"लेट मी अवेक!"
"नाऊ!!!!"
मनिष झोपेतून दचकून जागा झाला!
'ती!'
"का त्रास देतेय मला?"
"आमचं नातं कधीच संपलं,डेथ व्हॅलीमध्ये!"
"का तिला परत यायचय?"
ह्या विचारासरशी मनिषच्या अंगावर सरसरुन काटा आला!
"अशक्य!!!!!"
-----------------------
"हेलो आर.एम!" मनिषने समोर बसलेल्या व्यक्तीला अभिवादन केले.
"हॅलो सन."ती व्यक्ति म्हणाली.
"मनिष तू इथे येण्यास कारणही जबरदस्त असलं पाहिजे."
"जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यासाठी लोक कुठलीही कारण शोधतील."
"पण तू वेगळा आहेस,मनिष!"
"नाही मी वेगळा नाही."
"हो तू आहेस."
"बरं मला तुमच्या लायब्ररीत एंट्री मिळेल?"
"त्यात फक्त दोन व्यक्तींना एंट्री आहे."
"कोण?" मनिषने विचारले.
"मनिष आणि आर.एम!"
मनिष हसला आणि लायब्ररीच्या दिशेने गेला.
सोंटा लायब्ररी!
जगातील सर्वात मोठी लायब्ररी!
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची लायब्ररी!
जगातल्या सर्वात यशस्वी घोस्टहंटरची लायब्ररी!
जगातल्या सर्वात यशस्वी घोस्टहंटरच्या पिढ्यांनी बनवलेली लायब्ररी!
मनिष सोंटामध्ये बसला होता.अनेक पुस्तकांमधून त्याला हवे असलेले पुस्तक मिळाले होते.
१७०० साली आरेन यांनी लिहिलेले!
'द केस ऑफ़ ड्रीम्स!'
मनिषने पुस्तक पूर्ण वाचून काढले.
त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
मनिष लायब्ररीच्या बाहेर पडला.
आर.एम.त्याची वाट पहात उभे होते.
"उत्तरे मिळालीत?"
"हो!"
मनिष बाहेर जायला निघाला तेव्हा आर.एम.म्हणाले,
"अँद्रिआला मारल्यावर मला भेट."
"का?"
"कारण स्कायफॉल जवळ आहे!"
मनिषवर वज्राघात झाला!
तो बाहेर गेला.
----------------------
घरी आल्यावर मनिष सरळ झोपी गेला.
आणि स्वप्नात अँद्रिआच्या राज्यात पोहोचला!
"मनिष!"
"मला तू नको आहेस"
"मग कोण हवं आहे तुला?"
"अँद्रिआ!!"
क्षणार्धात ती स्त्री अदृश्य झाली!
आणि समोर 'ती' आली.
"अँद्रिआ!!!!"
"मनिष ये ना माझ्यापाशी,"ती म्हणाली.
"तू मला जाळ्यात नाही ओढू शकत."मनिषने प्रत्युत्तर दिले.
"मग कोण तुला जाळ्यात ओढू शकतं?"
"विचार कर!"
"समजल!" ती म्हणाली.
पुढच्याच क्षणी ती अदृश्य झाली.
अँद्रिआ रूप बदलत होती!
मात्र रूप बदलतानाच तिच्या चेहऱ्यावर असंख्य वेदना जाणवू लागल्या.
"अशक्य!" ती ओरडली.
"स्वप्नांच्या जगांपेक्षाही खरं जग स्वप्नवत असतं अँद्रिआ,"मनिष म्हणाला!
"पण ती..........."
आणि पुढच्याच क्षणी अँद्रिआचा अंत झाला!!!!!!!!
मनिषला जाग आली!
"ग्रेग!" तो पुटपुटला आणि घराच्या बाहेर धावला.
----------------------
"पण ती कोण होती, जिच रूप घेतांनाच अँद्रिआचा अंत झाला?" ग्रेगने विचारले.
मनिष उभा राहिला!
"ग्रेग, स्कायफॉल जवळ आहे!"
हे शब्द उच्चारुन तो बाहेर पडला!
----------------------
क्रमशः
(पुढील भागात 'पायरेट ऑफ़ द अरेबिक सी' आणि 'ती' कोण होती?
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 11:00 am | DEADPOOL
संपादक मंडळाला विनंती आहे की त्यांनी याआधीच्या भागाच्या लिंक येथे द्याव्यात!
21 Dec 2015 - 11:17 am | DEADPOOL
www.misalpav.com/node/34161
21 Dec 2015 - 11:17 am | DEADPOOL
www.misalpav.com/node/34161
21 Dec 2015 - 12:49 pm | पंतश्री
एकच वाक्य म्हणायचे आहे
" कडक "
21 Dec 2015 - 12:50 pm | यशोधरा
भारी!
21 Dec 2015 - 1:05 pm | DEADPOOL
धँस मंडळी!
21 Dec 2015 - 1:56 pm | समीर१२३४५६
एकदम मस्त अशाच अजून कथा येऊ दया
21 Dec 2015 - 2:00 pm | DEADPOOL
धँस समीरभाऊ
21 Dec 2015 - 2:07 pm | पद्मावति
हाही भाग मस्तं!
21 Dec 2015 - 2:21 pm | आदिजोशी
थोडे मोठे भाग ठेवले तर जास्त मजा येईल वाचायला.
21 Dec 2015 - 2:25 pm | आदिजोशी
थोडे मोठे भाग ठेवले तर जास्त मजा येईल वाचायला.
21 Dec 2015 - 2:29 pm | आदिजोशी
थोडे मोठे भाग ठेवले तर जास्त मजा येईल वाचायला.
21 Dec 2015 - 2:30 pm | DEADPOOL
अँद्रिआच्या कथेचा अंत म्हणून हा भाग छोटा झाला!
पायरेटचा भाग मोठा होईल!
धँस पद्मावती.
21 Dec 2015 - 4:10 pm | अनिरुद्ध.वैद्य
हा भागही आवडला! आन्द्रीयाच्या कथेचा अंत म्हणालात, पण ती का गेली, कळले नाही? खुलासे कधी? :D
पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
21 Dec 2015 - 4:20 pm | DEADPOOL
अहो सगळे खुलासे होतील!
ही कथामाला अत्यंत रंजक होणार आहे!
आई प्रॉमिस!
अवांतर: 'ती' ची कथा अँद्रिआच्या अंत कसा झाला ते सांगेल.
'पायरेट ऑफ़ द अरेबिक सी' मध्ये आर.एम.चं पूर्वायुष्य कळेल.
अनिशेठ कीप थिंकिंग!
गेसेस वेलकम!
21 Dec 2015 - 5:29 pm | सस्नेह
भलतीच रोचक कथामालिका आहे.
21 Dec 2015 - 5:36 pm | DEADPOOL
बादवे ती उपदेशन आणि ऊपासमार कथा मलाही थोडीफार लागू पडली होती! ;)
21 Dec 2015 - 5:58 pm | टुकुल
जबरदस्त..
21 Dec 2015 - 6:34 pm | DEADPOOL
भावा बऱ्याच दिवसांनी दिसलास!
ड्वले पाणवले!
22 Dec 2015 - 11:12 am | मयुरMK
जबराट पुर्वीसारखीच .
22 Dec 2015 - 12:23 pm | विजुभाऊ
काही संदर्भ लागत नाहीत.?
हे नक्की काय आहे . चित्रपट कथा? की आधारीत्/अनुवादीत कथा?
आध
22 Dec 2015 - 1:32 pm | DEADPOOL
ही कथा पूर्णपणे वरीजीनल हय!
संदर्भ लागण्यासाठी पुढचे भाग टाकणार आहे!
22 Dec 2015 - 1:33 pm | DEADPOOL
मयूर थँक्स!
22 Dec 2015 - 9:00 pm | जव्हेरगंज
वा!
इंटरेस्टींग होत चाललीय कथा!
येऊंद्या पुढचे भाग!!
22 Dec 2015 - 9:19 pm | DEADPOOL
थँक्स जव्हेरगंज!
22 Dec 2015 - 10:37 pm | मोगा
काइ कळेना
22 Dec 2015 - 11:22 pm | DEADPOOL
मंडळी पुढील भाग टाकला आहे!
22 Dec 2015 - 11:17 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/34204