तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

Primary tabs

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
25 Nov 2014 - 3:56 am
गाभा: 

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

प्रतिक्रिया

जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.जागेचा परतावा बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो.कधी कधी निव्वळ अफवेमुळे जागेच्या बाबतीत तोटा पण होवू शकतो तसाच फायदा पण होवू शकतो.शिवाय भारतातली वाढती लोकसंख्या पाह्ता, जागेचे भाव वाढतील पण कमी नक्कीच होणार नाहीत.

शेवटी पसंद अपनी-अपनी सोच अपनी अपनी.

(एक विनोद म्हणून, तुम्हाला नाही झाला तरी बिल्डरला तरी नक्कीच होतो.)

hitesh's picture

25 Nov 2014 - 6:28 am | hitesh

धन्यवाद.

वेल्लाभट's picture

5 Jul 2015 - 4:27 pm | वेल्लाभट

जागेतले पैसे वाया जात नाहीत.आज नाही तर उद्या नाही तर परवा तर नक्कीच फायदा होतो.

असतील तर टाका.

आणि मुंबई भरतच जाणार आहे. उद्या चौथी, पाचवी, सहावी पण येईल.

hitesh's picture

25 Nov 2014 - 6:31 am | hitesh

जे एन पी टी ची वाहतुक या मार्गावर रहाणार. तो एकच निगेटिव्ह मुद्दा आह. त्ञामुळे मोठ्या रस्त्याची गरज आहे.

hitesh's picture

25 Nov 2014 - 6:34 am | hitesh

बिल्डर लोक सध्या ही क्लिप दाखवत आहेत. यू ट्युबावर आहे.

http://m.youtube.com/watch?v=LzWtB1yxDcw

जेपी's picture

25 Nov 2014 - 6:48 am | जेपी

हितेस भाय,
तुमचे एक घर असेल तर उगाच गुंतवणुक म्हणुन दुसरे घर घेऊ नका.

(हे माझे वैयक्तीक मत आहे)

"गुंतवणुक म्हणून दुसरे घर घेउ नये." हे जरा स्पष्ट करुन सांगा.

कारण असे करुन आपण प्रापर्टी महाग करतो आणी दुसरे घर घेऊन एकाला घर घेण्यापासुन वंचीत ठेवतो.
(हे पण वैयक्तीक मत आहे)

hitesh's picture

25 Nov 2014 - 7:06 am | hitesh

सध्या माझ्या नावावर घर नाही.. घर रहाण्यासाठीच घ्यायचे आहे. गुंतवणुकीसाठी घर घ्यावे याबाबत अतिशय आग्रही आहे.

कारण लोकानी अशी घरे घेऊनब्ठेवली की आपण तिथे भाड्याने राहुशकतो...

:)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Nov 2014 - 7:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जास्त असलेला ईएमाय भरुन मालमत्ता कायमची आपली कराल का थोडं असलेलं भाडं भरुन दुसर्‍याचं पाकिट भराल? हा एक विचार झाला. अर्थात कीतीतरी जणं असे पाहातो की कर्जाचे हफ्ते फेडायची ताकद असते पण डाऊन पेमेंट महागाई मुळे जमा होऊ शकत नाही. :(

होकाका's picture

28 Nov 2014 - 12:39 pm | होकाका

१. रीयल इस्टेट ही इतर गुंतवणुकींसारखीच एक गुंतवणूक आहे. इतर गुंतवणुकींचेच नियम याही गुंतवणुकींला लागू होतात. गेल्या काही वर्षांत भारतात रीयल इस्टेटने खूप जणांचा खूप फायदा करून दिला म्हणजे त्यात नेहेमीच आणि सर्वच भागांत साधारणपणे समान बरकत होतच राहील असं नाही. उदा. वसई पूर्व भागातल्या किंमती १४ वर्षं स्थिर होत्या: साधारणपणे याच काळात (१९१२ - २००६) सोन्याच्या, स्टॉक्सच्या, इ. किंमतीत, भरपूर वाढ झाली. त्यामुळे ज्यांनी १९९२-९३ च्या काळात वसई पूर्व मध्ये गुंतवणूक म्हणून रुपये टाकले, त्यांचा तोटाच झाला.

२. भाड्याच्या घरात राहण्याचेही काही फायदे आहेत:
हे सामान्यपणे दिसून येते -- या सर्व गोष्टींना अपवाद असतीलच (मिपावर डिस्क्लेमर घातलेला बरा असतो नंतरचे वाद टळतात :)
* ते स्वमालकीचे घर नसल्यामुळे आपण त्यात खूप जास्त खर्च करत नाही.
* भाड्याच्या घरामुळे निवासस्थळाची अशी काही बंधनं निर्माण होत नाहीत. दुसर्‍या शहरातल्या नोकरी धंद्याच्या संधी सहजपणे स्विकारल्या जाऊ शकतात.
* डाऊन पेमेंट + इ एम आय + इंश्यूरन्स हा पूर्ण आकडा भाड्यापेक्षा खूपच जास्त असतो. लाईफ एक्स्पेक्टंन्सीचा विचार केल्यास भाड्याच्या घरात राहणे किफायतशीरच राहते.
* परिसर, शेजार, इ. पसंत न पडल्यास घर बदलणे सोपे जाते.

इतरही फायदे आहेत...

वेल्लाभट's picture

5 Jul 2015 - 4:30 pm | वेल्लाभट

पण इत्त्त्त्का सामाजिक विचार आजच्या जगात कामाचा नाही.

अँड अ‍ॅज अ सी ए, आय ऑलवेज अ‍ॅड्वाईज इन अ‍ॅसेट क्रिएशन. आणि घर हे असं अ‍ॅसेट आहे जे तुम्हाला इनकम जनरेट करून देत रहातं. गाड्या घोड्यांची गोष्ट वेगळी की जी फक्त चैनीसाठी कामाला येतात.

वैयक्तिक मत.

थोडे अवांतर - ठाण्याला भिवंडी रोड्ला जो कशेळी पुल आहे त्याच्या पलीकडे नवीन ठाणे वसणार आहे अशी एक वंदता आहे. मुंबैच्या आसपासची उपनगरे भरल्यामुळे नवीन नगरे वसवीण्याशीवाय पर्याय नाही.

या परिसराजवळ राहात असल्याने सांगु शकते.इथे सिडकोकडुन नवे नवे नोड्स डिक्लेअर होत आहेत.तिथे वेळीच गुंतवणुक फायदेशीर होऊ शकते,गुंतवणुक म्हणून घेतल्यास.मात्र फायदा दिसायला दहा वर्ष किमान जाऊ द्यावी लागतील.सध्या इथे अती संथ प्रमाणात विकास आणि एजंट लोकांची खाबुगिरी चालु आहे.निवासासाठी घर घेत असल्यास तिथल्या दळणवळणाच्या सोयी,शाळा,व्यवसाय इ साठी नवी मुंबईला लागुन असलेला परिसर बरा पडेल.अर्थात ते तुलनेने महाग आहेत.उदा.ओव्हरहाईप्ड उलवा भाग.तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल.

मुक्त विहारि's picture

25 Nov 2014 - 8:18 am | मुक्त विहारि

तसेच या सर्वच भागांमध्ये कोणीही उठतं बिल्डिंग बांधतं अशी स्थिती अाहे.त्यामुळे बांधकामाचा दर्जा जरुर जाणकारांकडुन तपासुन घ्यावा.कागदपत्र देखिल.

बाकी ठिकाणी गुंठा मंत्री तर इथे सगळेच "फूट-मंत्री".

शिवाय राजकीय वरदहस्त आणि इतर सामाजीक मदत आहेच.

त्यामुळे ताक फुंकूनच न्हवे तर, ताक फ्रीझमध्ये ठेवा आणि गोठले की मग आस्वाद घ्या.

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2014 - 8:49 am | प्रसाद१९७१

@ हितेन - जर रहाणार असाल तरच नविन घर घ्या. गुंतवणुक म्हणुन नको. आणि कर्ज काढुन ही गुंतवणुक करणार असाल तर अजिबात नको.
मधे टाइम्स मधे छान टेबल आले होते ज्यात दाखवले होते की कर्ज काढुन गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेणे कसे नुकसान करते जर F.D. शी तुलना केली तर.

hitesh's picture

25 Nov 2014 - 9:18 am | hitesh

सहमत आहे.. माझेही हेच मत आहे.

खेडूत's picture

25 Nov 2014 - 8:42 pm | खेडूत

खरंय !
पण वेळेपूर्वी- म्हणजे निम्म्या वगैरे वर्षांत संपवले तर खूप फायदा होतो हा स्वानुभव आहे .

अमित खोजे's picture

25 Nov 2014 - 9:52 pm | अमित खोजे

FD

या गणितामुळे माझाहि कर्ज काढून गुन्तवणुकिचे घर घेण्याचा विचार मी स्थगित केलाय.

क्लिंटन's picture

25 Nov 2014 - 10:59 pm | क्लिंटन

हे गणित कागदावर बरोबर आहे.पण त्यात अनेक गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही.

१. घर घ्यायचे हे उद्दिष्ट असेल तर त्याप्रमाणे किमान सहा महिने-वर्षापासून (कदाचित जास्तही) पहिल्या २०% डाऊन पेमेंटसाठी पैसे साठविले जातात.असे काही उद्दिष्ट नसेल तर तितके पैसे साठणे जवळपास दुरापास्त आहे.त्यामुळे असे काही उद्दिष्ट नसेल तर पैसे आहेत ना मग जा ट्रिपला, जेवा महागड्या हॉटेलांमध्ये असे व्हायची शक्यता जास्त. त्यामुळे घर न घेता १३ लाख रूपये बॅंकेत फिक्सला लाऊ असे म्हणणे कितपत प्रत्यक्षात उतरेल याविषयी साशंकता आहे कारण १३ लाख रूपये जमा होणेच वाटते तितके सोपे नाही. तसेच दर महिन्याला अमुक इतका ई.एम.आय द्यायचा म्हटल्यावर आपोआपच इतर खर्च नियंत्रणात ठेवले जातात.तसा दर महिन्याला कुठचाच खर्च होणार नसेल तर किती लोक ’जेवढे ई.एम.आय ला पैसे भरले असते तितके’ दर महिन्याला बॅंकेत टाकू शकतील?

२. पाच वर्षात भाव दुप्पट होतील म्हणजे वर्षाला किंमती वाढायचा रेट वर्षाला १४% असेल असे गृहितक आहे. जेव्हा ’इंडिया शायनिंग’ चालू असते त्यावेळी हे रेट त्यापेक्षा जास्त वेगाने वाढले आहेत (निदान मुंबईत तरी). २००३-०४ ते २००७-०८ मध्ये काय वेगाने किंमती वाढत होत्या हे आठवून बघा.गेल्या पाच वर्षात किंमती तितक्या प्रमाणात वाढत नव्हत्या.पण आता परत अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग वाढला तर कदाचित यापुढच्या पाच वर्षात घरांच्या किंमती वाढायचा वेग १४% पेक्षा जास्त असेल.

३. दर महिन्याचे भाडे ५% ने वाढेल असे म्हटले आहे. ५% हा वेग बराच कमी आहे हे मी स्वानुभवावरून सांगतो.मी स्वत: भाडे भरताना मागच्या वर्षीपेक्षा १०% जास्त भाडे देत होतो.आणि समजा एखादा भाडेकरू वर्षभर टिकला तर त्याला घरमालक १०% जास्त भाडे नक्कीच मागू शकेल (निदान मुंबईत तरी). कारण एकदा एखाद्या एरिआची सवय झाली तर ते सोडून दुसरीकडे जाऊन बस्तान बसविणे, सगळ्या सामानाची परत बांधाबांध करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही.मलाही थोडे कमी भाडे असलेली पण दुसरीकडील घरे मिळाली नसती असे नाही पण एकदा सवय झाली आहे ना मग कुठे परत दुसरीकडे जा हा विचार मीपण केलाच होता.

४. एफ.डी वरील व्याजाचा दर १०% मानला आहे. किती बॅंका पाच वर्षांसाठी आताही १०% व्याज देतात? आणि पुढील ३-४ महिन्यात व्याजाचे दर कमी झाले तर नव्याने केलेल्या एफ.डी वर आणखी व्याज कमी होईल.

५. पुढील पाच वर्षात इनकम टॅक्सच्या स्लॅब बदलू शकतात याचा विचार या चित्रात केलेला दिसत नाही. २००८-०९ मध्ये १.६० लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते ते आता २.५० लाख पर्यंत गेले आहे. ३०% ची स्लॅबही त्याप्रमाणे पुढील पाच वर्षात वर जाऊ शकेल.

त्यामुळे मला तरी हे चित्र कागदावरच बरोबरच वाटते.ते प्रत्यक्षात उतरणे कठिणच आहे.

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 1:28 am | खटपट्या

खूप छान विश्लेषण.
सहमत..

hitesh's picture

26 Nov 2014 - 8:44 am | hitesh

अगदी सहमत.. व्याज परतावे खर्च यांचे आकडे वास्तववादी नाहीत. त्यामुळे हे टेबल खरी परिस्थिती सांगत नाही.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

25 Nov 2014 - 9:50 am | चंद्रनील मुल्हेरकर

मुंबै पुणे एक्स्प्रेस वेच्या आजुबाजुला दाट वस्ती झाल्यावर काय करायचे?

काळा पहाड's picture

25 Nov 2014 - 11:08 am | काळा पहाड

कुणी काय करायचे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Nov 2014 - 1:01 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सत्ताबदल झाल्यावर आता हे प्रॉपर्टीचे धागे यायला लागले आहेत.पृथ्वीराज मुख्यमंत्री असताना हा प्रकार नव्हता.

hitesh's picture

25 Nov 2014 - 1:08 pm | hitesh

लोक म्हणतात मी तुम्ही नाना एकच आहोत.. खरेच असे आहोत का ?

पैसा's picture

25 Nov 2014 - 1:27 pm | पैसा

आत्ता लक्षात आलं. नाना-माई ही 'जुयेरे' नावाच्या भयाण शिरेलीतली मेड फॉर ईच अदर सासू सासर्‍यांची जोडी आहे.

hitesh's picture

25 Nov 2014 - 1:37 pm | hitesh

ते सासु सास्रे.

मग मी कोण आहे?

महारथी कर्णाला हाच प्रश्न छळत होता म्हणे. अर्ज्युन्यानं संपवला तेला.

hitesh's picture

26 Nov 2014 - 9:32 am | hitesh

कर्णाला कुंतीने संपवला.

( लबाड बै हतबुद्ध पुरुष हिंदु लक्षण)

hitesh's picture

26 Nov 2014 - 9:41 am | hitesh

मी घराचे नाव आलमगीर औरंगजेब निवास असे ठेवणार आहे.

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 10:24 am | खटपट्या

कीती तो विषयांतर करण्याचा प्रयत्न !!

पैसा's picture

26 Nov 2014 - 10:37 am | पैसा

हरदासाची कथा मूळपदावर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Nov 2014 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे

यावरून "मी धर्मबदल केला असता तर बरं झालं असतं" असं पूर्वी सतत म्हणणार्‍या एका आयडी/डुआयडीची आठ्वण होउन ड्वाले पानाव्ले :) ;)

जेपी's picture

25 Nov 2014 - 2:00 pm | जेपी

हितेस भाय,
मी कोण आहे?च्या शोधात बरेचजण भ्रमात जाऊन निराकार झाले आहेत.
आमचा नाना ही स्वत:ला शोधता शोधता चुकीच्या जागी गेला आणी वापस आलाच नाही.
तुमी काळजी घ्या.

तुम्ही नानांचा पुनर्जन्म होता का? मग माई पण पुनर्जन्म घेतील तुमच्यासाठी!! :)

भाते's picture

25 Nov 2014 - 2:42 pm | भाते

नानाला जाऊन फार काही दिवस झाले नाहीत. मग इतक्यात पुनर्जन्म होऊन मिपावर लेख प्रतिसाद देण्याइतका हा मोठा कसा झाला? :)

टवाळ कार्टा's picture

25 Nov 2014 - 3:01 pm | टवाळ कार्टा

मिपावर १ जन्म असतानाच पुनर्जन्म होतात ;)

hitesh's picture

25 Nov 2014 - 3:56 pm | hitesh

मी नानाच्या आधीही होतो. बरोबरही होतो. आताही आहे

जेपी's picture

25 Nov 2014 - 4:14 pm | जेपी

हितेस भाय,
आमचा नानापण असच बोलायच्या,यत्र तत्र सर्वत्र मीच आहे म्हणायच.
यामुळे तो गेलातरी अमर आहे.

Ae Babu Moshai, Zindagi aur maut uparwale ke haath hai. Usse na aap badal sakte hain na main” –
“ Nana mara nahin. Nana marate nahin” (अर्थातच ह्र्षिदांची क्षमा मागुन)

>>मी नानाच्या आधीही होतो. बरोबरही होतो. आताही आहे

हो, बिल्ला नंबर बघून कळतंय ते!! मांजरीन् डोळे मिटून दूध प्यायलंन् म्हणून जगाला दिसत नाही असं नाही.

भाते's picture

25 Nov 2014 - 2:34 pm | भाते

गेल्या आठवडयात टाइम्स प्रॉपर्टीमध्ये एक लेख वाचला होता. कांदिवली परिसरात बांधकाम चालू असलेली आणि बांधकाम पुर्ण झालेली मिळुन किमान २५ हजार घरे खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याने विक्री न होता पडून आहेत. तिथला जागेचा भाव १२ हजार स्क्वे. फू. वरून ९ हजार स्क्वे. फू. पर्यंत खाली आला आहे. ज्यांनी गुंतवणुक म्हणुन घर खरेदी केले होते ते आणखी नुकसान टाळण्यासाठी आत्ता मिळेल त्या भावात घर विकायला तयार आहेत.
त्यामुळे खिशात जास्तीचा पैसा असेल तर गुंतवणुक म्हणुन घर घ्यायला काही हरकत नाही. पुढे चांगला परतावा मिळेल या आशेवर आत्ता इएमआय भरण्यात काही अर्थ नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Nov 2014 - 5:19 pm | llपुण्याचे पेशवेll

Krupaya batmicha duwa dene.

भाते's picture

27 Nov 2014 - 6:07 pm | भाते

हा घ्या बातमीचा दुवा.

स्वामी संकेतानंद's picture

25 Nov 2014 - 3:21 pm | स्वामी संकेतानंद

रहायला म्हणून घ्या, त्या भागाचा 'विकास' होणार आहेच. गुंतवणूक म्हणून कर्ज काढून विकत घेण्यात अर्थ नाही.

hitesh's picture

26 Nov 2014 - 4:32 pm | hitesh

बिल्डर. .. लँडस्केप .

पुण्यात त्यांचे काम आहे

hitesh's picture

27 Nov 2014 - 5:32 pm | hitesh
डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2014 - 6:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजकाल टिव्ही वर "BKC मध्ये १४ लाखापासून फ्लॅट आणि ३६ की ३९ लाखापासून व्हिला" अशी जाहिरात येत आहे... हे BKC म्हणजे काय ? बांद्रा-कुर्ला-काँप्लेक्स की अजून काय ?

hitesh's picture

27 Nov 2014 - 7:21 pm | hitesh

हो तेच

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2014 - 7:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण तो तर हुच्च्भ्रू भाग आहे असे ऐकून आहे. मग तिथे इतके स्वस्त घरे अशी काय ?

hitesh's picture

27 Nov 2014 - 10:32 pm | hitesh

हुच्चभ्रू भागातही एखादा एरिया लोकल ट्रेनपासुन दूर अम्तरावर असेलच की.. हा तिथला दर असणार

hitesh's picture

28 Nov 2014 - 11:52 am | hitesh

१४ लाख ही सुरुवातीची डाउअन्पेमेंटची रक्कम असणार.

म्हणजे खरी किंमत एक कोटी असेल

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

डाउनपेमेंट १.४ लाख आणि ९०% कर्जाची हमी अशी ऑफर दिसते जाहिरातीत !

सुनील's picture

30 Nov 2014 - 10:27 am | सुनील

स्टेशनपासूनचे अंतर हा मुद्दा मुंबईत बर्‍याच ठिकाणी कालबाह्य झालेला आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Nov 2014 - 11:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

कसा काय ?

प्रसाद१९७१'s picture

28 Nov 2014 - 9:29 am | प्रसाद१९७१

हे जर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल तर काहीतरी झोल आह, फसवणुक नक्की होइल.
मुंबैत कुठेही जर १४ लाखात २ रुम चा फ्लॅट मिळत असेल तर तो घ्यावा. ( जर खरच मिळत असेल तर ).

ही नक्की फसवणुक आहे.

५ वर्षा पूर्वी पुण्यात पण ४-५ लाखात १ बेडरुम फ्लॅट ची जहीरात होती, बिल्डर नी फक्त पैसे गोळा केले आणि पाने पुसली.

हे मार्केटींग गिमिक आहे. अहो एक प्रदर्शन रीअल एस्टेटचे बीकेसी ला आहे, प्रत्यक्ष जागा भलतीकडेच आहे.

बीकेसी म्हणजे मुंबईतील नवीन नरिमन पॉईंट... फास्टेस्ट डेवलपींग एरिआ.

ह्या दरात तिथे खुर्ची टाकुन बसण्याइतकी पण जागा मिळणार नाही.

क्लिंटन's picture

28 Nov 2014 - 10:53 am | क्लिंटन

हो बरोबर. प्रदर्शन बीकेसीमध्ये आहे पण प्रत्यक्षात जागा दुसरीकडे आहे.आणि १९ लाखात घर म्हणजे पहिल्यांदा घर बुक करताना रक्कम भरायला लागते ती १९ लाख आहे.त्यानंतरचे हप्ते भरायला लागतील ते वेगळे आहेत. प्रदर्शनात सामील झालेले बिल्डर नामांकित आहेत.पैसे घेऊन पळून जाणार्‍यापैकी कोणी असतील असे वाटत नाही.फसवायचे असेल तर नंतर घराच्या बांधकामात कमी दर्जाच्या वस्तू वापरणे वगैरे प्रकारे फसवाफसवी होऊ शकेल पण अजिबातच पैसे घेऊन पळून कोणी जाईल असे वाटत नाही.

माझे ऑफिस बीकेसीमध्येच आहे.त्या प्रदर्शनाच्या जागेपासूनच एक्सर्बियाचे जाहिरातीचे बोर्ड लागले आहेत.त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित. म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर हिडन फी आहेत हे वेगळे सांगायलाच नको.

काळा पहाड's picture

29 Nov 2014 - 2:23 pm | काळा पहाड

त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित.

बिल्डर आता रिझर्व बँकेवर प्रेशर आणायच्या प्रयत्नात दिसतायत. म्हणजे लोकांना फितवायचं गव्हर्नंमेंट वर प्रेशर आणायला.

कोर्ट आहे म्हणून बर्याच गोष्टी व्यवस्थीत चालू आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2014 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

असेच वाटत होते. पण "मेड इन यु एस ए" प्रकारची काही फसवी आयड्या आहे का असाही संशय आला म्ह्णून विचारणा केली

जलिन्दर's picture

29 Nov 2014 - 11:15 pm | जलिन्दर

टीवी वर जी बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर ही जाहिरात चालू आहे ती शुद्ध मार्केटिंग गिमिक आहे, मुंबई मध्ये १४ लाख मध्ये साधे झोपाडपट्टी मध्ये सुद्धा घरे मिळणे मुश्कील झाले आहे. जाहिरात जर नीट बघितली तर लक्षात येईल की बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर म्हणजे हा जो XARBIA चा १४ लाखा चा प्रॉजेक्ट आहे तो मुंबई पासून दूर खूपच लांब खालापुर च्या पुढे कुठे तरी आहे आणि बी के सी मध्ये प्रॉपर्टी चे प्रदर्शन भरणार आहे म्हणजे ते लोक फक्त त्यांच्या स्टॉल ला भेट वाढवण्यासाठी ही सगळी शब्दांची चलाखी चालू आहे.

विवेकपटाईत's picture

27 Nov 2014 - 7:42 pm | विवेकपटाईत

पैसा असेल तरी नवी मुंबईत घर अवश्य घ्या. मी काही जोतिषी नाही. पण २०२० पर्यंत भाव तिप्पट तरी निश्चित होतील. ....

hitesh's picture

27 Nov 2014 - 10:33 pm | hitesh

तुमच्या तोंडात तीन चमचे साखर पडो.

hitesh's picture

29 Nov 2014 - 7:29 am | hitesh

इक घर बनाउंगा एअरपोर्ट के सामने
दुनिया बसाउंगा एअरपोर्ट के सामने.

:)

तुम्हि घर बनवाल एअरपोर्ट च्या समोर. ठिक आहे. पण एक मुद्दा लक्षात येत नाही, एअरपोर्ट जवळ असल्यामुळे भाव जास्त का? जसे काय सगळेजण रोज विमानाने जा ये करणार आहेत. स्टेशन जवळ असेल तर एक वेळ समजू शकतो. तिथे घर घेणारे कीतीजण आयुष्यात एकदातरी विमानतळाचा वापर करणार आहेत ?

hitesh's picture

29 Nov 2014 - 10:05 am | hitesh

एअरपोर्टजवळ हॉटेल वगैरे डेवलप होतात.

पर्यटकांची ये जा असल्याने सरकार या भागांच्या स्वच्छतेबाबत जास्तजागरुक असते.

एअर्पोर्टचा स्टाफ गब्बर पगाराचा असल्याने ते वाट्टेल त्या रेटने घरे घेतात .... हे स्वतः बिल्डर बोलला.

वरच्या ओळीत ते एअरपोर्ट नुस्ते ओळीत बसले म्हणुन वापरले आहे.

समुंदर के सामने / मसजिद के सामने .... काहीही शब्द सोयीनुसार समोर काय आहे त्यावरुन वापरु शकता

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2014 - 10:55 am | टवाळ कार्टा

हा लेख, लेखक आणि त्यावर प्रतिसाद देणारे पाहून "ड्वाळे पाणावले"

hitesh's picture

29 Nov 2014 - 7:04 pm | hitesh

जास्त रडू नका.. तुमच्या रडण्यानं समुद्र भरला तर त्या शिवडी उरण पुलाची उंची अजुन पाच फुट वाढवावी लागेल.

टवाळ कार्टा's picture

29 Nov 2014 - 8:49 pm | टवाळ कार्टा

=))

भारीच उपमा

hitesh's picture

30 Nov 2014 - 8:31 am | hitesh

City and Industrial Development Corporation (Cidco) plans to start the pre-development work, including relocation of power transmission lines and reclamation of land site, for the Navi Mumbai airport from January.

The work, expected to cost Rs 2,000 crore and take a year to complete, will commence after the completion of land acquisition later this month. According to Cidco’s planning, the first phase of the Rs 14,500-crore Navi Mumbai airport will be ready by December 2018.

मुक्त विहारि's picture

30 Nov 2014 - 8:42 am | मुक्त विहारि

तुम्हाला नक्की जागा हवी आहे का विकायची आहे?

hitesh's picture

30 Nov 2014 - 2:55 pm | hitesh

थोडी घेऊन ठेवणार . थोडी विकणार आहे.

dadadarekar's picture

5 Jul 2015 - 1:48 pm | dadadarekar

बोरखर सीलिंक सिटीचे प्लॉट खरेदीखत करणे सुरु झाले.

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:19 pm | अरवीन्द नरहर जोशि.

मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .

अरवीन्द नरहर जोशि.'s picture

10 Jul 2015 - 9:20 pm | अरवीन्द नरहर जोशि.

मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .

dadadarekar's picture

28 Jul 2015 - 11:10 pm | dadadarekar

आज प्लॉटचा हप्ता भरायला गेलो होतो. तिथे आयबीएन च्यानेलवाले आले होते. त्यानी माझी मुलाखत घेतली... येत्या शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मी टीव्हीवर येणार .

अल्ला मेहेरबान !!

dadadarekar's picture

28 Jul 2015 - 11:18 pm | dadadarekar

.p

ईश्वरसर्वसाक्षी's picture

29 Jul 2015 - 6:16 pm | ईश्वरसर्वसाक्षी

अब मजा आयेगा.हम्म्..अब मजा आयेगा.. (गब्बर सींग सोले वाला)

हजामोद्दीन खौलिया

dadadarekar's picture

28 Jul 2015 - 11:39 pm | dadadarekar

शिवडी परिसरात सी लिंकसाठी स्लम्स उठवण्यासाठी नोटिसा सुरु झाल्या.

.......

dadadarekar's picture

29 Jul 2015 - 5:53 pm | dadadarekar

हा भाग अ‍ॅग्री लँड असला तरी यू २ झोनमध्ये येतो. रॅसिडेन्शल व कमर्शियल दोन्ही बांधकामे करता येतात.

२.५ एफ एस आय मिळतो. भविष्यात चार होइइल कदाचित.

............

हे एफ एस आय ठरलेले असते तर मोठ्या टोवरना पर्मिशन कशी देतात ?

शेतजमीन खरेदी करायला शेतकरीच लागतो.
मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा

असा कुणाला अनुभव आहे का ?

बहुगुणी's picture

4 Aug 2015 - 10:42 pm | बहुगुणी

मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा ही ऐकीव माहिती आहे का? की आपल्याला स्वतःला असे उघड-उघड बेकायदेशीर काम करणारे एजंट्स भेटलेले आहेत? आणि भेटले असले तर "असा कुणाला अनुभव आहे का ?" असे विचारून तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे ते कळलं नाही.

बहुगुणी's picture

4 Aug 2015 - 11:09 pm | बहुगुणी

तुम्ही दिलेल्या लिंकवरील या दुव्यावर बर्‍यापैकी विस्तृत माहिती आहे, त्यावरून अशी पर-राज्यातील शेतजमीन घेणं हे बेकायदेशीर नसावं कदाचित, पण मग 'आपले काम झाले की तो उतारा पुन्हा परत करायचा' असं का? कायदेशीर प्रक्रिया करून, पैसे भरून तिथली जमीन तुमच्याच मालकीचीच होणार ना? मग तो उतारा परत का करायचा? दालमें कुछ काला लगता है......

dadadarekar's picture

5 Aug 2015 - 5:43 am | dadadarekar

यु पी राजस्तानची जमिन आपलीच रहाते.

dadadarekar's picture

17 Oct 2015 - 9:31 am | dadadarekar

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49423331&section=tajya-b...

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि जेएनपीटी बंदराचा होणारा चौपट विकास लक्षात घेता या परिसरात सुमारे ४ लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. विमानतळ आणि पोर्ट उभारणीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग शक्यतो प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध व्हावा, या दृष्टीने सिडको येत्या काळात पनवेल आणि उरण येथे एव्हिएशन आणि पोर्ट अॅकॅडमी सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली,