गाभा:
नमस्कार मंडळी,
या धाग्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्या अनुषंगाने इतर मुद्दे अशा स्वरूपाची चर्चा होईल.सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सव्वा आठच्या सुमारास पहिले कल हाती यायला लागतील.जसे कल येतील त्याप्रमाणे ते या धाग्यावरील प्रतिसादात लिहेन.
तेव्हा सुरवात करू उद्या सकाळी.
धन्यवाद
क्लिंटन
प्रतिक्रिया
10 Feb 2015 - 4:04 pm | पिंपातला उंदीर
या भक्तांचा बावळट पणा कधी थांबेल ते एक अयोध्येचा रामच जाणो
http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/NAT-DEL-delhi-election-2015-will...
10 Feb 2015 - 5:16 pm | नांदेडीअन
तुम्हाला विनंती करतो, यांचा पूर्ण व्हिडिओ बघा.
छान करमणूक होईल.
10 Feb 2015 - 4:14 pm | माहितगार
डिएनए या वृत्तपत्राने दिल्ली विधानसभेच्या १९९३ पासूनचे वोट शेअर दिले आहेत. आवडत्या पक्षाला ४० - ४५ किंवा ५० टक्के पेक्षा अधिक वोट शेअर देणे हे दिल्ली विधान सभेचे सर्वसाधारण स्वरूप दिसते. मागची त्रिशंकु विधानसभा हा अपवाद होता असे म्हणता येईल असे दिसते. १९९३ च्या पहिल्याच विधान सभा निवडणूकीत भाजपाला ४७.८२ टक्के वोट शेअर होता. १९९८ - ३४ %; २००३ - ३५. २२%; २००८ - ३६ %; २००१३ - ३३.१०%; २०१५ - ३२.३० %
२०१३ ते २०१५ वोट शेअर २९.५० % ते ५४ % असा भन्नाट वाढला आहे पण बिजेपीच्या किमान टक्केवारी म्हणजे लॉयल मतदारात फारसा फरक पडलेला नाही. काँग्रेसचा २४% शेअर घटून ९.५० टक्क्यांवर आला आहे म्हणजे आआपने १४% मते काँग्रेसच्या वाट्याची खाल्ली आणि दहा टक्के इंडिपेंडण्ट्स आणि इतर छोट्या पक्षांची खाल्ली असण्याची शक्यता आहे.
भाजपाच स्वतःच्या टक्केवारीत नुकसान झालेल नाही पण इतरांची मते खाण्यात आआप भाजपाच्या का अग्रेसर राहू शकला याचे विश्लेषण भाजपा समर्थकांनी करावयास हवे असे वाटते.एकुण काय तर यावेळी आआपकडे वळलेल्या २४ % दिल्लीच्या मतदारांना भाजपचे नेते नव्याने माहिती करून घ्यायचे नव्हते ती २४ % मते मिळवण्यासाठी असलेली प्रतीमा भाजपाच्या स्थानिक नेतृत्वात कमी पडली असावी ?
दुसरा एक फॅक्टर दिल्लीच्या गृहखात्याच्या बाबी केंद्रसरकारच्या हातात आहेत याचे प्रश्नावर केंद्रातील भाजपा सरकारने सुयोग्य तोडगा उपलब्ध केला नाही. दिल्लीचे गृहखाते विषयक प्रश्न पहाण्यासाठी दिल्लीतील एकाला उपमंत्री पद आणि स्त्री सुरक्षा विषयक प्रश्नापर्यंत किमान अधिकार स्थानिक प्रशासना कडे हस्तांतरीत करता आले असते मग याला समस्ये कडे दुर्लक्ष करणे म्हणता येईल का ?
हे मोफत ते मोफत ची आआपची आश्वासने अधिक असू शकतात पण अशी आश्वासने देणारे पक्षही बर्याचदा निवडणूकीत पडत असतात आआपला दिल्लीतील मतदारांनी एक संधी नक्कीच दिली आहे.
मुख्य म्हणजे दिल्ली बाजूच्या हरीयाणा आणि उत्तरप्रदेशापेक्षा आपल्या मतदानाचे वेगळेपण जपून ठेवते हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
10 Feb 2015 - 4:52 pm | गणेशा
छान रिप्लाय.
--
आप ६७ जागा जिंकलेत वाटते. ६५ म्हणता म्हणता ६७ झाले
10 Feb 2015 - 5:59 pm | क्लिंटन
१९९३ मध्ये भाजपला ४३%, काँग्रेसला ३४% तर जनता दलाला १२% मते होती. हा ४७.८२% हा आकडा कुठून आला याची कल्पना नाही.
+१.
10 Feb 2015 - 7:21 pm | माहितगार
हम्म डिएनएच्या आकडेवारीत गल्लत झाली असे दिसते. इलेक्शन कमीशनच्या वेबसाईटवर येथे तुम्ही म्हणता तशीच आकडेवारी दिसते.
10 Feb 2015 - 5:03 pm | कपिलमुनी
भाजपेयी आत्मपरीक्षण करतील अशी किंचित आशा होती पण हे तर अजून केजरीवाल भंपक आहे .. आक्रस्ताळा आहे ईई मुद्दे उगाळत बसले आहेत .
एवढ्या मोठ्या पराभवाची कारणीमीमांसा कोणत्याही पक्षाने , कार्यतर्याने , समर्थकाने नक्कीच करायला हवी. पूर्ण पराभव झाला याचा अर्थ चुकाही तेवढ्याच गंभीर आहेत . आणि मतदारांशी तुटलेली नाळ का तुटली .
केजरीवाल कसे का असेना पण आज मतदारांनी त्यांना स्विकारला आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे हातपाय आपटून नावे ठेवण्यात काही हशील नाही. अ पार्टी विथ डिफ्रन्स ने आत्मपरीक्षण करावे आणि पुढे या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी .
बाकी समर्थकाऐवजी भक्त असतील तर मात्र हे अवघड आहे.
10 Feb 2015 - 6:06 pm | क्लिंटन
नमस्कार मंडळी,
चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.ही चर्चा पण मुद्द्यांच्या आधारेच झाली हे आवडले.त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
आता केजरीवाल नक्की कारभार कसा करतात हे बघायचे. बहुदा जुन्या चुकांपासून ते शिकतील.तसे झाल्यास नवा लोकाभिमुख पक्ष मिळणार असेल तर ते खूपच चांगले.जसे भाजपला साध्वी निरंजन, साक्षी महाराज या त्यांच्यातल्याच लोकांपासून धोका आहे आणि अशांना खड्याप्रमाणे दूर ठेवले नाही तर एकनाएक दिवस भाजपवाले गोत्यात येतील त्याप्रमाणे आआपला कमलमित्र चिनॉय सारख्या स्वतंत्र काश्मीरवाल्यांपासून धोका आहे. असो.
गेले अनेक दिवस मी मिसळपाववर आणि फेसबुकवर बराच सक्रीय होतो. त्यामुळे थोडी दमछाकच झाली आहे. आता मला माझ्यासाठी वेळ हवा आहे.१५ फेब्रुवारी ते १ एप्रिल या काळात मी दोन्हींपासून दूर असेन.१५ तारखेपर्यंत इतर चर्चांमध्येही माझा सहभाग थोडा कमीच असेल.
सर्वांना धन्यवाद.
10 Feb 2015 - 10:39 pm | विकास
ही चर्चा पण मुद्द्यांच्या आधारेच झाली हे आवडले.
सहमत!
आता केजरीवालांनी आणि केंद्रात मोदीसरकारने देखील मुद्यांवर आधारीत राज्य केले तर ते या निवडणुकीचे चांगले फलीत मानता येईल.
आता मला माझ्यासाठी वेळ हवा आहे.१५ फेब्रुवारी ते १ एप्रिल या काळात मी दोन्हींपासून दूर असेन.
शुभेच्छा! मात्र (जरी शक्यता नसली आणि मी तसली काही आशा करत नसलो तरी) दिल्लीत जर काही जबरा (अर्थात युनिक) नौटंकी चालू झाली तर आणि हो अर्थसंकल्प कुठल्याही अर्थाने भन्नाट झाला तर, आपण हा त्रिदंडी संन्यास समजून (इष्टकामप्रसिद्यर्थम्) पुनरागमन करावेत! ;)
11 Feb 2015 - 9:19 am | ऋषिकेश
नाय नाय नाय! अर्थसंकल्पावर तुमच्या मतांशी प्रतिक्षा आहे. त्यानंतर काय तो सन्यास घ्या ;)
10 Feb 2015 - 11:30 pm | आयुर्हित
नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जितस्य सिंहस्य स्वयंमेव मृगेंद्रता।।
अर्थात सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही राज्याभिषेक केला जात नाही किंवा कुठलाही विधी केला जात नाही. आपल्या गुण आणि पराक्रम, कर्तृत्वाच्या जोरावर तो राजपद प्राप्त करतो, हेच खरे.
पण त्याही पेक्षा,
मला अमित शहांचे कौतुक वाटते, कि कसेही करून श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे जळते शेपूट पकडून दिल्लीच्या राजधानीत बांधून व अडकवून ठेवल्याबद्दल!
आता जरी आआप ने आग लागली तरी ती फक्त दिल्लीपर्यंतच मर्यादित राहील!!!
10 Feb 2015 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण त्याही पेक्षा,
मला अमित शहांचे कौतुक वाटते, कि कसेही करून श्रीयुत अरविंद केजरीवाल यांचे जळते शेपूट पकडून दिल्लीच्या राजधानीत बांधून व अडकवून ठेवल्याबद्दल!
आता जरी आआप ने आग लागली तरी ती फक्त दिल्लीपर्यंतच मर्यादित राहील!!!
हायला !!! हे केजरीवालच काय पण अमित शहांच्या मनात आले नसेल ! ;) :)
11 Feb 2015 - 9:38 am | असंका
_/\_