घोस्टहंटर-३
१६६५!
इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले!
काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता!
ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता!
मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती!
आंद्रे!!!!!
"ब्रॅक्स्टन!"
"कोण?"
"मी लाओ!"
लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता.
"बोल लाओ."
"ईशान्येला सैन्य हलवा!"
ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही!
ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला!