गाभा:
नमस्कार मंडळी,
या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन.
तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी.
धन्यवाद
क्लिंटन
प्रतिक्रिया
9 Feb 2015 - 9:11 pm | श्रीगुरुजी
प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यांच्या तुलनेसाठी खालील अंदाज देत आहे.
मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्यांचे अंदाज
(१) इंडिया टीव्ही - सी-व्होटर
आआपः ३१-३९, भाजपः २७-३५, काँग्रेसः २-४
(२) इंडिया टुडे - सिसेरो
आआपः ३५-४३, भाजपः २७-३५, काँग्रेसः ३-५
(यात आआप व भाजपच्या सरासरी जागांची बेरीज ७० आहे. काँग्रेसला ३-५ जागा कशा मिळणार?)
(३) एबीपी-नेल्सन
आआपः ३९, भाजपः २८, काँग्रेस: ३
(४) टुडेज चाणक्य
आआपः ४२-५४ (४०-४६% मते), भाजपः १६-२८ (३४-४०% मते), काँग्रेसः ०-२ (१०-१६% मते)
(५) न्यूज नेशन
आआपः ३९-४३, भाजपः २५-२९, काँग्रेसः १-३
(६) इंडिया न्यूज - अॅक्सिस
आआपः ४६-६०, भाजपः १०-२४, काँग्रेसः ०-२
(७) डाटा माईनिरो
आआपः ३१, भाजपः ३५, काँग्रेसः ४
10 Feb 2015 - 12:14 am | विकास
Delhi Assembly Elections 2015 - Exit Polls | Create infographics
10 Feb 2015 - 3:32 pm | श्रीगुरुजी
यातला फक्त इंडिया न्यूज-अॅक्सिस चा अंदाजच प्रत्यक्ष निकालांच्या किंचितसा जवळ आहे. बाकीचे अंदाज मोठ्या फरकाने चुकलेत.
9 Feb 2015 - 10:17 pm | अर्धवटराव
भाजप (४५% शक्यता) किंवा आप (५५% शक्यता) ३६ ते ३७ जागा मिळवुन सरकार बनवणार.
10 Feb 2015 - 3:00 am | सांगलीचा भडंग
अमित शहा साहेबांनी काय तर ' परचा कार्यकर्ता' प्रयोग केला होता असे एका न्यूज चानेल वर दाखवत होते . म्हणजे प्रत्तेक कार्यकर्ता ला ४०-५० घरे दिली होती आणि ती त्या कार्यकर्ता ची जबादारी कि त्या सगळ्यांनी वोट केलेच पाहिजे . शेवटच्या ४-५ तासात या ' परचा कार्यकर्ता' नि बरेच कष्ट केले , त्याचा फायदा भाजपा मिळणार अशी बातमी होती. अमित शहा नि हा प्रयोग गुजरात मध्ये पण केला होता आधी
10 Feb 2015 - 3:14 am | जयन्त बा शिम्पि
घोडा मैदान जवळ आहे
देखेंगे क्या क्या होता है ?
10 Feb 2015 - 6:03 am | सिद्धार्थ ४
किती वेळ उरलारे?
10 Feb 2015 - 7:57 am | क्लिंटन
मतमोजणी सुरू होत आहे.पहिले कल दहा-पंधरा मिनिटात येतील.
10 Feb 2015 - 8:08 am | विकास
BJP+ 1 +1 0
AAP 0 -1 0
Cong 0 0 0
Others 0 0 0
Awaited 69
10 Feb 2015 - 8:07 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: १
आआप: ०
भाजप: १
कॉंग्रेस: ०
भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. बहुदा पहिल्यांदा पोस्टल मते मोजली जात आहेत.
10 Feb 2015 - 8:16 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ४
आआप:४२
भाजप: २
कॉंग्रेस: ०
भाजपचे विजेन्द्र गुप्ता रोहिणी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. २०१३ मध्ये आआपने रोहिणीची जागा जिंकली होती. मंगोलपुरीमध्ये आआप आघाडीवर आहे. या दोन्ही जागा २०१३ मध्ये आआपने जिंकल्या होत्या. जनकपुरीमधून भाजपचे जगदीश मुखी आघाडीवर आहेत.
10 Feb 2015 - 8:17 am | क्लिंटन
मालवीय नगर मधून आआपचे सोमनाथ भारती आघाडीवर.
10 Feb 2015 - 8:19 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ७
आआप: ३
भाजप: ३
कॉंग्रेस: १
कॉंग्रेसचे ए.के.वालिया लक्ष्मीनगरमधून आघाडीवर.
10 Feb 2015 - 8:20 am | विकास
काँग्रेसचे एका ठिकाणी तरी आघाडीवर!
10 Feb 2015 - 8:20 am | क्लिंटन
किरण बेदी (भाजप) कृष्णनगरमधून आघाडीवर.
10 Feb 2015 - 8:24 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: १६
आआप: ७ (-३)
भाजप: ६ (+१)
कॉंग्रेस: २ (+१)
बसपा: १ (+१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
10 Feb 2015 - 8:27 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: २०
आआप: १० (-२)
भाजप: ७ (०)
कॉंग्रेस: २ (+१)
बसपा: १ (+१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
या क्षणी एकदम चुरशीची लढत चालू आहे. आआपचा स्वीप नक्कीच वाटत नाही. मागच्या वेळी जिंकलेल्या दोन जागांवर आआप पिछाडीवर आहे.
10 Feb 2015 - 8:33 am | नांदेडीअन
:: कल ::
आप २६
बीजेपी १५
कॉंग्रेस १
Total TV News (दिल्लीचे लोकल न्युज चॅनल)
10 Feb 2015 - 8:36 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: २२
आआप: १० (-२)
भाजप: ९ (+१)
कॉंग्रेस: २ (+१)
बसपा: १ (+१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आआपचे राखी बिडलान,सोमनाथ भारती,मनीष सिसोदिया आघाडीवर.
10 Feb 2015 - 8:41 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: २६
आआप: १४ (+१)
भाजप: ८ (-२)
कॉंग्रेस: ३ (+१)
बसपा: १ (+१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आतापर्यंतचे चित्र--
१. आआपने आघाडी घेतली आहे.
२. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.
10 Feb 2015 - 8:43 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: २९
आआप: १६ (+३)
भाजप: ९ (-४)
कॉंग्रेस: ३ (+१)
बसपा: १ (+१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आतापर्यंतचे चित्र--
१. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हे कल चालू राहिले तर आआपला बहुमत मिळायला हरकत नसावी.
२. कॉंग्रेसची कामगिरी इतकी वाईट नाही.
10 Feb 2015 - 8:49 am | विकास
काँग्रेसची प्रत्येक जागा आप साठीच्या जागा कमी करत आहे का भाजपाच्या?
10 Feb 2015 - 8:58 am | क्लिंटन
काँग्रेस नक्की कोणाच्या जागा घेत आहे हे बघायला हवे.त्यातील एक जागा मातिया महाल आहे. तिथून शोएब इक्बाल आघाडीवर आहेत.कोणत्याही पक्षात असले तरी शोएब इक्बाल जिंकतातच. मागच्या वेळी ते जनता दल (यु) च्या तिकिटावर निवडून आले होते.
10 Feb 2015 - 8:49 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ३६
आआप: २१ (+५)
भाजप: ११ (-५)
कॉंग्रेस: ५ (+१)
इतर: ० (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आतापर्यंतचे चित्र--
१. आआपने आता चांगलीच आघाडी घेतली आहे. हेच कल चालू राहिले तर अरविंद केजरीवालांना पुढचे मुख्यमंत्री व्हायला हरकत नसावी.
२. भाजपची कामगिरी निराशाजनक.
३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.
10 Feb 2015 - 8:56 am | विकास
आपने इव्हीएम्स ना रिप्रोग्रॅम केलेले दिसतेय! ;) :(
10 Feb 2015 - 8:55 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ४५
आआप: २९ (+८)
भाजप: ११ (-८)
कॉंग्रेस: ५ (+१)
इतर: ० (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आतापर्यंतचे चित्र--
१. आआप ६०% पेक्षा जास्त जागांवर पुढे आहे. बहुमतापासून १० जागा लांब.
२. भाजपची कामगिरी निराशाजनक. २०१३ मधील कामगिरीच्या ६०% च जागा पक्ष राखत आहे. पक्षांतर्गत भांडणांचा फटका पक्षाला बसत आहे असे दिसते.
३. कॉंग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा बरीच चांगली.
10 Feb 2015 - 8:58 am | नांदेडीअन
सगळ्यात ’ट्रस्टेड’ (पण सगळ्यात स्लो) इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर चार कल आले आहेत आत्तापर्यंत.
10 Feb 2015 - 9:01 am | क्लिंटन
भाजपला जोरदार झटका बसलेला दिसत आहे.जुनी विधानसभा बरखास्त करायला उशीर लावल्याची किंमत पक्ष नक्कीच भोगत आहे.हेच कल चालू राहिले तर भाजपला २० च्या आसपास जागा मिळतील.लोकसभेत पक्ष ६० जागांवर आघाडीवर होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे गणित वेगळे असले तरी ६० पासून २० म्हणजे जोरदार आपटी पक्षाने खाल्लेली दिसत आहे.
10 Feb 2015 - 9:03 am | स्वामी संकेतानंद
बरखास्त करायला उशीर करणे आणि किरन बेदी ह्यांना पुढे करणे दोन्ही कारणांचा फटका बसला.
10 Feb 2015 - 9:02 am | स्वामी संकेतानंद
अजूनही बरंच काही घडू शकते. उलटफेर होऊ शकते. पण हा शेर आठवला.
सामने तन के जिस दिन खडी हो गई
एक पर्वत से राई बडी हो गई
-- किशन तिवारी
10 Feb 2015 - 9:05 am | नांदेडीअन
सध्याचे कल
AAP 31
BJP 17
Congress 2
Total TV
10 Feb 2015 - 9:06 am | नांदेडीअन
किरण बेदी मागे पडल्या.
10 Feb 2015 - 9:06 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ५०
आआप: ३५ (+१३)
भाजप: ११ (-११)
कॉंग्रेस: ४ (-१)
इतर: ० (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आतापर्यंतचे चित्र--
१. आआप बहुमताच्या सीमेवर. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री नक्कीच होणार.पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असे दिसते.
२. भाजपला प्रचंड मोठा झटका. कामगिरी निराशाजनक. भाजप वीसपेक्षा आत आटपणार असे दिसते.
आम आदमी पक्षाचे अभिनंदन आणि अरविंद केजरीवालांना शुभेच्छा. यावेळी आक्रस्ताळेपणा न करता कारभार करावा ही अपेक्षा.
10 Feb 2015 - 9:09 am | विकास
किरण बेदी पिछाडीवर?
10 Feb 2015 - 9:15 am | नांदेडीअन
भाजप 09
आप 38
कॉंग्रेस 02
ABP News
10 Feb 2015 - 9:15 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ५६
आआप: ४२ (+१७)
भाजप: ११ (-१३)
कॉंग्रेस: ३ (-३)
इतर: ० (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
आम आदमी पक्षाने ३५ चा आकडा पार केला आहे.भाजपने आता मागच्या वेळी जिंकलेल्या अर्ध्यापेक्षाही कमी जागांवर आघाडी आहे.
किरण बेदी आणि अजय माकन हे दोघेही पिछाडीवर आहेत. तर अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. कृष्णानगर हा भाजपचा अगदी सर्वात सुरक्षित मतदारसंघ होता.१९९८ मध्येही भाजपने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघातून भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच मागे असणे म्हणजे अमेठीतून राजीव गांधी पिछाडीवर असल्यासारखे झाले.भाजपची कामगिरी १९९८ पेक्षा इतकी झाली तरी खूप झाले.
10 Feb 2015 - 9:15 am | अर्धवटराव
:)
केजरीवालांवर खुन्नस खाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा केंद्राने, विशेषतः मोदिंनी, केजरीसाहेबांना उत्तम सहकार्य करावं अशी भाबडी इच्छा आहे... चान्सेस कमि आहेत पण :(
10 Feb 2015 - 9:16 am | ऋषिकेश
टाइम्स नाउ वर भाजपा एक आकडी तर आआप ३० वर आघाडी आहे!!!!
याचे पाप मोदींच्या माथी मारता येऊ नये म्हणून बेदींना मध्ये घातल्याची चाल त्या अर्थाचे कदाचित मोदींसाठी फेससेव्हर ठरली तरी पक्षासाठी इतके खासदार, स्वतः मोदी मैदानात प्रचाराला उतरूनही झालेला हा पराभव भयंकर नामुष्कीचा आहे!
गुजरात विधानसभेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मोदीं विरूद्ध राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष (राहुल, सोनिया, पंतप्रधान वगैरे)प्रचंड प्रमाणात प्रचारात उतरले असूनही एकटे मोदी हिरो म्हणून राजकीय प्रतलावर उभारले गेले. दिल्लीत त्याचीच पुनरावृत्ती होतेय फक्त भाजपा आता दुसर्या बाजूला आहे.
10 Feb 2015 - 9:18 am | क्लिंटन
भाजपला ११ जागी आघाडी दिसत आहे त्यापैकी एक जागेवर (राजौरी गार्डन) शिरोमणी अकाली दल आघाडीवर आहे. म्हणजे खुद्द भाजपला १० जागांवरच आघाडी आहे. भाजप १९९८ पेक्षाही मागे पडणार म्हणजे भाजपचा धुव्वा उडाला असे म्हणायला हवे.
10 Feb 2015 - 9:24 am | क्लिंटन
मी राजकारण फॉलो करायला सुरवात केली तेव्हापासून (१९८९) मी दिल्ली हा भाजपचा हक्काचा बालेकिल्ला आहे असे समजतच मोठा झालो होतो.१९८९ मध्ये ७ पैकी ४, १९९१ आणि १९९६ मध्ये ७ पैकी ५, १९९८ मध्ये ७ पैकी ६ आणि १९९३ मध्ये विधानसभेत ७० पैकी ४९ जागा अशी पक्षाची कामगिरी होती.नंतर कळले की १९६७ मध्येही जनसंघाने दिल्लीत ७ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या. एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी नवी दिल्लीतून निवडून गेले होते.या पार्श्वभूमीवर १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे भाजपबरोबरच माझ्या या विश्वासालाही बसलेला मोठा धक्का होता. १९९९ मध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी ७ जागा जिंकल्या तेव्हा वाटले की १९९८ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे एक अपवाद होता.पण नंतरच्या काळात मात्र माझ्या त्या कल्पनेला पूर्ण तडा गेला.तेच अजूनही चालू आहे असे दिसते.
10 Feb 2015 - 9:25 am | ऋषिकेश
आआपला ५०% हून अधिक मते आहेत असे म्हटले जातेय
तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे
एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही
10 Feb 2015 - 9:33 am | विकास
तसे असेल तर तिरंगी लढतीत अशी मते मिळणे ऐतिहासिक आहे
तिरंगी कसली? काँग्रेस गेल्या विधानसभेपासूनच लांब गेली आहे. तरी देखील ५०% हून अधिक मते मिळणे नक्कीच स्पृहणीय आहे. पण तिरंगी म्हणवत नाही.
एकूणच भाजपाच्या एकट्या केजरीवालांना टारगेट करणार्या पर्सनल, भडक नी आक्रस्ताळ्या भाजपीयांच्या सोशल मिडीयावरील (प्रसंगी बिलो द बेल्ट) प्रचाराला दिल्लीकरांनी धूप घातलेली दिसत नाही
सहमत. यात अजून असे देखील म्हणेन की किरण बेदींना घेण्याचा मास्टरस्ट्रोक ठरला नाही... मागच्या वेळेस हर्ष वर्धन यांची उमेदवारी ठरवण्यात वेळ लावला आता बाहेरून आयात केलेले नेतृत्व आणण्याची चूक दोन्हीचा परीणाम तोच. मेक इन भाजपा पेक्षा आयातीचा दुष्परीणाम अधिक झालेला दिसतोय.
10 Feb 2015 - 9:27 am | नांदेडीअन
जो काम करेल, लोक त्याला वोट करतील.
दिल्लीने हे दाखवून दिले आहे.
असभ्य, अभद्र आणि सांप्रदायिक प्रचार करणार्यांना जनतेने धडा शिकवला आहे असंच दिसतंय
कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली, त्यांना सलाम
- संजय सिंह, आप
अजय माकन यांनी राजिनामा दिला.
- बातमी
10 Feb 2015 - 9:27 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ६५
आआप: ४९ (+२२)
भाजप: १३ (-१६)
कॉंग्रेस: २ (-५)
इतर: १ (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
10 Feb 2015 - 9:32 am | ऋषिकेश
योगेंद्र यादव यांचा अंदाज बरोबर येणार की काय?
भारतीय मतदाराला व्यक्तिगत व वैयक्तिक टिका एका मर्यादेपलिकडे आवडत नाही हे २००४ ला काही प्रमाणात सोनियांनी पुन्हा समोर आणलेले सत्य दिल्लीत अधिक प्रकर्षाने जाणवतेय असे म्हणावे काय? भाजपा २००४ पासून फारसा शिकला नाही
10 Feb 2015 - 9:41 am | पिंपातला उंदीर
याचाच व्यत्यास म्हणजे ज्याप्रमाणे मागच्या लोकसभा निवडणुकी पूर्वी ज्याप्रमाणे सोशल मिडिया वर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध अतिशय किळस येईल अशी बदनामी मोहीम राबवण्यात आली तशीच मोहीम यावेळेस अमित शह आणि मोदी यांच्याविरुद्ध चालवण्यात आली . दोघांची अक्षरशः लक्तर काढली गेली . सोशल मिडिया च हत्यार भाजप वरच उलटल . भाजप न जे पेरल ते उगवलं अस म्हणता येईल
10 Feb 2015 - 9:31 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ६७
आआप: ५२ (+२३)
भाजप: १३ (-१७)
कॉंग्रेस: १ (-५)
इतर: १ (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
सुरवातीला अमित शहांनी दिल्लीसाठी ’मिशन ६०’ लॉंच केले होते.बहुदा आआपने ते मिशन बरेच सिरियसली घेतले असे म्हणायला पाहिजे.
10 Feb 2015 - 9:35 am | पिंपातला उंदीर
सरकारी कर्मचारी मतदार मोठ्या संख्येने आहेत असे ३ ते ४ मतदारसंघ आहेत तिथे भाजप पिछाडिवर आहे वेळेवर कचेरीत जाणे , उशिरापर्यंत थांबावे लागणे या कारणांनी त्यांचा मोदी सरकारवर रोष होता म्हणे ,.. आता हसावे कि रडावे
10 Feb 2015 - 9:36 am | राही
संघकार्यकर्त्यांनी कमावले साध्वी-महाराजांनी गमावले.
मफ्लरने कमावले महागड्या कोटाने गमावले.
संघकामाने कमावले बूथ-बंदोबस्ताने गमावले.
रास्वसंने कमावले विहिंपने गमावले.
इ.इ.
10 Feb 2015 - 9:39 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ६८
आआप: ५४ (+२७)
भाजप: १२ (-१८)
कॉंग्रेस: १ (-७)
इतर: १ (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
10 Feb 2015 - 9:45 am | नांदेडीअन
किरण बेदी दुसर्या फेरीतसुद्धा पिछाडीवर आहेत.
10 Feb 2015 - 9:48 am | पिंपातला उंदीर
कुणीतरी किरण बेदी यांच्याबद्दल समर्पक विशेषण वापरल होत . Parachute Leader .
10 Feb 2015 - 9:51 am | नांदेडीअन
तिसर्या राऊंडमध्येसुद्धा किरण बेदी पिछाडीवर. ;)
10 Feb 2015 - 9:52 am | क्लिंटन
आआपच्या झंझावातात भाजप पालापाचोळ्यासारखा उडून गेला असे चित्र आहे. या निकालाचे अन्वयार्थ पुढीलप्रमाणे:
१. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडगोळी अजिंक्य आहे या कल्पनेच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत.
२. एप्रिल-मे २०१४ मध्ये पक्षाला लोकांनी भरभरून मते दिली ती नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान होतील या आशेवर दिली होती. साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या नेत्यांनी लोकांची मते त्यांच्या विचारांना होती असा त्याचा अर्थ घेऊन कट्टर हिंदुत्वाचा प्रचार केला.नरेंद्र मोदींना ही गोष्ट फारशी आवडलेली नाही अशा बातम्या आहेत पण त्यांनी अशा तत्वांविरूध्द तितक्या प्रमाणावर assertiveness दाखविलेला नाही.यातून असा अर्थ निघू शकेल की एकतर नरेंद्र मोदींचा स्वत:चा त्याला पाठिंबा आहे नाहीतर नरेंद्र मोदी जितके बलदंड नेते आहेत हे चित्र उभे केले होते तितके प्रत्यक्षात ते नाहीत-- शेखर गुप्ता एन.डी.टि.व्ही वर बोलताना म्हणाले. नरेंद्र मोदींना ही परिस्थिती बदलायला हवी.
३. बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) मध्ये अंतर्गत भांडणे आहेत.अशा बातम्या आहेत की भाजप जीतनराम मांझींना आपल्या कळपात घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार आहे. दिल्लीचा अनुभव लक्षात घेता अशा बाहेरच्या मंडळींना बरोबर घेणे धोक्याचे आहे हे समजून भाजपने तसे काही करण्यापेक्षा जनता दलात जी काही भांडणे चालू आहेत ती मजा बाहेरून बघावी आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुकांना आपल्याच हक्काच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जावे.
४. आम आदमी पक्षानेही दिल्लीत झाले ते सगळ्या भारतात होईल असे काही समजू नये.त्या अर्थाने दिल्ली बहोत दूर है. पंजाबमध्ये चार लोकसभा जागा जिंकूनही आम आदमी पक्षाने पोटनिवडणुकांमध्ये अनामत रक्कम गमावली होती हे विसरू नये.
10 Feb 2015 - 10:00 am | क्लिंटन
एकूण जागा: ७०
कल उपलब्ध: ७०
आआप: ५९ (+३१)
भाजप: १० (-२२)
कॉंग्रेस: ० (-८)
इतर: १ (-१)
कंसातील आकडे मागच्या वेळेपासूनचा फरक.
भाजप १९९८ पेक्षाही खाली आटपणार असे दिसते. लोकसभेत भाजपला ६० जागांवर आघाडी तर आआपला १० जागांवर आघाडी असे चित्र होते.हे चित्र बरोबर उलटे होणार असे दिसते.या प्रचंड मोठ्या पराभवानंतर भाजपने कारभारात सुधारणा कराव्या ही अपेक्षा. १९८४ मध्ये लोकसभेत मोठा पराभव झाल्यानंतर तीन महिन्यातच रामकृष्ण हेगडेंनी कर्नाटक विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या.दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाला हेगडेंच्या १९८५ मधील विजय हेच एक समकक्ष उदाहरण आहे असे दिसते.एन.डी.टी.व्ही वर तेच म्हटले जात आहे.
कॉंग्रेसला व्हाईटवॉश मिळताना दिसत आहे. कॉंग्रेस मुख्यालयासमोर "प्रियांका लाओ देश बचाओ" अशा घोषणा चालू आहेत.तसे झाल्यास कॉंग्रेसला तात्पुरती का होईना नवसंजीवनी मिळेल आणि राजकारणाला नवे वळण लागेल असे दिसते.
10 Feb 2015 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बहुतांशी लोक अरविंद केजरीवालला वेडा म्हणत होते आज त्यांना नाक नसेल राह्यलं काही बोलायला...
अभिनंदन कजरीवाल साहेब.
-दिलीप बिरुटे
10 Feb 2015 - 10:15 am | ऋषिकेश
+१ केजरीवाल, आआप व दिल्लीकरांचे स्पष्ट बहुमताबद्दल अभिनंदन!
10 Feb 2015 - 10:16 am | टिल्लू
हॅट्स ऑफ टू केजरिवाल !!!
10 Feb 2015 - 10:18 am | क्लिंटन
भाजपने प्रचारात एक मोठी चूक केली.केजरीवालांना टारगेट करून अरविंद केजरीवाल हे नाव कायम प्रकाशझोतात ठेवले.इतकी वर्षे नरेंद्र मोदींना असे टारगेट केल्यामुळे लोक नरेंद्र मोदी हे नाव कधीच विसरणार नाहीत याची तरतूद मोदी विरोधकांनी करून ठेवली होती आणि त्याचा फायदा नरेंद्र मोदींनाही झाला.नेमकी तीच चूक भाजपने केली.म्हणजे आआपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू केजरीवाल आणि भाजपच्या प्रचाराचाही केंद्रबिंदूही केजरीवालच.म्हणजे ही निवडणुक केजरीवालांभोवती फिरत राहिली.आआपला त्याचा फायदा नक्कीच झाला असे दिसते.
10 Feb 2015 - 10:19 am | क्लिंटन
या निकालाला लोकसभा निवडणुकांच्या निकालाशेजारी ठेवले तर काही समान मुद्दे दिसतात:
१. लोकप्रिय नेता असेल तर त्या नेत्याच्या नावावर मते फिरवता येतात.
२. अशा नेत्याने लोकांच्या अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या तर असा नेता सत्तेत असलेल्या सरकारपेक्षा लोकांना अधिक चांगला वाटतो आणि लोक भरभरून मते देतात.
पण त्यानंतर जर नेत्याने स्वत:हून वाढवून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत असे चित्र असेल तर मात्र जनमत ज्या वेगाने त्या नेत्याच्या बाजूने गेले त्याच्या दुप्पट वेगाने त्या नेत्याच्या विरोधात जाऊ शकते.केजरीवालांना काही महिन्यांनी यालाच सामोरे जायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अशा नेत्यांचा पराभव झाला तर नंतर मात्र राजकारणी पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा कितपत वाढवायच्या यावर स्वत: लगाम घालतील.भारतीय राजकारणासाठी ही एक चांगली गोष्ट असेल.
10 Feb 2015 - 10:19 am | क्लिंटन
अर्थात आताचे मॅन ऑफ द मॅच निर्विवादपणे अरविंद केजरीवाल.
10 Feb 2015 - 10:21 am | पिंपातला उंदीर
भाजप का हारल आणि आप का जिंकल -
१) दिल्ली च्या निवडणुकी मध्ये स्थानिक मुद्दे शिवाय राष्ट्रीय मुद्दे पण महत्वाचे होते . मोदी सरकारच्या हनिमून पिरीयड मध्ये भाजप ने महाराष्ट्र , हरियाना आणि इतर निवडणुका पण जिंकल्या . पण आता ९ महिन्यानंतर बरीच धूळ बसली आहे . मोदी सरकार अपेक्षे इतक काम करत नाहीये हि भावना आता हळूहळू देशभर मूळ धरू लागली आहे . त्यामुळे त्याचा फटका भाजप ला बसला .
२) साध्वी , स्वामी , योगी , घरवापसी , लव जिहाद , हा कोळसा जितका कमी भाजपवाले उगाळतील तितक बर . लोकसभे मध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मोदी यांना मत दिली होती . पण मोदी विजयाचा विहिप , बजरंग दल या लोकांनी आता आपल्याला रान मोकळ असा लावला त्यामुळे मध्यममार्गी जनमानस भाजप च्या विरुद्ध गेल .
३) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमित शाह यांनी भाजप ने काळा पैसा वापस आण्याच जे आश्वासन दिल तो एक प्रचारात वजन आणण्यासाठी वापरलेला एक निव्वळ 'जुमला ' होता अस विधान केल . ते भाजप ला जाम भोवल . सोशल मिडीयावर या विधानावरून अमित शाह आणि मोदी यांची जाम टर उडवण्यात आली . आप ने या मुद्द्याचा वापर कौशल्याने करून भाजप निवडणुकीतली आश्वासन पाळण्यात गंभीर नाही हे लोकांच्या मनावर ठसवल .
४) भारतीय लोकांना underdog च आकर्षण असत . आप ने कौशल्याने असे चित्र उभ केल की एकट्या मफलर मन विरुद्ध पंतप्रधान , अर्ध केंद्रीय मंत्रिमंडळ , ४ मुख्यमंत्री , १२० खासदार दिल्लीच्या गल्लीबोळात प्रचार करत आहेत . त्यामुळे एकहाती लढा देणाऱ्या केजरीवाल च्या बाजूने जनमत एकवटले .
५) सोशल मिडिया जिथे भाजप मजबूत होत तिथे पण आप ने बाजी मारली . पंतप्रधान यांनी घातलेला १० लाखाचा सुट वैगेरे मुद्द्यावरून त्यांनी भाजप हा श्रीमंत लोकांचा पक्ष आहे अशी इमेज व्यवस्थित उभी केली .
६) किरण बेदी यांच parachute नेतृत्व . या बाईनी भाजप च्या स्थानिक नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना चांगली वागणूक दिली नाही . नंतर नंतर तर त्यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत व्हयला लागली . आलिया भट ची आणि किरण बेदी ची तुलना करणाऱ्या क्लिपा मोबाइल वर फिरू लागल्या होत्या . या बाई विधानसभेला पडल्या तर ते त्यांच्यासाठीच बर राहील . कारण १० -१२ भाजप विधायकांसोबत त्या विधानसभेत काय करणार हाच प्रश्न आहे .
७) हा पराभव भाजप च 'स्तालीनग्राद ' ठरू नये . कारण मोदी आणि शाह जोडगोळी अजेय नाही हा संदेश लोकांमध्ये आणि विरोधकांमध्ये गेला आहे .
10 Feb 2015 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे
+ १ +
दिल्ली भाजपमध्ये--- विशेषतः स्वार्थी राजकारणामुळे--- जितकी अंतर्गत फूट आहे तितकी ती भारतात इतर कुठल्याच ठिकाणी नसावी. यामुळे छुप्या रितीने मते आपकडे वळवून मुख्यमंत्री उमेदवार बेदी आणि तसा उमेदवार लादणार्या मध्यवर्ती भाजप नेतृत्वाचे नाक कापण्याचे प्रयत्न झाल्यास आश्चर्य नाही. आपच्या भूकंपी विजयामध्ये या वस्तुस्थितीचा सहभाग नक्की आहे.
10 Feb 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
यावरून काही अक्कल शिकण्याइतकी बुद्धी संबद्धीत लोकांत असावी हाच आशावाद !
10 Feb 2015 - 10:22 am | विलासराव
अपेक्षीत निकाल.
भाजपने आता बोगस गप्पा बंद करुन खरच अच्छे दिन कसे येतील ते पहावे. वाचाळपणा करण्यापेक्षा जे काही चांगले करता येण्यासारखे असेल ते करावे. तुमचे तोंड बंद ठेवा,कामाला बोलु द्या.
आंधळ्या समर्थाकांनीही साधक-बाधक विचार करावा. कल्पना आणी वास्तव काय आहे याचा विचार करावा.
आपकडुन मलातरी अपेक्षा आहेत. पाहुया प्रत्यक्ष काय होतय ते.
10 Feb 2015 - 10:25 am | चौकटराजा
मी राजकारण आकडेवारीच्या माध्यमातून न अभ्यासता वर्तनाच्या माध्यमातून पहातो. त्यानुसार राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मायावती, मुलायम सिंग , लालूप्रसाद ,शरद पवार व गांधी घराणे ,जयललिता याना राजकारणात आणून भारतीय मतदारानी वेळोवेळी फार मोठी चूक केली आहे व किंमत मोजली आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे.
आता केजरीवाल हे जिकणार. ममतांसारखे जबरदस्त पणे जिकणार , मोदींसारखी लाट आणून जिंकणार हे नक्की. पंण ही माणसे वरील यादीपेक्षा बरी आहेत असे माझे मत झाले आहे. भारतात केमाल पाशांसारखे नेते होणे ही अपेक्षाच नाही. भारतातील राजकारण वर्ग व्यवस्थेकडे वळविण्या ऐवजी ते वर्ण व जातीव्यवथेकडे कसे जाईल याचीच काळजी १९५० च्या सुमाराला घेतली गेली आहे. सबब इथे प्रत्येक धर्माला सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे वागण्यास वाव मिळाला आहे. हेल्मेट सक्ती सारक्या गोष्टीतही धर्म डोकावलेला आहे तर एकपत्नी पणाची बातच सोडा ! अशा वेळी केजरीवालनी एका समुदायाच्या धर्मगुरूचा पाठिंबा नाकारून इतिहास घडविला आहे. मात्र सिंहासन हे आलीशान असले तरी मुकुट काटेरी असतो याचे भान त्यानाही येईल. त्यावेळी त्यांच्या खरी परीक्षा होईल. मोदी त्या परीक्षेत नापास झाल्याचे दिसत आहे.
10 Feb 2015 - 10:32 am | विलासराव
10 Feb 2015 - 11:18 am | पिंपातला उंदीर
नुकताच Whats App वर आलेला एक विनोद - मोदी यांनी केजारीवालाना फोन करून त्यांच अभिनंदन केल आणि त्यांना आपल्या टेलर चा पण नंबर दिला *lol*
10 Feb 2015 - 10:35 am | क्लिंटन
लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६२, भाजप: ७ आणि इतर: १.
कॉंग्रेसला मागच्या वेळी ८ जागा मिळाल्या होत्या.भाजपा यावेळी आठपेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत हा दैवदुर्विलास दिसतो.
इतक्या प्रचंड विजयाची अपेक्षा खरोखरच कोणीच केली नसेल. तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे.
10 Feb 2015 - 12:36 pm | श्रीगुरुजी
>>> तामिळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक आणि कॉंग्रेस युतीला १९९१ मध्ये २३४ पैकी २२४ आणि द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस युतीला २३४ पैकी २११ जागा मिळाल्या होत्या. ही दोन उदाहरणे वगळता खुल्या आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये ९०% पेक्षा जास्त जागा कुठल्याही पक्षाला मिळालेल्या नव्हत्या.आम आदमी पक्ष जवळपास ९०% जागा जिंकताना दिसत आहे.
१९९१ मध्ये अद्रमुक-काँग्रेस युतीला २३४ पैकी २३३ जागा मिळाल्या होत्या. द्रमुकला मिळालेल्या एकमेव जागेवर करूणानिधी निवडून आला होता. त्या जागेचाही नंतर राजीनामा दिला होता.
२०१० मध्ये बिहार विधानसभेत भाजप-संजद युतीला २४३ पैकी २०६ जागा (८४%) मिळाल्या होत्या.
काही पूर्वोत्तर राज्यांमध्ये स्थानिक पक्षाला ८०% हून अधिक जागा मिळाल्याची उदाहरणे आहेत.
10 Feb 2015 - 12:39 pm | क्लिंटन
आणि हरियाणामध्येही १९८७ मध्ये लोकदल+भाजप युतीने ९० पैकी ८५ जागा जिंकल्या होत्या. तसेच सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंटने ३२ पैकी ३१-३२ जागा २००४ आणि २००९ मध्ये जिंकल्या होत्या.
10 Feb 2015 - 10:40 am | वेल्लाभट
काहीही आहे हे !
अरे मुख्यमंत्री झाल्यावरही लहान मुलासारखा आंदोलनरुपी हट्ट करणा-या, पुढे सत्ता सोडणा-या अविचारी माणसाला कसं काय बहुमत मिळू शकतं? कमाल आहे.
महाराष्ट्रात टोकाचे का होईना पण सुविचार मांडणा-या नेत्यालाही पूर्ण बहुमत न मिळावं; याचं कुठेतरी वाईट वाटतं.
आता बघूच. किती दिवस टिकतंय आणि काय करतंय.
10 Feb 2015 - 10:48 am | नांदेडीअन
लाखो दिलों की धडकन और आदर्श विनोद कुमार बिन्नी ९००० मतांनी पिछाडीवर आहेत.
10 Feb 2015 - 10:52 am | वामन देशमुख
आआपचे अभिनंदन, केजरीवाल आतातरी शहाणपणाने वागतील ही अपेक्षा.
काँग्रेसी गवत उपटून टाकल्याबद्धल दिल्लीवासीयांचे अभिनंदन.
मोदी-शहा-भाजपचे सांत्वन, बिहारसाठी शुभेच्छा!
10 Feb 2015 - 10:52 am | प्रसाद१९७१
जाम खूष झालो मी. गेल्या ५ वर्षात भारतातले मतदार खूपच बदलले आहेत आणि त्याचे थोडे श्रेय केजरीवाल ला पण आहेच.
10 Feb 2015 - 10:54 am | भुमन्यु
अरविंद केजरिवाल आणि आपचे हार्दिक अभिनंदन!!! जे लोकसभेत मोदींसाठी झालं तेच आज आप साठी झालं... संपुर्ण बहुमत. ह्यातुन जनतेचखुप मोठ्या अपेक्षाच दिसुन येतात..
पुढिल ५ वर्षांसाठी हार्दिक शुभेच्छा
10 Feb 2015 - 10:57 am | जयंत कुलकर्णी
श्री केजरीवाल आता दिलेल्या वचनांची पुर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागतील. ती मिळाली नाही की त्यांच्या नावाने ओरडतील. आता बिहारमधे तेच चालले आहे.... कालच्या लोकसत्तेतील अग्रलेख वाचावा. जनतेला "फुकट काही मिळत नसते'' हे जेव्हा कळेल तो सुदीन. अर्थात ते कळणार नाही हेही निश्चित... :-) पण भाजपने कटू असले तरी अर्थशास्त्र दोरीवर वाळत टाकू नये. नाहीतर अर्थव्यवस्थेची वाट लागलीच समजा...... आणि त्यांना धडा मिळाला हेही एका अर्थाने बरेच झाले असे मला वाटते....
10 Feb 2015 - 10:59 am | अर्धवटराव
प्रखर हिंदुत्वाचा वाचाळपणा, मोदिंनी दिलेली अवास्तव आश्वासनं, निगेटीव्ह प्रचार, किरण बाई... इ. सर्व घटक मिळुन सुद्धा आप ला ६२ जगांचा पुश देऊ शकत नव्हत्या. मग उरलं एकच कारण... लोकांना यंदा केजरीवाल सीएम म्हणुन हवा'च' होता. भाजपला इतक्या कमि वेळात प्रतिकेजरीवाल तयार करता आला नाहि ( ते फारसं शक्य देखील नव्हतं) अन्यथा केजरीवालशिवाय आपलं काहि अडत नाहि हा विश्वास तरी वाटायला हवा होता लोकांना... ते ही नाहि जमलं मोदिंना.
आता जे मोदिंबद्दल खरं तेच केजरीसाहेबांबद्दलही. त्यांनी जेव्हढी वचनं दिली त्याच्या वास्तवीक शक्यतेएव्हढं काम केलं तरी पुरे.
अभिनंदन एण्ड ऑल द बेस्ट केजरीवालजी.
10 Feb 2015 - 11:04 am | क्लिंटन
लेटेस्ट आकडे आहेत आआप: ६६, भाजप: ३ आणि इतर: १.
आम आदमी पक्ष एकटाच ७० जागा जिंकणार आणि इतर सगळ्यांचा व्हाईटवॉश करणार की काय? इतके प्रचंड बहुमत मिळणेही वाईट.
10 Feb 2015 - 11:04 am | आदित
केजरीवाल यांनी निवडणूकीअाधी त्या ४९ दिवसानंतर दिलेल्या राजीनाम्याबद्दल जनतेची माफी मागितली अाणि जनतेने त्यांना एक चान्स दिला. याबरोबरच बीजेपीची अांधळी-कोशिंबीरही कारणीभूत अाहे. त्यापलीकडे याला महत्त्व देणं म्हणजे बेडकीला बैल केल्यासारखे अाहे. केजरीवाल अाता डोेकं ताळ्यावर ठेवून काम करतील ही अपेक्षा...
पण ले़फ्टीस्ट मिडिया अाणि अापवाले यातून अाक्रस्ताळेपणाचं प्रदर्शन करतील हेही नक्की...
10 Feb 2015 - 11:10 am | ग्रेटथिंकर
भाजपाला दणदणीत ४ जागा मिळत आहेत, श्रीगुरुजींचे दणकून हाभिनंदन :ROFL:
10 Feb 2015 - 11:37 am | मृत्युन्जय
खांग्रेसला एकही नाही. तुमचेही अभिनंदन.
बाकी इतका कुजकटपणा नाही हं करायचा. तुम्हाला देवबाप्पाने शिक्षा दिली बरे. भाजपाच्या जागा तुम्ही सांगितल्यापेक्षा ५०% ने वाढलेल्या दिसत आहेत आता. ६ जागांवर पुढे आहे. हाहाहाहा.
नमो आणी अमित शहांचा अवाजवी भपकेपणा नडला त्यांना.
10 Feb 2015 - 12:40 pm | श्रीगुरुजी
तुमचंही अभिनंदन नानासाहेब (काँग्रेसला भोपळा मिळाल्याबद्दल)!
आज तुमच्या घरावर लाईटिंग असेल ना आणि तुम्ही आणि माई ठेवणीतला कोट-टोपी, पैठणी, नथ वगैरे घालून सत्यनारायण घालणार असाल ना!!!
:YAHOO:
10 Feb 2015 - 12:42 pm | मृत्युन्जय
म्हणजे अर्धांग कोट आणी अर्धांग पैठणी असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला गुर्जी?
10 Feb 2015 - 11:12 am | सुबोध खरे
आप निवडून येत असताना शेअर बाजार २५०/७५ (सेन्सेक्स/ निफ्टी) ने वर आहे हे कशाचे द्योतक आहे?
10 Feb 2015 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे
दिल्लीच्या "स्थानीक" निवडणूकीचा शेअर बाजारावर फारसा परिणाम पडत नाही. गेले काही दिवस (आणि विशेषतः काल) खाली गेलेल्या किंमतींमुळे स्वस्त झालेल्या समभागांची खरेदी होत असल्याने बाजार वर गेला आहे.
10 Feb 2015 - 11:14 am | मित्रहो
अरविंद केजरीवालांचे अभिनंदन
व्होट शेअर बघितला तर भाजपाचा व्होट शेअर फार कमी झालेला नाही आहे. तो अजूनही ३२.५% जवळ जवळ आहे. संपूर्ण निकालानंतर निश्चित आकडे कळतील. म्हणजे इतरांनी एकगठ्ठा आआपला मतदान केले. काँग्रेस फकत ८% वर घसरली आहे सध्यातरी.इतरही मागे सरले.
७० पैका ६५ जागांवर निवडून आल्यावर अपेक्षा पूर्ण करणे कठीण असते.
10 Feb 2015 - 11:28 am | आनन्दा
मी खरे तर निकाल आल्या आल्या पहिला प्रश्न मित्राला हाच विचारला होता. व्होटे शेअर काय आहे? काँग्रेसने आपली सागळी ताकद 'आप'च्या मागे उभी केली आहे असे सकृतदर्शनी दिसत आहे.
बाकी क्लिंटनसारख्या जाणकारांच्या विश्लेषणाच्या प्रतीक्षेत.
10 Feb 2015 - 11:36 am | आनन्दा
http://zeenews.india.com/delhi-assembly-elections-2015/results#Voteshare
10 Feb 2015 - 12:07 pm | मित्रहो
चित्र भयंकर बदलेय
आआप 73% गेल्या कित्येक वर्षात हे दिसले नव्हते
भाजपा १९.४
इतरांचे हाल विचारुच नये. म्हणजे ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत भाजपाल मत दिले तेही आता आआपकडे वळले. याचे कारण फक्त बेदी नाहीत. ही विचार करण्यसारखी गोष्ट आहे.
10 Feb 2015 - 3:50 pm | आनन्दा
नाही हो. ती लिन्क गंडली होती बहुतेक. आता लेटेस्ट पहा. काँग्रेसने आपला वॉकओव्हर दिला आहे असेच दिसते.
10 Feb 2015 - 11:22 am | गणेशा
हा फक्त प्रामाणिक पणाचा विजय नसुन एका विश्वासाचा हे विजय होणार आहे.
आणि जनतेनेही लगेच एका दिवसात कांडी फिरावी तशी अपेक्षा करु नये. या वेळॅस अरविंद केजरीवाल यांनी योग्य रीतीने प्रचार केला आणि मुद्देसुद प्रचार केला या बद्दल अभिनंदन.
भारतीय राजकारणात मुद्देसुद प्रचार करुन आपले विचार जनते पर्यंत योग्य पोहचवु शकतो हे अरविंद जींनी दाखवुन दिले.
त्यांचे अभिनंदन. आणि एक खास झाले कॉन्ग्रेस ए प्रचारात न उतरवुन आप ला मदत केली असे म्हणण्याची सोय ही आप ने मागे ठेवली नाही हे बरे झाले.
10 Feb 2015 - 11:22 am | विजुभाऊ
भाजप इतक्या कम्मी जागा घेईल असे कुणालाच वाटले नव्हते भाजप ४ , आ आ पा. ६४.
भाजपला दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहिय्येत.
जिंकले तर मोदी हरले तर बेदी.........ही भाजपची तयारीच सांगत होती की त्यांचे काय होणार आहे ते.
10 Feb 2015 - 11:23 am | स्वधर्म
अापला छप्पर फाडके विजय मिळाला. मतदारांनी भाजपला चांगलाच धडा शिकवला.
- मतदारांनी निश्चितपणे प्रस्थापितांना नाकारलेले दिसते. मोदींच्या तथाकथित प्रतिमेचा काहीच परिणाम झाला नाही. अाप ही अाम अादमीला केंद्रस्थानी ठेवणारा पक्ष निवडून अाला.
- अापचा विजय हा नव्या प्रकारच्या राजकारणाला दिलेली पसंती होय. त्याांनी राजकारणाचे नियमच बदलून टाकले. अाता इतर पक्षांनाही याच नियमांवर काम करावे लागेल. देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दिलासादायक अाहे.
- केजरीवाल अाणि मंडळीना अाता ‘अराजक माजवणारे’ या प्रतिमेला पुसून काढेल असे काम करावे लागेल.
- स्वधर्म
10 Feb 2015 - 11:30 am | अर्धवटराव
नाहि. अगदी लोहिया वगैरे मंडळींपासुन ते नितीशकुमारने लालु यादवला पराजीत करेपर्यंत हेच कौतुक चालत आलय. डाव्यांना बंगालमधे पाणि पाजणार्या ममताबाईंना देखील असच मखरात बसवलं गेलं होतं.
10 Feb 2015 - 11:51 am | स्वधर्म
प्रचाराच्या सांगतेदिवशी केजरीवाल यांना सकाळी टीव्हीवर दाखवले. तो माणूस एका साध्या सलून दुकानात केस कापायला गेला. मोदी, फडणवीस, पवार, भुजबळ, ठाकरे यांचं नख तरी सामान्य माणसाला दिसतं का कधी? एकदा मुख्यमंत्री होउन गेलेला माणूस कधी असा अॅप्रोचेबल पाहिला अाहे काय?
- स्वधर्म
10 Feb 2015 - 8:17 pm | अर्धवटराव
स्वतः फडणवीस, शिवराजसींग चौहान, पर्रिकर, स्व. साहेबसिंग वर्मा, लालु यादव... इतरही अनेक आहेत.
मुख्यमंत्री होऊन गेलेला माणुस जर सामान्यांप्रमाणे सलुनमधे जाताना दिसला तर तो नवीन ट्रेण्ड सेटर कसा बनतो हे कळलं नाहि. असो.
10 Feb 2015 - 10:43 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो तो फडणवीस मुलीच्या शाळेत साधेपणाने गेला हे पाहीले नव्हते का? त्याची बायको साधेपणाने आर टी ओ च्या रांगेत जाऊन उभी राहीली माहीत नाही का? नाहीतर लगेच केजरीवाल यांची बायको रांगेत उभी राहीली की त्यांच्या साधेपणाचे ढोल वाजणे चालू होईल म्हणून आधीच नोंदवून ठेवले. साधेपणाने.
10 Feb 2015 - 11:30 am | पिंपातला उंदीर
मागच्या वेळेस कॉंग्रेस ची आमदारसंख्या बघून इंनोवात मावतील अशी हेटाळणी केली गेली होती . आता भाजप चे आमदार रिक्षात बसून जातील बहुतेक . भाजप समर्थक ह. घेणे *biggrin*
10 Feb 2015 - 11:35 am | जयंत कुलकर्णी
डबलसीट गेले नाहीत म्हणजे मिळवले....
10 Feb 2015 - 11:35 am | पिलीयन रायडर
मला राजकारणातलं अजिबात म्हणजे अजिबात काहिही कळत नाही, तरीही एक प्रतिसाद द्यायची खुमखुमी आहेच..
आप निवडुन येणार हे तसंही कळालं होतंच.. किरण बेदी हा सगळ्यात मोठा गाढवपणा होता.. केजरीवाल की किरण बेदी असं मला विचारलं असतं तर मी सुद्धा कदाचित केजरीवालांना निवडलं असतं..
असो..
मागच्या वर्षी सुद्धा केजरीवालांना पहिल्याच फटक्यात चांगल्या जागा मिळाल्या होत्या, ते मुख्यमंत्री सुद्धा झाले..
ह्याही वर्षी त्यांना दणकुन जागा मिळाल्या आहेत. फक्त मागच्या वर्षी त्यांची प्रतिमा ही "अत्यंत स्वच्छ, पारंपारिक राजकारणापेक्षा वेगळं काहीतरी देणारा पक्ष, शिकल्या - सवरल्या, जाणत्या लोकांचा पक्ष" वगैरे होती. ती तशी फारशी आता रहिली नाहीये... नसावी.. केजरीवाल माणुस किती घोळ घालु शकतो हे त्यांनीच मागच्या १ वर्षात दाखवलय.. आप आता "अजुन एक राजकीय पक्ष" म्हणून निवडुन आला असावा.. अजुन एक नेहमीचीच निवडणुक झालीये, अजुन एक "राजकारणी"च निवडुन आलाय.. मला तरी फार काही वेगळं घडेल असं वाटत नाहीये.. फक्त गोष्टी फुकट वाटणे आणि काही झालं की धरणं धरणे हे दोन वैताग पुढे कमी व्हावेत अशीच इच्छा...
(* - मला वाटतं म्हणुन मी लिहीलं.. का वाटलं असं? ह्याला उत्तर नाही.. म्हणून मी माझी मत तुम्हाला पटवुन द्यायला बांधील नाही.. वसावसा अंगावर येऊ नये..)
10 Feb 2015 - 11:41 am | वेताळ
जाम खुश...मुफ्त पाणि,मुफ्त वीज,मुफ्त वायफाय,मुफ्त घर.......मुफ्त जेवन देणार असेल तर दिल्लीला राहायला जाणार आम्ही.........
10 Feb 2015 - 12:04 pm | ऋषिकेश
मला प्रचंड मजा येतेय! फेसबुकपासून, व्हॉट्सअॅपपासून काही परिचितांपर्यंत अनेकजण जे गेले काही आठवडे अव्याहत स्पॅमिंग करत होते आज भुमिगत झालेत!
त्यातील काही वीर ते धाडस करताहेत त्यांपैकी भयाण विनोदाची झालर चढवण्यात व्यग्र आहेत तर काही हे शासकीय कर्मचार्यांना वेळेवर हाफिसात यायचे नव्हते म्हणून झाल्याचे सांगण्यात! आणि हे बचावात्मक तोकडे प्रयत्न तर अधिकच करूण भासत आहेत!
५०%हून अधिक मते तिरंगी लढतीत मिळवणे, ९०% च्या आसपास जागा जिंकणे! वॉव! काय मॉस्टरस विजय आहे! आआपच्या नियोजनाला हॅट्स ऑफ!
३०-३२% मतांसह विजय मिळवल्यानंतरही जग जिंकल्याच्या थाटात काही इंच छाती वाढवणार्यांना, दिल्लीकरांनी काँग्रेसमुक्त विधानसभेत फार जागा ठेवलेली नैय्ये!
बेसिकली, मला फारच मजा येतेय!
10 Feb 2015 - 12:08 pm | असंका
हाहाहा!!!
मलाही..अगदी गुदगुल्या वगैरे होत अस्ल्यासारखा हस्तोय सकाळपासून!!
आज तरी मजेचा दिवस आहे!!
10 Feb 2015 - 12:09 pm | विलासराव
मलाही मजा येतेय बर्यापैकी.

त्यात ही भर
10 Feb 2015 - 12:05 pm | क्लिंटन
या प्रचंड मोठ्या विजयातून असे स्पष्ट दिसते की मी जे काही आडाखे बांधले होते ते चुकले.
मतदानाची टक्केवारी मी अजून बघितलेली नाही.तरीही असे दिसते की दिल्लीत दुरंगी लढत झाली.कॉंग्रेस जागा घेणार नाही तरीही १०-१२% मते घेईल असे वाटले होते.तसे झाले असायची चिन्हे कमी. आघाडीच्या दोन पक्षांना ८५-९०% च्या आसपास मते मिळणे याला दुरंगी लढत म्हणता येईल.भाजपने २०१३ च्या तुलनेत फार मते गमावली नसतील (कदाचित आणखी मते मिळवली सुध्दा असतील) अशी माझी ’हंच’ आहे.पण कॉंग्रेस समर्थकांनी आपला पक्ष जिंकणे शक्य नाही हे लक्षात घेऊन एकगठ्ठा आआपला मतदान केले असे दिसते.त्याचप्रमाणे बसपाने २००८ मध्ये १४% आणि २०१३ मध्ये ५.५% मते घेतली होती त्यापैकी बरीचशी मते आआपला गेलेली असावीत असे दिसते.म्हणजेच मला वाटत होते की आआप ५०% पेक्षा जास्त मते मिळवू शकणार नाही असे वाटत होते ते चुकीचे ठरलेले दिसते.दुरंगी लढतीत जर आघाडीवर असलेल्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षापेक्षा १५% पेक्षा जास्त मतांची आघाडी असेल तर पहिल्या क्रमांकावरील पक्ष असा जबरदस्त स्वीप करू शकतो. म्हणजे आआपला ५०-५१% आणि भाजपला ३५-३६% मते असतील तर आआप ९०% जागा नक्कीच जिंकू शकतो. म्हणजे कॉंग्रेस आणि बसपा आआपची मते खातील आणि आआप ५०% ओलांडू शकणार नाही हा माझा अंदाज चुकला.
10 Feb 2015 - 12:49 pm | श्रीगुरुजी
एका वाहिनीवरील वृत्तानुसार मतांची टक्केवारी अशी आहे. (कंसात डिसेंबर २०१३ मधील मतांची टक्केवारी)
आआप - ५४% (२९.९%), भाजप - ३२% (३४.५%) आणि काँग्रेस - ८% (२४.५%)
भाजपची सुमारे २.५०% मते कमी झालेली दिसताहेत. मतांच्या टक्केवारीत भाजपला फारसा फटका बसलेला दिसत नाही.
आआपला तब्बल २४-२५ टक्के मते जास्त मिळाली. त्यातील १६-१७ टक्के मते काँग्रेसकडून आलेली दिसताहेत. इथेच मुख्य फरक पडला.
दुसर्या एका वाहिनीवरील चर्चेत सांगण्यात आले त्यानुसार काँग्रेसने आआपला वॉकओव्हर द्यायचे ठरविले होते. त्यामुळे त्या पक्षाने फारसा प्रचार केलाच नाही व पैसेही हात राखून खर्च केले. बर्याच झोपडपट्ट्यात काँग्रेसचे एकही पोस्टर नव्हते व तिथले कार्यकर्ते आआप उमेदवाराचा प्रचार करत होते. भाजपचे नाक कापण्यासाठी आपली स्वतःची स्पेस आआपला व्यापून देणे ही काँग्रेसची घोडचूक ठरेल.
11 Feb 2015 - 12:05 am | गणेशा
का मी खाली बोलतो ते का असु शकत नाही.
कॉन्ग्रेस ची १० % वोट भाजप ला गेले आणि भाजपचे ११ % आप ला गेले . म्हणजेच भाजपचे पण पारंपारिक लोक आप कडे वळलेच नाहीत असे ठोस आपण बोलु शकत नाही.
आकड्यांचय खेळात हे चालते,
10 Feb 2015 - 12:19 pm | बॅटमॅन
काय दणका तेच्यायला. दिल्लीचा मोदी झाला केजरीवाल. एकच नंबर. आतातरी बीजेपीचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे.
10 Feb 2015 - 12:23 pm | पिंपातला उंदीर
बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग
10 Feb 2015 - 12:33 pm | दुश्यन्त
केजरीवाल आणि आप यांचे अभिनंदन आणि शुभेछ्चा! अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी आपने या निवडणुकीत केली आहे. हा भाजपला मोठा झटका आहे, मोदी सरकराने जनतेची कामे करायला सुरुवात करावी नुसती भाषणबाजी उदंड झाली आणि हो 'जीता तो मोदी , हारा तो किरण बेदी' असे चालणार नाहि. मोदींच्या ९ महिन्याच्या कारभाराची दिल्लीकर जन्तेने दिलेली ही पोचपावती आहे. इथून पुढे तरी प्रधानसेवक उठसुठ राज्याराज्यात फिरून विरोधकांना 'बाजारू, नक्षलवादी बना' असा पोरकट प्रचार करून पदाची शान घालवणार नाहीत अशी आशा करुयात.नकारात्मक प्रचार करायचा, हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरण करायचं या सगळ्यांना लोकांनी एक सणसणीत चपराक दिली आहे.
काल दुसर्या एका धाग्यावर लिहिलेलं इथे परत डकवतो..
दिल्ली राज्य लहान आहे (पूर्ण राज्याचा दर्जा पण त्याला नाही). केंद्र शासित प्रदेश, महानगरपालिका आणि दिल्ली राज्य सरकार अश्या ३ पातळ्यावर दिल्लीचा कारभार चालतो तरीपण दिल्लीसाठी मोदी /शहा यांनी खूप जोर लावला कारण राज्य लहान असले तरी देशाची राजधानी आणि इथल्या मिडीयामुळे चर्चेत राहते आणि देशभर इथल्या घटनांचा परिणाम पडतो, दखल घेतली जाते (डिसेंबर २०१३ मध्ये भाजपने मप्र, छत्तिसगढ, राजस्थान जिंकले मात्र चर्चा जास्त झाली ती दिल्लीतल्या आपच्या जागांची!). दिल्लीत अपयश आले तर देशभर प्रतिसाद उमटणार आणि लोकसभा २०१४ नंतर उधळलेला वारू रोखला जाणार या भीतीने मोदी/ शहा आणि त्यांची फौज केजरीवर तुटून पडली (खरे तर महाराष्ट्रात त्याला थोडा ब्रेक लागलाच होता मात्र आधी एनसीपीबरोबर मिलीभगत उघड झाल्यावर पब्लिकने केलेल्या छीथुमुळे यांनी सेनेला बरोबर घेवून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला) . दुसरे असे कि केजरीवाल कसा का असेना प्रामाणिक आहे आणि जिद्दी आहे. शहरी सुशिक्षित मध्यमवर्ग आपकडे खेचला गेला होता, लोकसभेत परत तो भाजपकडे वळाला. मोदींचा कारभार आहे असाच चालत राहिला तर परत हा वर्ग केजरीवालकडे आशेने पाहू शकतो हे भाजपचे चाणक्य जाणून आहेत म्हणून ते आणि त्यांची फौज केजरीला टार्गेट करत आहेत. यांचा प्रचार काय तर मफलरवाला, खुज्लीवाल, अनार्कीस्ट वगैरे वगैरे आणि काही मोदिभक्त फेबुवालवर आप कसा देशद्रोही आहे, आपला मुस्लिम देशातून (पाक, सौदी) फंडिंग होते याच्या 'मनघडंत' कहाण्या रंगवत आहेत. प्रतिस्पर्धी आटोपत नसेल तर हिंदू- मुस्लिम अस ध्रुवीकरण करायची भाजपची जुनीच सवय आहे मात्र केजरीवाल दिल्लीतल्या सर्व समाज घटकांत लोकप्रिय आहे उद्या जर आप बहुमताने जिंकली आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाला तर तो आपल्याला नडणार हे भाजपेयी जाणून आहेत आणि म्हणून केजरीवर इतके तुटून पडत आहेत.
10 Feb 2015 - 12:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बरोब्बर बोललास रे दुश्यन्ता.
भाजपावाले जेवढे अरविण्दला टार्गेट करतील तेवढी त्यांची मते कमी होतील.गेल्याच वर्षी येथेच मिपाकरांनी अरविंदची यथेच्छ टिंगल केली होती."आप" संपला म्हणून पेढे वाटायचे बाकी ठेवले होते.
ह्या निकालातून सगळेच काही ना काही शिकतील अशी अपेक्षा.
10 Feb 2015 - 12:51 pm | श्रीगुरुजी
आआप ही खाप पंचायत आहे आणि केजरीवाल खोटारडा आहे असे तू सुद्धा मागील वर्षी म्हणत होतास की रे माईसाहेब. आता टोपी बदललीस का रे?
10 Feb 2015 - 12:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अरु व त्याच्या पक्षाचे अभिनंदन.
सकाळपासूनच चहा,आरारूट बिस्किटे,गुड-डे बिस्कीटे खात टी.व्ही.बघणे चालु होते.अरू व त्याचा पक्ष सत्तेवर येणार हे भाजपा-अध्य़़क्ष-अमितच्या बोलण्यातून जाणवत होते.गेल्या आठवड्यातच 'दिल्ली निकालांचा व केण्द्र सरकारच्या कामगिरीचा संबंध लावू नये' असे तो म्हणाला होता.
किरण बेदी ह्यांना पक्षात घेऊन मोठी घोडचूक केली.आता "आमची मते कमी झाली नाहीत' असे भाजपावाले म्हणत आहेत. हे म्हणजे- मला परी़क्षेत कमी मार्क्स मिळाले पण माझा विषयाचा अभ्यास पक्का होता' म्हणण्यासारखे.
10 Feb 2015 - 12:42 pm | पिंपातला उंदीर
अरू व त्याचा पक्ष
*lol* *LOL*
10 Feb 2015 - 12:59 pm | पिशी अबोली
किरण बेदी 'ह्यांना'????
आप जिंकल्याचा एवढा परिणाम की चक्क माई लोकांना आदरार्थी सम्बोधू लागल्या????? :-D
10 Feb 2015 - 12:37 pm | दुश्यन्त
बाकी भाजप ला इतक्या कमी जागा मिळाल्या तर त्याना विरोधी पक्ष नेते पद पण मिळणार नाही म्हणे . लैच धुव्वा उडाला मग
७ पेक्षा तरी आम्ही भाजपला विरोधी पक्ष नेतेपद देवू असे कुमार विश्वास म्हणत आहेत . भाजपने पण यातून बोध घ्यावा. लोकसभेत झाला एवढा पोरखेळ खूप झाला आता कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद द्यावे. एवढे पण घाबरू नये आणि प्रधान सेवकांनी सभागृहात आपली उपस्थिती वाढवावी
10 Feb 2015 - 12:43 pm | पिंपातला उंदीर
इथेच उद्धट भाजप नेतृत्व आणि आप मधला फरक कळतो . बाकी सत्या फिल्म मधला एक भारी संवाद आहे . "मौका सबको मिलता है ."
10 Feb 2015 - 12:50 pm | टिल्लू
किरण बेदीची सिट गेली. शोक्क्ड!
10 Feb 2015 - 1:15 pm | गणेशा
हो .. वाटले नव्हते ही सीट जाईन.
जसे टीव्ही वर निकाल + आघाडी दाखवतात, तसे नेट वर कोणत्या साईट वरती असे दिसेल.
मी साईट बघतोय पण तसे टीव्ही सारखे कुठेच दिसत नाहिये
10 Feb 2015 - 12:51 pm | नांदेडीअन
किरण बेदी हारल्या म्हणे !
10 Feb 2015 - 12:53 pm | क्लिंटन
किरण बेदींचा कृष्णानगरमधून पराभव झाला अशी पी.टी.आय ची बातमी आहे असे आताच एन.डी.टि.व्ही वर जाहिर केले गेले आहे. ही जागा भाजपच्या हर्षवर्धन यांनी गेल्या वेळी ३७% आघाडीने जिंकली होती.भाजपने ही जागा कधीच गमावली नव्हती.याचाच अर्थ असा किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून आणणे पक्षावर जोरदार बॅकफायर झाले आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेले दिसत नाही.अन्यथा इतकी सुरक्षित जागा गमावणे शक्य वाटत नाही.
10 Feb 2015 - 12:58 pm | श्रीगुरुजी
जबरदस्त विजयाबद्दल केजरीवाल आणि आआपचे अभिनंदन आणि शुभेच्छा! या निवडणुकीत भाजपचा अगदी पालापाचोळा झाला. काँग्रेसला तर भोपळाही फोडता आला नाही.
केजरीवालांनी "Promising the Moon" अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत. व्यावहारिक दृष्ट्या ती पूर्ण करणे अवघड आहे. तब्बल ५४% मते व ९०% हून अधिक जागा मिळवून आआप सत्तेत येत आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊन व अवास्तव आश्वासने पूर्ण करता आली नाहीत तर केजरीवाल केंद्रावर खापर फोडून पुन्हा एकदा राजीनामा देतील असं वाटतंय.
निदान आता तरी केजरीवालांनी नाटकीपणा सोडावा. आताच एका वाहिनीवर पाहिले. आपल्या शेजारी उभ्या असलेल्या पत्नी व वडीलांची केजरीवालांनी ओळख करून दिली आणि नंतर सांगितले की माझी पत्नी केंद्र सरकारी सेवेत आहे व तिला सरकार त्रास देईल अशी भीति आहे. आता हे नाटक कशाला? त्यांच्या पत्नीला सरकाराला त्रास द्यायचा असता तर याआधीच्या दोन्ही सरकारांनी त्रास दिला नसता का? एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा हा भंपकपणा कशाला?
10 Feb 2015 - 2:00 pm | थॉर माणूस
काही महिन्यांपूर्वी एका विशिष्ट व्यक्तीमत्वाविषयी अगदी याच टायपातले उद्गार काढणार्यांना "भक्तांनी" दीलेली उत्तरे आठवली आणि Irony म्हणजे काय याचा प्रत्यय आला. :D
10 Feb 2015 - 2:20 pm | गणेशा
माझे ही म्हणणे असे आहे की पुर्वग्रहदुषित द्रुष्टिकोण कायम का ठेवायचा. वेळ उत्तर देइलच आणि नाही जमले तर पुन्हा निवडनुका आहेतच. तेंव्हा पडतील मग
10 Feb 2015 - 1:01 pm | असंका
किरण बेदींबद्दल वाईट वाटतंय......
10 Feb 2015 - 1:09 pm | क्लिंटन
लेटेस्ट आकडे:
आआप-६७, भाजप-३
१९८४ मध्ये कॉंग्रेसने दिल्लीत ६९% मते मिळवली होती आणि जबरदस्त स्वीप केला होता. तसेच २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ७० पैकी ६८ जागांवर आघाडी होती.आआप या विक्रमाशी बरोबरी करतो की मोडतो आणि इतर सगळ्या पक्षांचा पूर्ण व्हाईटवॉश करतो ते बघायचे.
10 Feb 2015 - 1:17 pm | गणेशा
साईट देता येइल का लेटेस्ट आकडे , जसे टीव्ही वर दाखवतात तसे बघण्यासाठी
10 Feb 2015 - 2:17 pm | तुषार काळभोर
सर्वात विश्वासार्ह
http://eciresults.nic.in/
10 Feb 2015 - 1:18 pm | श्रीगुरुजी
आआपला सर्व ७० जागा मिळाव्यात असं वाटतंय.
10 Feb 2015 - 1:17 pm | श्रीगुरुजी
एक चांगलं झालं. आआपला प्रचंड बहुमत मिळाल्याने आता आश्वासने पूर्ण न करण्यासाठी कोणतेही कारण शिल्लक नाही. अर्थात केंद्राने माझ्या योजनांना निधी पुरवला नाही हे राखीव कारण केजरीवालांनी खिशात ठेवलं असणारंच.
मागील वर्षी केजरीवालांचा राजीनामा म्हणजे, प्रेक्षकात बसून फलंदाजावर टीका करणार्या प्रेक्षकाला हातात बॅट देऊन खेळायला बोलावल्यावर आणि आपल्याला गोलंदाजी खेळता येत नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर अशक्य अशी धाव घ्यायचा प्रयत्न करून मुद्दाम स्वतःहून धावबाद होऊन पंचांवर आणि नॉनस्ट्रायकरच्या काँग्रेसच्या फलंदाजावर दोषाचं खापर फोडण्यासारखं होतं.
आता त्याच प्रेक्षकाला पुन्हा एकदा फलंदाजीची संधी मिळाली आहे. नॉनस्ट्रायकरला काँग्रेसचा नसून आआपचाच फलंदाज आहे. गोलंदाज व क्षेत्ररक्षकही आआपचेच आहेत. पंच सुद्धा आआपचेच आहेत. असे असूनसुद्धा फलंदाज बाद झाला तर आपल्याला खेळता येत नाही हे कबूल करण्यापेक्षा चेंडू पडताना साईटस्क्रीन समोर कोणतरी हलत होतं आणि म्हणून लक्ष विचलीत झाल्यामुळे मी बाद झालो असे फुसके कारण फलंदाज देतो का ते बघायचं.
10 Feb 2015 - 1:23 pm | गणेशा
दिल्लीचा अर्थ संकल्प हा ४०,००० कोटी रुपयांचा आहे, आणि ती काही थोडकी रक्कम नाहिये.
आपण थोडा वेळ तर दिला पाहिजे असे वाटते.
हे तर मॅच सुरु न होताच, फलंदाज बाद होण्यासच मैदानात उतरले आहेत असे म्हणण्यासारखे आहे
10 Feb 2015 - 2:13 pm | क्लिंटन
तोच तर कळीचा मुद्दा आहे. वेळ द्यायला हवे हे अगदी बरोबर आहे.मला स्वत:ला ’फुलपाखरू’ मानसिकता अजिबात आवडत नाही. माझ्यासारखा विचार करून ज्या नेत्यावर विश्वास दाखविला आहे त्याला निदान ३-४ वर्षांचा वेळ दिला पाहिजे असा विचार मतदार इन जनरल करताना दिसत नाहीत. आता मतदारांना सगळे काही इन्स्टन्ट हवे असे दिसते.विशेषत: नेत्याला मॅन्डेट मोठे प्रचंड मिळाले असेल तर अशा अपेक्षा वाढीला लागतात.
व्ही.आय.पी कल्चर बंद करणे, वीजेचे दर कमी करणे, पाणी फुकटात देणे वगैरे त्या मानाने सोप्या गोष्टी आहेत.तरीही हे वीजेचे दर कमी करायचे असतील तर वीज वितरण कंपन्यांना सबसिडी द्यायला हवी.अन्यथा या कंपन्या कोर्टात गेल्या तर ते प्रकरण लटकू शकेल.शीला दिक्षित यांच्या सरकारने २००१-०२ मध्ये या कंपन्यांबरोबर करार केले होते आणि या कंपन्यांना वीज वितरणाचे अधिकार दिले गेले होते. तो करार मोडायचा असेल तरी तो नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कसा मोडावा हे त्या करारातच स्पष्ट केलेले असते (सर्वच करारात असे असते). मनात आले म्हणून केजरीवाल असा करार मोडू शकणार नाहीत.शेवटी केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत कोणी अनभिषिक्त सम्राट नव्हे.त्यांना हे सगळे करारमदार, कायदेकानू नक्कीच लागू पडतील.
केजरीवालांची खरी कसोटी लागेल इतर आश्वासनांच्या पूर्ततेच्या वेळी.
१. ५०० नव्या शाळा बांधू असे एक आश्वासन पक्षाने दिले आहे.पाच वर्षात ५०० नव्या शाळा म्हणजे दरवर्षाला सरासरी १०० नव्या शाळा आणि दर आठवड्याला सरासरी जवळपास २ नव्या शाळा काढल्या तरच ते शक्य आहे.तसेच प्रत्येक शाळेला किमान २ एकर जागा हवी.म्हणजे दिल्लीमध्ये एक हजार एकर जागा मिळायला हवी.तितकी जागा उपलब्ध आहे की नाही याची कल्पना नाही.शाळा बांधायला नक्की किती खर्च येतो याची कल्पना नाही.
२. पूर्ण दिल्लीमध्ये फुकटात वाय-फाय देऊ असे आणखी एक आश्वासन आहे.माझ्या ५०० स्क्वेअर फुटाच्या घरासाठी इंटरनेट आणि वायफायसाठी मी दर महिन्याला जवळपास ३०० रूपये भरतो.दिल्ली शहर हे मुंबईच्या सुमारे अडीच पटींनी मोठे आहे.म्हणजे हे आश्वासन पूर्ण करायचे असेल तर किती खर्च येईल?
३. दोन लाख पब्लिक टॉयलेट बांधू हे आणखी एक आश्वासन आहे.म्हणजे दर वर्षी ४० हजार पब्लिक टॉयलेट बांधून व्हायला हवीत आणि दररोज सुमारे ११०!!
अशी इतर अनेक आश्वासने आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की स्वत: केजरीवालांनी ही आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या आहेत.त्या पूर्ण करता आल्या नाहीत तर नेतृत्वाविषयी असंतोष वाढायला वेळ लागणार नाही.विशेषत: इतके अभूतपूर्व बहुमत मिळालेले असताना.
10 Feb 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी
शाळा, टॉयलेट, वाय-फाय इ. च्या आश्वासनावर विसंबून जनता मत देते असे मला वाटत नाही. मुळात या मूलभूत गरजाच समजल्या जात नाहीत. त्याऐवजी फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत या जास्त आकर्षक व मते खेचणार्या घोषणा आहेत. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना फुकट वीज द्यायला सुरूवात केली होती. त्याचा जबरदस्त फायदा मिळाला होता. अर्थात निवडून आल्यावर लगेचच ती योजना रद्द करण्याचा शहाणपणाही काँग्रेसने दाखविला होता. २००८ मध्ये शेतकर्यांना ७२,००० कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याच्या योजनेचा २००९ मध्ये काँग्रेसला प्रचंड फायदा झाला होता. जनतेला अशाच योजना आवडतात. स्वच्छता, टॉयलेट, वाय-फाय, शाळा अशा आश्वासनांना जनता भुलेल असे वाटत नाही.
10 Feb 2015 - 2:26 pm | गणेशा
किलंट्न जी आपले विचार आणि मुद्दे बरोबर.
बघुया पुधे काय होते ते .
परंतु सकारत्मक .. त्य दिशेकडे भ्रष्टाचार मुक्त वाटचाल चालु होत आहे या बद्दल मला आनंद आहे.
राजकारण दिसते तेव्हडे सोप्पे नाहिच हे दिसते आहेच. बघु या. परंतु बीजेपीच योग्य पर्याय होती आणि लोक चुकीचे होते हे सर्रास म्हणने योग्य नाही असे वाटते
10 Feb 2015 - 1:23 pm | नांदेडीअन
फेसबुकवर माझ्या मित्र यादीमध्ये अनेक अमराठी मित्र आहेत.
सगळ्यांना समजावे म्हणून मी हा पोस्ट हिंदी भाषेतून लिहिला होता.
तोच इकडे कॉपी-पेस्ट करतोय, त्याबद्दल माफ करा.
नियमबाह्य असेल तर नियंत्रकांनी खुशाल उडवून टाकावे.
================================================================
सुपडा साफ ।
ऎतिहासिक विजय ।
एक ‘भक्त’ दोस्त ने इस जित का एक लाईनमें ही विश्लेषण कर दिया ।
उसने कहा ये असत्य पर सत्य की विजय है ।
आज मुझे जो खुशी हो रही है, वो बयान करने के लिए मेरे पास वाकई में शब्द नहीं है ।
पर जो विचार मन में है, कम से कम उन्हे तो मै बयान कर ही सकता हूं ।
मेरे कुछ दोस्त केहते थे की केजरीवाल भगौडा है, नक्सली है, खांसता है, अराजकतावादी है, आतंकवादी है, देशद्रोही है, CIA एजंट है, भ्रष्टाचारी है, नौटंकीबाज है, पता नहीं और क्या क्या है, पर है जरूर ।
दिल्ली की जनता ने आज उनको बता दिया की ये बचकाने आरोप कितने खोखले थे ।
३०० एम.पी. + आधा दर्जन कॅबिनेट मिनिस्टर्स + तीन मुख्यमंत्री + खुद प्रधानमंत्री + पेड मिडिया + रिसोर्सेस + पैसा + संगठन के हजारो कार्यकर्ता + किरण बेदी + बाबा राम रहिम
इन सब लोगों को दिल्ली की जनता ने बता दिया की हमे काम करनेवाली सरकार चाहीये, आप लोगों की नकारात्मक सोच और भाषण नहीं ।
इतना जबरदस्त बहुमत मिला है, पर फिर भी कुछ लोग दिल्ली की जनता को कोस रहे है के उन्होंने आम आदमी पार्टी को चुनकर बहोत बडी गलती की है, अब पुरे देश को खामियाजा भुगतना पडेगा वगैरा वगैरा...
भाईयों, अब तो आंखे खोल दो ।
४९ दिन की सरकार के काम देखकर उन्हें वोट करनेवाली जनता पागल और आप फेसबुकी पंडित सच ऎसा तो नही हो सकता ना ?
लोकसभा मे आप लोगों जैसे ही ये दिल्ली की जनता भी मार्केटिंग के जाल में उलझकर पछता रही थी ।
पिछले ९ महिनों मे भाजपाने इतने अच्छे काम किये दिल्ली और पुरे भारत में की दिल्ली की जनता ने उन्हें वोट ही नही दिया ।
लाखों दिलों की धडकन, और उतने ही लोगों के आदर्श महामहिम बिन्नी जी लगभग १८ हजार वोटों से पिछे चल रहे है ।
जिस त्रिलोकपुरी मे दंगे कराने की कोशिश की गई थी, उस जगह भाजपा के प्रत्याशी ३० हजार वोटों से पिछे चल रहे है ।
किरण बेदी जी सिर्फ १ हजार वोटों से आगे चल रही है ।
खुद डिबेट को बुलाकर बाद मे विधानसभा में डिबेट करेंगे ऎसा कहा था इन्होंने ।
अगर किरण जी जित गई तो कम से कम वहां तो डिबेट करेंगी वो ।
खैर, आपको चिढाना मेरा मकसद नहीं है ।
बस इतनी सी प्रार्थना है की आंखे खोलकर देखो अपने आसपास ।
कट्टरतावाद समस्यायें सुलझाता नहीं बल्की बढाता है ।
ये बात दिल्ली के तो समझ में आ गई ।
आप भी जल्दी समझ जाओ तो आपके लिए ही अच्छा है ।
इस हार से सबक लेकर अगर भाजपा-कॉंग्रेस (और अन्य तमाम पार्टीयां) जनता के काम करना शुरू कर दे तो इससे अच्छी बात और क्या हो सकती है ?
आम आदमी पार्टी की जरूरत ही नही रहेगी फिर तो.
आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है :
१) आम आदमी पार्टी की नियत
२) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता
३) दिल्ली की जनता
दिल्ली की जनता का जितना शुक्रीया अदा किया जाये उतना कम है ।
देश की राजनिती को बदलकर रख देनेवाली पार्टी को जिताकर उन्होंने पुरे भारत के सामने एक आदर्श रखा है ।
और एक महत्त्वपूर्ण बात...
पिछले एक-दो साल में कई जगह पर डिस्कशन, डिबेट किया ।
वैसे मैने कभी किसी पर पर्सनल अटॅक किया नही, जबान कभी फिसलने नहीं दी ।
पर फिर भी कोई अगर मुझसे नाराज है तो उससे माफी मांगना चाहता हूं ।
आशा करता हूं की आप मुझे माफ कर देंगे ।
सोचा था ४-५ लाईन लिखकर खतम कर दूं, पर थोडा ज्यादा लंबा खिंच गया.
जाते जाते आपको भविष्य मे न्युज चॅनल और कुछ फेसबुक वॉलपर आनेवाली खबरें बता देता हूं ।
- मुख्यमंत्री बनने के २ घंटे बाद भी जनलोकपाल बिल पास नही हुआ ।
- ४ घंटे हो गये, अभी भी दिल्ली की जनता फ्री WiFi के लिये तरस रही है ।
- सरकार के ६ घंटे पुरे हो चुके है फिर भी १० लाख CCTV नही लगाये है ।
- केजरीवालने आज २ की बजाय ३ रोटीयां खाई हैं । तिसरी रोटी के लिये क्या दुबई से फंड आया है ?
- १० घंटों के बाद भी भ्रष्टाचार पुरी तरह से रूका नही है और इसलिये दिल्ली की जनता हा हाल बेहाल है ।
- केजरीवालने गिता की कसम खाते वक्त उसपर बांया हाथ रखा, हिंदू धर्म का अपमान ।
- पुरे २४ घंटे हो चुके है फिर भी केजरीवालने पेट्रोल के दाम नही घटाये है ।
- अब तक का सबसे बडा स्टींग ऑपरेशन, केजरीवाल के मंत्री हॉटेल में चाय पिते पकडे गये ।
अब इजाजत दिजिये, कुछ दोस्तों को पार्टी देने जाना है । ;)
10 Feb 2015 - 2:03 pm | चिगो
नाही हो.. ही 'आआप'वाल्यांची खासियत आहे. २००४च्या बातम्या २०१५त झळकवणे इत्यादी.. आता तेच जिंकले म्हटल्यावर हे सगळं कोण करणार? ;-) असो. आआपचे आणि केजरीवालांचे जबरदस्त अभिनंदन.. पाच वर्षं आहेत हातात. सुयोग्यरित्या वापरावीत, हीच अपेक्षा..
10 Feb 2015 - 2:12 pm | श्रीगुरुजी
>>> आम आदमी पार्टी के इस ऎतिहासिक विजय के तीन प्रमुख कारण जो मुझे लगते है, वो है :
१) आम आदमी पार्टी की नियत
२) ग्राऊंड लेवल पर काम करने वाले कार्यकर्ता
३) दिल्ली की जनता
माझ्या दृष्टीने आआपच्या विजयाची २ मुख्य कारणे आहेत.
(१) फुकट पाणी, वीजबिलात ५०% घट यासारखी अत्यंत लोकानुययी आश्वासने आणि
(२) काँग्रेसने आआपला दिलेला वॉकओव्हर. भाजपच्या मतात जेमतेम २-३ टक्के घट झाली आहे परंतु आआपची मते तब्बल २४-२५ टक्क्यांनी वाढली आहेत. काँग्रेसची मते २४.५% टक्क्यांवरून ८% टक्के इतकी कमी झाली आहेत.
हा प्रामाणिकपणाचा, स्वच्छ कारभाराचा विजय आणि अहंकाराचा पराभव वगैरे नुसत्या वावड्या आहेत. खरी कारणे ही दोनच असावीत.
10 Feb 2015 - 2:20 pm | असंका
आपण खरंच भाजपाचे पक्षपाती आहात का याबद्दल आता शंका यायला लागली आहे.
लक्षात घ्या, ज्या लोकांनी निवडून द्यायचे आहे, त्यांची 'फुकटे' वगैरे शब्दात संभावना करून आपण लोकांच्या मनात भाजपा बद्द्ल अनुकूल भावना कशा निर्माण करणार? म्ह्णजे जो फुकट देइल असे म्हणतो त्याच्या मागून फक्त ती फुकट गोष्ट हवी म्हणून एवढे लोक गेले? धन्य!!!
10 Feb 2015 - 2:27 pm | श्रीगुरुजी
मी फुकटे हा शब्द वापरलेला नाही. फुकट पाणी, विजबिलात ५०% सवलत इ. लोकानुययी घोषणांमुळे लोकांनी मते दिली असे म्हटले आहे.
मी आधीच्या एका प्रतिसादात महाराष्ट्रातील २००४ मधील शेतकर्यांना फुकट वीज योजना, २००८ मधील ७२,००० कोटी रूपयांची कर्जमाफी ही उदाहरणे दिली आहेत. तीच इथेही लागू पडतात.
10 Feb 2015 - 3:02 pm | काळा पहाड
निवडून देणारे लोक फुकटे नसतात असं म्हणायचंय का? बाकी मी काही भाजपाचा पक्षपाती नाही. त्यामुळे मी तरी त्यांना फुकटेच म्हणणार.
10 Feb 2015 - 3:20 pm | कपिलमुनी
तुम्हाला अजून शंका येतेच कशी ?
10 Feb 2015 - 2:57 pm | पिंपातला उंदीर
नान्देडियन - मिपा वर मागच्या वेळेस केजरीवाल ने शपथ घेऊन १० दिवस झाले नव्हते आणि त्यांचा performance जज करणारा धागा तयार झाला होता . यावेळेस शपथविधी झाल्यावरच धागा तैयार होईल बहुतेक
10 Feb 2015 - 3:03 pm | श्रीगुरुजी
केजरीवालांनी मागील वेळी शपथविधी झाल्यावर काही मिनिटातच प्रत्येक घरी प्रति महिना २०,००० लिटर मोफत पुरविण्याची घोषणा केली होती आणि लगेचच दुसर्या दिवशी वीजबिलात सवलत जाहीर केली होती. जो मुख्यमंत्री इतक्या वेगात निर्णय घेतो त्याच्या निर्णयांची समीक्षा वेगात होणारच.
10 Feb 2015 - 4:58 pm | कपिलमुनी
बहुधा काळे धन परत आणून काही भाजपेयींच्या अकांउंटमध्ये जमा केले आहे वाटतं ;)
10 Feb 2015 - 2:01 pm | सुधीर
भाजप मधले इतर दबलेले गट आता जास्त सक्रीय होतील. "पूर्ण बहुमत" हा आजकालचा ट्रेंड आहे का? का आघाडी/युती ला लोकं कंटाळले आहेत? विरोधी पक्ष असा काही राहतच नाही. मला अजूनही हा प्रश्न पडलाच आहे "फेवरेट पार्टीचा" उमेद्वार सरसकट निवडून देण्याचे फायदे-तोटे काय आहेत?
10 Feb 2015 - 2:21 pm | ऋषिकेश
महाराष्ट्र व काश्मिरकडे बघून असा ट्रेंड वगैरे असेलसे वाटत नाही.
10 Feb 2015 - 2:28 pm | क्लिंटन
हो असे दिसते.गेल्या काही वर्षात पूर्ण बहुमत मिळायचा कल वाढलेला दिसतो.अगदी उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही मतदारांनी २००७ आणि २०१२ मध्ये एका पक्षाला निर्विवाद पूर्ण बहुमत दिले होते.
"फेवरेट पार्टीच्या" नावावर दगड जरी उभा राहिला त्याला निवडून देणे ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे.महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अनेक उमेदवारांना उभे केले होते.आआपनेसुध्दा ७० पैकी १० उमेदवार इतर पक्षांतून आयात केलेले होते.यातून राजकारणातील संधीसाधूपणाला नक्कीच चालना मिळेल.
10 Feb 2015 - 2:50 pm | मित्रहो
हे पटत असले तरीही असे नाही केले तर त्रिशंकू परिस्थिती येते त्याचे दुष्परिणाम बघितलेलेच आहे.
10 Feb 2015 - 3:52 pm | पिंपातला उंदीर
दिल्लीतील यशाबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरातून फोन खणखणत असताना काही फोन लक्ष्यवेधी ठरले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत दुय्यम स्थान मिळालेल्या शिवसेनेकडून केजरीवाल यांचे खास अभिनंदन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांना फोन केला व त्यांच्या भरघोष यशाबद्दल अभिनंदन केले. ट्विटरवर ही माहिती देताना 'एक वर्ष सत्तेशिवाय काढल्यानंतर दिल्लीकरांनी आपल्याला हवा तोच पर्याय निवडला आणि 'आप'ला भरभरून यश दिले...दिल्लीचेही अभिनंदन', असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना-भाजप युती तुटताना त्याचे खापर आदित्य यांच्यावर फोडणाऱ्या भाजपला हा चिमटा तर नाही ना, अशी शंका घ्यायला या अभिनंदानाने पूर्ण वाव आहे.
सोर्स - महाराष्ट्र टाईमस
महारश्त्र्म