डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन
डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन / २०-०६-२०१४ /
पृष्ठे १५७ / रुपये १७०/- / कथा संग्रह:
स्त्री ची अनेक रूपे असतात. वयानुसार हि रूपे बदलत जातात, तसेच त्या स्त्रीची मानसिकता, जगाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आमुलाग्र बदलते. लेखिकेने अश्याच वेगवेगळ्या रूपातील स्त्रीयांचा व त्यांच्या बदललेल्या मनाचा - आयुष्यातील भूमिकेचा मागोवा घेतला आहे.
कथा संग्रहात ११ कथा अहेत. ह्या सर्व कथा मासिकात ह्यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय आहेत. परंतु खालील कथा खूप लक्षवेधी आहेत …. डेट, पैलतीरावर, एका मोकळ्या श्वासासाठी.