मराठी विकिपीडियावर भोंडला या लेखास कुणीतरी हात घालेल आणि सुधारणा करेल या आशेवर अल्पसे लेखन करून लेख सोडून दिला होता. पण गेल्या तब्बल नऊ वर्षात तसा मुहुर्त येणे कदाचित त्या लेखाच्या नशिबी नसावे.
मराठी विकिपीडियावर १५ ऑक्टोबर पासून वाचक प्रेरणा सप्ताह साजरा करावा असा मानस असल्यामुळे ऑप्टोबर महिन्यातील उत्सव विषयक लेखांच्या सुधारणेची हालचाल करावी म्हणून भोंडला हा लेख पुन्हा संपादनासाठी घेतला. गूगल शोध करून भुलाबाई शब्दापासून सुरवात केली अॅग्रोवन साप्ताहीकातील एका लेखाचा संदर्भ देऊन काही लेखन करून '''एका संस्थळावरील एका मॅडमचा लेख''' चांगला वाटला म्हणून त्यांच्या लेखाचा संदर्भ घेतला त्यात "माळी पौर्णीमा" नावाचा शब्द होता, कोजागिरी पौर्णीमेस माडी पौर्णीमा म्हणतात असा संदर्भ मराठी विकिपीडियावर आधीपासून होताच माडी आणि माळी लेखनात कुठे गल्लत होते आहे का माळी पौर्णीमेचा अजुन एखादा संदर्भ भेटतो का म्हणून गूगल शोध घेतला.
थिंक महाराष्ट्रावरील भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती हा 30 सप्टेंबर 2015 (node/2274) हि प्रकाशन तारीख दिलेला लेख आणि साप्ताहिक लोकप्रभा (दैनिक लोकसत्तासंस्थळावरील) भुलाबाई उत्सव – वैदर्भीय लोकसंस्कृतीचा ठेवा संतोष विणके - यांचा September 26, 2014 01:18 am हि प्रकाशन वेळ असलेला लेख यात वाक्यरचनांमध्ये किरकोळ बदल असले तरीही प्रथम दर्शनी साम्य वाटते आहे.
उदाहरणार्थ दैनिक लोकसत्तात संतोष विणके यांचे वाक्य
विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात साजरी केली जाते.
"त्या संस्थळावरील त्या लेखिकेने" केलेला बदल ?
विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहात साजरी केली जाते.
दैनिक लोकसत्तात संतोष विणके यांचे वाक्य
कोजागरीच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. महिनाभर स्थापलेल्या भुलाबाईची कोजागरीच्या टिपूर चांदण्यात घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबाई-भुलोजी-गणेश यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांडय़ांची खोपडी (निवारा) बनवून पूजा केली जाते. या खोपडीला माळी म्हणतात.
"त्या संस्थळावरील त्या लेखिकेचे वाक्य
शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. भुलाबाई-भुलोजी-गणेश यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांड्यांना देवळाप्रमाणे मंडपीचा आकार देऊन त्यामध्ये स्थापना केली जाते. त्या मंडपीला माळी असे म्हणतात.
दैनिक लोकसत्तात संतोष विणके यांचे वाक्य
जिराईत शेतकरी ज्वारीच्या कणसांची खोपडी करतात तर बागाईत शेतकरी ही उसाच्या पाच खोडांची खोपडी करतात. तिला पण माळीच म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या डोक्यावर ही माळी हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन आलेल्या ज्वारीच्या भरलेल्या कणसांची, कणसातील ज्वारीच्या दाण्यांची पूजा करून शेतकरी त्या धान्याचे स्वागत करतात.
"त्या संस्थळावरील त्या लेखिकेचे वाक्य
जिराईत शेतकरी ज्वारीच्या ताटांची मंडपी करतात तर बागाईत शेतकरी ऊसाच्या पाच खोडांची मंडपी करतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मस्तकी ही माळी हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन ज्वारीच्या भरलेल्या कणसातील दाण्यांची पूजा करतात. तसेच भुलाबाई आणि भुलोजी यांच्या समोर विविध धान्यांची आरास करून त्या धान्याचीसुद्धा पूजा करतात. पूजा घराच्या अंगणात, कोजागरीच्या टिपूर चांदण्यात खुलून दिसते.
दैनिक लोकसत्तात संतोष विणके यांचे वाक्य वरील परिच्छेदाच्या आधी आलेले आहे
महिनाभर स्थापलेल्या भुलाबाईची कोजागरीच्या टिपूर चांदण्यात घराच्या अंगणात पूजा मांडली जाते.
"त्या संस्थळावरील त्या लेखिकेचे खालील वाक्य परिच्छेदाच्या नंतर आलेले आहे.
पूजा घराच्या अंगणात, कोजागरीच्या टिपूर चांदण्यात खुलून दिसते.
असाच प्रकार "त्या संस्थळावर उजव्या कोपर्यात 'लेखकाचे इतर लेख' असा छोटा कॉर्नर आहे त्यात अजुन काही लेख दुवे लेखकाच्या नावा शिवाय आहेत त्यातील अजून एक लेख तपासला रामशेज किल्ल्या संदर्भातला अजून एक लेख (हा दुवा उघडत नाही कृपया मिपा संपादकांनी मदत करावी) तपासला त्यातील काही मजकुर ६ वर्ष अजिंक्य राहिलेला नाशिक जवळचा रामशेज किल्ला या लेखातील काही मजकुराशी साम्य असू शकते का अशी शंका वाटली नाही म्हणावयास रामशेज किल्ला संबंधीतच्या लेखात छायाचित्रा बाबत sambhajimaharaj.comचे सौजन्य नमुद केले आहे. पण मजकुराबाबत तसे दिसले नाही.
हे खरे आहे की फॅक्ट्सवर कॉपीराइट लागत नाही. लेखन स्वतःच्या शब्दात केले तर कॉपीराइट बंधने कदाचित शिथील होऊ शकतात. (पण त्यासाठी वस्तुतः वाक्यरचनेत अथवा शब्दात फेरफार हा शॉर्टकट पुरेसा नाही, विषयाचे संक्षीप्त मुद्दे लिहुन काढावयाचे आणि त्याचा विस्तार स्वशब्दात पुन्हा करावयाचा एवढे करून मुळ लेखकाचा संदर्भ द्यावयाचा) पुर्वेकडून सुर्य उगवतोला फार फारतर सुर्य पुर्वेकडून उगवतो एवढेच बदलता येते हे सर्व खरे आहे. बदल केल्या नंतर मूळ लेखकाचा पुर्ण कॉपीराइट कदाचित शिथील होईल पण जिथ पर्यंत माझी माहिती आहे कलम ५७ नुसार कॉपीराइट संपल्यानंतर सुद्धा मूळ लेखकाचा संदर्भात नाव नमुद केल्या जाण्याचा अधिकार अबाधीत रहात असावा (चुभूदेघे) कायद्या व्यतरीक्त सुद्धा ती एक नैतीक जबाबदारी म्हणूनही महत्वाची आहे. आज माझे लक्ष गेले नसते तर मराठी विकिपीडियातील लेखात संतोष विणके यांच्या एवजी दुसर्याच लेखिकेच्या नावाचे आणि संस्थळाचे संदर्भ लागले गेले असते आणि संतोष विणके त्यांच्या नावाचा संदर्भ मराठी विकिपीडियावर नमुद केल्या जाण्याच्या आधिकारा पासून ते हकनाक मुकले असते
या लेखाचा उद्देश "त्या संस्थळावरील त्या लिहिणार्या लेखिकेस अथवा त्या संस्थळा समोर नामुष्की आणण्याचा नाही. ज्या चुका करत आम्ही शिकत गेलो त्याच चुका इतरांकडून न होवोत ही सदीच्छा. (म्हणूनच त्या लेखिकेचे अथवा त्या संस्थळाचे नाव नमुद केलेले नाही) मिपा असो अथवा मराठी विकिपीडिया सर्वसामान्य लेखक आणि संपादकात संदर्भ लेखनाच्या आवश्यकते बद्दल जागरुकता निर्माण करणे आहे. 'त्या संस्थळावर लिहिणार्या त्या लेखिकेस' कदाचित संतोष विणके यांच्या मतानुसार असा उल्लेख करता आला असता आणि शक्यतोवर अजून एखादा संदर्भ स्रोत वापरला तर समिक्षणाच्या कक्षेत अधिक निश्चिंतपणे बसवता आले असते.
भुलाबाई या विषयावर वेगळ्या संदर्भाने धागा लेख काढावयाचा आहे तो विचार बाजूस पडून संदर्भ नमूद करण्याची आवश्यकता या विषयावर लिहिण्याचा योग आला. असो.
हा लेख सर्व साधारण जागरुकता वाढवण्याच्यादृष्टीने लिहिला आहे. उत्तरदायकत्वास नकार लागू
प्रतिक्रिया
10 Oct 2015 - 12:33 am | एस
चोरी बरोबर पकडलीत.
13 Oct 2015 - 8:56 pm | palambar
माझे लहान्पण खान्देशात गेल्यामुळे भूलाबाइ मला माहित आहे . फार मजा यायचि . एक महिना भर रोज सन्ध्याकाळि
भूलाबाइ चि गाणि म्हण्ण्यात जायचा. कोजागिरि ला तर खुप मजा करायचो. शाळेतिल गअॅद रिंग सार्खे कार्यक्रम सादर करायचो.