शब्दांचं आयुष्य
व्यायामचड्डीचा खिसा छोटा आहे, त्यामुळे जीवनसाथी (मोबाईल) बरोबर नेता येत नाही, किल्लीचा जुडगा तेव्हडा मावतो.
तर,
तसा निघालो, एक गोरे आजोबा व्यायामावरून येत होते, आज (अनेक दिवसांनी का होईना) मीपण पळायलाच चाललो असल्यानं नेहमीसारखं गिल्टी वाटलं नाही. वर त्यांनी अगदी ओळख असल्यासारखा हाय वगैरे केला. खरंय पण, एकुणातच सगळे प्राणी दुसरा समोर आला कि ऍकनोलेज करतात, म्हणजे कुत्री समोर आली कि गुरगुरतात, मांजरं पण, अगदी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मुंग्या पण काहीतरी देवाणघेवाण करताना दिसतात, चिमण्यांचंही तेच, मग माणसांनी हाय म्हणायलाच हवं. हाय आजोबा, व्हाट्स अप !