घर

नकुल पाठक's picture
नकुल पाठक in जनातलं, मनातलं
4 Dec 2016 - 9:44 pm

एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं.

बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ.

घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं. कधी निरव शांतता तर कधी भयाण. कधी गोंधळात टाकणारे आवाज तर कधी चलबिचल करणारे बोल. कधी मोह घालणारे सुरेल आवाज असलेले सुर तर कधी हळुवार पकड घेणारे वाद्यांचे ताल.

काही गोष्टींसाठी विशिष्ठ जागा तर काही अगदीच अडगळीत टाकलेल्या, अस्ताव्यस्त. कुंपणाच काम ह्या सर्व गोष्टी सांभाळून ठेवणं अशी खुळी समजूत.

अशी ही घराची परिस्तिथी मिनिटांत विचारांचं गणित बदलणारी, सैरभैर. दावं सुटलेल्या बैलासारखी.

आणि आपल मन, ह्या घराला सामावून घेणारं.

वाङ्मयसाहित्यिकविचारलेख

प्रतिक्रिया

केडी's picture

4 Dec 2016 - 10:16 pm | केडी

क्या बात है! जमलंय....

देशपांडेमामा's picture

5 Dec 2016 - 7:08 am | देशपांडेमामा

छान लिहिलय!

देश

अरिंजय's picture

5 Dec 2016 - 8:24 am | अरिंजय

फार छान लिहिलंय.

ज्योति अळवणी's picture

5 Dec 2016 - 9:43 pm | ज्योति अळवणी
ज्योति अळवणी's picture

5 Dec 2016 - 9:44 pm | ज्योति अळवणी

प्रत्येकाच्या मनात असत असं एक घर. मस्त!

नीलमोहर's picture

5 Dec 2016 - 10:10 pm | नीलमोहर

मस्त लिहिलेय,

पैसा's picture

5 Dec 2016 - 10:13 pm | पैसा

छान!

नकुल पाठक's picture

5 Dec 2016 - 11:23 pm | नकुल पाठक

धन्यवाद मंडळी ! :)