आमचीबी चालुगिरी…

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Aug 2015 - 12:09 pm

मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा….

आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा..

त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो. आयटीयापाशी बसाचु आन थेट पांजरापोळ चौकात उतराचो.

एका दिशी काय जालं, आमच्या मागच्या शीटावर (म्हंजी बशीतल्या वो) दोन चिकण्या पोरी बसल्या व्हत्या. आता आमाला एक ले इचित्र सवय हाये बगा..

म्हंजी दिसलं देवाळ की जोड हात, दिसलं देवाळ की जोड हात !

पोरी जरा चालु व्हत्या, आमची खोड लक्षात आली आन त्येनी क्येलं की चालु चिडवाया. आमी देवाळ बगुन नमस्कार क्येला की त्याबी उटायच्या आन खिडकीत वाकुन नमस्कार कराच्या आन वर फ़िदी फ़िदी हासाच्या पण बगा. आमाले तर लैच कसंतरी वाटाया लागलं ना यार.

तेवड्यात काय जालं एका ष्टापवर बस थांबली. ष्टापकडं पायलं (ष्टाप कसला वो, खांबाला लटकवलेली पाटी नुसती) आमचीबी कळी खुलली (आयव मलाबी ते काव्याट्मक की काय ते लिवता अलं की)

तर ष्टापच्या म्हागं ध्यान ग्येलं आन आमी पटकनी हुबे रायलो आन झटकनी नमस्कार क्येला बगा..
तशा त्या पोरीबी हुब्या रायल्या आन त्येनी मी नमस्कार क्येला..

आता हासायची बारी आमची हुती… आमी लै (आक्षी रावणावानी) हासाया लागलो की द्येवानु…
बस हालली, पण हालता हालता पोरींना त्ये दिसलंच…

ज्येला आमी नमस्कार क्येला हुता त्यो एक बोर्ड हुता.
त्येच्यावर लिवलं व्हतं…

“सरकारमान्य देशी दारुचा गुत्ता”

पोरी अशा काय त्वांड करुन बसल्या की ज्याचं नाव त्ये! लै मजा आली राव…

तुमी बी क्येला आसलच की आसला चालुपना कंदी ना कंदी..
मंग सांगा की राव आमाला बी !

इरसाल म्हमईकर

मांडणीसंस्कृतीइतिहासवाङ्मयभाषाव्याकरणशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

दा विन्ची's picture

10 Aug 2015 - 12:23 pm | दा विन्ची

मी पयला.
आवडली पर भाषा जरा जास्तच गावठी वाटाय लागलीय. बहुतेक तुमचे नाव आधी वाचल्यामुळे.

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 3:04 pm | विशाल कुलकर्णी

काय कर्नार द्येवा. समदं जग फिरलु पर गावाकल्डी भाषा कशी इसरल म्हन्तू मानुस ? सोलापूरापास्नं सवाशेक किलोमिट्रावर गाव हाये आम्चं. करमाळा तालुक्यात घोटी म्हनुन्शान. लै नाय पर थोडी श्येती हाय ततं. ;)

सामान्यनागरिक's picture

10 Aug 2015 - 4:21 pm | सामान्यनागरिक

मंजी या हिकडे धूतल्या अंगाला ईस ईस यकराचे दोन टुकडे ; आन त्या खादल्ल्या हाताला ईस न पाच यकराचे दोन टुकडं अशी इतकुशी जिमीन हाय बगा....जातो कदी मधी बोल्लेरो घिऊन फेरी माराला .

टवाळ कार्टा's picture

10 Aug 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा

खिक्क

प्रियाजी's picture

10 Aug 2015 - 1:59 pm | प्रियाजी

कथा आवडली. तुमच्या समयसूचकतेचे कौतुक वाटले.

बाबा योगिराज's picture

10 Aug 2015 - 3:10 pm | बाबा योगिराज

येक लम्बर.....

हान तिच्या मारी......

नाव आडनाव's picture

10 Aug 2015 - 3:21 pm | नाव आडनाव

:)

देवळात पर्साद घ्याया न्याचं की पावन्यांना. समदी भक्तमंडळी खुश झाली आस्ती की! ;)

जडभरत's picture

10 Aug 2015 - 4:51 pm | जडभरत

+१

अभिजित - १'s picture

10 Aug 2015 - 5:39 pm | अभिजित - १

वा !!

अभ्या..'s picture

10 Aug 2015 - 6:07 pm | अभ्या..

नको विशाल नको.
तुझ्या नेहमीच्या दर्जेदार लेखनाला असली ठिगळं लावू नको. ही ना सोलापुरची ना बार्शीची ना कम्प्लीट करमाळ्याची भाषा वाटते. उगी नको असे लिहूस प्लीज. (आणि त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता. तपशीलात नाही गंडायचे आपण ;) )
.
.
तुझाच सोलापुरी मित्र.
अभ्या..

त्या आक्ख्या रोडवर म्हणजे विजापूर नाका ते पांजरापोळापर्यंत रंगभवन वरुन गेले तर मेन रस्त्यावर एकपण देशी दारुचे दुकान नाही रे. स्टेशनमार्गे आहे पण बंदय आता क्काय पाठांतर!!! ;) गंमतीत घ्या!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्ये कालिजात आस्ताना आसंल-बिसंल. तुमी दुकानाचे इनिसपेक्टर जनूं, आँ ;) :)

अभ्या..'s picture

10 Aug 2015 - 7:46 pm | अभ्या..

व्हय.
त्येनी नमस्कार कर्तेत, आमी इनस्पेक्षन कर्तो.

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 9:37 pm | विशाल कुलकर्णी

नजर लागते अभ्याशेट, चला माझ्याबरोबर एक दिवस . एक नाही किमान सहा दाखवतो. भाषेबद्दल म्हणाल तर ती त्या भागातली कुठलीच बोली भाषा नाहीये, मी लेखाखाली वापरलेले टॅग्स वाचले असतेत तर त्यातली खोंच लक्षात आली असती. असोच.... ;)

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 9:43 pm | विशाल कुलकर्णी

आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा पासआऊट झालो, तुम्ही किती साली होतात?

नाही राव तुमच्यासारखि नजर आमची. आणी तुमच्यासारख इंजीनियर बी नाही झालो. उगी चार वर्षे एक बार चालवला फ़क्त. ते बी सोडल. आता हाव निवांत. ते काय टयाग पन कळत नाहीत म्हणून मापी असावी बरका. जाता जाता सांगताव. कंट्रीचे लायसन आता २ कोटाच्या वर जातय. आन नवीन बंद हाय द्यायचे. ;-)

प्यारे१'s picture

11 Aug 2015 - 12:03 am | प्यारे१

2 कोटी????? बाब्बो!

बाकी आमच्या गावच्या 'माननीयां'चा स्वत:चा असा 'राष्ट्र'-वादी बार आहे.
त्यांना मनुष्यबळाची गुंतवणूक फार कमी लागते.
काही 'कार्यकर्ते' उजाडायची वाट पाहत असतात. उजाडलं आणि दुकानवाला माणूस चावी घेऊन आला की यांची गड़बड़. साफ सफाई करतील, सडा घालतील, दूकान मस्त आवरतील, रिकाम्या चपटया बाजूला जातील, क्रेट कोपर्यात जातील, सगळां सुशेगात. तोवर दुकानदार दिवाबत्ती करुन घेतो. हे चुळबुळ करत कधी एकदा पॉवर प्ले सुरु होतो याची वाट बघत थांबलेले... हे झालं की काचेचे ग्लास भरले जातात. अगरबत्तीचा वास नाकात आणि ग्लास तोंडात रिकामा एकदम च. अतिशय कडू औषध एका घोटात संपवलं जावं अशा पद्धतीनं पेला एका घोटात रिकामा.

एक झटका आणि गड़ी कामाला! सकाळचे 7-7.30 वाजत असतात.

अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला होता बे तु. ये बे समाधान ला जाऊत.

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 9:39 pm | विशाल कुलकर्णी

दादा, चंडकला होतो, इलेक्ट्रोनिक्सच्या डिप्लोमाला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Aug 2015 - 8:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

हे भारी आहे!!!! आता एक किस्सा वर्हाड़ीत लिवणे आले !!! :D

तीरूपुत्र's picture

10 Aug 2015 - 10:12 pm | तीरूपुत्र

भारी आहे.

सुहास झेले's picture

10 Aug 2015 - 10:30 pm | सुहास झेले

=)) =))

Pain6's picture

11 Aug 2015 - 10:45 am | Pain6

शेवट कळला नाही.
दारूची दुकाने ही हात जोडण्याचीच ठिकाणे नाहीत का?

विशाल कुलकर्णी's picture

11 Aug 2015 - 10:58 am | विशाल कुलकर्णी

अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून हात जोडण्याचीच ठिकाणे आहेत ;)

gogglya's picture

11 Aug 2015 - 3:15 pm | gogglya

तर लोटांगण पण घालतात भावीक जन...

बबन ताम्बे's picture

11 Aug 2015 - 6:26 pm | बबन ताम्बे

समाधीत पण जातात !

पैसा's picture

11 Aug 2015 - 6:32 pm | पैसा

लै भारी किस्सा!