वाङ्मय
मरण!
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!
दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत
शेतकरी साहित्यही पुढे यावे
सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन
कहे कबीरा (२)- सुनता है गुरु ग्यानी !!
सुनता है गुरु ग्यानी ।
गगन में आवाज हो रही
झीनी झीनी ।
नभ मेघांनी आक्रमिले...घन घन माला नभी दाटल्या...त्या ढगांचा गडगडाट होतो आहे आणि लवकरच पाऊस सुरू होणार आहे ही सामान्य घटना कबीर एका वेगळ्या नजरेतून बघतात.
आणि त्यांच्या 'भाई साधो' लोकांना प्रश्न विचारतात..
सुनता है गुरु ग्यानी? गगन में आवाज हो रही, झीनी झीनी. माझ्या ज्ञानी मित्रा, तुला गगनात होणारा आवाज ऐकू येतोय ना?
मी अश्व!!
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित!
वेग अफाट
शक्ती अचाट
अंगी डौल
मोल अमोल
निष्ठा घोर
इतिहास थोर
करारी बाणा
सखा महाराणा
बनता दळ
सैन्या बळ
आजीचे कथन
पऱ्यांचे वाहन
नीज गहाण
वया परिमाण
लौकिकी मती
प्राणी जगती
अडीच पावली
चौसष्ठ आलयी
पौरुष नामांकन
दिव्य आभूषण
मिळता सात
तिमिरा मात
ऋणी विश्व
मी अश्व!!
- संदीप चांदणे
तू फूल कुणाचे देखणे?
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू!
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून त्यांच्या देशा!
रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा?
जा निघून हलक्या पायाने....
तू फूल कुणाचे देखणे?
नको उन्हात हासत राहू.....
-शिवकन्या
मराठी भावानुवादः मैं चमारों की गली तक ले चलूँगा आपको - अदम गोंडवी
कवी रामनाथ सिंग जे अदम गोंडवी ह्या नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या अनेक जबरदस्त कवितांपैकी ही एक कविता. शिर्षकासारखी ही थोडी लांबलचक आहे. पण वाचली पाहिजेच. मूळ कविता इथे दिली नाही कारण ती खरंच दिर्घ आहे.
घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान
झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान
सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते. ती घोरत होती आणि तिच्या कुशीत बसलेली मनिमाऊं म्यांव म्यांव करत अर्धोन्मिलित डोळ्यांतून गुलामांकडे टक लावून बघत बसलेली.
पहिला गुलाम बोलला, "झोपलेली असते तेव्हा ही म्हातारी किती किळसवाणी वाटते, हिचा लटकलेला जबडा बघा; आणि श्वास तर असा घेते आहे जणू सैतानाने हिचा गळा दाबून धरला आहे."
मनिमाउं म्यांव करत म्हणाली, "उघड्या डोळ्याने हिची गुलामी करतांना जितके कुरूप तुम्ही दिसता, झोपलेली असतांना ही त्याच्या अर्धीपण भयंकर दिसत नाही."
बोबडी कविता!
बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!
इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!
बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!
- संदीप चांदणे