आमचीबी चालुगिरी…
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा….
आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा..
त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो. आयटीयापाशी बसाचु आन थेट पांजरापोळ चौकात उतराचो.