समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार
गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार
उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे
वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे
संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा
अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा
नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची
जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची
साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी
हंबरून गायी सार्या उधळीत दिशा गिरिकुहरी
निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी
पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी
अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई
अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!
प्रतिक्रिया
5 Dec 2015 - 10:28 pm | दमामि
वा! क्या बात!!!
6 Dec 2015 - 7:06 am | मितान
धन्यवाद !
5 Dec 2015 - 10:37 pm | अजया
काय कळलं रे दमाम्या तुला?
6 Dec 2015 - 7:49 am | दमामि
ही कविता पंचशील उतारा (antidote) आहे,
जरी गूढगर्भाचा रस्ता चोखाळते तरी चुकूनही ग्रेसचा छाप जाणवत नाही.
कविता स्त्रीपोटी जन्मलेली आहे असे जाणवते.
कविता नाद आणि लय यांचा हात पकडून चालतेय, त्यामुळे वाचताना खूप मजा येते, अशा कविता चालसिद्ध असतात.
हुश्श, हे झाले कवितेच्या बाह्यरुपाबद्दल.
अर्थ? व्यनि करतो, चालेल?;)
6 Dec 2015 - 11:53 am | माहितगार
कृ. मलाही व्यनि करावा.
7 Dec 2015 - 9:16 am | दमामि
किती जणांना व्यनि करणार? त्यापेक्षा इथेच लिहितो.स्त्री ची अनेक रुपे या कवितेत दिसतात.
१ ती
म्हणजे जणू तलवारीप्रमाणे चराचराला कापत जाणारी रात्र. तिचे शुद्ध प्रेम म्हणजे सात्विकतेचा प्रकाश देणारी मंदपणे तेवणारी समई. त्यात कुठेही मशालीची आक्रमकता नाही, आहे ती भरजरी , हळुवार तलम अशी सहनशीलता. परिस्थितिच्या अगतिकतेमुळे जरी तिच्या आशेची पौर्णिमा काळवंडली असली तरी अजूनही ती विझली नाहीय, तेवत आहे.
२ ती
जगाला झुकल्या वेलीप्रमाणे , नाजूक, सदानकदा कुठल्यातरी वृक्षावर आधारासाठी अवलंबून अशी वाटते.
पण तिच्या आत जर डोकावून पहाता आले तर लक्षात येइल की ती एक अवखळ सारिका आहे, तिला पडलेली तिच्या सख्याची भूल इतकी प्रभावी आहे की, सारी बंधने उधळून देऊन एखाद्या नदीप्रमाणे मिलनोत्सुक अशी तिची अवस्था आहे.
3 ती
सुखदु:खाच्या पलिकडे पोचली आहे, तिचे दगड झालेले मन सन्याशाप्रमाणे आता कसल्याही मोहात अडकत नाही. ( असं तिला वाटतय)
मग चंद्राचे शीतल चांदणे का बरे मनाला डागण्या देतय? कुठची अत्रुप्त इच्छा मनात अजून तग धरून आहे की वेराग्यात सुद्धा गीताचा म्हणजेच लपवलेल्या आर्ततेचा जोगवा मागतेय?
मग मनाचं वैराग्य , संवेदनाविरहितता वगैरे खरी का?
४ ती
जिच्या मनाच्या सृजनेतलाच या जगाने नख लावलेय, आता ती कधीच फुलणार नाही हे तिला पक्के माहित आहे . . पार्थाचे बाण जसे लक्ष्याचा अचूक वेध घेतात तसा अचूकपणे तिच्या मोहोराला जणू लक्ष्य केलेय, नेहमीचा जीवनदायी पाऊस आज जणूआग बनून बरसतोय.
मिळून मिळून काय मिळणार तर विष, जीवन नव्हे तरीही जगण्याची आशा, तहान चिवट आहे.
५ ती
वरून जरी तिचे घाव भरलेले वाटले तरी आत अजूनही जखम ओली आहे. ती सुकली नाहीये तर आत दु:ख साकळले आहे, वरून जरी पाणी गंगेप्रमाणे लोभस हिरवे शांत वाटले तरी आत विखारी शेवाळ आहे.
हे बाकी कुणी नाही पण त्या मुक्या जीवांनी ओळखलेय म्हणून त्या पाण्याला तोंड देखिल न लावता उधळून लांब पळत सुटल्या.
6 ती
मांडीतील आग न लपवणारी, जगाची पर्वा न करता उन्मादात गाणारी, ज्या भावना , क्रीडा किळसवाण्या रातकिड्यांप्रमाणे काळोखात उरकण्याचा जगाचा संकेत तो धुडकाऊन , त्या भावनांना अभय देणारी, जगाने तिच्यावर निर्लज्ज असा शिक्का मारलाय.
7 ती, आदिमाया,
ज्यात शिरले की अंत ठरलेला असे मायेचे चकवे निर्माण करणारी, की शेवटी फक्त राख उरते, शुन्य हेच सत्य हे माहित असूनही जगण्याची ओढ रंध्रांध्रात निनादत ठेवणारी!
7 Dec 2015 - 9:23 am | संदीप डांगे
साक्षात दंडवत महाराजा....
(कवितेप्रमाणेच रसघ्रणही डोक्याव्रून गेल्यात आले आहे)
7 Dec 2015 - 9:29 am | दमामि
अहो, कविता आणि रसघ्रण दोन्ही अॅब्स्ट्रॅक्ट आहे.
लोक अॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? कवितेतून जे अमूर्त भाव उभे केलेत त्याच्यामागच्या कवीच्या भावना जाणून घेणे आवश्यकच आहे काय? अमूक एक शब्द का वापरला याचा किस पाडून नक्की काय मिळणार
7 Dec 2015 - 9:58 am | संदीप डांगे
रसिकाच्या जाणिवेच्या कक्षा मर्यादित असतांना संवेदनांचा अपेक्षित पल्ला गाठू शकत नसल्याने अल्पगतीधारक बुद्धीने मनाच्या कल्पनाशक्तीपुढे पत्करलेली हार प्रत्यक्ष दिसत असतांना कविता समजली आहे असे म्हणणे कवीच्या मूळ प्रेरणेच्या आणि प्रकटनाच्या उद्देशाविरूद्ध वर्तन असून असे वर्तन रसिकाला मान्य नसल्यास त्याला शब्दांचा किस पाडण्यात किंचितही रस राहत नाही ह्या अवस्थेला डोक्यावरून जाणे म्हणतात असे आमचे पूज्य गुरुजी (गाढववाले)-कानाला हात लावल्याची स्मायली कल्पावी-(ज्यांनी एखाद्या शूरवीर पराक्रमी योद्ध्याप्रमाणे अशा लाखोंच्या झुंडींना सामोरे जात आयुष्यभर विजय मिळवला आहे -आकाशाकडे डोळे करून आदर व्यक्त करणारी स्मायली कल्पावे) सांगुन गेलेत.
7 Dec 2015 - 10:04 am | संदीप डांगे
---श्या! शतशब्दकथेला पंधरा शब्द कमी पडलेत---
एका वाक्यात यापेक्षा जास्त शब्द वापरण्याचा विक्रम कुणी केलाय का मिपावर ? अन्यथा माझे नाव मिपावर्ल्ड्रेकॉर्डमध्ये नोंदवावे अशी मी याठिकाणी घोषणा करतो.
- कीबोर्डखान मीचीबाराखडीवाले.
7 Dec 2015 - 10:26 am | दमामि
शतशब्दकथा की शतशब्दव्यथा?
7 Dec 2015 - 9:57 am | माहितगार
बर्याच रुपकांचा अंदाजा येण्यास मदत झाली. आता तुम्ही सुचवलेल्या अर्थांसहीत पुन्हा वाचून पाहतो. मी बर्यापैकी वेगळे अर्थ काढून वाचण्याचा प्रयत्न केला होता पण काही रुपकांचा अंदाज न आल्यामुळे गाडी अडली होती. रसग्रहणासाठी खूप खूप धन्यवाद.
7 Dec 2015 - 10:27 am | दमामि
:):)
7 Dec 2015 - 3:26 pm | मितान
पैजारबुवांचा प्रतिसाद पचतो न पचतो तोच तुमचा प्रतिसाद आला. अर्थाचे एवढे आरोप माझ्या कवितेवर झालेले बघून मूर्च्छित होऊन जी पडले ती एवढ्या तासांनी शुद्ध आली !!!!
तुम्हालाही साष्टांग नमन !!!!!
पण अजून एका थोर व्यक्तीच्या प्रतिसादाची आस लागली आहेच ;)
7 Dec 2015 - 7:06 pm | दमामि
वो हाथ मुझे दे दे... का?
7 Dec 2015 - 11:25 am | पगला गजोधर
5 Dec 2015 - 10:40 pm | टवाळ कार्टा
शष्प काही समजले नाही...कोणी मराठीत अर्थ लिहिल काय
6 Dec 2015 - 7:08 am | मितान
टवाळजी कार्टाजी,
काविता वाचल्याबद्दल धन्यवाद.
ही कविता खरंच मी मराठीतच लिहिली आहे हो. वाटल्यास अवतीभवती असणार्या भाषा अभ्यासकांना विचारा.
तरीही तुम्हाला समाजायला अवघड गेली याचे वाईट वाटले.
असो.
5 Dec 2015 - 10:52 pm | स्रुजा
काय न कळण्याजोगं आहे यात? स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! एक एक कडवं पुन्हा पुन्हा वाचत गेलं की तरल अर्थ उमटत जातो . आयुष्याचं सार मांडलं आहे जणु !! वाह वा !!
6 Dec 2015 - 7:15 am | मितान
स्रुजाताई,
हो, या कवितेतून असाही एक अर्थ निघू शकतो.
मनाच्या संस्काराच्या गाभार्यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आणि ती चौकट वापरण्याचा पूर्ण अधिकार रसिकांचा असतोच.
5 Dec 2015 - 11:10 pm | अजया
तुमचा अनर्थशास्त्राचा गाढा अभ्यास बघून वारल्या गेले आहे.
6 Dec 2015 - 12:20 am | स्रुजा
बघ एस भौंना आणि अकुंना पण आवडली आहे. त्यांना नाही सांगायला गेलीस ते तुझ्या वारण्याची कथा :प
5 Dec 2015 - 11:23 pm | अविनाशकुलकर्णी
छान
5 Dec 2015 - 11:48 pm | एस
कविता अनर्थशास्त्रावर असली तरी का कुणास ठाऊक आवडली आहे. वाखुसाआ.
6 Dec 2015 - 7:09 am | मितान
अकु, एसभाऊ,
अनेकानेक धन्यवाद !
6 Dec 2015 - 1:10 am | कवितानागेश
शून्य कशाचे प्रतिक आहे ते नक्की सांग, मगच मी रसग्रहण करेन.
6 Dec 2015 - 7:06 am | मितान
सभोवतालच्या अनुभवल्या जाणार्या वातावरणामुळे माझी कलात्मक प्रेरणा संजिवीत होताना एक कलाकार म्हणुन सवेदनांच अटॅच-डिटॅच फ्रिक्वेन्सी एका विशिष्ट वेगाने तयार झाली. त्यातून हे अमूर्त काव्य प्रसवले.
कविता झाल्यामुळे अर्थात मी कवयित्री झाले. आणि कवीने आपल्या उपमांचे स्पष्टीकरण द्यायला जाऊ नये म्हणून मी कोणतेही स्पष्टीकरण द्यायला जाणार नाही.
रसिकांनी आपल्या जाणिवांच्या रंध्रांवरची फोल पटे दूर सारली तर नक्कीच या कवितेचा आस्वाद घेता येईल ! :)
6 Dec 2015 - 8:04 am | स्रुजा
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)
6 Dec 2015 - 8:04 am | स्रुजा
थोडक्यात रसिकांनी आपल्या जाणिवांचं फेशियल करावं, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे साफ होतील. टवाळजी कार्टाजी यांना हा ही प्रतिसाद कळला नाही तर हे स्पष्टीकरण हो ;)
6 Dec 2015 - 8:11 am | अजया
मी शेंगा खाल्ल्या नाही.मी फोलपटे टाकणार नाही.आधीच सांगून ठेवतेय.
6 Dec 2015 - 11:57 am | माहितगार
पहिली कविता आहे ? निश्चितच अभिनंदन, असेच लिहित रहा. प.ले.शु (पुढील लेखनास शुभेच्छा)
6 Dec 2015 - 7:50 am | अजया
नुसती शब्दांची चमकती माळ मांडली की कविता झाली असे वाटत असेल तर ती केवळ पोकळ अभिव्यक्ती ठरेल.आपण ग्रेस यांच्या कवितेचा सखोल अभ्यास करणाऱ्यांचा अभ्यास न केल्याने असे अॅबस्ट्रॅक्ट काव्य प्रसवले आहे.
कितव्या पाणीपुरीनंतर ही कविता तुम्हांस झाली हे कळु शकेल का?
नवरातकिडे कुठे आढळतात?
निर्लज्ज उगवतो अंकी म्हणजे काय?
रुपकांचं स्पष्टीकरण देता येत नसेल तर हा कवितारुपी शब्दांचा बाजार भरवून आपण भ्रष्ट नकलेची नक्कल काढता आहात असा हा प्रकार आहे.
6 Dec 2015 - 9:26 am | मितान
अजयाताई, तुमचा प्रतिसाद व्यक्तिगत होत आहे.
नसेल पाणीपुरी पचत तर मान्य करावे ना...उगाच ते पोकळ अन्न वगेरे रडरड करत राहू नये.
कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण देण्यास कवयित्री पक्षी आम्ही म्हणजे मी बांधील नाही हे ठणकावून सांगतेय !
6 Dec 2015 - 10:04 am | अजया
पाणीपुरीसारख्या पोकळ अन्नावर पोसलेली कविता सपष्ट दिसत असताना आपण अमान्य करत आहात.एक पक्षी साॅरी एक कवयित्री म्हणून आपण आपल्या भावनांचे फेशीयल तटस्थ राहुन करु शकत नाही असा याचा अर्थ आहे.
6 Dec 2015 - 1:00 pm | इशा१२३
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल?
अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!
6 Dec 2015 - 1:01 pm | इशा१२३
अजयाताई तुमची टिका नक्की कशावर आहे?पाणीपुरीवर कि कवितेवर?केवळ विरोधासाठी विरोध का हा.असो कवितेच एकवेळ राहुद्या पण पाणीपुरीवरची टीका पक्षी सॉरी एक खवय्यी कवयित्री कशी काय सहन करू शकेल?
अखिलपाणीपुरीखवय्येसंघटनेतर्फे त्रिवेणी यांच्या अध्यक्षतेखाली अजयाताई तुमचा निषेध!!!
6 Dec 2015 - 1:17 pm | पैसा
Déjà vu !!
(नवरातकिडे हे मी चुकून 'नवरा तिकडे' असं वाचलं त्यामुळे confusion मध्ये अंमळ भर पडली.)
6 Dec 2015 - 1:32 pm | इशा१२३
खिक्क!आता नव्याने कवितेचे रसग्रहण करावे लागेल.
6 Dec 2015 - 8:21 am | संदीप डांगे
रसग्रहणासाठी माहितगार यांना आवाहन.
6 Dec 2015 - 9:21 am | मितान
=)) =))
6 Dec 2015 - 11:53 am | माहितगार
=))
6 Dec 2015 - 8:25 am | कंजूस
काही कळले नाही.
"स्त्री ची व्यथा मांडली आहे, किती गहिरा अर्थ आहे ! ----"
आणखी एक वकील.
जाऊ द्या समजावत बसू नका कारण सोपी गोष्ट आणखी सोप्पी करता येत नाही आणि सरळ रेषा आणखी सरळ करता येत नाही असं आमचं मत आहे.
6 Dec 2015 - 8:35 am | स्रुजा
अय्या सरळ रेषा कशाला सऱळ करायची अजुन ?? वाकडी करण्यात च गंमत आहे :P
6 Dec 2015 - 8:33 am | कंजूस
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे.पुरूष त्यांना समजून घेतात/समजूतदारपणा दाखवतात त्यामुळे ते अगोदरच रिंगणाबाहेर गेलेत.उर्वरित निरूपणासाठी बॅटन टवाळ कार्टाकडे सोपवण्यात येत आहे आणि आज रविवार असला तरी ठाणे मॅरथॅान नाहीये.चालू/पळी द्या धागा हळहळू २१ किमीटरकडे.
6 Dec 2015 - 9:26 am | अत्रुप्त आत्मा
@हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे. >>
7 Dec 2015 - 1:12 pm | पियुशा
हल्लीच्या मराठी मालिका पाहून स्त्रियाच स्त्रियांच्या व्यथा आहे असे लक्षात आले आहे
काय लॉलताय बुवा :प
पुरुशी व्यथा जाणुन घ्यायला कोण त्या काळातल्या मालिका पाहयच्या बर्र ? ?
(प ळा... )
6 Dec 2015 - 8:37 am | भुमी
अति सुंदर काव्य.मितानजींच्या प्रतिसादामुळे कवितेचे अंतरंग नीट उलगडले आहेत असे वाटतेय. रसिक ,अभ्यासू ,जाणकार, सुज्ञ अजून प्रकाश पाडतीलच.
6 Dec 2015 - 9:09 am | इशा१२३
मुक्त काव्य आवडले.एक एक शब्द अनेक अर्थान उलगडत जातो य. स्त्रि व्यथेचि कथा मनाला भिडलि.
अजयाताइच्या प्रतिसादाचे नवल वाटतेय.कविता समजुन घ्या बर.
6 Dec 2015 - 9:27 am | अजया
कविता १९७८ आमच्या मैत्रीण असल्याने केव्हाच्या समजूनच घेतोय :(
6 Dec 2015 - 9:34 am | कविता१९७८
मला समजतीयेना कविता मग अजयाताई तुम्हाला समजायला काय कठीण आहे??? तुम्ही तर कीती कठीण कठीण दात पाडता हो महाभागान्चे
6 Dec 2015 - 9:11 am | कविता१९७८
कविता आवडली
6 Dec 2015 - 9:13 am | सस्नेह
अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो हे या काव्याचे यश !
मितान कसं गं सुचतं तुला ?
6 Dec 2015 - 9:22 am | मितान
खिक्क !!!! ;)
6 Dec 2015 - 9:26 am | अजया
मराठीत टँजंट म्हणायचे आहे का आपणांस?
6 Dec 2015 - 11:56 am | सस्नेह
आपल्या मराठीइतकीच आपली जाणीव साकल्ययुक्त आहे !
6 Dec 2015 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा
@अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! >> वारलो!
6 Dec 2015 - 9:31 am | स्रुजा
फक्त तुला कळली आहे ही कविता .. लोल.. __/\__
6 Dec 2015 - 9:45 am | इशा१२३
वा!सुरेख विवेचन स्नेहाकिता.
प्रतिसाद आवडला.
6 Dec 2015 - 11:10 am | Maharani
स्नेहाकिता..महालोल
6 Dec 2015 - 11:11 am | मित्रहो
धन्यवाद, आजतागायत कुठलीच कविता अशी समजली नव्हती.
6 Dec 2015 - 10:16 am | कवितानागेश
ही कविता तुमची वाटत नाही मितानताई...
6 Dec 2015 - 11:12 am | मितान
होक्का ???
मग कोणाची वाटते म्हणे ?
इथे प्रतिभेचा आदर करण्याची पद्धतच दिसत नाही. !!
6 Dec 2015 - 11:31 am | कवितानागेश
मला असे म्हणायचे आहे की एखाद्या महान कवीची वाटतेय!
.... तुमच्यासारख्या कवयित्रीची वाटत नाही. फार छान उतरलिये.
7 Dec 2015 - 2:17 pm | जातवेद
हे म्हणजे, आप पुरूष नही बल्की महापुरूष हो टैप झालं ;)
6 Dec 2015 - 11:34 am | कवितानागेश
तुमच्या शैलीवर एका विशिष्ट कवीचा प्रभाव जाणवतोय. कवितेला जी लय आहे ती विशेषतः त्याच कवीकडून उचलल्यासारखी भासतेय.
6 Dec 2015 - 11:36 am | जव्हेरगंज
पहिली चार कडवी समजली असं वाटत असतानाच शेवटची तीन कडवी डोक्यावरुन गेली.
म्हणून पहिली चारच कडवी आवडली!
6 Dec 2015 - 11:38 am | जव्हेरगंज
काव्यरस:
अनर्थशास्त्र
इशारा
फ्री स्टाइल
भूछत्री
मुक्त कविता
विराणी
सांत्वना
लेखनविषय::
पाकक्रिया वाङ्मय कविता क्रीडा>>>>>>>
अर्रर, असं आहे का हे ???
मग लगे रहो!!!;-)
6 Dec 2015 - 11:41 am | मारवा
कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ?
आम्हाला तर एकही प्रतिसाद पण नाही कळला.
कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ?
ग्रेस चा प्रभाव आहे हे पुर्णपणे चुकीचे विधान आहे.
उद्या तुम्ही
घर थकेला संन्यासी
भित बी हलु हलु खचरेयली है
या पपन च्या ग्रेसच्या कवितेचा बिहारी मित्राला समजावुन सांगण्यासाठी केलेल्या अनुवादावरही
आक्षेप घ्याल
6 Dec 2015 - 11:42 am | रातराणी
खूप छान लिहिता आहात आपण. चिकित्सा करणाऱ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. त्याना लिहिता येत नाही म्हणून असे प्रतिसाद देतात. कसलीही स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्यासारख्या प्रतिभावान पक्षी आपलं ते हे कवयित्रीला ते कराव लागतय हे अत्यंत केविलवाण
आहे.एक मिपाकर म्हणून शरम वाटली आज. इथे चिकित्सा करणाऱ्या सर्वांना एकच प्रश्न विचारतो आपलं ते हे विचारते शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला?
आपण लिहीत रहा बिनधास्त. कुणी त्रास दिला तर म्हणा गोली मार भेजेमे. येत रहा. _/\_
6 Dec 2015 - 11:54 am | संदीप डांगे
शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला?
त्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळतील ह्याचे मार्गदर्शन आमचे मास्तर गाईड नामक बुकातून करत असत. ;-)
त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...
6 Dec 2015 - 11:58 am | रातराणी
आँ अच्च्च जालं तर..
6 Dec 2015 - 12:08 pm | माहितगार
:) किती तो चिकित्सेवर राग ! चिकित्सेची चिकित्सा करणार्यांसाठी पूर्ण गुण ! :) (ह.घ्या.)
6 Dec 2015 - 12:12 pm | मितान
त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...>>>>>>>
असं नै ! असं नै रागवायचं. राग आला ना की छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळतो आणि मग स्पंदनं निर्माण होतात असं दामोदरपंत म्हणायचे !!!
6 Dec 2015 - 12:12 pm | जव्हेरगंज
हैला, भारी लिहीलयं की आपलं ते हे रातराणी!
6 Dec 2015 - 12:12 pm | जव्हेरगंज
हैला, भारीच लिहीलयं की आपलं ते हे रातराणी!
6 Dec 2015 - 12:27 pm | रातराणी
कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या माउलीचे जिच्यामुळे मला पुन्हा प्रतिसाद प्रसव संवेदना झाली. _/\_
6 Dec 2015 - 11:46 am | pacificready
छान पाकृ.
घरी आलो असल्यानं करुन पाहता येईल.
6 Dec 2015 - 11:49 am | जेपी
हाफशेंच्युरी...
होऊ द्या सत्कार
6 Dec 2015 - 11:52 am | रातराणी
सत्कार करायचा का ओटी भरायची? अशा चुका नाही करायच्या जेपी भाऊ. संपादक व्हायचय की नाही तुम्हाला? :)
6 Dec 2015 - 11:55 am | pacificready
प्रतिभा लिंगसापेक्ष नसते. सत्कार करायचा तो आविष्करणाचा.
- 2 3 असेच लेख कविता वाचल्यावर मैं कहां हूँ वाटू शकेल असा
6 Dec 2015 - 12:02 pm | रातराणी
ब्वार्र प्यारेकाका. ब्रोब्र आहे तुमचं.
6 Dec 2015 - 11:57 am | मारवा
ओटी भरायला हे अनाहिता आहे का ?
हा मेन बोर्ड आहे मेन बोर्ड
इथे होणार फक्त सत्कार
6 Dec 2015 - 12:00 pm | रातराणी
मेन बोर्ड अनाहिता नाही असं म्हणता? चश्मा बदला मारवाजी. :)
6 Dec 2015 - 12:09 pm | मितान
शी बै ! ओटी की सत्कार वगेरे टिपिकल मिडिऑकर चर्चांसाठी दुसरा धागा काढा बाई !
इथे या धाग्यावर केवळ प्रतिभेच्या उच्च आविष्करणाबद्दल आपल्या संवेदनशील जाणिवांमधुन प्रसृत झालेल्या चमत्कृतीजन्य संकल्पनांवर चर्चा व्हावी !!!
6 Dec 2015 - 12:21 pm | रातराणी
होऊ द्या खर्च!
6 Dec 2015 - 12:17 pm | नीलमोहर
त्यांनी फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून एकापुढे एक जोडले नाही आहेत.
सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टी अतिप्रचंड प्रमाणात अंगी असतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरत नाही.
अर्थात इतक्या लोकांनी भयंकर कंफ्यूजन केल्यावरही कवितेचा फोलपणा न दाखवणं साहसाचं होतं
पण कोणतीच कविता सखोल अभ्यासली नसल्यानं ते सोपं होतं.
मुळात 'बसलं' की काहीही अर्थ निघू शकतात, पण आपण कधीच 'बसत' नसल्याने अर्थ काढण्यात खूप कमी पडतो ;)
6 Dec 2015 - 12:19 pm | संदीप डांगे
म्हणजे कवयित्री का कवियत्री च्या अमुर्त अपेक्षांची पुर्तता करण्याची जाणीव रसिकांमधे जागृत राहील...
6 Dec 2015 - 12:20 pm | आदूबाळ
एकदम फ्रेस आहे कविता.
6 Dec 2015 - 1:00 pm | पिशी अबोली
अंगावरून झुरळ फिरताना त्याची फिरण्याची जागा काही सेंटीमीटरपुरती मर्यादित असली, तरी त्याची जाणीव साकल्याने होते. सृष्टीच्या चराचरात एक साकल्यभाव त्याच्या गूढ अस्तित्वाने एक रंजकता निर्माण करत असतो. पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली.
(^_^)
6 Dec 2015 - 2:25 pm | अजया
एक नं झुरळपूर्ण प्रतिसाद _/\_