वाङ्मय

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
28 Nov 2016 - 8:14 pm

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

संस्कृतीकलावाङ्मयविचार

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Nov 2016 - 12:46 pm

['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]

पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणकालगंगाभावकवितामुक्त कवितासांत्वनाशांतरसवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानप्रवासभूगोल

एक पत्र "पप्पा"साठी

कऊ's picture
कऊ in जनातलं, मनातलं
14 Nov 2016 - 8:48 am

प्रिय पप्पा,
मुळात आधी एकाच घरात राहत असताना पत्र लिहिलचं का?हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.6 नोव्हेंबरला माझा वाढदिवस झाला. पण तेव्हा तुम्हाला सांगितलच नाही की तुम्ही बनवलेली बिर्याणी मस्त झाली होती.
दुसर्याच दिवशी अंकिताने message केला की "कऊ तुझे पप्पा किती भारी आहेत ग,अस वाटलचं नाही की त्यांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो."

वाङ्मयलेख

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
9 Nov 2016 - 3:37 pm

दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता.

चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!"

पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच.

वाङ्मयकथासाहित्यिकkathaaमौजमजाअनुभवविरंगुळा

डॉ.अक्षयकुमार काळे : एक ओळख. (अ.भा.मराठी साहित्य संमेलन उमेदवार)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 9:41 pm

राम राम मंडळी. डोंबिवली येथे नियोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची रणधुमाळी सुरु झाली आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद शाखेत डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. आम्ही त्यांचे पाठीराखे, आणि मतदार असल्यामुळे आम्हीही त्यांच्या सोबत होतोच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य समाज आणि संस्कृतीच्या चिंतनाचं एक व्यासपीठ आहे, असे आम्ही समजतो. मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीचा विचार त्या विचारपीठावरुन मांडल्या जातो हे अनेकांना माहिती आहेच.

संस्कृतीवाङ्मयसाहित्यिकशुभेच्छा

दिवाळीचे दिवस - डॉ. सुधीर रा. देवरे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 1:57 pm

बालपणी दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे. दुसरीकडे माझी आकाशदिव्याची तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्‍यांच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे.

वाङ्मयलेख

दिसत जावं माणसानं

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
17 Oct 2016 - 6:49 pm

हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही. मराठीत रूपांतर करताना एक कडवं अधिकचं जोडलं आहे.

दिसत जावं माणसानं
- © मंदार दिलीप जोशी
http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html

भावकवितामुक्त कवितावाङ्मयकविता

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
30 Sep 2016 - 7:55 am

अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !

या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!

- शिवकन्या

अविश्वसनीयकविता माझीकालगंगाभावकवितामुक्त कविताविराणीवीररसधोरणमांडणीवावरसंस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजराजकारण

धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ?

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
29 Sep 2016 - 10:52 pm

नारायण धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ? -

अवकाशाशी जडले नाते , अधःपात , अघोरी हिरावट , कालगुंफा , आसमंत, गुढात्मा , चेटूक , तळघर , न्यायमंदिर ,पानघंटी, बहुरूपी , बंध , मोहिनी , मैफल , युगपुरुष , विलक्षण सूड , विश्वसम्राट , विश्वव्यूहाचा भेद , विषारी वारसा , शोध , शिवराम , कुलवृत्तांत , किमयागार, कृष्णा , सरिता .

वाङ्मयचौकशी