

बाकी बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे काय गौडबंगाल आहे म्हणायचे?

यसवायजी's picture

29 Jul 2014 - 12:51 am | यसवायजी

बॅटमॅन-बॅटमॅन:- एकटा टायगर. :))

त्या धाग्यावर बंदी हाय, हिकडं परत चालू करा की.
मानाचे ५ गणपती- ब्याट्या, प्रगो, प्यारे, संक्षी, धन्या - लगे रहो.

प्यारे१'s picture

29 Jul 2014 - 12:52 am | प्यारे१

>>>बॅटमॅन-बॅटमॅन ह्या पार्टमनशिपचे

तत्त्व महत्त्वाचं. त्या अनुषंगानं होणारा 'आपुलाचि वाद आपणासि' असू शकतो. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2014 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन-बॅटमॅन पार्टमनशिप म्हणजे "स्वतःच्या प्रतिसादाला प्रतिप्रतिसादाचे शेपूट" किंवा "खुदसे बातां" ;)

दादा आमच्या बाजुला आलेले पाहुन डोले पानावले :-D

उगाच नाय सख्खे मित्र म्हणत !!

संजय क्षीरसागर's picture

29 Jul 2014 - 10:48 am | संजय क्षीरसागर

तिथे आभार मानायचे राहून गेले. लेखक आणि या संकेतस्थळाद्वारे लिहीण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार्‍या नीलकांतचे हार्दिक आभार.

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2014 - 11:36 am | पिलीयन रायडर

मानाचे गणपती?!!!

कहर आहात बाबा तुम्ही लोकं!!!
आवडेश.. एकदम आवडेश...!

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2014 - 12:58 pm | श्रीगुरुजी

आदूबाळ,

तुमच्या प्रदीर्घ चिकाटीला, सखोल अभ्यासाला आणि व्यासंगाला प्रणाम!

अजून काही सुधारणा सुचवू इच्छितो.

(१) सर्वात लांबलचक असलेले पहिले पाच प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) आणि सर्वात कमी लांबीचे ५ प्रतिसाद (आणि त्यांचे धनी) यांचा तुलनात्मक अभ्यास आणि त्यांचे आलेख

(२) मानाच्या पहिल्या पाच मानकर्‍यांच्या सर्व प्रतिसादातील एकूण अक्षर संख्या, एकूण शब्द संख्या, एकूण वाक्य संख्या, एकूण परिच्छेद, एकूण अवतरण चिन्हे, एकूण हसर्‍या इ. चा तुलनात्मक अभ्यास व आलेख

(३) एकच प्रतिसाद किती जणांनी किती वेळा चोप्य पस्ते केला आहे त्याची आकडेवारी. (उदा. जलेबीबाईंनी आपला पहिल्या पानावरील प्रदीर्घ प्रतिसाद त्यापुढील प्रत्येक पानावर, "मी माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात हेच लिहिलं होतं", अशी प्रस्तावना लिहून चोप्य पस्ते केला होता. एकूण सर्व ५ पानांवर तोच प्रतिसाद चोप्य पस्ते केला होता.)

(४) पार्टनरशीप च्या आकडेवारीमध्ये सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी सुद्धा हवी. (उदा. जलेबीबाईंच्या प्रत्येक प्रतिसादाला नाना "+१", "+१०००००", "सॉल्लीड प्रतिसाद" असे अनुमोदक प्रतिसाद देत होता. अश्या सूचक-अनुमोदक पार्टनरशीपची आकडेवारी व आलेख हवेत.)

सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)

=)) रोफ्ल

भारीच. संख्याशास्त्राची छोटीशी चुणूक मिळाली या धाग्याने. :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Jul 2014 - 3:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

साष्टांग नमस्कार
मला आजपर्यंत वाटायचे की लोक्स मिपावर फक्त टाईमपास करायला येतात.

हे विश्लेषण वाचून चाट पडलो

हे भारी आहे. तुमच्या चिकाटीचं कौतुक!

आतिवास's picture

31 Jul 2014 - 8:56 am | आतिवास

'मराठी माणसाला चर्चा करायला आवडतात' हे वास्तव अधोरेखित करणारं विश्लेषण :-)

बाळ सप्रे's picture

31 Jul 2014 - 11:52 am | बाळ सप्रे

आणि काही लोकांना विश्लेषण करायला आवडतं हे अधोरेखिल करणारी चर्चा :-)

संजय क्षीरसागर's picture

31 Jul 2014 - 12:02 pm | संजय क्षीरसागर

दाखवणारा लेख!

मानाच्या गणपतींत उच्चासनी नसल्याची जळजळ जाणवतेय ओ. उगी उगी.

श्रीगुरुजी's picture

31 Jul 2014 - 2:19 pm | श्रीगुरुजी

फिदी फिदी फिदी .....

करणं, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत! मला खुद्द लेखकाचा, मुद्दा समजल्याचा व्य. नि. आलायं, दॅट इज इनफ.

कित्ती कित्ती निरागस ओ संक्षी तुम्ही =))

चालूद्या.

हाडक्या's picture

31 Jul 2014 - 5:04 pm | हाडक्या

बॅट्या, असे बोलू नये.! चल शाळेत जा पाहू आता गप गुमान.. ;)

हा हा हा, ओक्के हाडक्यागुर्जी ;)

श्रीगुरुर्जी अणि संक्षी, एक वेगळा धागा काढायचा का तुमचे ऐसपैस प्रतिसाद वाचायला? हे असे नीट वाचता येत नाहीत. मस्तपैकी एंटरटेनमेंट होईल. मी देऊ काढून? *good*

तुमचा मानाची गौराई व्हायचा विचार दिसतोय. ;)

श्रीगुरुजी's picture

2 Aug 2014 - 2:21 pm | श्रीगुरुजी

आदूबाळ,

या धाग्याचेही विश्लेषण करण्याची सुवर्णसंधी येताना दिसतेय. निदान त्या नवीन धाग्यात तरी 'सर्वज्ञांना' मानाच्या गणपतीत स्थान मिळू देत. नाहीतर त्यांना आयुष्यात वैफल्य येऊन त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर निघायचं.

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 4:57 pm | प्यारे१

थँक यु सर. पण सर मला शेपूट नाहीये.

तुम्हाला आहे का?

पैसा's picture

2 Aug 2014 - 11:01 pm | पैसा

पण सर मला शेपूट नाहीये.

http://en.wikipedia.org/wiki/Coccyx हे विकिबाबा काय वेगळंच सांगतायत! *secret*

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 11:14 pm | प्यारे१

त्या माकडहाडासाठी 'विकी'ची मदत घ्यावी लागते होय???????

याल्लाह, उठा ले रे बाबा. :(

पैसा's picture

2 Aug 2014 - 11:24 pm | पैसा

मी सांगितलं की तुम्ही म्हणणार पुरावे दाखवा, म्हणून आधीच विकिची साक्ष काढली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

माकडहाड (Coccyx) म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये असलेया आणि आता नाहिश्या झालेल्या शेपटीचा अवशेष.

माणसातली खरी शेपटी ही अशी असते...

.

(दोन्ही फोटो विकिबाबाच्या सौजन्याने)

ही झाली खर्र्या शारिरीक शेपटीची खर्री शास्त्रिय गोष्ट. बाकी इथल्या इतर शेपटींबाबत आमी अज्ञानी आणि वाचनमात्र आहोत हे किलियर करत हावोत, तेची नोंद घेवावी आशी णम्र इणंती.

शेपूट असावं तर असं. पण ती खरी शेपूट आहे?

मनातलं: सिंहकटी भारीच्च आहे. ;)

हाडक्या's picture

2 Aug 2014 - 5:31 pm | हाडक्या

दुसर्‍या महानुभावांनी, निवडीचा इतका वाईड स्पेक्ट्रम असतांना `हाडूक' उचललं आहे, हे लक्षात आलं तरी खूप होईल.

बाकी तुमचे चालू द्या पण आम्हाला हा टोमणा असेल तर एवढेच सांगतो की आम्ही 'श्रीमंत छत्रपती' किंवा 'विवेकानंद' असे नाव घेतले असते तर तुम्ही अशीच भाषा वापरली असती का ?

लोकांचे दिसणे, नव, आडनाव (त्यावरून येणारी जात), सामाजिक उतरंडीतले आर्थिक-सामाजिक स्थान असल्या फालतू गोष्टींवरून त्यांना जोखणारे आणि त्यांच्या मतांना पाहणारे अशांना फाट्यावर मारण्यासाठी आमचा असला आडनिडा आयडी आहे आणि अस्तित्व, सत्य आदी मोठमोठ्या बाता मारणारे तुम्ही पण त्यातलेच निघालेले पाहून आजवर असलेला तुमच्याबद्दल उरला सुरला आदर देखील राहिला नाही असे म्हणावेसे वाटते.

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 6:05 pm | कवितानागेश

तुमचा अभ्यास फरच कमी पडतोय हाडक्या. ;)

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 6:23 pm | प्यारे१

गप्राव!

सारखं आपलं आब्ब्यास आब्ब्यास. आब्ब्यास ह्यो भ्रम हाय!

काय काय भ्रम आहे हेच कळेनासं झालंय राव.. ;)

प्रसाद गोडबोले's picture

5 Aug 2014 - 12:49 am | प्रसाद गोडबोले

प्रावले काका , मला त्या भ्रम धाग्याची लिन्क द्या ना राव लय शोधुनही सापडला नाय ...की तो धागा हाच एक ब्रम होता ?

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 2:43 pm | प्यारे१

सर,

एक गंभीर प्रश्न विचारतोय.
बहुतांश सगळ्याला आपण निरर्थक म्हणता.
नक्की काय सार्थ आहे ते मज निरोपावे.
मी लाख सांगेन पण घंटाचंदा तुला समजणार नाही असा तुमचा प्रतिसाद असेल कदाचित पण तरीही सांगाच्च असा आग्रह आहे. ज्यांना समजेल त्यांना समजेल.
दोन पाच वर्षांनी खरंच माझ्या बुद्धीची वाढ झालीच तर मलाही कळेल.

तर.... व्हॉट्स रियली मीनिंगफुल ऑर वर्थ?

घंटाचंदा आत्ता उपरती झाली तुला

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 3:06 pm | बॅटमॅन

=))

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 3:40 pm | प्यारे१

हो स्पा सर.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 4:56 pm | कवितानागेश

हे म्हणजे मेंढरानी सिंव्हाला विचारण्यासारखे झाले, 'जंगलचा राजा कोण?' =))

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 8:15 pm | प्यारे१

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला परंतु....

इस्स मिपा पे किसी को माफी नही मिलती अयसा लग रहा हय!
जरा कुठं थोरांचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं की आलेच्च :-/ *fool*

का? असं का?

प्रसाद गोडबोले's picture

2 Aug 2014 - 12:52 am | प्रसाद गोडबोले

वाल्याचा वाल्मिकी झाला, तो अंगुलिमाल माणसं मारणं सोडू शकला, पतित पावन झाला

आवल्यांचा आवळा झाला की कदाचित माफी मिळेल असा अंदाज आहे ! *biggrin* अ.ह.घ्या

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 12:10 pm | कवितानागेश

अगदी!
सर्वात पुढे, महाराष्ट्र माझा. ;)

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले

आदुबाळ ह्यांचे अभिनंदन ! अतिषय सुंदर अ‍ॅनालिसीस !
शेवटचे दोन चार्ट्स , एक्सेल मधे कशे काढले हे खुप विचार करुन गुगल करुनही लक्षात आले नाही , त्याबद्दल सविस्तर बोलुच :)

डॅटा एक्सेल्स शेयर करण्याबाबर व्यनि पाठवला आहे :)

आदूबाळ's picture

31 Jul 2014 - 2:28 pm | आदूबाळ

पार्टनरशिप चार्ट
मूळ डेटा वापरून एकापाठोपाठच्या प्रतिसादांचा "डमी डेटा" बनवला.

उदा.
प्रगो
आदूबाळ
स्पा
सूड

असे एकापाठोपाठ एक चार प्रतिसाद असतील तर कॉन्केटिनेट वापरून
प्रगो - आदूबाळ
आदूबाळ - स्पा
स्पा - सूड

असा डमी डेटा बनला.

मग पिव्होट चार्ट मारला.

गुणवंतांची गुणवत्ता चार्ट
गुणवंतांचे प्रतिसाद दुसर्‍या सीरीजमध्ये घेतले, आणि एक्स अ‍ॅक्सिस तोच ठेवून पहिल्या (सर्वात वरच्या) ग्राफवर ही दुसरी सीरीज प्लॉट केली. वेगळे उठून दिसण्यासाठी सीरीजचे रंग बदलले.

शिद's picture

31 Jul 2014 - 2:44 pm | शिद

जबराट_/\_

ह्यावर एक सविस्तर लेख येऊद्या...आमचा कस्टमर मध्येच अश्या मागण्या करत असतो पण कॉग्नोस(रीपोर्टिंग टुल) मध्ये. एक्सेलमध्ये होते तर कॉग्नोसमध्ये पण हवंय म्हणे.

विटेकर's picture

31 Jul 2014 - 3:07 pm | विटेकर

तुमच्या चिकाटीला !

पैसा's picture

31 Jul 2014 - 4:43 pm | पैसा

आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात. आमच्या घरचे ब्रॉडबँड बंद असल्याने या गमतीजमतीत भाग घेता आला नाही याबद्दल अतिषय विषण्ण मनाने मानाच्या गणपतींचे आणि काड्या टाकणार्‍यांचे अभिनंदन करत आहे.

या विषयांवर आवडीने लिहिणार्‍या अर्धवटराव, मृगनयनी यांची अनुपस्थिती या धाग्यावर जाणवली.

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 4:52 pm | प्यारे१

बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता करविता 'वेगळाच' असतो हे सगळ्यांना मान्य करावंच लागेल. ;)

पैसा's picture

31 Jul 2014 - 4:57 pm | पैसा

खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल! (आम्हाला पण मटा मराठी येते)

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 5:02 pm | प्यारे१

खरंय.

बाकी डॉ. खरेंचे खरोखर मनापासून आलेले प्रतिसाद नाहीत दिसले हल्ली. खरे आहेत आपलं बरे आहेत ना? ;)
(हलकं घ्या सर)

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 5:20 pm | प्रसाद गोडबोले

"मी बोटीवर होतो तेव्हा असले वाद विवाद व्हायचे नाहीत मिपावर " असा प्रतिसाद अपेक्षित होता काय ?

सूड's picture

31 Jul 2014 - 5:23 pm | सूड

*mosking*

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:30 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

अनुप ढेरे's picture

3 Aug 2014 - 5:56 pm | अनुप ढेरे

=))

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:00 pm | बॅटमॅन

आमहाला एवढं नक्की कळलं की भरपूर प्रतिसाद असलेला धागा काढायचा असेल तर आधी एक देव धर्म इ बद्दल विषय निवडावा. आणि मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.

छान पाकृ. वीकांताला करून पाहीन!

पैसा's picture

31 Jul 2014 - 5:02 pm | पैसा

प्रथमग्रासे मक्षिकापात. वीकांताला केलीली पाकृ सोमवारपर्यंत खपत नाय.

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 5:05 pm | बॅटमॅन

अहो, लेख लेख मे लिखा है प्रतिसादक का नाम. टेण्षण नका घेऊ.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 5:22 pm | प्रसाद गोडबोले

मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, प्यारे, धन्या यांना काळवेळ बघून पिना माराव्यात.

आमचा बेन्चयोग संपाला आहे माते ! आता काम सुरु !

मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

धन्या's picture

31 Jul 2014 - 8:48 pm | धन्या

मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची डॉक्युमेन्ट गोळा करत आहे सध्या ! मुक्तपीठ मोड ऑफ :ड

बी १ चे काय त कौतुक. आमच्या डोंबीवलीत घरास एक याप्रमाणे पोरं एच १ वर जातात.

पैसा's picture

31 Jul 2014 - 10:00 pm | पैसा

तुजप्रत कल्याण डोंबोली असो. लौकरच तुलाही हिरवा माज असल्याचे सांगता यावे यासाठी शुभेच्छा!